३९९ रुपयांत पोस्ट ऑफिस विमा योजना | 399 Post Office Insurance Scheme 2023

३९९ रुपयांत पोस्ट ऑफिस विमा योजना | 399 Post Office Insurance Scheme 2023

      जवळपास सर्व लोक कधी ना कधी कुठे ना कुठे प्रवास करतच असतात. काही लोकांना तर नोकरीमुळे ,शिक्षणामुळे किंवा इतर काही कारणास्तव दररोजच प्रवास करावा लागतो. काही लोक त्यांच्या खाजगी वाहनाने प्रवास करतात तर काही लोक रिक्षा, बस यांसारख्या वाहनांचा उपयोग प्रवासासाठी करतात. प्रवास करत असताना हल्ली अपघाताचे प्रमाण सुद्धा रस्ते चांगले नसल्याकारणाने किंवा इतर काही कारणास्तव वाढले आहे. अशातच जर ज्या माणसाचा अपघात झाला त्या माणसावरच जर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असेल आणि त्या माणसाचे काही बरे वाईट झाले तर मात्र सर्वकाही कठीण होऊन बसते. परंतु अशावेळी जर अपघात विमा काढलेला असेल तर नक्कीच त्या व्यक्तीच्या कुटुंबाला हातभार लागू शकतो. तसेच ज्या व्यक्तीचा अपघात झालेला आहे ती व्यक्ती जखमी झाली तर दवाखान्याच्या खर्चामध्ये सुद्धा अपघात होण्यामुळे बऱ्यापैकी हातभार लागतो.

      पोस्ट ऑफिस विमा हा अगदी कुठल्याही वाहनाचा अपघात झालेला असेल उदाहरणार्थ दुचाकी, चार चाकी किंवा ट्रक किंवा टेम्पो असे कुठलेही वाहन असेल तरीसुद्धा हा विमा उपलब्ध आहे.

पोस्ट ऑफिस विमा योजनेचे लाभ : 

Benefits of Post office Insurance :

✓ अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये

✓ दवाखान्याचा खर्च ६० हजार रुपये

✓अपघातामुळे कायमस्वरूपीचे अपंगत्व १० लाख

✓ मुलाच्या शिक्षणासाठी- १ लाख रुपये प्रति मुल (जास्तीत जास्त दोन मुले)

✓ ऍडमीट असेपर्यंत रोज १ हजार रुपये (१० दिवसापर्यंत)

✓ ओ पी डी खर्च -३० हजार रुपये

✓ अपघाताने पॅरॅलिसिस झाल्यास- १० लाख रुपये

✓ कुटुंबाला दवाखाना प्रवासखर्च २५,०००/- रुपये

पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी पात्रता :   

Eligibility for Post office Insurance :

-पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी पोस्ट ऑफिस मध्ये बँक खाते असणे आवश्यक आहे.

-पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी वयोमर्यादा १८ वर्ष ते ६५ वर्ष असणे आवश्यक आहे.

-पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी प्रति वर्ष ३९९ रुपये भरावे लागणार आहेत.

३९९ रुपयांमध्ये मिळणारा विमा लाभ कुठे आणि कसा मिळणार ? 

– पोस्ट ऑफीस विम्याचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावे आणि पोस्ट ऑफिस मध्ये बँक खाते उघडावे.

– पोस्ट ऑफीस मधूनच ह्या विम्या संदर्भात माहिती तुम्हाला दिली जाईल.

– पोस्ट ऑफीस मधूनच तुम्हाला एक कार्ड सुद्धा मिळेल.

– जर भविष्यामध्ये अपघात झाला तर ह्या कार्डद्वारे तुम्हाला ह्या विम्याचा लाभ मिळू शकतो.

पोस्ट ऑफिस विमा योजनेचा कालावधी किती असणार आहे?

– पोस्ट ऑफिस विमा योजनेचा एकुण कालावधी हा एक वर्ष इतका असून दर एक वर्षानंतर विमा धारकास आपल्या विम्याचे नुतनीकरण पोस्ट ऑफीस मध्ये जाऊन करणे गरजेचे असेल.

हे ही वाचा … प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२३ (PMUY):

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२३ (PMUY):

      केंद्र सरकारकडून व राज्य सरकारकडून जनतेसाठी विविध प्रकारच्या योजना वेगवेगळ्या हेतूसाठी बनवल्या जातात. त्यापैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री उज्वला योजना. शहरांमध्ये बऱ्यापैकी विकास झाला असल्याकारणाने जवळपास सर्वच घरी गॅसची सुविधा उपलब्ध असलेली दिसून येते ,परंतु खेड्यामध्ये किंवा गावाकडील भागात बऱ्याचशा घरांमध्ये अजून सुद्धा गॅसची सुविधा उपलब्ध नाही यामागे आर्थिक दृष्ट्या गरिबी हे कारण असू शकते किंवा इतरही काही कारण असू शकते. खेड्यामध्ये अजूनही बऱ्याच महिला चुलीवर स्वयंपाक करताना आढळतात आणि त्यासाठी लागणारी लाकडे काही महिला तर दूर दूर हून जमा करत असतात. तसेच शेणाच्या गोवऱ्या सुद्धा बनवत असतात. क्वचितच आवड म्हणून चुलीवर स्वयंपाक करणे वेगळे आणि आर्थिकदृष्ट्या हालाखीची परिस्थिती असल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करणे या दोन्ही गोष्टींमध्ये नक्कीच फरक आहे.

