Holi 2022 Puja Muhurat, Essay on Holi होळी 2022 मुहूर्त, पूजेचा विधी, पूजा कशी करावी

होळी हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण आहे.होळी हा सणवसंतोत्सव आहे.होळीला रंगांचा सण असे सुद्धा म्हणतात. होळी प्रत्येक वर्षी फाल्गुन (मार्च) महिन्यात शेवटच्या पौर्णिमेला साजरी केली जाते.होळी विविध रंगांसोबत साजरी केली जाते.पूर्ण भारतभर होळी हा सण खूप आनंदात साजरा केला जातो.होळीचा सण साजरा करण्याच्या मागे एक प्राचीन इतिहास आहे.


Holi 2022 Puja Muhurat, Essay on Holi  होळी 2022 मुहूर्त, पूजेचा विधी,

प्राचीन काळात एक हिरण्यकश्यप नावाचा असुर राजा होता.हिरण्यकश्यप भगवान विष्णूंचा विरोधी होता.त्याची एक दृष्ट बहीण होती तिचे नावहोलिकाहोते.हिरण्यकश्यपचा पूत्रप्रल्हादभगवान विष्णूंचे खूप मोठे भक्त होते.त्या कारणामुळे हिरण्यकश्यपने त्याची बहीण होलिका ला पूत्र प्रल्हाद यांना जिवे मारण्यासाठी आगीमध्ये बसण्यास सांगितले.कारण होलिका ला आगीपासून जळण्याचे वरदान प्राप्त होते.त्यानंतर होलिका प्रल्हादला घेवून आगीमध्ये बसते.परंतु प्रल्हाद आगीमध्ये सुरक्षित वाचतो,प्रल्हादांना कुठलीही इजा होत नाही.आणि होलिका त्याच आगीमध्ये जळून भस्म होते.

 

होळी हा सण भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये किंबहुना भारतभर साजरा केला जातो.वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो.हा सण काही ठिकाणी दोन दिवसांचा असतो तर काही ठिकाणी तीन दिवसांचा साजरा केला जातो.भारतात आणि नेपाळमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.तसेच जगभरात बऱ्याच ठिकाणी होळी हा सण साजरा केला जातो.

होळी या सणाला महाराष्ट्रात महाराष्ट्रातशिमगाया नावाने देखील ओळखले जाते. उत्तर भारतात होळीलादोली यात्राकिंवाहोरीअसे म्हंटले जाते.दक्षिण भारतात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.२०२२ मध्ये होलिका दहन १७ मार्च रोजी गुरुवारी होणार आहे.तर होळीचे रंग १८ मार्च शुक्रवारी साजरे
केले जाणार आहे.

 

होळीचे महत्त्व – 

असे मानले जाते की ,होळी हा सण वाईटावर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. वाईटाचा नाश व्हावा म्हणून हा सण साजरा केला जातोप्रल्हादांचा जसा भगवान विष्णू यांच्यावर विश्वास होता, जशी भक्ती होती तसाच  विश्वास आणि भक्ती देवावर प्रत्येकाने ठेवली पाहिजे. देवावर जर भक्ती आणि विश्वास असेल तर देव नेहमीच आपल्या सोबत असतात.

मुहूर्त –

फाल्गुन पौर्णिमा १७ मार्च गुरवारी दुपारी 01: 29 पासून आहे आणि दुसऱ्या दिवशी 18 मार्च शुक्रवारी रात्री 12.47 पर्यंत राहील.

होळी साठी एखादा खड्डा खांदुन त्यात एखाद्या झाडाचे खोड किंवा लाकूड लावले जाते. त्या भोवती गोवर्या गवताच्या पेंढ्या रचतात. आणि सभोवताली रांगोळी काढली जाते.स्त्रीपुरुष होळीची पूजा करतात. पुरुष मंडळी दोन्ही बाजूने दोघे उभे राहून पेंढी एकमेकांकडे फेकतात. त्यानंतर जळणाऱ्या होळीत नैवेद्य आणि नारळ टाकला जातो.होळीला मुख्यतः पुरणपोळीचा नैवद्य दाखवला जातो. त्यानंतर होळीला हळदीकुंकू,फुले वाहिली जातात.होळीला जल अर्पण केले जाते आणि प्रदक्षिणा घातल्या जातात.सर्वजण सुख समृद्धीची प्रार्थना करतात.जे वाईट आहे ,कालबाह्य आहे ,अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा.नव्या चांगल्या गोष्टींचा,चांगलेपणाचा स्वीकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे.

होळी या सणाला दुसरे नावहुताशनी पौर्णिमाअसेही आहे .हा सण शहरात तसेच खेड्या पाड्यात मोठ्या आनंदाने,थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो.