महिला सम्मान बचत पत्र योजना 2023 मराठी | Mahila Samman Bachat Patra Yojana –

महिला सम्मान बचत पत्र योजना 2023 मराठी | Mahila Samman Bachat Patra Yojana –

      भारत सरकारकडून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना नेहमीच राबवण्यात येत असतात. तसेच इतरही नवनवीन योजना वेळोवेळी सुरू केल्या जात असतात. आपल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३ चा अर्थसंकल्प जाहीर करत असताना महिलांसाठी ” महिला सन्मान बचत पत्र योजना “ सुरू केली आहे. महिला सन्मान बचत पत्र योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अर्ज करावे लागणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात महिला सन्मान बचत पत्र योजना नक्की काय आहे ….

” महिला सन्मान बचत पत्र योजना ” –

 – १ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ सादर करताना ” महिला सन्मान बचत पत्र योजना ” सुरू करण्याची घोषणा केली आणि महिलांना एक मोठी भेटच दिली.

– महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.

– ” महिला सन्मान बचत पत्र योजना ” ही योजना सुरू झाल्यामुळे महिलांना तसेच मुलींना बचत करण्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे ; कारण या योजनेअंतर्गत केलेल्या गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळणार आहे.

– महिलांनी या योजनेमध्ये जर चांगली गुंतवणूक केली तर नक्कीच चांगले व्याज मिळून मोठा फायदा महिलांना होऊ शकतो.

–  महिला किंवा मुलींच्या नावावर दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते आणि या गुंतवणुकीवर ७.५ % निश्चित व्याज दिले जाईल. 

– अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान बचत पत्र योजनेबद्दल घोषणा केली आणि पंतप्रधान मोदींसह सर्व सदस्यांनी टेबलावर हात मारून आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली.  

– भारत सरकारने सुरू केलेली ही योजना मार्च २०२५ पर्यंत लागू असेल.

– महिला सन्मान बचत पत्र योजनेचा लाभ कोणत्याही वयोगटातील मुली तसेच महिला घेऊ शकणार आहेत .

– या योजनेअंतर्गत महिलांना अंशतः पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे.

महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठी पात्रता –

Eligibility for Mahila Samman Bachat Patra Yojana –

– महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत बचत खाते उघडण्यासाठी महिला ही मूळ भारतातील रहिवासी असणे अनिवार्य आहे.

– महिला सन्मान बचत पत्र खाते हे फक्त भारत देशामधील महिला आणि मुलींसाठीच असणार आहे.

– महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत कोणत्याही वयोगटातील मुली किंवा महिला खाते उघडू शकतात.

महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –

Documents required for Mahila Samman Bachat Patra Yojana :

महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत –

✓ अर्जदाराचे आधार कार्ड

✓ मतदार ओळखपत्र

✓ शिधापत्रिका

✓ जात प्रमाणपत्र

✓ पत्त्याचा पुरावा

✓ उत्पन्न प्रमाणपत्र

✓ पासपोर्ट फोटो

✓ मोबाईल नंबर

✓ ईमेल आयडी

महिला सन्मान बचत पत्र योजनेचे फायदे –

Benefits of Mahila Samman Bachat Patra Yojana :

–  समजा तुम्ही या योजनेंतर्गत दोन वर्षांसाठी २ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक ७.५ % व्याज मिळेल. म्हणजेच पहिल्या वर्षी, तुम्हाला मूळ रकमेवर १५,०००/-  रुपये मिळतील आणि दुसर्‍या वर्षी, तुम्हाला १६,१२५/- रुपये मिळतील.

– अशा प्रकारे, दोन वर्षांच्या शेवटी, तुम्हाला एकूण रक्कम २,३१,१२५  (२,००,००० प्रारंभिक गुंतवणूक + दोन वर्षांसाठी ३१,१२५ व्याज) मिळतील.

– महिला सन्मान बचत पत्र योजनेमुळे महिला किंवा मुलींना बचत करण्यामध्ये नक्कीच हातभार लागणार आहे.

– तसेच या योजनेअंतर्गत महिलांना अंशतः पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे.

– महिला सन्मान बचत पत्र योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना या योजनेमध्ये गुंतवणूक करून करात सूट मिळू शकते.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा? 

