महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक फेडरेशन लि. मध्ये लिपिक आणि वरिष्ठ अधिकारी पदांची भरती

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक फेडरेशन लि. मध्ये लिपिक आणि वरिष्ठ अधिकारी पदांची भरती

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी लिपिक, प्रशिक्षणार्थी वरिष्ठ अधिकारी

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (किमान ५०% आवश्यक) (प्रथम प्रयत्नांत उत्तीर्ण) व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक

एकूण रिक्त पदे: १९ पदे

नोकरीचे ठिकाण: जालना ( दी जालना पिपल्स को-ऑप. बँक लि., जालना )

वयोमर्यादा: दिनांक ६ जुलै २०२३ रोजी किमान २२ ते कमाल ३५ वर्षे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

परीक्षा शुल्क: ९४४/- रुपये

अर्ज सुरु होण्याची तारीख: १७ ऑगस्ट २०२३

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ ऑगस्ट २०२३

भरती प्रक्रिया : लेखी परीक्षा व इंटरव्यू

जाहिरात : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

३९९ रुपयांत पोस्ट ऑफिस विमा योजना | 399 Post Office Insurance Scheme 2023

३९९ रुपयांत पोस्ट ऑफिस विमा योजना | 399 Post Office Insurance Scheme 2023

      जवळपास सर्व लोक कधी ना कधी कुठे ना कुठे प्रवास करतच असतात. काही लोकांना तर नोकरीमुळे ,शिक्षणामुळे किंवा इतर काही कारणास्तव दररोजच प्रवास करावा लागतो. काही लोक त्यांच्या खाजगी वाहनाने प्रवास करतात तर काही लोक रिक्षा, बस यांसारख्या वाहनांचा उपयोग प्रवासासाठी करतात. प्रवास करत असताना हल्ली अपघाताचे प्रमाण सुद्धा रस्ते चांगले नसल्याकारणाने किंवा इतर काही कारणास्तव वाढले आहे. अशातच जर ज्या माणसाचा अपघात झाला त्या माणसावरच जर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असेल आणि त्या माणसाचे काही बरे वाईट झाले तर मात्र सर्वकाही कठीण होऊन बसते. परंतु अशावेळी जर अपघात विमा काढलेला असेल तर नक्कीच त्या व्यक्तीच्या कुटुंबाला हातभार लागू शकतो. तसेच ज्या व्यक्तीचा अपघात झालेला आहे ती व्यक्ती जखमी झाली तर दवाखान्याच्या खर्चामध्ये सुद्धा अपघात होण्यामुळे बऱ्यापैकी हातभार लागतो.

      पोस्ट ऑफिस विमा हा अगदी कुठल्याही वाहनाचा अपघात झालेला असेल उदाहरणार्थ दुचाकी, चार चाकी किंवा ट्रक किंवा टेम्पो असे कुठलेही वाहन असेल तरीसुद्धा हा विमा उपलब्ध आहे.

पोस्ट ऑफिस विमा योजनेचे लाभ : 

Benefits of Post office Insurance :

✓ अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये

✓ दवाखान्याचा खर्च ६० हजार रुपये

✓अपघातामुळे कायमस्वरूपीचे अपंगत्व १० लाख

✓ मुलाच्या शिक्षणासाठी- १ लाख रुपये प्रति मुल (जास्तीत जास्त दोन मुले)

✓ ऍडमीट असेपर्यंत रोज १ हजार रुपये (१० दिवसापर्यंत)

✓ ओ पी डी खर्च -३० हजार रुपये

✓ अपघाताने पॅरॅलिसिस झाल्यास- १० लाख रुपये

✓ कुटुंबाला दवाखाना प्रवासखर्च २५,०००/- रुपये

पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी पात्रता :   

Eligibility for Post office Insurance :

-पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी पोस्ट ऑफिस मध्ये बँक खाते असणे आवश्यक आहे.

-पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी वयोमर्यादा १८ वर्ष ते ६५ वर्ष असणे आवश्यक आहे.

-पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी प्रति वर्ष ३९९ रुपये भरावे लागणार आहेत.

३९९ रुपयांमध्ये मिळणारा विमा लाभ कुठे आणि कसा मिळणार ? 

– पोस्ट ऑफीस विम्याचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावे आणि पोस्ट ऑफिस मध्ये बँक खाते उघडावे.

– पोस्ट ऑफीस मधूनच ह्या विम्या संदर्भात माहिती तुम्हाला दिली जाईल.

– पोस्ट ऑफीस मधूनच तुम्हाला एक कार्ड सुद्धा मिळेल.

– जर भविष्यामध्ये अपघात झाला तर ह्या कार्डद्वारे तुम्हाला ह्या विम्याचा लाभ मिळू शकतो.

पोस्ट ऑफिस विमा योजनेचा कालावधी किती असणार आहे?

– पोस्ट ऑफिस विमा योजनेचा एकुण कालावधी हा एक वर्ष इतका असून दर एक वर्षानंतर विमा धारकास आपल्या विम्याचे नुतनीकरण पोस्ट ऑफीस मध्ये जाऊन करणे गरजेचे असेल.

हे ही वाचा … प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 

“सुभेदार” या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याच्या तारखेमध्ये बदल ….

“सुभेदार” या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याच्या तारखेमध्ये बदल ….

       बऱ्याच दिवसापासून बहुचर्चित असलेला आणि प्रेक्षकांमध्ये अतिशय उत्सुकता असलेला सुभेदार हा मराठी चित्रपट १८ ऑगस्ट २०२३ या दिवशी प्रदर्शित होणार होता. परंतु आता या तारखे मध्ये बदल करण्यात आलेला आहे.

    ‘सुभेदार’ हा श्री शिवराज अष्टका मधील पाचवा चित्रपट असून या चित्रपटांमध्ये तानाजी मालसुरे यांची शौर्यगाथा बघायला मिळणार आहे. प्रेक्षकांमध्ये सुभेदार या चित्रपटाची उत्सुकता अगदी चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाल्यापासूनच दिसत आहे. तसेच आजच्या पिढीपर्यंत आपल्या इतिहासाबद्दल अधिक माहिती पोहोचवण्यासाठी चित्रपट हे सुद्धा महत्त्वाचे माध्यम आहे असे म्हणता येईल.

    ‘सुभेदार’ या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेमध्ये चिन्मय मांडलेकर असून मृणाल कुलकर्णी या राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या भूमिकेमध्ये आहे तर सुभेदार तानाजी मालसुरे यांची भूमिका अजय पुरकर यांनी साकारली आहे. तसेच सुभेदार या चित्रपटांमध्ये समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, स्मिता शेवाळे यांच्यासह इतरही कलाकार आहेत.

   काही दिवसांपूर्वीच दिग्पाल लांजेकरांच्या सुभेदार या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून असा प्रतिसाद दिला असून सुभेदार या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात ”आमच्या लाडक्या कोंढाण्यावरचे मुघलांचे निशाण आमच्या डोळ्यात तिखटाप्रमाणे झोंबत आहेत ” या जिजाऊंच्या भूमिकेमध्ये असलेल्या मृणाल कुलकर्णी यांच्या डायलॉगने  होते. या चित्रपटाचा ट्रेलर बघत असताना सुद्धा अक्षरशः अंगावर शहारे येतात जणू काही खरोखरच हे आपल्यासमोर घडत आहे, एवढ्या उत्तम पद्धतीने हा चित्रपट बनवला गेला आहे असे म्हणता येईल. तसेच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेले ‘आले मराठे, आले मराठे’ हे गाणं सुद्धा प्रेक्षकांना खूपच आवडलेले आहे.

       ‘सुभेदार’ या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख सुरुवातीला २५ ऑगस्ट ठरवण्यात आलेली होती परंतु नंतर या तारखे मध्ये बदल करून ही तारीख पुन्हा १८ ऑगस्ट करण्यात आली.परंतु पुन्हा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता तांत्रिक अडचणीमुळे २५ ऑगस्ट केली आहे. या संबंधित चिन्मय मांडलेकर यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून ही माहिती दिली.

            चिन्मय मांडलेकर यांनी असे लिहिलं आहे की, “जय जिजाऊ! जय शिवराय! नमस्कार.. छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार नरवीर तान्हाजीराव मालुसरे यांचा पराक्रम सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर आपणां सर्वांना अनुभवता यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु काही तांत्रिक गोष्टी आपल्या हातात नसतात. पण आम्ही सगळे सुद्धा तुमच्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. कोणत्याही अडचणीला न घाबरता आम्ही चित्रपट तुमच्या भेटीला आणणारच आहोत. यासाठी लागणारा काळ आणि तुमची साथ आम्ही तुमच्याकडे मागत आहोत. या तांत्रिक अडचणीवर मात करून श्री शिवराज अष्टकातले पाचवे पुष्प ‘सुभेदार’ दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित करीत आहोत. या अडचणीच्या काळात तुम्ही सर्व रसिक मायबाप आणि शिवभक्त आमच्या पाठीशी आधार बनून उभे रहाल ही खात्री आहे. हर हर महादेव..”

https://www.instagram.com/p/Cv7fNvftp69/?igshid=MzRlODBiNWFlZA==

नाशिक मध्ये भरणार रानभाजी महोत्सव …

नाशिक मध्ये भरणार रानभाजी महोत्सव …

     अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी जीवनातील महत्त्वाची गरज म्हणजे अन्न.चांगल्या आरोग्यासाठी योग्य ते अन्न सेवन करणे सुद्धा गरजेचे आहे.आज काल चांगले अन्न मिळणे सुद्धा कठीण झाले आहे. केमिकल विरहीत,सेंद्रिय अन्न शरीरासाठी नक्कीच चांगले आहे. मार्केट मध्ये मिळणाऱ्या भाज्या तसेच फळे सुद्धा बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रतीचे मिळत नाहीत.परंतु काही विशेष ठिकाणी रसायन मुक्त आणि पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले फळे तसेच भाज्या मिळतात.तसेच बरेचसे शेतकरी ह्या पद्धतीची शेती आता करत आहेत.

