आज आणि भविष्यात आपल्याला जे हवे आहे त्यासाठी पैसे देण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे आहेत हे जाणून घेणे हा आर्थिक दृष्ट्या सुरक्षित financial security वाटण्याचा एक मार्ग आहे. आपल्यापैकी बरेच जण आपल्या मालमत्तेची बचत, गुंतवणूक आणि विमा काढण्याचे हे देखील एक कारण आहे. येथे 6 सोप्या पैसे व्यवस्थापन money management कसे करायचे याबद्दल टिप्स दिल्या आहेत ज्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित वाटण्यास मदत करू शकतात.
Top 6 tips for financial Success I Simple Money Management Tips
1. Emergency fund- तुम्हाला सहा महिने जेवढा खर्च येतो तेवढ्याच पैशाचा एक इमर्जन्सी फंड बनवा –
समजा तुम्हाला किराणा, भाजीपाला, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, किंवा इतर खर्च म्हणजे गाडी किंवा घराचे हफ्ते EMI जर सुरू असतील तर तो खर्च असा सर्व खर्च expenditure मिळून सहा महिने जेवढा खर्च येतो तेवढ्या पैशांचा मिळून तुम्ही एक इमर्जन्सी फंड emergency fund बनवून ठेवू शकता. जेणेकरून भविष्यात कधी काही आर्थिक अडचणी financial issues आल्या तर हा इमर्जन्सी फंड तेव्हा नक्कीच कामात येईल आणि इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही निश्चिंत राहाल आणि तणावमुक्त राहाल.
2. Saving funds- प्रत्येक महिन्यातील आपल्या कमाई मधून 20 टक्के पैसे सेव करा –
तुम्हाला महिन्याला जी काही कमाई होत असेल त्या कमाईच्या 20 टक्के एवढ्या पैशांची बचत करा त्यामुळे ही बचत savings केलेली रक्कम पुढे भविष्यात नक्कीच कामी येईल आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास देखील मदत करेल.
3. finance Books फायनान्स च्या संदर्भात पुस्तके वाचा –
आपल्याला काही फायनान्शिअल टिप्स financial tips हव्या असतील तर फायनान्स च्या संदर्भात पुस्तके वाचा त्यामुळे आपल्याला आर्थिक बचत कशी करावी याबद्दल नक्कीच ज्ञान मिळेल ज्याचा उपयोग आपण पैशांची बचत करण्यासाठी नक्कीच करू शकतो.
पैशांची बचत करण्याबरोबरच पैसा कसा आणि कोणत्या पद्धतीने कमावता येईल ह्या बद्दल देखील माहिती किंवा आवश्यक ज्ञान फायनान्स च्या संदर्भातील पुस्तकांमधून मिळते. त्यामुळे तुम्ही ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल असाल म्हणजे मराठीतून जर जास्त समजत असेल तर मराठी फायनान्शिअल पुस्तके वाचा. फायनान्शिअल पुस्तके विविध भाषांमध्ये उपलब्ध आहेत.
4. Multiple income Source- एकापेक्षा अधिक इन्कम सोर्स बनवा –
बहुतेक लोक फक्त एकाच इन्कम सोर्स single income source वर अवलंबून राहता आणि यदाकदाचित जर तो इन्कम सोर्स काही कारणास्तव बंद पडला म्हणजेच उदाहरणार्थ, कोरोना काळात बहुतेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि काही लोक सर्वस्वी फक्त नोकरीवर Service dependency अवलंबून होते त्यांना शेती नव्हती किंवा इतर छोटे मोठे काही व्यवसायही Side business करत नव्हते तर अशा लोकांना प्रश्न उभा राहिला की घर कसे चालवायचे…
तर ह्या प्रकारच्या गोष्टी टाळण्यासाठी सर्वांनीच एका इन्कम सोर्स वर अवलंबून न राहता जास्त इन्कम सोर्स तयार करावे म्हणजे जर कोणी नोकरी करत असेल तर त्या जोडीला छोटा मोठा बिजनेस देखील करू शकता. इन्कम सोर्सचे income source खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत.
5. control on expenditure- जोपर्यंत संपत्ती तयार होत नाही तोपर्यंत आपल्या शौकच्या किंवा हौसेच्या वस्तू खरेदी करू नका –
या टीपमध्ये सांगितल्याप्रमाणे काही वस्तू अशा असतात की ज्या गरजेच्या नसतात परंतु काही लोकांना त्या वस्तूची हौस Habitual purchase असल्यामुळे ते लोक त्या वस्तू खरेदी करतात. हौस पूर्ण करणे अर्थातच चुकीची गोष्ट नाही, परंतु जर आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम financial stable झालेले नसू तर ज्या वस्तू गरजेच्या नसतील किंवा टाळता येण्यासारखे असतील त्या वस्तू नक्कीच खरेदी करू नये.
6. Loan Trap- गरज नसेल तर कर्ज घेऊ नका –
काही लोक गरज नसली तरीदेखील कर्ज घेतात आणि कर्ज परतफेड न करता आल्यामुळे आर्थिक अडचणी मध्ये सापडतात. असे टाळण्यासाठी जेव्हा कधी कर्ज घेण्याची गरज नसेल त्यावेळी कर्ज न घेता इतर काही करता येईल का याचा विचार करावा त्याच बरोबर आपण ज्या गोष्टीसाठी कर्ज घेत आहोत ती गोष्ट घेणे गरजेचे आहे का हे देखील तपासून पहावे.
अशाप्रकारे ह्या काही टिप्स आहेत ज्यांचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.
Add a Comment