How to apply for Mahila Samman Bachat Patra Yojana ?

– नजीकच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन महिला सन्मान बचत पत्र योजनेचा फॉर्म मिळवा.

– अर्ज व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत लागणारी कागदपत्रे जमा करा.

– अर्ज भरल्यानंतर तुम्हाला जी काही रक्कम जमा करायची आहे ती रक्कम जमा करा.

– त्यानंतर महिला सन्मान बचत पत्र योजनेमधील तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा पुरावा प्राप्त करा.

हे ही वाचू शकता….श्रावण बाळ योजना

जिओचा मोठा धमाका… ! सर्वात स्वस्त असा लॅपटॉप लॉन्च…पहा किती आहे किंमत …..

जिओचा मोठा धमाका… ! सर्वात स्वस्त असा लॅपटॉप लॉन्च… पहा किती आहे किंमत …..

     जिओ कंपनी नेहमीच वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येत असते किंवा बऱ्याचदा नवनवीन धमाके करत असते. पुन्हा एकदा जिओने असाच एक मोठा धमाका केला आहे आणि तो म्हणजे सर्वात स्वस्त असा लॅपटॉप जिओने लॉन्च केला आहे. रिलायन्स जिओ या मुकेश अंबानी यांच्या कंपनीने रिलायन्स जिओ बुक ( Reliance Jiobook ) 4G इनेबल्ड हा स्वस्त असा लॅपटॉप मार्केटमध्ये नुकताच लॉन्च केला आहे.रिलायन्स जिओ बुक ( Reliance Jiobook ) सोमवारी, ३१ जुलै रोजी भारतात लाँच करण्यात आले.

      रिलायन्स जिओ या कंपनीने लॉन्च केलेल्या रिलायन्स जिओ बुक ( Reliance Jiobook ) 4G इनेबल्ड लॅपटॉप मध्ये जवळपास सर्व फीचर्स असून हा लॅपटॉप २०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये मिळणार आहे.रिलायन्स जिओ बुक ( Reliance Jiobook ) या लॅपटॉपची किंमत १६, ४९९ रुपये इतकी असणार आहे.रिलायन्स जिओ बुक ( Reliance Jiobook ) हा लॅपटॉप सामान्य ग्राहकांचे बजेट लक्षात घेऊन बनवला आहे असे म्हटले जात आहे.

Image Credit : Amazon

रिलायन्स जिओ बुक ( Reliance Jiobook ) चे फीचर्स पुढील प्रमाणे आहेत :

Reliance jio book features –

✓ ब्लूटूथ 5.0

✓ वाय फाय

✓ 4G LTE

✓ 3.5 mm ऑडिओ जॅक

✓ एच डी एम आय पोर्ट

✓ ड्युअल सिम सपोर्ट

✓ लॅपटॉपचे वजन : ९९० ग्रॅम 

✓ लॅपटॉपची किंमत : १६,४९९ रुपये

✓ ११.६ इंच LED डिस्प्ले

✓ २ MP वेब कॅम 

✓ 5,000mAh बॅटरी ( ८ तासांपर्यंत बॅटरी लाईफ )

✓ Android-आधारित JioOS ऑपरेटिंग सिस्टम

✓ 64GB इनबिल्ट स्टोरेज

✓ उपलब्ध स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 256GB पर्यंत वाढवता येऊ शकते.

✓ ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स

✓ १०० GB क्लाउड स्टोरेज

     रिलायन्स जिओ बुक ( Reliance Jiobook ) हा लॅपटॉप एकमात्र जिओ ब्लू कलर मध्ये उपलब्ध आहे.रिलायन्स जिओ बुक ( Reliance Jiobook ) या लॅपटॉपची विक्री ५ ऑगस्टपासून सुरू होणार असून हा लॅपटॉप रिलायन्स डिजिटलची ई-कॉमर्स वेबसाईट, ॲमेझॉन आणि इतर रिटेल स्टोअर्स द्वारे फ्री ऑर्डर साठी उपलब्ध आहे.

    रिलायन्स जिओ बुक ( Reliance Jiobook ) हा लॅपटॉप वजनाने हलका असल्याने ग्राहकांना हाताळण्यासाठी तसेच कॅरी करण्यासाठी सुद्धा सोपा आहे.