     भाजी मार्केट मध्ये सध्या भाजीपाला उपलब्ध असतो परंतु रान भाज्यांची सख्या खूप कमी बघायला मिळते.ग्रामीण भागामधील लोकांना रान भाज्यांबद्दल पुरेशी माहिती आहे परंतु शहरी भागातील लोकांना रान भाज्यांबद्दल एवढी माहिती नाही.रान भाज्यांबद्दल माहिती जाणून घेण्याची खास संधी आता चालून आली आहे….नाशिक मध्ये…होणार आहे रानभाजी महोत्सव ….

        कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक यांच्या वतीने रानभाज्यांचे आहारातील महत्व आणि दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश व्हावा यासाठी नाशिक मध्ये १४ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट या दिवशी कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) येथे रानभाजी महोत्सव आयोजित केला आहे.या महोत्सवाचा आनंद सर्वांनी घेतला पाहिजे.

      रानभाज्या म्हणजे निसर्गतःच उगवलेल्या भाज्या होय.रानभाज्या ह्या शेता मध्ये बांदावर किंवा इतर पिकांच्या मध्ये तसेच जंगलात उगवतात.ह्या भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात परंतु आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त घटक तसेच औषधी गुणधर्म या रानभाज्यांमध्ये आढळून येतात.म्हणून ह्या रानभाज्यांचे सेवन नक्कीच केले पाहिजे.रानभाज्या ह्या पावसाळ्याच्या सुरवातीपासून ते ऑक्टोबरपर्यंत जास्त प्रमाणात उपलब्ध असतात.

        रानभाज्यांमध्ये तांदुळजा, कुडा, टाकळा, कोरला, कुर्डू, सुरण,कडूकंद,करवंदे, गुळवेल,चाईचा मोहर ,अळू, तोडली व लोथ,घोळ, अळू यांसारख्या भाज्यांचा समावेश आहे.रानभाज्या ह्या नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या असल्या कारणाने त्यांच्यावर कुठल्याही रसायनांची फवारणी होत नाही आणि त्यामुळे सुद्धा ह्या भाज्यांना खूप महत्त्व आहे.

       सर्वसामान्यापर्यंत रानभाज्यांचे महत्त्व पोहचण्यासाठी महोत्सवाची व्याप्ती वाढविणे काळाची गरज असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे व आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी असे आव्हान केले आहे की, जास्तीत जास्त नागरिकांनी महोत्सवास भेट देवून आरोग्यवर्धक रानभाज्या खरेदी कराव्यात. अशा प्रकारच्या रानभाजी महोत्सवामुळे रानभाज्यांना चांगला भाव मिळेल तसेच शहरी लोकांना सुद्धा ह्या रानभाज्यांची ओळख नक्कीच चांगल्या प्रकारे होईल.

     त्यामुळे आवर्जून अशा महोत्सवाचा आनंद सर्व नागरिकांनी घेतला पाहिजे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२३ (PMUY):

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२३ (PMUY):

      केंद्र सरकारकडून व राज्य सरकारकडून जनतेसाठी विविध प्रकारच्या योजना वेगवेगळ्या हेतूसाठी बनवल्या जातात. त्यापैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री उज्वला योजना. शहरांमध्ये बऱ्यापैकी विकास झाला असल्याकारणाने जवळपास सर्वच घरी गॅसची सुविधा उपलब्ध असलेली दिसून येते ,परंतु खेड्यामध्ये किंवा गावाकडील भागात बऱ्याचशा घरांमध्ये अजून सुद्धा गॅसची सुविधा उपलब्ध नाही यामागे आर्थिक दृष्ट्या गरिबी हे कारण असू शकते किंवा इतरही काही कारण असू शकते. खेड्यामध्ये अजूनही बऱ्याच महिला चुलीवर स्वयंपाक करताना आढळतात आणि त्यासाठी लागणारी लाकडे काही महिला तर दूर दूर हून जमा करत असतात. तसेच शेणाच्या गोवऱ्या सुद्धा बनवत असतात. क्वचितच आवड म्हणून चुलीवर स्वयंपाक करणे वेगळे आणि आर्थिकदृष्ट्या हालाखीची परिस्थिती असल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करणे या दोन्ही गोष्टींमध्ये नक्कीच फरक आहे.

          चुलीचा वापर केल्यामुळे जर जास्त प्रमाणावर धूर झाला तर त्याचा परिणाम त्या स्त्रीच्या तसेच कुटुंबातील इतर व्यक्तींच्या, लहान मुलांच्या आरोग्यावर होतो आणि यामुळे काही आजार सुद्धा उद्भवू शकतात. म्हणूनच जे लोक आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत , ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, जे लोक दारिद्र्य रेषेच्या खाली येतात अशा जनतेसाठी ‘ प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ‘ ही योजना आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना | Pradhanmantri Ujjwala Yojana | PMUY: 

– प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्यरेषेखालील जनतेसाठी आहे.

– पूर्वी केंद्र शासनाने आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्यरेषेखालील पाच कोटी कुटुंबांना एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला होता परंतु आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेचा लाभ आठ करोड दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना घेता येणार आहे.

– प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दिले जाणारे एलपीजी गॅस कनेक्शन हे त्या कुटुंबामधील महिलेच्या नावाने दिले जाणार आहे.

– प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी १६०० रुपयांचं आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.

– प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना १४.२ किलो वजन असलेला एलपीजी गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे तर देशामधील ज्या भागांमध्ये इतका मोठा सिलेंडर ट्रान्सपोर्ट करणे शक्य नाही उदाहरणार्थ, दुर्गम आणि डोंगराळ भाग … तर अशा ठिकाणी ५ किलो वजनाचे २ एलपीजी सिलेंडर देण्यात येणार आहे.

– स्थलांतरित कामगारांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी या कामगारांना स्वयं प्रमाणित घोषणापत्र सादर करावे लागणार आहे आणि हे त्यांच्या वास्तव्याचे प्रमाण समजण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2023 पात्रता –

Eligibility for Pradhanmantri Ujjwala Yojana –

– अर्जदार महिला असावी आणि भारताची नागरिक असावी.अर्जदार महिलेचे वय १८ वर्षा पेक्षा जास्त असणे सुद्धा आवश्यक आहे.

– अर्ज करणारी महिला दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असावी तसेच या कुटुंबातील इतर कोणाकडेही एलपीजी गॅस कनेक्शन नसावे.

–  बीपीएल कार्ड आणि बीपीएल शिधापत्रिका अर्जदाराजवळ असणे आवश्यक आहे.

– अर्ज करणाऱ्या महिलेचे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.

– दारिद्र्यरेषेखाली असणारे कुटुंबे, सर्वाधिक मागासवर्गीय कुटुंबे, वनवासी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती हे कुटुंबे या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी पात्र आहेत.

– १४ – सूत्री घोषणानुसार गरीब कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत.

– अर्ज करणाऱ्या महिलेचे नाव जनगणना २०११ (SECC – 2011) च्या यादीमध्ये असणे आवश्यक आहे ,त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या महिलेचे नाव तेल विपणन कंपन्यांच्या डेटाबेस मध्ये असलेल्या बीपीएल माहितीशी सुद्धा जुळणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे : 

Documents required for Pradhanmantri Ujjwala Yojana :

– आधार कार्ड क्रमांक ( ओळखीचा पुरावा म्हणून अर्जदाराचे आधार कार्ड)

– रहिवासी प्रमाणपत्र

– जाती प्रमाणपत्र

– बीपीएल रेशनकार्ड (ज्या राज्यातून अर्ज केला जात आहे त्या राज्याने जारी केलेले रेशनकार्ड)

– जन-धन बँक खात्याचे नंबर

– पंचायत अधिकारी / नगर पालिका यांनी प्रमाणित केलेले बीपीएल प्रमाणपत्र

– पासपोर्ट आकाराचा फोटो

– कुटुंबातील सदस्यांचा आधार क्रमांक

– कुटुंबाच्या स्थितीला आधार देण्यासाठी पूरक KYC 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अर्ज करण्याची प्रक्रिया : 

Application process of Pradhanmantri Ujjwala Yojana : 

– प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो.

🔸ऑफलाइन पद्धतीने करण्याची प्रक्रिया –

– प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करताना नजीकच्या एलपीजी वितरण केंद्रामध्ये हा अर्ज मिळू शकतो किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन हा अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी.

– अर्ज व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत लागणारी सर्व कागदपत्रे जोडावी.

– त्यानंतर हा फॉर्म एलपीजी वितरण केंद्रामध्ये जमा करावा.

– तसेच हा अर्ज करत असताना सिलेंडर १४.२ किलो वजनी हवा की ५ किलो यासाठी केवायसी फॉर्म भरणे सुद्धा आवश्यक आहे.

