चेहऱ्यावर येणारे पिंपल किंवा ॲकने दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय :
Acne treatment at home in Marathi
Acne home remedies –
सामान्यतः काही लोकांची अशी समजूत असते की 16 ते 25 वर्षे या वयातच चेहऱ्यावर ॲकने येण्याची समस्या उद्भवते. परंतु असे नसून कोणत्याही वयामध्ये आपल्याला ही समस्या उद्भवू शकते. ही समस्या येण्यामागचे कारण आपल्या त्वचेमध्ये ज्या ऑइल glands असतात त्यामधील ऑइल गरजेपेक्षा वाढले तसेच त्यामध्ये डेड सेल्सचे प्रमाण वाढले की चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात. चेहऱ्यावर ॲकने किंवा पिंपल येण्यामागचे इतर काही कारणे पुढील प्रमाणे : –
– चेहऱ्यावर पिंपल येण्यामागे आपले जेनेटिक्स किंवा अनुवंशिकता देखील कारणीभूत ठरू शकते परंतु दरवेळी जेनेटिक्समुळे पिंपल्स येतील असे नाही.
– हार्मोन्स मध्ये बदल घडून आल्यामुळे देखील चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.
– आपण नियमित जो काही आहार घेतो तो देखील व्यवस्थित रित्या घेतला पाहिजे. तळलेले पदार्थ तसेच जंक फूड जास्त प्रमाणात खाणे टाळले पाहिजे. आपण कोणत्या प्रकारचा आहार घेतो याचा देखील आपल्या चेहऱ्यावर परिणाम होत असतो. Pimple remedies in marathi
– तसेच आपण आपल्या चेहऱ्याची दररोज योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
– काहींना चेहऱ्यावर जास्त प्रमाणात मेकअप करण्याची सवय असते आणि तो मेकअप जर व्यवस्थित रित्या काढला गेला नाही तरी देखील चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ॲकने येतात.
– काही प्रकारच्या मेडिसिन्समुळे देखील चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ॲकनेची समस्या येऊ शकते.
– काहींना जास्त ताणतणाव घेण्याची सवय असते त्या कारणामुळे देखील या प्रकारची समस्या उद्भवू शकते.
ही झाली पिंपल्स किंवा ॲकने येण्यामागची काही कारणे. आता आपण यावर काही घरगुती उपाय बघणार आहोत.
१ . तांदळाच्या पिठाचा फेसपॅक –
– दोन चमचे तांदळाचे पीठ, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध ही सर्व सामग्री व्यवस्थित रित्या मिक्स करून त्याची पेस्ट बनवा.
– ही पेस्ट चेहऱ्यावर सर्कुलर मोशन मध्ये व्यवस्थित रित्या लावून घ्या.
– ही पेस्ट चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे तशीच राहू द्या आणि त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन काढा.
तांदळाच्या पिठामुळे चेहऱ्यावरील पिगमेंटेशन कमी होते तसेच चेहरा देखील उजळतो. तांदळामध्ये विटामिन बी असल्यामुळे ते नवीन सेल्स तयार करण्यामध्ये मदत करतात. लिंबाचा रस चेहऱ्यावरील जास्त प्रमाणात असलेलं ऑइल काढण्यामध्ये मदत करतो तसेच लिंबाच्या रसामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे चेहऱ्यावर नको असलेले जे बॅक्टेरिया आहे त्याचा नाश लिंबाचा रस करते तसेच लिंबामध्ये विटामिन सी असल्याने त्वचा उजळवण्यामध्ये त्याची मदत होते.
२ . मध – मध हे एक उत्तम प्रकारचे मॉइश्चरायझर आहे. चेहरा हायड्रेटिंग ठेवण्यासाठी मध मदत करते. तसेच मधामध्ये अँटिबॅक्टरियल गुणधर्म देखील असतात.
ज्या ठिकाणी पिंपल्स किंवा ॲकने आहेत त्या ठिकाणी मध लावून ठेवा आणि काही तासानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन काढा.
३ . ऑरेंज पील फेस पॅक –
एक चमचा संत्रीच्या सालीपासून बनवलेली पावडर आणि दोन चमचे गुलाब पाणी घेऊन व्यवस्थित रित्या मिक्स करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन काढा.
संत्रीच्या साले मध्ये विटामिन सी असते तसेच अँटिबॅक्टरियल गुणधर्म देखील असतात आणि त्याचा फायदा आपल्या चेहऱ्यासाठी नक्कीच होतो. गुलाब पाणी चेहऱ्यावरील धूळ किंवा डर्ट काढून टाकतो.
४ . ग्रीन टी बॅग –
ग्रीन टी बॅग चहा बनवल्यानंतर ती बॅग फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा आणि त्यानंतर चेहऱ्यावर ठेवा किंवा ग्रीन टी थंड करून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही तो टोनर म्हणून देखील वापरू शकता. ग्रीन टी बॅग मध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात त्यामुळे ॲकने दूर करण्यामध्ये त्याची मदत होते.
५ . बटाटा –
बटाट्यामध्ये जे स्टार्च उपलब्ध असतं त्यामुळे बटाटा चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहऱ्यावरील लालसर पणा तसेच ॲकने कमी करण्यामध्ये त्याची मदत होते.
६ . चंदन पावडर , निम पावडर , एलोवेरा जेल आणि गुलाब पाणी –
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा फेस वॉशने व्यवस्थित रित्या स्वच्छ करून घ्या. त्यानंतर त्यावर गुलाब पाणी लावा. नंतर थोडेसे एलोवेरा जेल लावा. आणि त्यानंतर चंदन पावडर ,निम पावडर आणि गुलाब पाणी या सामग्रीची मिळून व्यवस्थित पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर ज्या ठिकाणी पिंपल्स किंवा ॲकने आहेत त्या ठिकाणी लावा. रात्रभर तसंच राहू द्या आणि सकाळी चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन काढा