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये ३१५४ जागांसाठी भरती …

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये ३१५४ जागांसाठी भरती

” ग्रामीण डाक सेवक (GDS) ” भरती २०२३

महाराष्ट्र डाक विभागाने (Maharashtra postal department) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) आणि GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) या पदांसाठी २०२३ साठी भरती जाहीर केली असून एकूण  ३१५४ रिक्त पदांची घोषणा केलेली आहे. जाणून घेऊयात त्याबद्दलच सविस्तर माहिती …

महाराष्ट्र डाक विभाग भरती २०२३ :

पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक [ ब्रांच पोस्ट मास्टर(BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)]

जाहिरात क्र. : 17-67/2023-GDS

एकूण रिक्त पदे : ३१५४ पदे

पद क्र.पदाचे नाव
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
एकूण जागा३१५४
भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये भरती

शैक्षणिक पात्रता : 

१) 10वी उत्तीर्ण  

२) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र ( संगणक ज्ञान आवश्यक )

३) सायकलिंगचे ज्ञान 

४) पुरेशी उपजीविका (Adequate livelihood)

वयाची अट :

 २३ ऑगस्ट २०२३ रोजी १८ ते ४० वर्षे (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

General/OBC/EWS: १००/-  रुपये.

  (SC/ST/PWD/महिला:फी नाही)

अर्ज सुरू होण्याची तारीख : ३ ऑगस्ट २०२३ 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ ऑगस्ट २०२३ 

अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: २४ ते २६ ऑगस्ट २०२३ 

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

निवड प्रक्रिया ( Selection process ) :

१) गुणवत्ता यादी ( Merit list )

२)  कागदपत्रांची पडताळणी ( Documents verification )

जाहिरात ( Notification ) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट ( Official Website ) :येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज ( Apply online ) : येथे क्लिक करा

पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा ….

पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा ….

PM Modi Pune visit 

    काल मंगळवार दिनांक १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये येत असल्याकारणाने काल सकाळी ६ ते दुपारी ३ वाजे दरम्यान काही बदल करण्यात आलेले होते .त्यामध्ये वाहतुकीमध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले होते, काही मार्ग या वेळेमध्ये बंद करण्यात आलेले होते. यामध्ये टिळक रोड, शिवाजी चौक, कुमठेकर रोड, अलका चौक, स्वारगेट, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, पुणे विद्यापीठ चौक, लक्ष्मी रोड, सिमला ऑफीस चौक, संचेती चौक, संगमवाडी रोड, गोल्फ कल्ब चौक, विमानतळ रोड, स गो बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक आणि सेवासदन चौक हे प्रमुख मार्ग ठरलेल्या वेळेमध्ये बंद राहणार होते.

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे दौऱ्या दरम्यान विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले, तसेच भूमिपूजन सुद्धा करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे लोकार्पण केले.

     पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येत असल्याकारणाने पुण्याच्या रस्त्यांवर गर्दी होण्याची तसेच ट्रॅफिक जाम होण्याची दाट शक्यता होती, त्यामुळेच मनसे विद्यार्थी सेनेने शिक्षक आयुक्तांना निवेदन करून तेथील शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी विनंती सुद्धा केली होती जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांना या गोष्टीचा त्रास होऊ नये.

      पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येत असल्याकारणाने सुरक्षा यंत्रणा सुद्धा अलर्ट मोडवर कार्यरत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या ज्या मार्गाने जाणार होते त्या मार्गांवर रंगीत तालीम सुद्धा घेण्यात आली होती. पुणे पोलिसांनी तसेच केंद्रीय पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेतला होता.

     पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एअर फोर्सच्या विशेष विमानाने पुण्यामध्ये आले, त्या ठिकाणी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वप्रथम दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये गेले. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा व अभिषेक केला आणि त्यांच्या हस्ते महाआरती सुद्धा करण्यात आली.

    यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एसटी कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्काराची सर्व रक्कम नमामी गंगा प्रोजेक्टला दिली.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास काम लोकार्पणासाठी निघाले. पुणे मेट्रोचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटन दाबून पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकेचे लोकार्पण केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्घाटन सुद्धा केले.

