जागतिक महिला दिन भाषण मराठी 2022 I women’s day 2022 theme in india

 

महिला दिन म्हणजे स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्याचा गौरव करण्याचा दिवस आहे. दरवर्षी मार्च “हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.२८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा केला होता,तरीही १९१० साली झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार , मार्च हा दिवस आंतरराष्ट्रिय महिला दिन म्हणून ठरवण्यात आला.


विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ पूर्ण जगभरातल्या स्त्रियांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आलेला होता.तेव्हा हे स्त्री पुरुष विषमतेचे एक उदाहरणच होते.परंतु स्त्रिया आपला हक्क मिळवण्यासाठी लढतच होत्या. अमेरिकेत १८९० मध्ये मतदानाच्या हक्का संदर्भात  नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशनची स्थापना झाली.


Women’s Day Essay 2022 in marathi  Mahila Diwas Nibandh

परंतु ही असोसिएशन सुद्धा वर्णद्वेशी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती.उत्तर पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरीत मतदात्यांपासून आणि दक्षिणेकडील देशांना काळ्या मतदात्यांपासुन वाचवण्याकरिता स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायला हवा असे आवाहन त्या करत होत्या.परंतु या मर्यादित हक्कांना देशांतरित कामगार स्त्रियांनी आणि बहुसंख्य कृष्णवर्णीय लोकांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्स वाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला.


पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद १९०७ साली स्टुटगार्ड येथे भरली.त्या परिषदेत क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने ” सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली.


न्यूयॉर्क येथे मार्च १९०८ रोजी वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली.काही मागण्यांबरोबरच मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही केली.अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकीन अतिशय प्रभावित झाल्या.


१९१० साली कोपनहेगन येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय  समाजवादी महिला परिषदेत मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ , मार्च हा दिवसजागतिक महिला दिनम्हणून स्वीकारावा असा ठराव क्लाराने मांडला आणि तो ठराव पासही झाला.

भारतामध्ये पहिल्यांदाजागतिक महिला दिन मार्च १९४३ रोजी साजरा केला गेला.महिला समानतेबद्दल जागरूकता वाढवणे ,महिलांचे यश साजरे करणे हे महिला दिनाच्या निमित्ताचे काही उद्देश आहेत.

महिला दिनानिमित्त प्रत्येक स्त्रीने ही शपथ घ्यावी की मी स्त्रीभ्रूणहत्या करणार नाही आणि मुलगा मुलगी एक समान मानेन.त्यांच्यात भेदभाव करणार नाही.

स्त्रियांना मान सन्मान देणे,स्त्रियांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी महिला दिवस साजरा केला जातोस्त्रीला आई,बहीण,मुलगी,पत्नी,मैत्रीण, आत्या,काकी,मावशी,आजी अशी अनेक नाती हळूवार जोपासावी लागतात स्त्री सृष्टीचे जीवनचक्र अविरतपणे चालू ठेवण्याचे कार्य करते.प्रत्येक कुटुंबाचा पाया कणा स्त्री असते.स्त्री शिवाय कुटुंब नाही कुटुंबाशिवाय समाज नाही.सासर माहेरच्या दोन्ही घरांना ती नकळतपणे जोडते.

स्त्री आपल्या मुलांना योग्य ते संस्कार देते. मुल पोटात वाढवण्यापासून ते सुसंस्कृत व्यक्ती घडवण्यापर्यंत संपूर्ण जबाबदारी स्त्री तक्रार करता पार पाडते.प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हंटले जाते. ती संकटात पुरुषाची ढाल बनते.स्त्री फक्त कुटुंबासाठी झटत नाही;तर झाशीची राणी लक्ष्मीबाई,अहिल्याबाई होळकर यांसारख्या अनेक स्त्रिया मायभूमिच्या रक्षणासाठी झटल्या आहेत.


तसेच सावित्रीबाई फुले यांचे योगदान स्त्री शिक्षणासाठी अतुलनीय असे आहे.आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पूढे आहे.प्रगती पथावर आहे.स्त्रीचे प्रत्येक
क्षेत्रात योगदान आहे.अनेक स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले आहे.आज स्त्रीचा गौरव केला जातो,परंतु काही समस्याही स्त्रियांना आहेच,जसेकी स्त्री भ्रूणहत्या ,लैगिंक अत्याचार,जुन्या चालीरीती, अंधश्रद्धा .ह्या समस्या जर दूर झाल्या तर नक्कीच स्त्रियांचे जीवन अधिक सोपे होईल त्या त्यांच्या क्षेत्रात अधिकाधिक प्रगती करतील

फक्त महिला दिनाच्या दिवशीच नव्हे तर प्रत्येक दिवशी स्त्रियांना मान सन्मान मिळाला पाहिजे….