Social Media Marketing | सोशल मीडिया मार्केटिंग

सोशल मीडिया मार्केटिंग –

What is social media in marketing?

Why is social media important?

What is the best form of social media marketing?

What are benefits of social media marketing ?

How to do social media marketing ?

Social media marketing –

    पूर्वीच्या काळी इंटरनेट नसल्याकारणाने व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादनांची मार्केटिंग करण्यासाठी ट्रॅडिशनल मार्केटिंग पद्धतीचा म्हणजेच टीव्ही, रेडिओ ,वर्तमानपत्रे, पॅम्प्लेट्स,बॅनर्स यांसारख्या माध्यमांचा उपयोग करावा लागत असे. यामुळे इतर खर्च तर येत असतंच त्याचबरोबर वेळ देखील खर्च होत असे. परंतु आता इंटरनेट उपलब्ध असल्याकारणाने सर्रास डिजिटल मार्केटिंग पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहे. डिजिटल मार्केटिंग पद्धतीमधीलच एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग. चला तर जाणून घेऊयात सोशल मीडिया मार्केटिंग बद्दल …

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय ? 

What is social media marketing ?

   सोशल मीडिया मार्केटिंग हा इंटरनेट मार्केटिंगचा किंवा डिजिटल मार्केटिंग चाच एक प्रकार असून ब्रँड किंवा उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच विक्री वाढवण्यासाठी आणि विक्रेत्यांच्या वेबसाईटवर अधिक ट्रॅफिक येऊन त्यांचा सेल वाढवण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की व्हाट्सअप ,इंस्टाग्राम, फेसबुक ,ट्विटर, युट्युब यांचा उपयोग करणे होय.

     थोडक्यात ,विविध सोशल मीडिया एप्लीकेशनचा उत्पादनांची मार्केटिंग करण्यासाठी मार्केटिंग टूल म्हणून उपयोग करणे म्हणजेच सोशल मीडिया मार्केटिंग.

सोशल मीडिया वेबसाईटस् कोणत्या आहेत ?

Which are social media websites OR applications ?

– व्हाट्सअप ( WhatsApp

– फेसबुक ( Facebook )

– इंस्टाग्राम ( Instagram )

– ट्विटर ( Twitter )

– लिंकड इन ( LinkedIn )

– टेलिग्राम ( Telegram )

– युट्युब ( Youtube )

– पिंटरेस्ट ( Pinterest )

– स्नॅपचॅट ( Snapchat )

– टम्बलर ( Tumbler )

सोशल मीडिया मार्केटिंगचे फायदे कोणते आहेत ?

Which are benefits of social media marketing ?

१ . सोशल मीडिया मार्केटिंगचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ट्रॅडिशनल मार्केटिंग मध्ये जो जास्तीचा वेळ खर्च होतो तो वेळ या प्रकारच्या मार्केटिंग मध्ये वाचतो म्हणजेच कमी कालावधीमध्ये सोशल मीडिया मार्केटिंग करता येऊ शकते.

२ . तसेच इतर मार्केटिंग पद्धतीचा उपयोग करत असताना खर्च देखील जास्त प्रमाणात होतो परंतु अगदी कमी खर्चामध्ये सुद्धा सोशल मीडियावर उत्तम रित्या मार्केटिंग केली जाऊ शकते.

३ . तुमच्या कंपनीला किंवा तुमच्या ब्रँडला ओळख मिळवून देण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म महत्त्वाची भूमिका बजावतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे बरेचसे ब्रँड लोकांपर्यंत पोहोचले आहेत.ब्रँडला ओळख मिळवण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप मदत होते.

४ . तुमच्या कंपनीचे किंवा ब्रँडचे उत्पादने किंवा सर्विसेस जर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील तर ग्राहकांना तुमच्या कंपनीच्या उत्पादना संदर्भात किंवा सर्विसेस संदर्भात पडलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने तुम्हाला देता येतील. आणि यामुळे ग्राहकांचा कंपनी बद्दल किंवा तुमच्या ब्रँड बद्दल असणारा विश्वास वाढेल आणि तुमची कंपनी किंवा तुमचा ब्रँड विश्वसनीय बनेल.

५ .  आजच्या जमान्यामध्ये अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण विविध सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. त्यामुळे तुमच्या कंपनीची किंवा ब्रँडची उत्पादने तसेच तुम्ही देत असलेल्या सर्विसेस बद्दलची सर्व माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल म्हणजेच audience reach वाढेल.

६ . तुमची कंपनी जर सोशल मीडिया मार्केटिंग करत असेल तर ग्राहकांना उत्तमरीत्या सर्विस देता येईल.

७ . सोशल मीडिया मार्केटिंग मुळे नक्कीच तुमच्या कंपनीच्या उत्पादनांची विक्री वाढण्यास मदत होऊ शकते.

८ . सोशल मीडिया मार्केटिंग मुळे तुमच्या कंपनीच्या वेबसाईटवर सुद्धा जास्त ट्रॅफिक येऊ शकते.

९ . सोशल मीडिया मार्केटिंग मुळे तुमचे जे स्पर्धक आहेत त्यांचादेखील अभ्यास करता येऊ शकतो आणि तुमची उत्पादने किंवा सर्विसेस देखील अपडेट ठेवू शकता.

सोशल मीडिया मार्केटिंग कशी करावी ?

How to do social media marketing ?

– सोशल मीडिया मार्केटिंग करत असताना उपलब्ध असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पैकी योग्य त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची निवड करणे गरजेचे आहे.

– सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची निवड करत असताना तुमचे केंद्रित ग्राहक कोणते आहेत म्हणजेच उदाहरणार्थ जर ते ग्राहक प्रोफेशनल असतील तर तुम्ही लिंकड इनची निवड करू शकता, आणि जर तुमचे ग्राहक स्टुडंट्स असतील तर इंस्टाग्राम ,फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्मची निवड करू शकता.

– सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची निवड झाल्यानंतर त्यावर कोणत्या प्रकारचा कंटेंट प्रदर्शित करायचा आहे हे निश्चित केले पाहिजे. तुम्ही बनवत असलेल्या कंटेंटमध्ये तुमच्या ब्रँड बद्दल किंवा उत्पादनांबद्दल सर्व माहिती व्यवस्थित रित्या समाविष्ट झाली पाहिजे तसेच कंटेंट आकर्षक देखील वाटला पाहिजे. कन्टेन्ट विविध फॉर्ममध्ये असू शकतो जसे की इमेज, आर्टिकल, व्हिडिओज.

– कंटेंट बनवून झाल्यानंतर निवडलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा कन्टेन्ट प्रदर्शित करू शकता.

– कन्टेन्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही ग्रुप्स बनवू शकता किंवा युट्युबचा उपयोग करणार असाल तर चॅनल तयार करू शकता असे केल्यामुळे एकाच वेळी कंटेंट जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

– गुगल ऍड्स ,फेसबुक ऍड्स तसेच इंस्टाग्राम ऍड्स रन करून सुद्धा सोशल मीडिया मार्केटिंग केली जाते.