” बाईपण भारी देवा ” सैराटचे रेकॉर्ड मोडणार का …..? वेडचा रेकॉर्ड मोडला…. सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट ठरला …

” बाईपण भारी देवा ” सैराटचे रेकॉर्ड मोडणार का …..? वेडचा रेकॉर्ड मोडला…. सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट ठरला …

    सध्या सगळीकडेच चर्चेत असलेला आणि सहा बहिणींची कथा असलेला केदार शिंदे दिग्दर्शित मराठी चित्रपट ” बाईपण भारी देवा” या चित्रपटाने रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचा ” वेड ” या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला असून मराठी मधील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे आणि आता  ” बाईपण भारी देवा ” हा चित्रपट नागराज मंजुळे यांच्या ” सैराट ” या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    ” बाईपण भारी देवा ” या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून खूप चांगली कमाई केलेली आहे आणि प्रेक्षकांचा सुद्धा भरपूर प्रतिसाद या चित्रपटाला अजून सुद्धा मिळताना दिसत आहे.” बाईपण भारी देवा ” हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही हिंदी चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाले परंतु त्या चित्रपटापेक्षा जास्त चांगला प्रतिसाद या मराठी चित्रपटाने मिळवला आहे.

      ” बाईपण भारी देवा ” या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर अगदी पहिल्याच आठवड्यामध्ये १२ कोटींची कमाई केली होती तर दुसऱ्या आठवड्यामध्ये २४ कोटी तिसऱ्या आठवड्यामध्ये या चित्रपटाने २१ कोटींची कमाई केली तर चौथ्या आठवड्यात १० कोटी इतकी कमाई केली. आता तर या चित्रपटाची जवळपास ८३ कोटी ५० लाखांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. ही कमाई आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळून झालेली आहे. तर वेड या मराठी चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर ७५ कोटींच्या आसपास कमाई केली होती.

     ” बाईपण भारी देवा ” या चित्रपटाने फक्त भारतामध्ये जवळपास ७२ कोटी ११ लाख इतकी कमाई केली आहे तर सैराट या मराठी चित्रपटाने ११० कोटींची कमाई त्यावेळी केली होती. आता ” बाईपण भारी देवा “हा चित्रपट सैराट या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.” बाईपण भारी देवा ” हा चित्रपट पाच कोटींमध्ये जरी बनला असला तरी सुद्धा या चित्रपटाने खूप यश संपादन केले आहे.

       ” बाईपण भारी देवा ” हा चित्रपट बघितल्यानंतर बऱ्याच महिला काहीतरी करण्यासाठी प्रेरित झाल्या असून कोणी व्यवसाय सुरू करायचा विचार करत आहे तर कोणी नोकरी करायचा किंवा स्वतःचे काहीतरी करण्याचा विचार करत आहे. तसेच ” बाईपण भारी देवा “या चित्रपटांमधील रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर,सुचित्रा बांदेकर,दीपा परब यांसह इतर कलाकारांचे काम सुद्धा सर्वांना आवडत आहे. तसेच या चित्रपटांमध्ये नट्यांच्या वेशभूषा तसेच ज्वेलरी सुद्धा चर्चेत आहे.” बाईपण भारी देवा “या चित्रपटातील गाणी सुद्धा प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे.

नाशिक मधील अनुराग मकाडेची गगन भरारी … १ कोटींपेक्षा जास्तीचे पॅकेज …

नाशिक मधील अनुराग मकाडेची गगन भरारी … १ कोटींपेक्षा जास्तीचे पॅकेज …

      प्रत्येकालाच अगदी लहानपणापासून वाटत असते की एखाद्या चांगल्या क्षेत्रामध्ये आपले करिअर घडावे. प्रत्येक जण आपापल्या परीने अगदी शाळेत असल्यापासूनच प्रयत्न सुद्धा करत असतो. काहींना करिअर घडवण्यामध्ये यश येते तर काहींना अपयश… नाशिक मधील अनुराग मकाडे याने उत्तुंग अशी भरारी घेत ॲमेझॉन सारख्या मोठ्या कंपनीमध्ये जवळपास सव्वा कोटीचे पॅकेज मिळवले आहे.

     दरवर्षी मोठमोठ्या कंपन्या मोठ्या कॉलेजेस मधून किंवा आय आय टी किंवा आय आय एम च्या विद्यार्थ्यांना मोठं-मोठे पॅकेजेस देत असतात. परंतु अनुराग मकाडे हा आय आय टी किंवा आय आय एम चा विद्यार्थी नसून अनुरागचे शिक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, अलाहाबादमध्ये झालेले आहे. अनुराग मकाडे हा बीटेकचा विद्यार्थी आहे. अनुराग मकाडे याने त्याच्या मेहनतीच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर उंच अशी झेप घेतलेली असून ॲमेझॉन मध्ये फ्रंट इंजिनियर म्हणून त्याची निवड झालेली आहे. अनुराग मकाडे याला ॲमेझॉन कडून जवळपास सव्वा कोटी चे पॅकेज मिळाले आहे.

     अनुराग माकडे ज्याची निवड ॲमेझॉन मध्ये फ्रंट इंजिनियर म्हणून झालेली आहे त्यांनी ही चांगली बातमी स्वतः लिंक्डइनवर अशाप्रकारे दिली की ,” अभिवादन,मी Amazon मध्ये फ्रंटएंड इंजिनियर म्हणून सामील झालो हे सांगताना मला खूप आनंद होत आहे !”

     अनुराग मकाडे याने नक्कीच नेत्रदीपक असे यश मिळवले आहे आणि आपल्या कुटुंबीयांचे, नाशिक जिल्ह्याचे तसेच पूर्ण महाराष्ट्राचेच नाव मोठे केले आहे.

     आय आय आय टी अलाहाबाद येथील अनुराग सोबतच्याच इतर काही विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय नेत्र दीपक असे यश संपादन केलेले आहे.आय आय आय टी अलाहाबादचा विद्यार्थी प्रथम गुप्ता याची गुगलने निवड केली असून त्याला १.४ कोटी रुपयांचे पॅकेज मिळालेले आहे.

      उत्तराखंड येथील चंपावतच्या यशवंत चौधरी याने सुद्धा अतिशय मोठी भरारी घेतली असून २४ वर्षीय यशवंतला २३ कोटी रुपयांची ऑफर जर्मनीमधील टेस्ला गीगा कंपनीने दिली असून वरिष्ठ व्यवस्थापक या पदासाठी ही संधी यशवंतला मिळालेली आहे. यशवंत चौधरी याचे बंगळुरू मध्ये प्रशिक्षण होईल आणि त्यानंतर नोव्हेंबर मध्ये बर्लिनला जावे लागेल.पलक मित्तलने देखील अमेझॉन मध्ये एक कोटी रुपयांच्या आश्चर्यकारक पगारासह प्लेसमेंट मिळवले आहे. अखिल सिंगला रुब्रिकमध्ये १.२ कोटींच्या पॅकेज मिळाले आहे.

    अशा विद्यार्थ्यांचे यश पाहून नक्कीच हे सिद्ध होते की कठोर परिश्रम करणाऱ्या आणि कौशल्य असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अनेक अशा जागतिक संधी उपलब्ध आहेत.

बसचे छप्पर तुटले, तरीसुद्धा बस सुसाट धावत होती… ड्रायव्हर निलंबित… अभियंता सुद्धा निलंबित …

बसचे छप्पर तुटले, तरीसुद्धा बस सुसाट धावत होती… ड्रायव्हर निलंबित… अभियंता सुद्धा निलंबित …

    आपल्या भारत देशातील सर्वात मोठी वाहतूक कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणजे महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळ.सध्या सोशल मीडियावर बसचे छत तुटलेले असताना सुद्धा ती बस सुसाट धावत होती असा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये असणारी ही बस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचीच आहे. 

        महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे छत गडचिरोली जिल्ह्यामध्ये अर्धवटरीत्या तुटले.गडचिरोलीवरून अहेरीकडे जात असताना या बसचे छप्पर चामोर्शी मार्गावर उडाले. बसचे छत तुटले असताना सुद्धा बस रस्त्यावर धावतच होती. अशातच त्या बसच्या पुढे असलेल्या वाहनांमधील एका व्यक्तीने या बसचा व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ सध्या सगळीकडे वायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये बसचे छत तुटलेले असून हे छत वाऱ्यामुळे उडताना सुद्धा दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या बसच्या बस चालकाला निलंबित करण्यात आले आहे.

