ऑगस्ट महिन्यामध्ये बँका असणार १४ दिवस बंद …
दरवर्षी बँकांना काही ठरलेल्या दिवशी सुट्टी जाहीर केलेली असते.दरवर्षी लोकांना बँकेशी संबंधित कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते आणि यावर्षी सुद्धा रिझर्व बँकेने ही यादी जाहीर केलेली आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये बँकेला चक्क १४ दिवस सुट्टी असणार आहे. तर कोणकोणत्या १४ दिवसांसाठी बँक बंद असणार आहे हे जाणून घेऊयात ….
जर तुमचे बँकेशी संबंधित ऑगस्ट महिन्यामध्ये कोणतेही काम असेल तर ही सुट्ट्यांची यादी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
काही कामे अशी असतात किती बँकेतच होऊ शकतात परंतु नवनवीन तंत्रज्ञानामुळे बँक बंद असताना सुद्धा ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी यूपीआय, नेट बँकिंग व मोबाईल बँकिंगचा उपयोग आपण करू शकतो. तसेच एटीएम द्वारे सुद्धा पैसे काढले जाऊ शकतात.
ऑगस्ट महिन्यामध्ये काही सण असल्यामुळे सुट्टी असणार आहे तसेच १५ ऑगस्ट या दिवशी सुद्धा सुट्टी असणार आहे. तसेच रक्षाबंधन मुळे सुद्धा सुट्टी असणार आहे.
पुढील तारखांना बँक बंद असणार आहे : –
१२ ऑगस्ट २०२३ : दुसऱ्या शनिवारी देशभरामधील बँका बंद राहणार आहेत.
१३ ऑगस्ट २०२३ : या तारखेला रविवार असल्यामुळे देशभरामधील बँका बंद राहणार आहेत.
१५ ऑगस्ट २०२३ : या दिवशी स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण देशामध्ये बँका बंद राहणार आहेत.
१६ ऑगस्ट २०२३ : पारशी नववर्षा निमित्त मुंबई ,नागपूर आणि बेलापूर मध्ये बँका बंद राहणार आहेत.
१८ ऑगस्ट २०२३ : श्रीमंत शंकर तिथीमुळे गुवाहाटी मध्ये बँक बंद राहणार आहेत.
२० ऑगस्ट २०२३ : या तारखेला रविवार असल्यामुळे देशभरामधील बँका बंद राहणार आहेत.
२६ ऑगस्ट २०२३ : चौथा शनिवार असल्यामुळे देशभरातील बँकांना या दिवशी सुट्टी राहणार आहे.
२७ ऑगस्ट २०२३ : या तारखेला रविवार असल्यामुळे देशभरामधील बँका बंद राहणार आहेत.
२८ ऑगस्ट २०२३ : कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये मध्ये पहिला ओणमुळे बँका बंद राहणार आहेत.
२९ ऑगस्ट २०२३ : तिरुओणममुळे कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद राहणार आहे.
३० ऑगस्ट २०२३ : रक्षाबंधनाच्या निमित्ताने जयपुर आणि शिमला मध्ये बँकेला सुट्टी असणार आहे.
३१ ऑगस्ट २०२३ : डेहराडून ,गंगटोक, कानपूर, कोची, लखनऊ आणि तिरुअनंतपुरममध्ये येथे रक्षाबंधन, श्री नारायण गुरुजी जयंती मुळे बँका बंद राहणार आहेत.