काही दिवसापूर्वी राज्य सेवेचा निकाल जाहीर झाला. त्यातील सर्व यशस्वीतांचे खूप अभिनंदन. पुढील दीड-दोन महिन्यात UPSC चा पण निकाल लागेल.वर्तमान पत्रात बातम्या, social मीडिया वर कौतुकाच्या पोस्ट तसेच अजून काही पोस्ट पाहिल्या असतील आणि पुढही बघाल. परीक्षा पास झालेल्या कित्येकांची नावे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील.
अर्थात त्यामागे त्या सर्वांचे कठोर परिश्रम आणि आहोरात्र मेहनत आहेच.आणि ते तशा सत्कारास पात्र देखील आहेत. पण फक्त एवढंच पाहून मी पण MPSC च करणार किंवा माझ्या मुलाला/मुलीला MPSC करायला लावणार, असा विचार करत असाल तर थोड थांबा. आम्ही काही माहिती गोळा केलीय ती विडिओ एकदा बघून मग ठरवा
खरंच MPSC करावी का मराठी मुलांनी? आपल्या मुलांना ह्या गोष्टी माहित आहेत का?
खरं तर पहिले तर दोन गोष्टी तुम्हाला हमखास जाणवल्या असतील किव्हा जाणवतील:
एक म्हणजे भयानक स्पर्धा (जवळ जवळ ४ लाख मूले स्पर्धेत बसतात, निकाल लागले कि अधिकारी होणार ४०० फक्त) आणि दुसरी माझ्यामते त्याहूनही भयानक म्हणजे राहिलेल्या जवळपास ९९.९९% मुलांचं,मुलींचा काय होतं,
अधिकारी बनलेले मुलांचे सत्कार बघून कोणताही जास्त विचार न करता आपण ठरवून टाकतो की मी पण MPSC च करणार.सर्व काही विसरून अभ्यासाला सुरुवात होते.पहिल्या एक-दोन प्रयत्नात यशस्वी झालेले नशीबवान ठरतात. (कमीत कमी असतात असे) उरलेल्यांना मात्र जसे जसे attempt वाढत जातात,तसे तसे वास्तव दिसायला सुरुवात होते.
तसे पाहायला गेले तर स्पर्धा परीक्षा मध्ये यशाच्या राजमार्गात खाच खळगे देखील आहेत याची जाणीव व्हायला लागते.काहीजण यातून सावरून यशस्वी होतात, तर खूपजण नैराश्याच्या गर्तेत अडकून पडतात.३-4 वर्षांनंतर देखील हातात कुठलीच पोस्ट अथवा नोकरी नसते.यावेळी graduation उरकून गेले त्यास काही वर्षे निघून गेलेली असतात, अशावेळी वाटायला सुरुवात होते की वेळीच दुसरी एखादी पोस्ट घ्यायला हवी होती किंवा साईड बाय साइड , इतर नोकरीचा (अर्थात ba
ckup plan चा) विचार करायला हवा होता.
ckup plan चा) विचार करायला हवा होता.
खूप वेळा वेळ आणि वय दोन्हीही आपल्या बाजूने नसते. अशा खूप जणांची परिस्थिती, त्या ९९.९९% मधील अपयशी जणांची कहाणी थोड्या अधिक प्रमाणात सारखीच असेल. कठीण परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्यांची बरीच उदाहरणे आहेत आणि त्यांचा प्रवास कौतुकास्पद आहेच, पण त्यांच्यासारखी किंवा त्यापेक्षा जास्त मेहनत करून देखील यशस्वी न झालेल्यांचे प्रमाणसुुुध्दा खूप आहे. शंभरातले 1-२ चीच निवड होणार हे कितीही कटू असले तरी स्पर्धा परीक्षांच्या विश्वाचं सत्य आहे. अन ते आपणास स्वीकारावं लागेल
स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचं नेमकं प्रमाण किती?
महत्त्वाचे पाहिले तर् दरवर्षी दोन परीक्षा नियमित होतात. एक म्हणजे राज्यसेवा आणि दुसरी संयुक्त परीक्षा वर्ग दोनची परीक्षा या दोन्हीसाठी जर जागा चांगल्या असतील तर 1200 ते 1300 जागा दरवर्षी येतात आणि फॉर्म येतात जवळपास 4 लाखाच्या आसपास लोक फॉर्म भरतात, म्हणजे १ % पण मुलं पास होत नाहीत
आणि मुख्य म्हणजे या आकड्यांमध्ये दरवर्षी वाढच होत असते. कमी मात्र होत नाही, म्हणजे दरवर्षी स्पर्धा वाढतच जाते
काही वर्ष जोमाने अभ्यास केल्यानंतर अनेक प्रश्न समोर उभे राहतात.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना लगेच ते सोडून एखाद्या दुसऱ्या क्षेत्राकडे पण लगेच वळता येत नाही. कारण तो त्या वयात खूप अस्थिर असतो. डोक्यात सारखा विचार असतो कि,
दुसऱ्या पण क्षेत्रात आपण अपयशी झालो तर काय. बाकीचे जे लोक आयुष्य जगत असतात तस त्याला काहीच आयुष्य जगता नाही येत, त्याच्या सेटलमेंटचा प्रश्न असतो, त्याच्या लग्नाचा प्रश्न, त्याच्या पोटापाण्याचा, त्याच्या घराचा प्रश्न असतो. त्याचबरोबर आयुष्यात 2 पैसे पण कधी कमवेल की नाही. याचा प्रश्न असतो. अशा अपयशी लोकांकडे समाजातील काही लोक तुच्छपणे बघतात.
त्यामुळे आम्हाला एवढंच सांगायचं आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
अभ्यास करा,प्रयत्न करा,पण एवढ करून देखील select नाही झाला तर काय करायचं याचाही प्लॅन तयार ठेवा.म्हणतात ना-“Hope for the best but prepare for the worst.”म्हणूनच स्पर्धा परीक्षांचा विचार करताना Backup Plan चा देखील विचार करा.आशावादाला प्रामाणिक प्रयत्नांबरोबरच थोडीशी का होईना व्यावहारिकतेचीदेखील जोड असुद्या.
शुभेच्छा.