       या घटने संदर्भात माध्यमांना बस चालकाने माहिती देत असताना सांगितले की, बसचे छत निघाले असल्याची माहिती बस चालकांनी डेपोला दिली होती. अंगावर पाणी पडत होते त्यामुळे सीटच्या मागच्या बाजूला छत्री बांधली आणि त्यानंतर हळूहळू डेपोमध्ये बस नेण्यात आली. त्यावेळी बस मध्ये जवळपास दहा ते बारा प्रवासी होते. तेथील परिसरामधील रस्त्यांची अवस्था खराब असल्याने बसची परिस्थिती सुद्धा खराब होत असल्याचे सांगितले.

      महामंडळाच्या बसचा असा व्हिडिओ समोर आला असल्याने याबद्दल बऱ्याच प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे. महामंडळाने या संबंधी अभियंत्याला सुद्धा निलंबित केले आहे.विभागीय कार्यशाळेमध्ये बस दुरुस्तीचे काम योग्य त्या वेळेमध्ये पूर्ण न केल्यामुळे संबंधित विभागाचे यंत्र अभियंता शि. रा. बिराजदार यांना सुद्धा निलंबित करण्यात आलेले आहे. 

         संबंधित अधिकाऱ्यांवर बसचे काम वेळेत पूर्ण न करणे तसेच बसमध्ये त्रुटी असताना सुद्धा वाहतुकीसाठी उपलब्ध करून देणे असे सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन बसेस मार्गस्थ कराव्यात असे आगार व्यवस्थापनाला निर्देश देण्यात आलेले आहेत.

      शेखर चन्ने (एम एस आर टी सी चे संचालक आणि उपाध्यक्ष ) यांनी सांगितले की, ही बस गडचिरोली अहेरी मार्गावर धावत होती. ड्रायव्हरच्या कॅबच्या वरचा फायबर चा भाग तुटला होता. बाहेरील ॲल्युमिनियम छताचा भाग आणि छताचे आतील अस्तर चांगले होते त्यामुळे चालक आणि प्रवाशांना तुटलेल्या छताबद्दलची माहिती ही नव्हती.

    या बसचे चालक प्रदीप मेश्राम यांनी एका माध्यमाला मुलाखत देत असताना सांगितले की त्यांनी छत्री घेऊन जवळपास ५० किलोमीटर पर्यंतचा प्रवास केला असल्याची माहिती दिली .तसेच जवळपास दोन वर्षापासून ही बस खराब अवस्थेत असल्याची तक्रार सुद्धा त्यांनी अनेकदा केली असून सुद्धा त्यावर कुठलीही कारवाई किंवा दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे आरोप या बस चालकाने केले.

     व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोकांनी निरनिराळ्या कमेंट केलेल्या आहेत त्यापैकीच एका व्यक्तीने केलेली कमेंट म्हणजे ” आता लाल परीलाही फुटलेत पंख… “. तर काही व्यक्तींनी अशा प्रकारच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे.

      हा व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर एम एस आर टी सी बसेस बद्दल तसेच बसेसच्या देखभालीबद्दल विविध प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.

” युवकांकडून आपण धंदा करायला बसलोय का ? तलाठी होण्यासाठी हजार रुपये फी तर यूपीएससी साठी शंभर रुपये … ” – रोहित पवार

” युवकांकडून आपण धंदा करायला बसलोय का ? तलाठी होण्यासाठी हजार रुपये फी तर यूपीएससी साठी शंभर रुपये … ” – रोहित पवार

     आपल्या महाराष्ट्रामधील बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खूप धडपड करत असतात तसेच अथक परिश्रम देखील घेत असतात परंतु त्यांना ज्या ज्या परीक्षा द्यावयाच्या असतात त्या परीक्षांसाठी फी देखील जास्त प्रमाणामध्ये आकारली जाते. आपल्या राज्यामध्ये काही दिवसांपासून तलाठी भरती प्रक्रियेची अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली असून यासाठी फी ओपन कॅटेगिरी साठी १००० रुपये तर रिझर्व कॅटेगिरी साठी ९०० रुपये अशी आकारण्यात येत आहे. परंतु ही फी खूप आहे, ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती गरिबीची आहे परंतु त्यांना सरकारी परीक्षा द्यायच्या आहेत आणि ते वेगवेगळ्या परीक्षांसाठी फॉर्म भरू इच्छित आहेत त्यांनी मग काय करावे ?

      राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आमदार रोहित पवार यांनी अधिवेशनामध्ये विविध महत्त्वाचे आणि लक्षवेधी असे प्रश्न विचारले. यामध्ये रोहित पवार यांनी तलाठी भरती प्रक्रियेसाठी जी फी आकारण्यात येत आहे त्यावरून संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी तलाठी भरतीच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली होती.

    आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तलाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली असून ४६४४ जागांसाठी ही भरती होत आहे. तलाठी भरती प्रक्रियेसाठी तब्बल १३ लाखांच्या वर अर्ज आलेले असून अगदी इंजिनियर सारख्या उच्चशिक्षित तरुण-तरुणींनी सुद्धा या परीक्षेसाठी फॉर्म भरले आहेत. सरकारकडे जवळपास १२७ कोटींच्या वर परीक्षा शुल्क जमा झाले आहे.

    आमदार रोहित पवार यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाषण करत असताना त्यांच्या भाषणामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी जी फी आकारली जाते या महत्त्वाच्या मुद्द्यावर सुद्धा भाष्य केले. आमदार रोहित पवार म्हणाले की ” जर समजा एका विभागाची परीक्षा द्यायची असेल आणि ओपन समाजातील मुलगा किंवा मुलगी असेल तर १००० रुपये द्यावे लागतात तर रिझर्व कॅटेगिरी साठी ९०० रुपये द्यावे लागतात आणि जर उद्या जर समजा दुसऱ्या विभागाची परीक्षा द्यायची असेल तर परत १००० रुपये द्यावे लागतात आणि रिझर्व कॅटेगिरी चा असेल तर ९०० रुपये द्यावे लागतात… मग आपण युवकांकडून काय धंदा करण्यासाठी बसलोय… सरकार बनुन?… का टी सी एस ला आपल्याला मोठं करायचंय…? एम पी एस सी ३५० रुपये घेते.. यु पी एस सी १०० रुपये घेते …. मग आपल्याला काय हजार रुपये ? … याच्या आधी सुद्धा पाच वर्षांपूर्वी असंच झालं होतं… मेगा भरती …. १००- २०० कोटी गोळा झाले पुढे काय झाले त्या पैशाचा कोणालाच माहीत नाही…. मग अशाच पद्धतीने आपण प्रायव्हेट कंपन्यांना मोठं करायचंय का …? मग टी सी एसलाच जर काम द्यायचं असेल तर हजार रुपयेच का शंभर रुपये का नाही … ? ” राजस्थान सरकारने एक कार्ड काढले आहे … सहाशे रुपये देऊन हे कार्ड घ्यायचे आणि कुठलीही परीक्षा देता येते … असे सुद्धा त्यांनी सांगितले.

     आमदार रोहित पवार यांना यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. खरोखरच जर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे कार्ड काढले किंवा अशी काहीतरी संकल्पना राबवली तर आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थी विद्यार्थिनींना सुद्धा त्यांना हव्या त्या परीक्षा देता येऊ शकतात आणि त्यांची स्वप्न ते पूर्ण करू शकतात.

श्रावण बाळ योजना २०२३ | Shravan Bal Yojana

श्रावण बाळ योजना २०२३ : 

    आई वडील लहानपणापासून आपल्या मुलाबाळांना सांभाळतात, परंतु काही मुलं मुली त्यांचे आई वडील म्हातारे झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित रित्या सांभाळात नाही. काही मुला मुलींची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे ते त्यांच्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष करतात यांसारखी कित्येक कारणे यामागे असू शकतात. खरंतर ,आई-वडिलांना न सांभाळण्यासाठी कुणीही कोणतेही कारण देऊ नये आणि त्यांचा सांभाळ व्यवस्थित रित्या करावा. परंतु काही मुलं मुली तसं करत नाहीत. सरकारने वृद्ध लोकांसाठी श्रावणबाळ योजना सुरू केली आहे त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत …

श्रावण बाळ योजना २०२३ –

– राज्यांमधील वंचित तसेच निराधार वृद्ध नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी बनवण्यासाठी श्रावणबाळ योजना राबवली जात आहे.

