आज आपण बघणार आहोत केक बनवण्यासाठी कोणकोणत्या टूल्स ची आवश्यकता असते.
१.मोजण्याचे कप आणि चमचे measuring cups and spoons for cake making
बेकिंगमध्ये अचूकता असते, म्हणून हातात मोजण्याचे कप आणि चमचे यांचा संपूर्ण संच असणे आवश्यक आहे. सर्व घटक अचूकपणे मोजण्यासाठी तुम्हाला मोजण्याचे कप आवश्यक असतील. ही साधने स्वयंपाकघरात सहज मिळतील अशा ठिकाणी ठेवा, कारण तुम्ही ती नेहमी वापराल, फक्त केक साठीच नाही तर इतर रेसिपीज साठी सुद्धा या साधनांचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल. त्यामुळेच मोजण्याचे कप आणि चमचे यांचा संच असणे नक्कीच आवश्यक आहे.
बहुतेक मोजण्याचे कपाच्या संचात एक कप, ½ कप, ⅓ कप आणि ¼ कप अशा पद्धतीने कप येतात.
२. रबर /सिलिकॉन स्पॅचुला rubber or Silicon spatula for cake Making
सिलिकॉन स्पॅचुला चा उपयोग केक बनवताना जे बॅटर बनवले जाते ते मिक्स करण्यासाठी तसेच बॅटर केक टीन मध्ये ओतण्यासाठी केले जाते. हे साधन ओले आणि कोरडे घटक एकत्र फोल्ड करण्यासाठी देखील अतिशय सुलभ आहेत. सिलिकॉन स्पॅचुला एखादी रेसिपी बनवताना उच्च उष्णतेपर्यंत देखील उपयोगी राहतील.
3.पेस्ट्री ब्रश किंवा ग्रीसिंग ब्रश pastry brush or greasing Brush for cake Making
ग्रीसिंग ब्रश चा उपयोग बॅटर केक टिनमध्ये ओतण्यापूर्वी केकच्या भांड्याला तेल किंवा तूप लावण्यासाठी म्हणजेच ग्रीसिंग करण्यासाठी होतो. तसेच ग्रीसिंग ब्रशचा उपयोग इतर रेसिपी बनवण्यासाठी सुद्धा होतो.
म्हणूनच आपल्या किचन मध्ये ग्रीसिंग ब्रश असणे आवश्यक आहे जेणेकरून ग्रीसिंग व्यवस्थित होईल आणि तेलाची किंवा तुपाची ग्रिसिंग जर करत असू तर तेल आणि तूप कमीत कमी वापरले जाते आणि तेल आणि तुपाचा कमीत कमी वापर आपल्या शरीरासाठी सुद्धा योग्य आहे.
४. बेकिंग पॅन किंवा केक टीन– Backing Pan or cake Tin for cake Preparation
केक बनवण्यासाठी बेकिंग पॅन किंवा केक टिन असेल तर अधिकच उत्तम. बाजारामध्ये विविध आकाराचे केक बनवण्याचे भांडे उपलब्ध आहेत जसे की गोल, चौरसाकृती, आयताकृती, हार्ट शेपचे, बटरफ्लाय, मिकी माऊस, गिटार शेपचे, तसेच डॉल केक बनवण्यासाठी त्या आकाराचे भांडे देखील उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जे भांडे अधिक उपयोगी आहे ते खरेदी करू शकता.
५. बटर पेपर- butter Paper for Cake Making
केक बनवताना केकच्या भांड्याला ग्रीसिंग करून झाल्यानंतर बटर पेपर लावला जातो जेणेकरून केक त्या भांड्याला चिकटवून बसू नये, केक सहजरीत्या भांड्यातून काढता यावा यासाठी लावला जातो.
६.कटर – Cake cutter for Cake preparation
केक बनवून झाल्यानंतर केकचे दोन किंवा तीन भाग (horizontal layers) करण्यासाठी कटर चा उपयोग होतो. तसेच ह्या कटर चा उपयोग स्वयंपाक घरात इतर काही गोष्टींसाठी सुद्धा नक्कीच होईल.
६. इलेक्ट्रिक बिटर– electric beater for cake Making
इलेक्ट्रिक बीटर हे बेकिंग मधील अत्यावश्यक आणि महत्त्वाचे साधन आहे. इलेक्ट्रिक बीटर चा उपयोग विपिंग क्रीम वीप करण्यासाठी होतो तसेच बॅटर बनवताना देखील होतो. इलेक्ट्रिक बिटरचा उपयोग स्वयंपाक घरात इतर काही गोष्टींसाठी सुद्धा नक्की होईल जसे की ताक/तूप बनवण्यासाठी किंवा इतर रेसिपीज मध्ये नक्की होईल.
७. पॅलेट नाईफ pallet Knife for cake Making
पॅलेट नाईफ चा उपयोग विपिंग क्रीम केकच्या लेयर्स मध्ये लावण्यासाठी होतो तसेच केक ला व्यवस्थित रित्या फिनिशिंग करण्यासाठी होतो.
८. टर्निंग टेबल- cheap turning table for Cake Making
केक बनवत असताना किंवा केक डेकोरेट करत असताना टर्निंग टेबल एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. टर्निंग टेबल वर केक ठेवल्यानंतर केक डेकोरेट करण्यास नक्कीच सोयीचे पडते म्हणूनच टर्निंग टेबल असणे आवश्यक आहे.
९. नोझल्स- nozzles set for cake decoration
केक वर विविध पद्धतीची डिझाईन काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नोझल्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक नोझलला वेगवेगळे नंबर असतात आणि त्या त्या नोझल चा उपयोग करून आपण वेगवेगळ्या पद्धतीची डिझाईन केक वर तयार करू शकतो. नोझल पायपिंग बॅग मध्ये घालून त्याच विपींग क्रीम घालून वेगवेगळ्या पद्धतीची डिझाईन बनवता येते.
१०. स्क्रॅपर सेट Scrapper Cake Decoration Tools for Cake Baking and Making
स्क्रॅपरचा उपयोग करून केकला फिनिशिंग करता येते तसेच केक ला जर साईडने लाइनिंग ची डिझाईन हवी असेल तर विशिष्ट पद्धतीचा स्क्रॅपर वापरून तशी डिझाईन करता येते.
Add a Comment