– नंतर एलपीजी केंद्र अधिकाऱ्याकडून अर्ज तसेच कागदपत्रांची संपूर्ण पडताळणी करण्यात येते त्यानंतर लाभार्थ्यांना काही दिवसांतच एलपीजी कनेक्शन दिले जाते.

 🔸प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज  करण्यासाठी https://www.pmuy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.

हे ही वाचा ….महिला सम्मान बचत पत्र योजना २०२३

ऑगस्ट महिन्यामध्ये बँका असणार १४ दिवस बंद …

ऑगस्ट महिन्यामध्ये बँका असणार १४ दिवस बंद …

   दरवर्षी बँकांना काही ठरलेल्या दिवशी सुट्टी जाहीर केलेली असते.दरवर्षी लोकांना बँकेशी संबंधित कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते आणि यावर्षी सुद्धा रिझर्व बँकेने ही यादी जाहीर केलेली आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये बँकेला चक्क १४ दिवस सुट्टी असणार आहे. तर कोणकोणत्या १४ दिवसांसाठी बँक बंद असणार आहे हे जाणून घेऊयात ….

     जर तुमचे बँकेशी संबंधित ऑगस्ट महिन्यामध्ये कोणतेही काम असेल तर ही सुट्ट्यांची यादी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

   काही कामे अशी असतात किती बँकेतच होऊ शकतात परंतु नवनवीन तंत्रज्ञानामुळे बँक बंद असताना सुद्धा ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी यूपीआय, नेट बँकिंग व मोबाईल बँकिंगचा उपयोग आपण करू शकतो. तसेच एटीएम द्वारे सुद्धा पैसे काढले जाऊ शकतात.

    ऑगस्ट महिन्यामध्ये काही सण असल्यामुळे सुट्टी असणार आहे तसेच १५ ऑगस्ट या दिवशी सुद्धा सुट्टी असणार आहे. तसेच रक्षाबंधन मुळे सुद्धा सुट्टी असणार आहे.

पुढील तारखांना बँक बंद असणार आहे : –

१२ ऑगस्ट २०२३ : दुसऱ्या शनिवारी देशभरामधील बँका बंद राहणार आहेत.

१३ ऑगस्ट २०२३ : या तारखेला रविवार असल्यामुळे देशभरामधील बँका बंद राहणार आहेत. 

१५ ऑगस्ट २०२३ : या दिवशी स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण देशामध्ये बँका बंद राहणार आहेत.

१६ ऑगस्ट २०२३ :  पारशी नववर्षा निमित्त मुंबई ,नागपूर आणि बेलापूर मध्ये बँका बंद राहणार आहेत.

१८ ऑगस्ट २०२३ : श्रीमंत शंकर तिथीमुळे गुवाहाटी मध्ये  बँक बंद राहणार आहेत.

२० ऑगस्ट २०२३ : या तारखेला रविवार असल्यामुळे देशभरामधील बँका बंद राहणार आहेत.

२६ ऑगस्ट २०२३ : चौथा शनिवार असल्यामुळे देशभरातील बँकांना या दिवशी सुट्टी राहणार आहे.

२७ ऑगस्ट २०२३ : या तारखेला रविवार असल्यामुळे देशभरामधील बँका बंद राहणार आहेत.

२८ ऑगस्ट २०२३ : कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये मध्ये  पहिला ओणमुळे बँका बंद राहणार आहेत.

२९ ऑगस्ट २०२३ :  तिरुओणममुळे कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद राहणार आहे.

३० ऑगस्ट २०२३ :  रक्षाबंधनाच्या निमित्ताने जयपुर आणि शिमला मध्ये बँकेला सुट्टी असणार आहे.

३१ ऑगस्ट २०२३ : डेहराडून ,गंगटोक, कानपूर, कोची, लखनऊ आणि तिरुअनंतपुरममध्ये येथे रक्षाबंधन, श्री नारायण गुरुजी जयंती मुळे बँका बंद राहणार आहेत.

पावसाळ्यामध्ये घरामध्ये चिलटं किंवा चाचण झाल्यामुळे त्रास होतोय … ? चला तर जाणून घेऊयात त्यावरील उपाय ….

पावसाळ्यामध्ये घरामध्ये चिलटं किंवा चाचण झाल्यामुळे त्रास होतोय … ? चला तर जाणून घेऊयात त्यावरील उपाय ….

     पावसाळा सुरू झाला की आपल्या घरामध्ये चिलटं किंवा चाचण येऊ लागतात. घरामध्ये हे चिलटं स्वयंपाक घरामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. तसेच कचऱ्याजवळ सुद्धा चिलटं जास्त प्रमाणात आढळतात. तसेच फळे, भाज्या यावर सुद्धा हे चाचन सारखे घोंगावतात.हे चिलटं घरामध्ये असल्याने विविध समस्या जाणवू लागतात तसेच चाचण घरामध्ये असणे विचित्र ही दिसते. हे चाचण सारखे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फिरत असल्याने आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक असतात.तर आज आपण या चाचनांपासून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय बघणार आहोत.

