पावसाळ्यामध्ये घरामध्ये येणारे डास, माश्या तसेच कीटकांना पळवून लावण्यासाठी उपाय

घरामधील डास तसेच माश्यांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय

Top 10 Natural ways to Keep Insects away – 

      पावसाळा सुरू झाला की वेगवेगळ्या समस्या आपल्याला जाणवू लागतात त्यापैकीच एक समस्या म्हणजे पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे तसेच अस्वच्छतेमुळे आपल्या घराच्या आसपासच्या परिसरामध्ये डास, माश्या तसेच इतर किटके भटकू लागतात आणि त्याचा त्रास आपल्याला होऊ लागतो. या किटकामुळे आपल्या आरोग्याला सुद्धा धोका असतो आणि आपण आजारी पडण्याची शक्यता जाणवते. म्हणून यावर आपण काही घरगुती उपाय बघणार आहोत ते पुढील प्रमाणे :

१ . आपल्या घरापासून डास, माश्या तसेच इतर किटके दूर ठेवण्यासाठी सर्वात पहिला उपाय म्हणजे संध्याकाळच्या वेळी आपल्या घराच्या खिडक्या वगैरे पॅक करून घेणे.

२ . ज्या खोलीमध्ये किंवा ज्या ठिकाणी लाईटची आवश्यकता नसेल अशा ठिकाणी लाईट बंद करून ठेवा असे केल्यामुळे लाईट भोवती फिरणारे किटके फिरत नाहीत.

३ . काळी मिरी कुठून ती पाण्यामध्ये मिक्स करा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून हा स्प्रे घरामध्ये फवारा असे केल्यामुळे घरामधील डास, माश्या तसेच इतर किटके पळून जातील.

४ . त्याचप्रमाणे लिंबू आणि सोड्याचे मिश्रण करून ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरून हा स्प्रे घरामध्ये फवारा असे केल्यामुळे घरामधील डास, माश्या तसेच इतर किटके पळून जातील.

५ . घरामध्ये जास्तीत जास्त स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करा. ज्या ठिकाणी स्वच्छता असते अशा ठिकाणी शक्यतो डास, माश्या तसेच इतर किटके भटकत नाहीत.

६ . लवंग तसेच लिंबूवर्गीय फळे सुद्धा कीटकांसाठी घातक असल्याकारणाने लवंगाची पावडर करून पाण्यामध्ये मिसळा आणि त्यामध्ये लिंबाचा रस घाला. तयार झालेले मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घरामध्ये सगळीकडे फवारा, असे केल्यामुळे डास, माश्या तसेच इतर किटके घरामधून दूर पळून जातील.

७ . पुदिना हा सुद्धा डासांसाठी घातक असल्याकारणाने तुम्ही तुमच्या घराच्या गॅलरीमध्ये पुदिना लावू शकता तसेच ठिकठिकाणी पुदिन्याची पाने ठेवू शकता. तसेच पुदिन्याचे तेल सुद्धा तुम्ही घरामध्ये ठीक ठिकाणी फवारू शकता,असे केल्यामुळे डास, माश्या तसेच इतर किटके घरामधून दूर पळून जातील.

८ . गावाकडे पूर्वी आणि अजून सुद्धा डास आणि इतर किटके पळवून लावण्यासाठी एक पारंपारिक असा उपाय केला जातो तो म्हणजे कडुलिंबाच्या पानांचा धूर करणे. कडुलिंबाच्या पानांच्या धुरामुळे डास, माश्या तसेच इतर कीटकांना त्रास होऊ लागतो आणि ते दूर पळून जातात.

९ . कडुलिंबाच्या पानांचा अजून एक उपाय म्हणजे घरामध्ये बल्ब जवळ कडुलिंबाच्या पानांची फांदी बल्ब चालू करण्यापूर्वी अडकवणे, असे केल्यामुळे सुद्धा लाईट चालू केल्यानंतर येणारी किटके येत नाहीत.

१० .हा उपाय शक्यतो संध्याकाळच्या वेळेस करावा कारण संध्याकाळच्या वेळी घरामध्ये डास,माश्या तसेच इतर कीटकांची प्रमाण जास्त आढळते. चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेऊन थोड्याशा ठेचून घ्या त्यानंतर त्यामध्ये चार ते पाच कापराची पावडर टाका. यामध्ये थोडेसे गावरान तूप घाला आणि नंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार झालेले हे मिश्रण एखाद्या पणती मध्ये किंवा दिव्यामध्ये होता आणि त्यात कापूर प्रज्वलित करा. असे केल्यामुळे या मिश्रणाचा वास तसेच धूर घरामध्ये पसरेल आणि या उपायामुळे डास,माश्या तसेच इतर कीटक दूर पळून जातील.