छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य- 10 management lessons from Chhatrapati Shivaji Maharaj

 

छत्रपती शिवाजी महाराजांनाव्यवस्थापनाचे गुरुम्हणून देखील ओळखले जाते. व्यवस्थापन म्हणजेच योग्य पद्धतीने काम पूर्ण करणे. व्यवस्थापनातील तत्वांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतोनियोजन, संघटन, दिशा आणि नियंत्रण एखादे काम करणे अगोदर त्या कामाचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे म्हणजेच ते काम कुणी, कधी ,कशासाठी आणि का करत आहोत हे अगोदरच ठरवणे म्हणजेच ध्येय आणि हेतू निश्चित करणे गरजेचे आहे.


10 Leadership Lessons from the Legend of Chhatrapati Shivaji Maharaj

  संघटन म्हणजे साधन सामग्रीची जुळवाजुळव. काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणकोणते साधनसामग्री लागणार आहे हे ओळखणे गरजेचे आहे.

काम योग्य दिशेने पूर्ण करणे अतिशय गरजेचे आहे. आपण जे काम करत आहोत ते योग्य पद्धतीने करणे, त्यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे.

या सर्व गोष्टी शिवाजी महाराजांच्या जीवनातून शिकण्यास मिळतात.

शिवाजी महाराजांच्या जीवनातून शिकता येणारे काही कौशल्ये खालील प्रमाणे


1.नाते जपणे –

सामान्य माणसांशी संबंध कसे बांधले आणि जोपासले हे शिवाजी महाराजांच्या जीवनातून शिकता येते. आपणही प्रत्येकाने नाती जपली पाहिजे, जोपासली पाहिजे.

 

 2.प्राधान्यक्रम – छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासनासाठी स्पष्ट प्राधान्यक्रम तयार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले प्राधान्य म्हणजे लोकांची सुरक्षितताहोती. कुठलीही परिस्थिती आली तरी ह्या गोष्टीचे पालन त्यांनी केले.सर्व परिस्थितीत त्याचे पालन केले. आपणही आपल्या जीवनात कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे ते ठरवले पाहिजे.

 

3. निर्णय घेणे

कोणतीही गोष्ट करताना निर्णय घेणे अतिशय महत्त्वाचे असते. निर्णय घेण्या अगोदर खालील गोष्टींचा विचार करणे महत्वाचे आणि फायद्याचे ठरू शकते.

 1. माहिती गोळा करा कुठलाही निर्णय घेण्याअगोदर त्यासंबंधी सर्व माहिती गोळा करणे आवश्यक आहे
.

2. पर्यायाचे विश्लेषण करा एखादा निर्णय घेताना कोण कोणते पर्याय उपलब्ध आहे याचा देखील विचार करणे आवश्यक आहे.

 3. निर्णय अंमलात आणा

तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो अमलात आणणे गरजेचे आहे.

 4. परिणामांचे पुनरावलोकन कराआपण हा निर्णय घेतल्यानंतर कोण कोणते परिणाम होऊ शकतात या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

 

4. संवाद –

3C’s of communication-concise complete and clear

संक्षिप्त, पूर्ण, स्पष्ट म्हणजेच संवाद संक्षिप्त असेल,पूर्ण असेल आणि स्पष्ट असेल तर अतिशय उत्तम.

जेव्हा संसाधनांची कमतरता असते तेव्हा सुद्धा सुसंवादामध्ये अंतर येता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांची लिखित संवादाची परिणामकारकता पत्रांमधून स्पष्ट होते

5. स्टेकहोल्डर्स व्यवस्थापनकोणाचेही प्रेरणा आणि वर्तन ओळखून,समजून घेणे आवश्यक आहे. तुम्ही जे साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात त्यावर ते परिणाम करू शकतात, विशेषत: जेव्हा अनेक भागधारक असतात. शिवाजी महाराजांनी कर गोळा करण्याची जहाँ गिरी  पद्धत बंद करून भागधारक कमी केले, भ्रष्टाचार कमी केला.

 6. लोकांना एकत्र आणा

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व जातीधर्मातील रयतेला एकत्र आणले.

7. नवीन कल्पना

 छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना निर्माण केली. शिवाजी महाराज भारतीय नौदलाचे जनक होते. शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांना मराठी डिक्शनरी बनवण्यासाठी सांगितली जेणेकरून मराठी भाषा जपली जाईल आणि वाढली जाईल.

8. शिवाजी महाराजांनी रयते वरील लक्ष कधीच कमी होऊ दिले नाही. त्याच्या गरजा, त्यांची सुरक्षितता यावर नेहमी लक्ष दिले. त्याचप्रमाणे आपण आपले जे ग्राहक आहेत त्यांना कोणत्या गोष्टी आवश्य
आहेत यावरील लक्ष कमी होऊ देता कामा नये.

9. विश्वास तयार करने

तानाजी मालसुरे, बाजीप्रभू देशपांडे, बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, हंबीरराव मोहिते, कोंडाजी फर्जंद, येसाजी कंक, बाजी पासलकर, मुरारबाजी देशपांडे, शिवा काशिद हे सर्व शिवाजी महाराजांचे विश्वासू  होते. याप्रमाणेच आपण लोकांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे.

10. भावनिक बुद्धिमत्ता

स्वतःबद्दल जागृकता असणे अतिशय आवश्यक आहे तसेच कामात नियमितपणा असणे आवश्यक आहे. तसेच इतरांसाठी आपण कशा पद्धतीने मोटिवेशन बनवू शकतो हे ओळखणे गरजेचे आहे. तसेच आपल्या मध्ये सामाजिक कौशल्य असणे आवश्यक आहे.