१ . स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ ठेवा. प्रत्येक जण स्वयंपाक घर स्वच्छ ठेवतेच, परंतु पावसाळ्यामध्ये जरा जास्तच काळजी घेतली पाहिजे. तसेच बेसिन नेहमी स्वच्छ ठेवा.

 २ .एका उंच अशा बाटलीमध्ये ॲपल सायडर विनेगर भरून त्यामध्ये लिक्विड सोप टाका. ॲपल साइडर विनेगरला आंबूस गोड वास असल्याकारणाने चिलटं त्या ठिकाणी आकर्षित होऊन त्या बाटलीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात आणि बाटलीच्या आत मध्ये जाऊन मरतात. अशाप्रकारे एक ते दोन दिवसानंतर हे मिश्रण फेकून द्यावे आणि पुन्हा नवीन मिश्रण भरून ठेवावे.

३ . शेराच्या झाडाची फांदी स्वयंपाक घराच्या एका कोपऱ्यामध्ये लटकवून ठेवा. या झाडाच्या फांदीकडे चिलटं आकर्षित होतात आणि या फांदीवर जाऊन बसतात. ही फांदी नंतर बाहेर फेकून द्या आणि नंतर पुन्हा दुसरी फांदी स्वयंपाक घरामध्ये एका कोपऱ्यात अडकवून ठेवा.

४ .केळाचे छोटे छोटे तुकडे करून एका भांड्यामध्ये ठेवा आणि त्या भांड्यावर प्लास्टिक कागद लावा. त्यानंतर या प्लास्टिक कागदावर सुईने थोडेसे छिद्र पाडा. या छिद्रामधून सर्व चिलटे केळीकडे जाण्यासाठी बघतील आणि त्या भांड्यामध्ये अडकले जातील.

५ . एखाद्या बरणीमध्ये किंवा एक बाटली घेऊन ती अर्धी कापा आणि त्यामध्ये जास्त प्रमाणावर पिकलेल्या फळाचा तुकडा किंवा फळाच्या साली ठेवा. त्यावर थोडासा विनेगर टाका. नंतर कागदाचा शंकू / कोन बनवून त्या बाटलीवर किंवा बरणीवर उलटा ठेवा. नंतर चिलटं त्या फळाकडे आकर्षित होतात आणि त्या शंकू मधून बाटलीमध्ये प्रवेश करतात. एकदा की चिलटं बाटलीच्या आत गेले की त्यांना पुन्हा बाहेर येता येत नाही आणि तेथेच मरण पावतात.

घरामध्ये चिलटं होत असतील तर काय काळजी घ्यावी … ?

– घरामध्ये कुठेही पाणी साचून देऊ नका, जर जागा ओलसर झालेली असेल तर ती जागा पुसून कोरडी ठेवा.

– फरशा पुसण्यासाठी पाण्याचा वापर आपण करतो तर फरशा पुसून झाल्यानंतर त्वरित हे पाणी फेकून द्या.

– टोमॅटो केचप तसेच ज्यूसच्या बॉटल्स यांसारख्या खाद्यपदार्थांच्या बरण्या किंवा बॉटल्स उपयोग झाल्यानंतर त्वरित झाकण लावण्याची जागा व्यवस्थित रित्या पुसून त्यानंतर लगेच झाकण लावा.

– तसेच निवडलेल्या भाज्यांचे देठ, फळांच्या साली, खरकटे अन्न किंवा इतर ओला कचरा थोड्या वेळासाठी ही घरामध्ये ठेवू नका त्वरित बाहेर ठेवा.

– पाण्याच्या बाटल्यांमध्ये पाणी भरण्यापूर्वी गरम पाण्याने धुऊन घ्या तसेच बाटल्या धुण्याचा ब्रश सुद्धा गरम पाण्याने धुवून नंतरच बाटल्या धुण्यासाठी वापर करा.

– बहुदा आपल्या टूथब्रशवर सुद्धा ही चाचण बसलेली आढळतात, त्यामुळे ब्रश करण्या अगोदर टूथब्रश सुद्धा गरम पाण्याने धुऊन घ्या.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (HAL) मध्ये अप्रेंटिस पदांच्या ६४७ जागांसाठी भरती …

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (HAL) मध्ये अप्रेंटिस पदांच्या ६४७ जागांसाठी भरती …

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (HAL) भरती

जाहिरात क्र. : HAL/T&D/1614/23-24/155

एकूण जागा : ६४७

पदाचे नाव व इतर माहिती : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या 
पदवीधर अप्रेंटिस१८६
डिप्लोमा अप्रेंटिस१११
आय टी आय अप्रेंटिस३५०
एकूण ६४७

शैक्षणिक पात्रता:

१) पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात पदवी

– उमेदवाराने 1 सप्टेंबर 2020 रोजी किंवा त्यानंतर पदवी/डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.

२) डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात डिप्लोमा.

३) आय टी आय अप्रेंटिस: संबंधित ट्रेड मध्ये आय टी आय उत्तीर्ण.

 ( डिटेल माहिती व पात्रता पुढे जाहिरात या ऑप्शनमध्ये क्लिक करून मिळवता येईल )

नोकरीचे ठिकाण: नाशिक

फी : फी नाही

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ ऑगस्ट २०२३

जाहिरात (Notification): येथे क्लिक करा

ऑनलाईन नोंदनी ( Online Registration) :

पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस : Apply Online 

आय टी आय अप्रेंटिस : Apply Online 

ऑनलाइन अर्ज ( Online application ) : येथे क्लिक करा

‘सुभेदार’ या दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज …..

 ‘सुभेदार’ या दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज …..

      छत्रपती शिवाजी महाराजांनी जो इतिहास घडवला आहे, त्यातून खूप काही शिकण्यासारखं असून छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचीच प्रेरणा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढे जाणून घेऊ तेवढे कमीच आहे … अशी अफाट माहिती राजांबद्दल आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर तसेच त्यांच्या मावळ्यांच्या जीवनावर मराठी भाषेसोबतच हिंदी भाषेमध्ये सुद्धा चित्रपट बनताना दिसत आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मराठी आणि हिंदी सिरियल सुद्धा बनवल्या गेल्या आहेत. अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर बनवले जाणारे चित्रपट आणि मालिका यांच्यामुळे ज्यांना वाचनाची फारशी आवड नाही त्यांच्यासाठी हे चित्रपट आणि मालिका बघून त्यांना राजांबद्दल अधिक ज्ञान नक्कीच मिळू शकते. तसेच प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी छोटी मुलं मुली ज्यांना वाचता येत नाही ते देखील हे सिरीयल किंवा सिनेमे बघू शकतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात.

      दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकमधील ‘सुभेदार’ हा पाचवा सिनेमा असून यापूर्वी दिग्पाल लांजेकर यांचे ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’  हे शिवराज अष्टक मधील चार चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस उतरले असून या सिनेमाला सुद्धा भरपूर प्रतिसाद मिळण्याची दाट शक्यता आहे.

    दिग्पाल लांजेकर यांच्या ‘सुभेदार’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून असे समजते की ,हा चित्रपट सुभेदार तानाजी मालसुरे यांची शौर्यगाथा सांगणारा आहे. तसेच सुभेदार या चित्रपटांमध्ये चिन्मय मांडलेकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेमध्ये असून मृणाल कुलकर्णी या राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या भूमिकेमध्ये आहे तर अजय पुरकर यांनी सुभेदार तानाजी मालसुरे यांची भूमिका साकारली आहे. तसेच सुभेदार या चित्रपटांमध्ये मृण्मयी देशपांडे, स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी यांच्यासह इतरही अनेक कलाकार आहेत.

    सुभेदार या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून करत होते.या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.”आमच्या लाडक्या कोंढाण्यावरचे मुघलांचे निशाण आमच्या डोळ्यात तिखटाप्रमाणे झोंबत आहेत ” या जिजाऊंच्या डायलॉगने सुभेदार या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. छत्रपती शिवाजी महाराज हे जिजाऊंना कोंडाणा जिंकणारच असा आश्वासन देतात. तानाजी मालसुरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली जाते. तानाजी मालसुरे यांच्या घरामध्ये रायबाच्या लग्नाची तयारी सुरू असून सुद्धा ‘ आधी लगीन कोंढाण्याचं अन् मंग रायबाचं’ असं म्हणत सुभेदार तानाजी मालसुरे छत्रपती शिवाजी महाराजांना कोंडाणा किल्ला जिंकण्याची खात्री देतात आणि तशी शपथ सुद्धा घेतात. ही लढाई लढण्यासाठी पाचशे मावळे सुद्धा खूप झाले असा विश्वास सुभेदार तानाजी मालसुरे व्यक्त करतात. सुभेदार तानाजी मालसुरे यांच्या जीवनावर आधारित सुभेदार या चित्रपटाचा ट्रेलर बघताना सुद्धा अंगावर शहारे येतात.

    तसेच सुभेदार या चित्रपटातील ‘आले मराठे, आले मराठे’ हे गाणं सुद्धा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले असून या गाण्याला सुद्धा प्रेक्षकांची भरपूर दाद मिळताना दिसत असून हे गाणं स्वत: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी फक्त पाच मिनिटांमध्ये लिहिलं आहे. 