          चुलीचा वापर केल्यामुळे जर जास्त प्रमाणावर धूर झाला तर त्याचा परिणाम त्या स्त्रीच्या तसेच कुटुंबातील इतर व्यक्तींच्या, लहान मुलांच्या आरोग्यावर होतो आणि यामुळे काही आजार सुद्धा उद्भवू शकतात. म्हणूनच जे लोक आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत , ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, जे लोक दारिद्र्य रेषेच्या खाली येतात अशा जनतेसाठी ‘ प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ‘ ही योजना आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना | Pradhanmantri Ujjwala Yojana | PMUY: 

– प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्यरेषेखालील जनतेसाठी आहे.

– पूर्वी केंद्र शासनाने आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्यरेषेखालील पाच कोटी कुटुंबांना एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला होता परंतु आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेचा लाभ आठ करोड दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना घेता येणार आहे.

– प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दिले जाणारे एलपीजी गॅस कनेक्शन हे त्या कुटुंबामधील महिलेच्या नावाने दिले जाणार आहे.

– प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी १६०० रुपयांचं आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.

– प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना १४.२ किलो वजन असलेला एलपीजी गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे तर देशामधील ज्या भागांमध्ये इतका मोठा सिलेंडर ट्रान्सपोर्ट करणे शक्य नाही उदाहरणार्थ, दुर्गम आणि डोंगराळ भाग … तर अशा ठिकाणी ५ किलो वजनाचे २ एलपीजी सिलेंडर देण्यात येणार आहे.

– स्थलांतरित कामगारांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी या कामगारांना स्वयं प्रमाणित घोषणापत्र सादर करावे लागणार आहे आणि हे त्यांच्या वास्तव्याचे प्रमाण समजण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2023 पात्रता –

Eligibility for Pradhanmantri Ujjwala Yojana –

– अर्जदार महिला असावी आणि भारताची नागरिक असावी.अर्जदार महिलेचे वय १८ वर्षा पेक्षा जास्त असणे सुद्धा आवश्यक आहे.

– अर्ज करणारी महिला दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असावी तसेच या कुटुंबातील इतर कोणाकडेही एलपीजी गॅस कनेक्शन नसावे.

–  बीपीएल कार्ड आणि बीपीएल शिधापत्रिका अर्जदाराजवळ असणे आवश्यक आहे.

– अर्ज करणाऱ्या महिलेचे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.

– दारिद्र्यरेषेखाली असणारे कुटुंबे, सर्वाधिक मागासवर्गीय कुटुंबे, वनवासी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती हे कुटुंबे या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी पात्र आहेत.

– १४ – सूत्री घोषणानुसार गरीब कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत.

– अर्ज करणाऱ्या महिलेचे नाव जनगणना २०११ (SECC – 2011) च्या यादीमध्ये असणे आवश्यक आहे ,त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या महिलेचे नाव तेल विपणन कंपन्यांच्या डेटाबेस मध्ये असलेल्या बीपीएल माहितीशी सुद्धा जुळणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे : 

Documents required for Pradhanmantri Ujjwala Yojana :

– आधार कार्ड क्रमांक ( ओळखीचा पुरावा म्हणून अर्जदाराचे आधार कार्ड)

– रहिवासी प्रमाणपत्र

– जाती प्रमाणपत्र

– बीपीएल रेशनकार्ड (ज्या राज्यातून अर्ज केला जात आहे त्या राज्याने जारी केलेले रेशनकार्ड)

– जन-धन बँक खात्याचे नंबर

– पंचायत अधिकारी / नगर पालिका यांनी प्रमाणित केलेले बीपीएल प्रमाणपत्र

– पासपोर्ट आकाराचा फोटो

– कुटुंबातील सदस्यांचा आधार क्रमांक

– कुटुंबाच्या स्थितीला आधार देण्यासाठी पूरक KYC 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अर्ज करण्याची प्रक्रिया : 

Application process of Pradhanmantri Ujjwala Yojana : 

– प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो.

🔸ऑफलाइन पद्धतीने करण्याची प्रक्रिया –

– प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करताना नजीकच्या एलपीजी वितरण केंद्रामध्ये हा अर्ज मिळू शकतो किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन हा अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी.

– अर्ज व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत लागणारी सर्व कागदपत्रे जोडावी.

– त्यानंतर हा फॉर्म एलपीजी वितरण केंद्रामध्ये जमा करावा.

– तसेच हा अर्ज करत असताना सिलेंडर १४.२ किलो वजनी हवा की ५ किलो यासाठी केवायसी फॉर्म भरणे सुद्धा आवश्यक आहे.

– नंतर एलपीजी केंद्र अधिकाऱ्याकडून अर्ज तसेच कागदपत्रांची संपूर्ण पडताळणी करण्यात येते त्यानंतर लाभार्थ्यांना काही दिवसांतच एलपीजी कनेक्शन दिले जाते.

 🔸प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज  करण्यासाठी https://www.pmuy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.

हे ही वाचा ….महिला सम्मान बचत पत्र योजना २०२३