चंद्राच्या खूप जवळ पोहोचले चंद्रयान ३ ….. बघा चंद्रावरील पहिले दृश्य …
आपल्या सर्वांना माहीतच असेल की चंद्रयान ३ हे १४ जुलै २०२३ ला २ वाजून ३५ मिनिटांनी लॉन्च केले गेले होते. यापूर्वी सुद्धा चंद्रयान २ हे २२ जुलै २०१९ ला लॉन्च केले गेले होते परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यामुळेच सर्वांचे लक्ष आता चंद्रयान ३ कडे लागलेले आहे आणि चंद्रयान ३ यशस्वी होण्याच्या मार्गावर असून चंद्राच्या अगदी जवळ चंद्रयान ३ पोहोचले आहे.
चंद्रयान ३ हे चंद्राच्या ऑर्बिट मध्ये पोहोचले असून चंद्रयान ३ हे १६६ किमी x १८,०५४ किमी च्या ऑर्बिट मध्ये यात्रा करत आहे आणि हे चंद्राचे ऑर्बिट आहे. यानंतर १७ ऑगस्ट हा चंद्रयान ३ साठी महत्त्वाचा दिवस ठरणार असून चंद्रयान ३ प्रोपल्शन आणि लैंडर मॉड्यूल वेगळे होतील आणि त्यानंतर फक्त लँडिंग होणे बाकी राहील.इस्रो ( ISRO – Indian Space Research Organisation) ने खूप मोठे यश मिळवले आहे.
चंद्राच्या पृष्ठभागापासून चंद्रयान ३ आता कमी अंतरावर असून इस्रोने पुन्हा चंद्रयानाची कक्षा बदलली आहे याचे कारण म्हणजे यामुळे चंद्रयान ३ चंद्राच्या अजून जवळ नेता येईल.चंद्रयान ३ ची कक्षा ९ ऑगस्टला पुन्हा बदलली जाऊ शकते.
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोकडून असे सांगण्यात आले की, चंद्राच्या जवळ जाण्यासाठी चंद्रयान ३ ची ऑर्बिट बदलण्याची जी प्रक्रिया केली जाते ती १७ ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाईल.चंद्रयान ३ चे प्रोपल्शन आणि लैंडर मॉड्यूल वेगळे होतील आणि नंतर लँडर शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचेल.डी-ऑर्बिटिंगची प्रक्रिया लँडिंगच्या आधीच सुरू होईल. त्यानंतर काही वेळाने लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल.
चंद्रयान १ ने २००८ मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचे अंश शोधून काढले होते तर त्यानंतर चंद्रयान २ मिशन २०१९ मध्ये लॉन्च करण्यात आलं त्यावेळी सुद्धा दक्षिण ध्रुवावर शोध घेतला जाणार होता परंतु त्यावेळी हे मिशन अयशस्वी ठरले होते आणि आता पुन्हा चंद्रयान ३ मिशन सुरू असून हे मिशन नक्कीच यशस्वी होऊ शकते.
२३ ऑगस्ट रोजी चंद्रयान ३ हे चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार आहे. इस्रोचा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा दुसरा प्रयत्न असून जर यामध्ये यश आले तर भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरेल.
चंद्रयान ३ हे ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या कक्षेत आले असून आता चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत स्थिरावले आहे. इस्रो ने चंद्रयान ३ या मोहिमेमधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार केला असून हे मिशन यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे.चंद्रयान ३ चे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापूर्वी चार वेळा ऑर्बिट बदलले जाणार आहे.चंद्रयान ३ हे चंद्राभोवती परिभ्रमण करत चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेल.चंद्रयान ३ चे वजन चंद्रावर उतरण्यापूर्वी ३९०० किलोवरून २१०० किलोवर येणार आहे.
चंद्रयान ३ चा वेग नियंत्रित केला जात आहे याचे कारण असे की ,चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करत असताना कुठलीही अडचण येऊ नये तसेच चंद्रावरील गुरुत्वाकर्षणाचा परिणाम यावर होऊ नये यामुळे यानाचा वेग कमी करत करतच यान चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने जात आहे.
चंद्रयान ३ हे जसे जसे चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ पोहोचतयं तसे इस्रोकडून फोटो शेअर करण्यात येत आहेत.