– श्रावण बाळ योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक आणि विशेष सहाय्य विभागाकडून राबवली जात आहे आणि नियंत्रित केली जाते.

– श्रावणबाळ योजना ही दोन श्रेणीमध्ये विभागण्यात आलेली आहे :

श्रेणी अ आणि श्रेणी ब

१ . श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना गट अ :

श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना गट अ या अंतर्गत ६५ व ६५ वर्षावरील तसेच दारिद्र्यरेषेच्या खालील कुटुंबांच्या यादीमध्ये ज्या निराधार स्त्री व पुरुष नागरिकांचे नाव समाविष्ट आहे अशा नागरिकांना चारशे रुपये प्रति महिना निवृत्ती वेतन देण्यात येईल तर केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे दोनशे रुपये प्रति महिना असे निवृत्तीवेतन देण्यात येईल म्हणजेच एकूण सहाशे रुपये प्रति महिना.

२ . श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट ब :

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट ब ही योजना जे लोक खरोखरच गरजू आहेत परंतु ज्यांचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीमध्ये नाही अशा व्यक्तींसाठी आहे. या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांचे वय ६५ व ६५ वर्षाच्या वरती आहे अशा नागरिकांना आणि ज्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयांच्या आत आहे अशा व्यक्तींना सहाशे रुपये प्रति महिना निवृत्तीवेतन भेटते.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे : –

१ . वयाचा दाखला –

– शाळा सोडल्याचा दाखला

– रेशन कार्ड मधील अथवा निवडणूक मतदार यादी मध्ये नमूद केलेला वयाचा उतारा किंवा ग्रामीण अथवा नागरी रुग्णालयाच्या यांचा किंवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला

– ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका मधून अधिकृत जन्म प्रमाणपत्र

२ . दारिद्र्यरेषेखाली त्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे नाव समाविष्ट असल्याचा अधिकृत असा पुरावा

३ . रहिवासी दाखला – 

ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक, नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांनी दिलेला रहिवासी दाखला

श्रावण बाळ योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो –

 श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज व्यवस्थित रित्या भरावा.

श्रावण बाळ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

नवीन नोंदणी : येथे क्लिक करा

श्रावण बाळ योजना फॉर्म पी डी एफ : येथे क्लिक करा

महाराष्ट्र आपले सरकार पोर्टल : येथे क्लिक करा

महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत १७८२ जागांसाठी भरती

महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत १७८२ जागांसाठी भरती :

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 :

परिक्षेचे नाव : महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३

एकूण जागा : १७८२

पद क्र. परिक्षा पदाचे नावपद संख्या
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य)स्थापत्य अभियंता, गट-क२९१
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत)विद्युत अभियंता, गट-क४८
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक)संगणक अभियंता,गट-क४५
महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवापाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क६५
महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभागलेखापरीक्षक/लेखापाल,गट-क२४७
महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारणकर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क५७९
महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवाअग्निशमन अधिकारी, गट-क३७२
महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवास्वच्छता निरीक्षक, गट-क३५

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.१:

१) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

२) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.२:

१) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी

२) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.३:

१) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी

२) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.४:

१) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी

२) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.५:

१) B.Com

२) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.६:

१) कोणत्याही शाखेतील पदवी

२) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.७:

१) कोणत्याही शाखेतील पदवी

२) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण

३) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.८:

१) कोणत्याही शाखेतील पदवी

२) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा

वयाची अट: २० ऑगस्ट २०२३ रोजी २१ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ०५ वर्षे सूट)

फी : खुला प्रवर्ग : १००० रुपये/-

मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ : ९०० रुपये/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० ऑगस्ट २०२३

अभ्यासक्रम : येथे क्लिक करा

जाहिरात : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा