मराठी विचार मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत.आज आपला विषय स्मार्ट शेती तर सगळ्यांनाच हा प्रश्न असतो कि शेतीमध्ये स्मार्ट पध्दतीने काम करून खरंच लाखो रुपये कमवतात येतात का?
तर त्यासाठी आपल्याला माहिती हवी ते आपण विचार करतो.आधुनिक शेती कशी करायची?
खरंच आपल्याला फायदा होईल का? किंवा गाव पातळीवर शेती आहे आपल्याला जमेल का?
आपण करू शकतो का?जर आपण स्मार्ट शेती चालू केली तर मी त्याला कसे वाढवू शकतो अशा प्रकारचे विचार निर्माण होतात. पण मी गावच्या गावी स्मार्ट शेती चालू करू शकतो का? हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोक्यात येत असतोच, तर आपण आज या विषयावर बोलायचा प्रयत्न करनार आहोत.
Dragon Fruit- एकदाच लागवड करून 20 वर्षापर्यंत, वार्षिक 12-14 लाख उत्पन्न देणारी शेती
आता त्यामागचे अर्थकारण जाणून घेऊ. जर आपला पैसा वाढवायचा असेल किंवा त्या पैसाचे दामदुप्पट करायचे असेल तर आपल्याला 5 वर्षांसाठी गुंतवणूक करायची तर त्याचा आपल्याला परतावा किती मिळणार आहे.जर आपण FD मध्ये गुंतवणूक केली तर 6% शेअर बाजारात 10% तर M.फंड मध्ये 15%किंवा आपण सोने नाणे घेतले तर आपल्याला 17%पर्यंत परतावा मिळू शकतो.परंतु आपल्याकडे असीच एक स्मार्ट शेती योजना आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 30%पेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. तर हे कसे हे आपण जाणून घेणार आहोत.
Dragon Fruit Farmers- Maharashtra- Contact Details
Dragon food च्या शेती बद्दल त्यामध्ये investment किती लागेल.?
एकरी उत्पन्न किती घेता येईल?
रोपे कुठे मिळतील?
रोप कशी निवडावी?
लागवड कशी करावी?
यासर्व गोष्टी वर आपण आज थोडक्यात बोलणार आहे तर चला जाणून घेऊ dragon food चा उगम अमेरिकेतील Arizona नामक भागात झाला. आता हळूहळू भारतात त्याचे प्रस्थ वाढीस लागले आहे.जगामध्ये दोन ते तीन देश असे आहे ते संपूर्ण जगाच्या 70% उत्पन्न काढतात. तर आपल्याला भारतात सुध्दा एवढा स्कोप तयार करता येईल.
तर आपण पाहू यामध्ये प्रामुख्याने किती प्रकार आहेत आणि पिकवतात. White, yellow, purple, red हे प्रकार आहेत. तर Red Dragon food ला बाजारात जास्त प्रमाणात मागणी आणि भाव मिळतो. तर यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा प्रश्न असतो कि जमीन कशी असावी तर लाल तांबडी काळी अगदी मुरमाड सुध्दा चालेल. तर हे पिक 20 ते 35 degree मध्ये घेत असतील तर आपले इकडच वातावरण पुरक आहे.
जर तुम्हाला पाण्याची टंचाई असेल तर काळजी करू नका तर ह्या पिकाला पाणी खूप कमी लागते.
रोपे कशी निवडावी?-
तर नर्सरी मध्ये dragon food चे प्रकार आहेत white एक रोप 30 ते 50रूपयांमध्ये तर रेड 40 ते55 पर्यंत मिळते पण नर्सरी मध्ये गेल्यानंतर एक काळजी घ्यावी कि तो मालक स्वतः रोप तयार करतो का का दूसरीकडून आणतो आहे व त्या रोपावरती किड रोग किंवा डाग असतील तर घेवू नये. तर तुम्हाला एका एकरासाठी 1200 रोपे लागतील.आणि महत्त्वाचे कि रोपामध्ये काय पाहायचे तर, चांगले 2 ते तीन महिने वाढ झालेले रोपे खरेदी करावी.
लागवड कशी करावी आणि कधी करावी?
यांमध्ये पोल बांध केली जाते तर 12*6 12*8 10* 6 फुटांपर्यंत अंतर असावे. तर लागवडीसाठी योग्य वेळ जून जुलै महिन्यात आहे, कारण पावसाळ्यात रोपांची वाढ होते, एका पोलवर चार रोपांची लागवड करावी. तर आपल्याला एकरात 300 पोल.लागतात ,किंवा तुम्ही लाकडी खांब सुद्धा वापरू शकता. पोल बायडींग तार रोपे यांचा एकरी खर्च साडेतीन लाख रुपये येतो
आपण पाहू dragon food फायद्याचे गणित
फळाला कमीत कमी 100 ते 150 रूपये प्रति किलो भाव मिळतो तर आपल्याला कशा प्रकारे फायदा होणार आहे हे जाणून घेऊ लागवड खर्च साडेतीन लाख पहिली तोड महिन्यात 500 ते 600 किलो माल मिळतो,
उत्पन्न पन्नास हजार तर दुसरे वष्रे 6 ते 7 टन माल उत्पन्न 6 लाख रूपये तीसरे वष्रे माल 10 ते 12 टन उत्पन्न12 लाख अश्या प्रकारे चौथ्या पाचव्या वष्री 12-15 लाखांचे उत्पन्न काढू शकता.तर तुम्ही म्हणाल प्रत्येक वष्रे इतर खर्च लागेल तर मजूरी 50 ते 80 हजार वगळता अन्य कोणत्याही खर्च लागत नाही.
तर झाडांचे आयुष्य 20 वष्रे पर्यंत असते. तुम्ही 20 वष्रे उत्तम उत्पादन घेवू शकता.