व्हिडिओ मार्केटिंग | Video marketing –
What is the video marketing?
How we can do video marketing?
What is digital marketing information in marathi?
What is the role of video in digital marketing?
What is video marketing good for ?
What is the need for video marketing?
व्हिडिओ मार्केटिंग –
अगदी कुठलाही व्यवसाय असला तरी त्यामध्ये मार्केटिंगला खूप महत्त्व आहे. पूर्वी आणि आत्ता देखील बऱ्याचदा पारंपारिक मार्केटिंग पद्धतीचा उपयोग केला जातो ,परंतु हल्ली डिजिटल मार्केटिंग पद्धती जास्त प्रमाणामध्ये वापरली जाते. डिजिटल मार्केटिंग बद्दल यापूर्वी एका लेखांमध्ये आपण माहिती जाणून घेतली आहे त्याची लिंक पुढे दिलेली आहे, ती माहिती तुम्हाला हवी असल्यास तो लेख सुद्धा तुम्ही वाचू शकता.
Digital marketing | डिजिटल मार्केटिंग
आज आपण डिजिटल मार्केटिंग पद्धतीमधीलच एक महत्त्वाची मार्केटिंग पद्धती म्हणजेच व्हिडिओ मार्केटिंग. याबद्दल जाणून घेणार आहोत …..
✔️व्हिडिओ मार्केटिंग म्हणजे काय ?
What is video marketing ?
– अगदी कुठलाही व्यवसाय असो त्या व्यवसायाच्या उत्पादनाची किंवा सर्विसेसची किंवा त्या ब्रँडची मार्केटिंग करत असताना व्हिडिओ फॉरमॅटचा मार्केटिंग करण्यासाठी उपयोग करणे म्हणजे व्हिडिओ मार्केटिंग होय.
– व्हिडिओ मार्केटिंग मुळे जे व्हिडिओ बघणारे ऑडियन्स असतात त्यांना एखाद्या घटकाबद्दल व्यवस्थितरित्या माहिती ज्ञात होते.
– व्हिडिओ मार्केटिंग मुळे अगदी कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांच्या किंवा केंद्रित ग्राहकांच्या एखाद्या उत्पादनाबद्दल किंवा सर्विसेस बद्दल माहिती पटकन लक्षात येते.
✔️व्हिडिओ मार्केटिंगचे फायदे कोणते आहेत ?
Which are benefits of video marketing ?
– एखाद्या व्यवसायाच्या उत्पादनाबद्दल किंवा सर्विसेस बद्दल उत्कृष्ट असा व्हिडिओ तयार करून त्यामध्ये त्या उत्पादनाबद्दल किंवा सेवेबद्दल व्यवस्थित माहिती टाकून हा व्हिडिओ लक्षित ग्राहकापर्यंत पोहोचवल्यामुळे ग्राहकांमध्ये तुमच्या व्यवसायाबद्दल किंवा ब्रँड बद्दल अधिक जागरूकता निर्माण होते आणि व्यवसायाचे किंवा एखाद्या ब्रँडचे सेल्स किंवा उत्पन्न वाढवण्यामध्ये व्हिडिओ मार्केटिंग खूप मदत करते.
– मजकूर जाहिरातींपेक्षा ( text advertising ) व्हिडिओ मार्केटिंग अधिक आकर्षक आणि समजण्यास सोपी असते त्यामुळे ग्राहकांची संख्या वाढण्यामध्ये मदत होते.
– इतर मार्केटिंग पद्धतीमध्ये इमेजेस आणि शब्दात्मक पद्धतीचा उपयोग करून जाहिरात केली जाते परंतु त्यापेक्षा व्हिडिओ मार्केटिंग पद्धती अधिक आकर्षक आणि समजण्यास सोपी असल्याने ग्राहकांमध्ये व्यवसायाबद्दल जलदरीतीने प्रचार होण्यास मदत होते.
– समजा ग्राहकाला एखादे उत्पादन किंवा सर्विस खरेदी करायची असल्यास ग्राहकाला व्हिडिओ फॉरमॅटमध्ये असलेली माहिती पटकन लक्षात बसते तसेच एखाद्या उत्पादन किंवा सेवा खरेदी करण्यापूर्वी ग्राहकाला ते उत्पादन किंवा सर्विस कसे कार्य करते याची देखील माहिती व्हिडिओद्वारे मिळू शकते आणि त्यामुळेच ग्राहकांना योग्य तो निर्णय घेण्यामध्ये या व्हिडिओ मार्केटिंग पद्धतीचा जास्त उपयोग होतो.
– ग्राहकाला जे उत्पादन किंवा जी सर्विस हवी असते ते मिळवण्यामध्ये ग्राहकाला मदत होते आणि हवे ते उत्पादन किंवा सर्विस मिळते.
– एखाद्या व्यवसायाची किंवा ब्रांडची वेबसाईट असते तसेच इतर सोशल मीडिया अकाउंट जसे की इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर असतात ह्या द्वारे व्हिडिओ मार्केटिंग करणे सोपे होते आणि व्हिडिओ मार्केटिंग केल्यामुळे वेबसाईटवर तसेच इतर सोशल मीडिया अकाउंट वर ऑडियन्स रीच देखील वाढतो आणि याद्वारे ऑनलाईन पद्धतीने इन्कम देखील कामाला जाऊ शकतो.
जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर
KuKu FM Discount Code- GVKEO1966
कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत- https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8
✔️व्हिडिओ मार्केटिंग स्ट्रॅटेजीज –
Video marketing strategies –
– व्हिडिओ मार्केटिंग करण्यासाठी योग्य त्या संसाधनांची आवश्यकता असते जसे की ,व्हिडिओ तयार करण्यासाठी लागणारी उपकरणे, तसेच उत्तम सॉफ्टवेअर याचबरोबर व्हिडिओ तयार करण्यासाठी आवश्यक तो वेळ तसेच शक्य झाल्यास व्हिडिओ मार्केटिंग टीम.
– जो व्हिडिओ व्हिडिओ मार्केटिंग साठी वापरणार आहात तो व्हिडिओ आकर्षक आणि माहितीपूर्ण असणे गरजेचे आहे ,जेणेकरून केंद्रित ग्राहकापर्यंत तो पोहोचेल.
– हल्ली सर्वच लोक व्यस्त असतात आणि बरीच व्हिडिओज निरोपयोगी असतात त्यामुळे काही लोक बऱ्याच व्हिडिओंकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे एखाद्या व्यवसायाबद्दल किंवा ब्रँड बद्दल व्हिडिओ बनवत असताना व्हिडिओ जेवढा शॉर्ट ठेवता येईल तेवढा ठेवला तर ऑडियन्सला देखील कमी कालावधीमध्ये आवश्यक ती माहिती मिळण्यास मदत होईल.
– तुम्ही जितक्या ठिकाणी तुमच्या व्यवसायाबद्दल किंवा ब्रँड बद्दल व्हिडिओ पब्लिश करू शकता तितक्या ठिकाणी केला पाहिजे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त ऑडियन्स किंवा ग्राहकांपर्यंत व्हिडिओ पोहोचतो.
✔️व्हिडिओ मार्केटिंग साठी प्लॅटफॉर्म्स –
Platforms for video marketing –
– युट्युब YouTube
– विमिओ Vimeo
– फेसबुक Facebook
– लिंकड इन LinkedIn
– ट्विटर Twitter
– डेली मोशन DailyMotion
– इंस्टाग्राम Instagram
– टिक टॉक TikTok
– ई-मेल Email
– ब्लॉग आर्टिकल्स Blog articles
– पेड एड्स Paid ads
– पिंटरेस्ट Pinterest