चंद्राच्या खूप जवळ पोहोचले चंद्रयान ३ ….. बघा चंद्रावरील पहिले दृश्य …

चंद्राच्या खूप जवळ पोहोचले चंद्रयान ३ ….. बघा चंद्रावरील पहिले दृश्य …

    आपल्या सर्वांना माहीतच असेल की चंद्रयान ३ हे १४ जुलै २०२३ ला २ वाजून ३५ मिनिटांनी लॉन्च केले गेले होते. यापूर्वी सुद्धा चंद्रयान २ हे २२ जुलै २०१९ ला लॉन्च केले गेले होते परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यामुळेच सर्वांचे लक्ष आता चंद्रयान ३ कडे लागलेले आहे आणि चंद्रयान ३ यशस्वी होण्याच्या मार्गावर असून चंद्राच्या अगदी जवळ चंद्रयान ३ पोहोचले आहे.

Image Source : Twitter/@chandrayaan_3

 

     चंद्रयान ३ हे चंद्राच्या ऑर्बिट मध्ये पोहोचले असून चंद्रयान ३ हे १६६ किमी x १८,०५४ किमी च्या ऑर्बिट मध्ये यात्रा करत आहे आणि हे चंद्राचे ऑर्बिट आहे. यानंतर १७ ऑगस्ट हा चंद्रयान ३ साठी महत्त्वाचा दिवस ठरणार असून चंद्रयान ३ प्रोपल्शन आणि लैंडर मॉड्यूल वेगळे होतील आणि त्यानंतर फक्त लँडिंग होणे बाकी राहील.इस्रो ( ISRO – Indian Space Research Organisation) ने खूप मोठे यश मिळवले आहे.

      चंद्राच्या पृष्ठभागापासून चंद्रयान ३ आता कमी अंतरावर असून इस्रोने पुन्हा चंद्रयानाची कक्षा बदलली आहे याचे कारण म्हणजे यामुळे चंद्रयान ३ चंद्राच्या अजून जवळ नेता येईल.चंद्रयान ३ ची कक्षा ९ ऑगस्टला पुन्हा बदलली जाऊ शकते.

    भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोकडून असे सांगण्यात आले की, चंद्राच्या जवळ जाण्यासाठी चंद्रयान ३ ची ऑर्बिट बदलण्याची जी प्रक्रिया केली जाते ती १७ ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाईल.चंद्रयान ३ चे प्रोपल्शन आणि लैंडर मॉड्यूल वेगळे होतील आणि नंतर लँडर शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचेल.डी-ऑर्बिटिंगची प्रक्रिया लँडिंगच्या आधीच सुरू होईल. त्यानंतर काही वेळाने लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल.

     चंद्रयान १ ने २००८ मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचे अंश शोधून काढले होते तर त्यानंतर चंद्रयान २ मिशन २०१९ मध्ये लॉन्च करण्यात आलं त्यावेळी सुद्धा दक्षिण ध्रुवावर शोध घेतला जाणार होता परंतु त्यावेळी हे मिशन अयशस्वी ठरले होते आणि आता पुन्हा चंद्रयान ३ मिशन सुरू असून हे मिशन नक्कीच यशस्वी होऊ शकते.

     २३ ऑगस्ट रोजी चंद्रयान ३ हे चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार आहे. इस्रोचा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा दुसरा प्रयत्न असून जर यामध्ये यश आले तर भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरेल.

      चंद्रयान ३ हे ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या कक्षेत आले असून आता चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत स्थिरावले आहे. इस्रो ने चंद्रयान ३ या मोहिमेमधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार केला असून हे मिशन यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे.चंद्रयान ३ चे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापूर्वी चार वेळा ऑर्बिट बदलले जाणार आहे.चंद्रयान ३ हे चंद्राभोवती परिभ्रमण करत चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेल.चंद्रयान ३ चे वजन चंद्रावर उतरण्यापूर्वी ३९०० किलोवरून २१०० किलोवर येणार आहे.

     चंद्रयान ३ चा वेग नियंत्रित केला जात आहे याचे कारण असे की ,चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करत असताना कुठलीही अडचण येऊ नये तसेच चंद्रावरील गुरुत्वाकर्षणाचा परिणाम यावर होऊ नये यामुळे यानाचा वेग कमी करत करतच यान चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने जात आहे.

    चंद्रयान ३ हे जसे जसे चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ पोहोचतयं तसे इस्रोकडून फोटो शेअर करण्यात येत आहेत.

https://twitter.com/chandrayaan_3/status/1688215948531015681?s=20

सर्वांच्या नजरा चंद्रयान ३ मिशन कडे ….