एन एफ टी हे एक आपण तयार केलेले आर्ट वर्क ,म्युझिक, फोटोज ,जी आय एफ, व्हिडिओ एका विशिष्ट पद्धतीने सेल करून इन्कम मिळवण्याचे माध्यम आहे.
चला तर बघुयात एन एफ टी म्हणजे तरी नक्की काय?
एन एफ टी चा लॉंग फॉर्म आहे
नॉन फंजिबल टोकण. Non fungible token in Marathi
फंजिबल म्हणजे रिप्लेसेबल म्हणजेच बदलता येणारी गोष्ट. उदाहरणार्थ एका व्यक्तीकडे शंभर रुपये आहेत आणि त्याने दुसऱ्या व्यक्तीकडून सुटे करून घेतले तर शंभर रुपयाचे मूल्य कमी होत नाही आणि इथे त्या व्यक्तीला ते दुसऱ्या व्यक्तीकडून बदलवून घेता आले.
नॉन फंजिबल म्हणजे नॉन रिप्लेसेबल म्हणजेच न बदलता येणारी गोष्ट. उदाहरणार्थ कोहिनूर हिरा ,ताजमहल ,काही पेंटिंग अशा काही गोष्टी बदलता येत नाही त्या युनिक आहेत.
टोकण म्हणजे प्रूफ ऑफ ओनरशिप किंवा सर्टिफिकेट ऑफ ओनरशिप.
एन एफ टी ब्लॉक चैन मध्ये स्टोअर केले जाते.
ब्लॉकचेन
ब्लॉकचेन मध्ये केलेल्या सर्व ट्रांजेक्शन्स चे रेकॉर्ड सेव असते. ब्लॉकचेन मध्ये झालेली एन्ट्री कधीही डिलीट करता येत नाही. म्हणजेच ब्लॉकचेन मधील एन्ट्री नॉन ईरेझेबल non erasable (न पुसता येणारी)असते. ब्लॉकचेन साठी पियर टू पियर नेटवर्क वापरलेले असते म्हणजेच यामध्ये प्रत्येक कम्प्युटर एकमेकांशी जोडले गेलेले असते त्यामुळे कोणीही एक कम्प्युटर हॅक करून माहिती पुसू शकत नाही. म्हणूनच हे सेफ असे नेटवर्क आहे.
एन एफ टी कसे तयार करायचे आणि विकायचे कसे?
एन एफ टी तयार करण्यासाठी खूप सार्या वेबसाइट्स उपलब्ध आहेत जसे की opensea.io, foundation.app, nftwazirx.org. परंतु यामधील opensea.io ही वेबसाईट नवख्या लोकांसाठी अत्यंत चांगली अशी वेबसाईट आहे,
ह्या वेबसाईट वर गेल्यानंतर एक्सप्लोर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स बघण्यास मिळतील.
तुम्ही सुरुवातीला काही वेळ या वेबसाईटवर घालवा म्हणजे तुम्हाला भरपूर गोष्टी शिकण्यास मिळतील.
जेव्हा तुम्ही एखादं डिजिटल आर्ट वर्क बनवाल ते सेल करून तुम्ही इन्कम मिळवू शकता आता ते कसे करायचे हे आपण बघणार आहोत.
यासाठी तुम्हाला गरज पडणार आहे क्रिप्टो वॉलेटच crypto Wallet क्रिप्टो वॉलेट च्या सहाय्याने तुम्ही पैसे डिपॉझिट करू शकता किंवा आर्ट वर्क सेल झाल्यानंतर येणारे पैसे क्रिप्टो वॉलेट मध्ये जमा होतात. पैसे क्रिप्टो करेंसी मध्ये जमा होतात. Money deposit in crypto Wallet
क्रिप्टो वॉलेट मध्ये अकाउंट कसे तयार करायचे? How to open Account in crypto Wallet for NFT
Metamask.io ही वेबसाईट उघडल्यानंतर तिथे क्रिप्टो वॉलेट चा डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येतो. क्रोम किंवा आय ओ यस किंवा अँड्रॉइड असे विविध ऑप्शनस असतात.
क्रिप्टो वॉलेट इन्स्टॉल Crypto Wallet Install झाल्यानंतर तिथे क्रिएट अ वॉलेट् चा ऑप्शन येईल त्यानंतर “I agree”वर क्लिक करून तिथे पासवर्ड किंवा सिक्रेट रिकवरी फ्रेज येईल. ही प्रेज तुम्ही कुणाशी शेअर करू नका. त्यानंतर सीक्रेट रिकवरी फ्रेज कन्फर्म करण्यासाठी येईल. कन्फर्म झाल्यानंतर अकाउंट क्रिएट होईल आणि काँग्रॅच्युलेशन्स असा मेसेज येईल. Account activation confirmation
आता तुमचे क्रिप्टो वॉलेट वर अकाउंट तयार झालेले आहे.
आता बघूया आर्ट वर्क एन एफ टी मध्ये कसे कन्व्हर्ट करायचे? How to convert art into NFT?
opensea.io ही वेबसाईट उघडल्यानंतर तिथे क्रिएट असा ऑप्शन येईल त्यावर क्लिक केल्यानंतर मेटा मास्क वर क्लिक करायचे नंतर नेक्स्ट करून साइन इन करायचे.
आता इथे आर्ट वर्क वर अपलोड करायचे आहे .आर्ट वर्क सिलेक्ट केल्यानंतर त्याला तुम्ही नाव देऊ शकता त्याच्या शी रिलेटेड डिस्क्रिप्शन टाकू शकता त्यानंतर ब्लॉक चेन निवडायची आहे.
ब्लॉकचेनमध्ये दोन ऑप्शन्स आहेत इथेरियम आणि पॉलीगोन. जर तुम्ही इथेरियम निवडले तर गॅस फी भरावी लागते आणि पॉलीगोन फ्री आहे. POLYGON FOR NFT
सुरुवातीला तुम्ही पॉलीगोनच सिलेक्ट करा. त्यानंतर एन एफ टी क्रिएट होईल. क्रिएटेड आल्यानंतर सेल ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही तिथे फिज, डुरेशन, कम्प्लीट लिस्टिंग ही सर्व माहिती टाकू शकता.
त्यानंतर तुम्हाला अनलॉक करन्सी ह्या ऑप्शनवर क्लिक करून मेटा मास्क ला क्रिप्टो वॉलेट चा असेस द्यायचा आहे म्हणजेच फ्युचर मध्ये जेव्हा तुमचा आर्ट वर्क सेल होईल येणारा इन्कम क्रिप्टो वॉलेट मध्ये जमा होईल.
Author-Poonam Ghorpade Gore