जर तुम्हाला स्वयंपाक आणि बेकिंगची आवड असेल तर कुकीज आणि बिस्किटे तयार biscuit making business करणे हा एक उत्तम व्यवसाय आहे.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी low investment कमी भांडवल लागत असल्याने तुम्ही हा लघु उद्योग उभारू शकता.तसेच, हा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असा व्यवसाय आहे. हा सर्वात फायदेशीर लघु उद्योगांपैकी profitable low investment business idea एक आहे कारण तुम्हाला फक्त एक छोटी जागा, कच्चा माल आणि तुमच्या मदतीसाठी फक्त काही लोकांची गरज लागू शकते.मुळात, बिस्किट उत्पादन हे पारंपरिक बेकरी उद्योगांतर्गत येते. ह्या व्यवसायात यश मिळवण्यासाठी, तुम्हाला मार्केटिंगची काळजी घेणे आणि तुमचे क्लायंट शोधत असलेली चव जाणून घेणे आवश्यक आहे. Biscuit making business setup सेटअपसाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक गोष्टी म्हणजे इलेक्ट्रिक ओव्हन, ग्राइंडर, मिक्सर आणि कच्चा माल.
Planning for biscuit making business 2022
तुम्ही तुमच्या स्थानिक मार्केटचा अभ्यास करा, त्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारचे बिस्कीट बनवणार आहात ते ठरवा,ते खूप महत्वाचे आहे. Type of biscuit making business विविध प्रकारची बिस्किटे तुम्ही बनवू शकता जसे की शुगर-फ्री, वेफर, सॉल्टेड, क्रीम बिस्किट, कोकोनट बिस्किट, जिंजर बिस्किट, जीरा क्रंच, डायजेस्टिव्ह इ. म्हणून, तुम्हाला कोणत्या विशिष्ट प्रकारचे बिस्किट तयार करायचे आहे हे ठरवावे लागेल. तसेच, बिस्किटाचा आकार, चव निश्चित करणे आवश्यक आहे. कारण तुम्ही जो आकार निच्छित कराल त्या आकारानुसार साचा घ्यावा लागेल. तसेच, तुम्हाला हवी असलेली चवीनुसार विशिष्ट रेसिपी तयार करावी लागेल.
बिस्किटे वाहतुकीसाठी सोपी असतात. खायला चविष्ट, कोलेस्टेरॉल मुक्त बिस्किटे तुम्ही बनवू शकता.
Machinery required for biscuit making
बिस्कीट बनवण्यासाठी लागणाऱ्या मशिन्स –
बिस्किट बनवण्याचे दोन प्रकारचे युनिट बनवता येऊ शकते. Types of machines
अर्ध-स्वयंचलित semi automatic किंवा पूर्ण स्वयंचलित fully automatic आधारावर युनिट सेट करू शकता.
तसेच, विशिष्ट यंत्रसामग्रीची आवश्यकता उत्पादन प्रक्रिया आणि उत्पादन क्षमतेवर अवलंबून असते. येथे, तुम्हाला बिस्किट बनवण्याच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या मशीनची यादी दिलेली आहे.
स्वयंचलित कंटीन्यूअस रोलर कटिंग मशीन
Automatic continuous Roller cutting machine for biscuit making
फ्लोअर शिफ्टर ऑटोमॅटिक स्क्रू टाईप व्हायब्रेटर सिस्टम विद एन ऑटोमॅटिक लिफ्टींग सिस्टीम
Flour Shifter automatic screw type vibrator system with an automatic lifting system
साखर ग्राइंडिंग मशीन Suger Grinding Machine
रोल शीटर Roll Sheeter
डबल ॲक्शन होरिझोंटल मिक्सिंग मशीन कूलिंग कन्वेयर
Double action horizontal mixing machine
Cooling conveyor
खारट बिस्किटासाठी तेल फवारणी मशीन
Oil spraying machine for salted biscuit
ओव्हन आणि कन्व्हेयर यांच्यामध्ये मोटार आणि स्टार्टर बसवलेले टर्नटेबल काम रोटरी कटिंग मशीन आणि रोलर कटिंग मशीनसाठी अतिरिक्त ब्रास रोलर एक मोटर आणि स्टार्टरसह सिरप मशीन मोटरसह बिस्किट ग्राइंडर
S.S./Aluminium टॉपसह वजनाचा बॅलन्स प्लॅटफॉर्म प्रकार असलेला वर्किंग टेबल
Documents required for biscuit making business
रजिस्ट्रेशन अँड लायसन्स
– सर्वप्रथम कंपनीचे रजिस्ट्रेशन करा.
– जर उद्योग आधार साठी अप्लाय केले तर सबसिडी मिळू शकते तसेच इतरही काही फायदे असतात.
– जीएसटी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. जीएसटी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जीएसटी नंबर मिळतो.
-तसेच एफ एस एस ए आय FSSAI लायसन्स मिळवणे देखील गरजेचे आहे .
मार्केटिंग
Marketing ideas for biscuit making business
-बिस्किटांचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पासूनच तुम्ही बिस्किटांची मार्केटिंग करण्यास सुरु करू शकतात जसे की काही ठिकाणी बॅनर किंवा होर्डिंग्ज लावणे. असे केल्याने बिस्किटांचा व्यवसाय सुरू होण्यापूर्वीच लोकांना तुम्ही सुरू करत असणाऱ्या बिस्किटांच्या व्यवसायाबद्दल तसेच कोणत्या प्रकारची बिस्किटे बनवत आहात याबद्दल थोडीशी कल्पना आधीच मिळून जाईल
याचा फायदा नक्कीच तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी होईल.
-त्याच बरोबर बिस्किटांचा व्यवसाय सुरु झाल्यानंतर तुम्ही काही पॅम्प्लेट वाटू शकता.
-त्याच बरोबर वर्तमानपत्रे, लोकल न्यूज चॅनल यावर देखील बिस्किटांची जाहिरात करू शकता.
-तसेच सुपर मार्केट, किराणा दुकाने,मॉल्स या ठिकाणी विजिट करून तुम्ही बनवत असलेल्या बिस्किटांची माहिती त्या ठिकाणी देऊन तिथून देखील बिस्किटांच्या ऑर्डर्स मिळवू शकता.
तसेच ऑनलाइन पद्धतीने सोशल मीडियांच्या साह्याने
बिस्किटांची जाहिरात करू शकता याचा फायदा देखील तुम्हाला व्यवसायात नक्कीच होईल.
Add a Comment