” बाईपण भारी देवा ” सैराटचे रेकॉर्ड मोडणार का …..? वेडचा रेकॉर्ड मोडला…. सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट ठरला …
सध्या सगळीकडेच चर्चेत असलेला आणि सहा बहिणींची कथा असलेला केदार शिंदे दिग्दर्शित मराठी चित्रपट ” बाईपण भारी देवा” या चित्रपटाने रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचा ” वेड ” या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला असून मराठी मधील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे आणि आता ” बाईपण भारी देवा ” हा चित्रपट नागराज मंजुळे यांच्या ” सैराट ” या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
” बाईपण भारी देवा ” या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून खूप चांगली कमाई केलेली आहे आणि प्रेक्षकांचा सुद्धा भरपूर प्रतिसाद या चित्रपटाला अजून सुद्धा मिळताना दिसत आहे.” बाईपण भारी देवा ” हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही हिंदी चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाले परंतु त्या चित्रपटापेक्षा जास्त चांगला प्रतिसाद या मराठी चित्रपटाने मिळवला आहे.
” बाईपण भारी देवा ” या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर अगदी पहिल्याच आठवड्यामध्ये १२ कोटींची कमाई केली होती तर दुसऱ्या आठवड्यामध्ये २४ कोटी तिसऱ्या आठवड्यामध्ये या चित्रपटाने २१ कोटींची कमाई केली तर चौथ्या आठवड्यात १० कोटी इतकी कमाई केली. आता तर या चित्रपटाची जवळपास ८३ कोटी ५० लाखांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. ही कमाई आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळून झालेली आहे. तर वेड या मराठी चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर ७५ कोटींच्या आसपास कमाई केली होती.
” बाईपण भारी देवा ” या चित्रपटाने फक्त भारतामध्ये जवळपास ७२ कोटी ११ लाख इतकी कमाई केली आहे तर सैराट या मराठी चित्रपटाने ११० कोटींची कमाई त्यावेळी केली होती. आता ” बाईपण भारी देवा “हा चित्रपट सैराट या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.” बाईपण भारी देवा ” हा चित्रपट पाच कोटींमध्ये जरी बनला असला तरी सुद्धा या चित्रपटाने खूप यश संपादन केले आहे.
” बाईपण भारी देवा ” हा चित्रपट बघितल्यानंतर बऱ्याच महिला काहीतरी करण्यासाठी प्रेरित झाल्या असून कोणी व्यवसाय सुरू करायचा विचार करत आहे तर कोणी नोकरी करायचा किंवा स्वतःचे काहीतरी करण्याचा विचार करत आहे. तसेच ” बाईपण भारी देवा “या चित्रपटांमधील रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर,सुचित्रा बांदेकर,दीपा परब यांसह इतर कलाकारांचे काम सुद्धा सर्वांना आवडत आहे. तसेच या चित्रपटांमध्ये नट्यांच्या वेशभूषा तसेच ज्वेलरी सुद्धा चर्चेत आहे.” बाईपण भारी देवा “या चित्रपटातील गाणी सुद्धा प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे.