Latest 5 News in 5 Minutes – Daily update

१. केरळ राज्यातील बावीस वर्षीय तरुणाचा मंकीपॉक्समुळे मृत्यू 

30 जुलै,शनिवार रोजी ही घटना घडली असून,केरळ सरकारने पुष्टी(confirms) केली की ,मरण पावलेल्या 22 वर्षीय युवकाचे नमुने सकारात्मक आढळले.ज्यामुळे तो भारतातील पहिला मंकीपॉक्स-संबंधित मृत्यू ठरला आहे.

हा तरुण संयुक्त अरब अमिराती येथून राज्यात परतला होता.

 केरळ राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, या व्यक्तीने सुरुवातीला परदेशात विषाणूची सकारात्मक चाचणी केली होती. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तपासलेल्या नमुन्यांमध्येही विषाणू आढळून आल्याचे त्यांनी सोमवारी सांगितले. 

जागतिक स्तरावर आफ्रिकेबाहेरील मंकीपॉक्समुळे झालेला हा चौथा मृत्यू आहे, अशी नोंद करण्यात आली आहे.

मंकीपॉक्समुळे झालेला हा मृत्यू आशियातील पहिला मृत्यू आहे. स्पेनमध्ये गेल्या आठवड्यात दोन मंकीपॉक्स संबंधित मृत्यूची नोंद झाली आणि ब्राझीलमध्ये एका मृत्यूची नोंद झाली.

२३ जुलै रोजी जागतिक आरोग्य संघटनेने या उद्रेकाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे.

केरळच्या महसूल मंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकारने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 21 लोकांना वेगळे (isolate) केले आहे.

२. कॉमनवेल्थ गेम्स 2022 : हरजिंदर कौरने महिलांच्या 71 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले ..

भारताला सातवे वेटलिफ्टिंग पदक हरजिंदर कौर यांनी मिळवून दिले. कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील नववे पदक महिलांच्या ७१ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत अभूतपूर्व कामगिरी करत कांस्यपदक जिंकले.

नायजेरिया येथील जॉय ओगबोन इझे तिच्या तीनही क्लीन अँड जर्क प्रयत्नांमध्ये अयशस्वी झाली. 

हरजींदर कौर यांना क्लीन अँड जर्क फेरीत सर्व प्रयत्नांमध्ये यश आले.

स्नॅच प्रकारामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये हरजिंदरला ९० किलो वजन उचलण्यात अपयश आले. दुसऱ्या प्रयत्नामध्ये हरजींदर यांनी ९० किलो वजन यशस्वीरित्या उचलून पुनरागमन केले आणि तिसऱ्या आणि शेवटच्या प्रयत्नामध्ये हरजींदर कौर यांनी ९३ किलो वजन उचलले.

हरजींदर कौर यांनी क्लीन अँड जर्क प्रकारात ११३ किलो वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नामध्ये ११६ किलो वजन उचलले. तिसऱ्या आणि शेवटच्या प्रयत्नामध्ये ११९ किलो वजन उचलले.

अशा रीतीने हरजींदर कौर यांनी एकूण वजन २१२ किलो (९३ किलो + ११९ किलो) पर्यंत नेले.

३. मुख्यमंत्री योगी गोरखपूर येथील दौऱ्यावर .. CM news on Gorakhpur visit

आज मुख्यमंत्री योगी गोरखपूर येथील दौऱ्यावर जाणार असून, गोरखपुर मंदिर येथे होणाऱ्या दोन दिवसीय कुस्ती स्पर्धेच्या समारोप सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री कुस्तीपटूंना बक्षीस देणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री योगी रोजगार मेळाव्यामध्ये देखील जाणार असून तिथे युवांना संबोधित करणार आहेत.

४. भारतात ऑक्टोबरपर्यंत 5G सुरू होण्याची शक्यता : 5G update news, india 5G trial News,

या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाचव्या जनरेशनची (5G) दूरसंचार सेवा भारतात सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

5G स्पेक्ट्रमची बोली संपल्यानंतर एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री (telecommunication,electronics and information technology minister) अश्विनी वैष्णव म्हणाले की, ऑफरवर असलेल्या एकूण 72,098 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमपैकी 51,236 मेगाहर्ट्झ किंवा सुमारे 71 टक्के लिलावात विकले गेले आहेत. .

गेल्या सात दिवसांत बोलीच्या एकूण 40 फेऱ्या पार पडल्या. बोलीचे एकूण मूल्य 1,50,173 कोटी रुपये आहे.

५. अखेर शिवरायांची मूर्ती किंवा स्टिकर असलेल्या गाड्यांना तिरुपती देवस्थान येथे प्रवेश ..– tirupati Shivai Maharaj news

काही दिवसांपूर्वी तिरुपती देवस्थान येथे दर्शनासाठी गेलेल्या एका व्यक्तीच्या गाडीमध्ये शिवरायांची मूर्ती असून त्या गाडीला आत मध्ये प्रवेश नाकारला गेला असा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

परभणीचे खासदार संजय जाधव सध्या तिरुपती बालाजी येथे दर्शनास गेलेले असून त्यांनी तेथील स्थानिक प्रशासनाची चर्चा केली आणि या वादावर तोडगा काढला आहे. आता यापुढे गाडीमध्ये शिवरायांची छोटी मूर्ती किंवा इतर देवी-देवतांच्या मूर्ती नेण्यास बंदी नाही परंतु कुठल्याही राजकीय किंवा सामाजिक पक्षाचा झेंडा, चिन्ह किंवा निशाणी नेण्यास बंदी आहे.

Tags: No tags

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *