Gopaani…

GoPaani :

गोपाणी ॲप :

  What is Gopaani?

  Who founded Gopaani?

  What is the use of Gopaani?

    जे लोक काही व्यवसाय निमित्त किंवा नोकरीनिमित्त बाहेर राहतात ते लोक पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पाण्याचे जार विकत घेतात. तसेच ज्या लोकांचे घरापासून दूर दुकान आहेत जसे की किराणा स्टोअर, मेडिकल स्टोअर, पार्लर, स्टेशनरी स्टोअर किंवा ऑफिसेस असे लोक पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पाण्याचे जार खरेदी करतात. परंतु जे लोक पाण्याचे जार प्रोव्हाइड करतात म्हणजेच वॉटर सप्लायर्स त्या लोकांना रोज कोणकोणत्या ठिकाणी पाण्याचे जार द्यायचे आहे तसेच किती ठिकाणी किती पाण्याचे जार दिले यांसारखे डिटेल्स ठेवावे लागतात. हे डिटेल्स रोजच्या रोज ठेवण्यामध्ये काही समस्या येतात किंवा डिटेल्स व्यवस्थित रित्या ठेवले जात नाही. या समस्यांचे निराकरण अंकित रांका आणि अर्पित शारदा यांनी 2019 मध्ये केले.हे दोघेही बालपणीचे मित्र आहेत. 

      अंकित रांका आणि अर्पित शारदा या दोघांनी मिळून जून 2019 मध्ये Boond Tech Pvt Ltd नावाने GoPaani लॉन्च केले. ऑगस्ट 2019 मध्ये GoPaani हे ॲप प्ले स्टोअर वर लॉन्च करण्यात आले.या दोघांनी हे स्टार्ट अप इंदोर मधून सुरू केले आहे.अंकित रांका आणि अर्पित शारदा यांचे उद्दिष्ट पाणी पुरवठादारांना तसेच ग्राहकांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे हा आहे. भारतामध्ये खूप वॉटर डिलिव्हरी बिझनेस आहेत. त्यांना ज्या समस्या येतात त्या समस्या अंकित रांका आणि अर्पित शारदा यांनी GoPaani ॲपच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

      GoPaani ॲप हे प्रॉडक्ट इन्व्हेंटरी जसे की डिस्पॅच, डिलिव्हरी, कलेक्शन आणि अनलोडिंग इत्यादींचा ट्रॅक ठेवण्यास किंवा मागोवा घेण्यास मदत करते.GoPaani ॲप अँड्रॉइड आणि iOS या दोन्हींवर उपलब्ध आहे.GoPaani Customer App द्वारे या व्यवसायांचे जे ग्राहक असतात ते डिलिव्हरी कधी होईल ह्याची माहिती घेवू शकतात तसेच बिल पेमेंट करू शकतात तसेच रेटिंग देऊ शकतात आणि व्यवसाय मालकांशी देखील संपर्क करू शकतात,थंड पाण्याचे जार ऑर्डर करू शकतात तसेच पाणी बॉटल्स देखील ऑर्डर करू शकतात. त्यामुळे GoPaani ॲप फक्त व्यवसाय मालकांसाठीच नव्हे तर ग्राहकांसाठी देखील फायदेशीर आहे.या मध्ये एक इव्हेंट ॲप देखील आहे जे की लग्न समारंभ,पार्टी यांसारख्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना लागणाऱ्या मोठ्या ऑर्डर्स व्यवस्थापित करण्यासाठी परवानगी देते.GoPaani हे B2B आहे तसेच हे ॲप व्यवसायांचे ग्राहक देखील वापरतात त्यामुळे B2B2C म्हणून देखील चालते.

       GoPaani ची 45 सदस्यांची टीम असून अंकिता रांका हे कंपनीचे सीईओ आहेत.अंकित यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी, एन वाय सी मधून कम्प्युटर सायन्स मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे आणि Gopaani सुरू करण्याच्या आधी त्यांनी यु एस मध्ये टॅपफेमची स्थापना केली.आणि अर्पित शारदा हे सी ओ ओ आहेत,अर्पित यांनी  ICFAI विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे आणि ते हर्ष पेट येथे प्रोप्रायटर होते जे प्लास्टिक उत्पादने जसे की  पाण्याचे जार, दुधाचे कंटेनर इ.मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग करत असे.अंकित रांका हे डिझाईनची काळजी घेतात तर अर्पित शारदा हे विक्री आणि मार्केटिंगची जबाबदारी घेतात.

    स्टार्टअप व्यवसायांना त्यांच्या एकूण ग्राहकांच्या संख्येनुसार 4,000 ते 36,000 रुपये प्रति वर्ष शुल्क आकारले जाते. सध्याला जवळपास 20 हजार व्यवसायांनी ह्या ॲपवर साइन अप केले असून त्यापैकी 4.5% इतके व्यवसाय सशुल्क व्यवसाय आहेत म्हणजेच सशुल्क व्यवसायामध्ये या ॲपचे प्रीमियम वर्जन वापरण्यासाठी कंपनीला पैसे द्यावे लागतात.

     या ॲपचे विनामूल्य व्हर्जन देखील उपलब्ध असून ज्या व्यवसायांनी 50 पेक्षा कमी ग्राहक जोडले आहे किंवा पन्नास ग्राहकांपर्यंत डिटेल्स ठेवण्याची मर्यादा या विनामूल्य ॲप मध्ये आहे म्हणजेच हे ॲप 50 ग्राहकांचे डिटेल्स ठेवण्याची परवानगी देते. डिटेल्स जशी की डेली डिलिव्हरी रेकॉर्ड ठेवणे तसेच पर्सनल कस्टमर बिल डाउनलोड करणे, ऑनलाइन पेमेंट करणे, पेमेंट रिमाइंडर आणि खूप काही.

     अशा रीतीने GoPaani पाणी सेवा पुरवठादारांना त्यांचा व्यवसाय डिजीटल करण्यात मदत करत आहे.

Tags: No tags

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *