Low cost business idea – Bangles shop |कमी खर्चात व्यवसाय कल्पना – बांगड्यांचे दुकान

Low cost business idea – bangles shop

कमी खर्चात व्यवसाय कल्पना – बांगड्यांचे दुकान

Is bangle business profitable?

How to start the bangles business at home?

How to start bangles shop ?

     आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बांगड्यांना खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या भारत देशामधील अगदी प्रत्येक राज्यांमध्ये विविध प्रकारच्या बांगड्या परिधान केल्या जातात. जवळपास प्रत्येक स्त्रीला हातामध्ये बांगडी घालायला आवडते त्यापैकी बऱ्याच स्त्रियांना हातामध्ये भरभरून बांगड्या घालायला आवडतात. बांगड्या फक्त स्त्रीच्या हातांचे सौंदर्य वाढवत नाही तर त्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे, ज्यावेळी बांगड्यांचे हाताच्या मनगटावर घर्षण होते त्यावेळी एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि रक्तप्रवाह देखील सुरळीत चालतो. भारतामधील जवळपास प्रत्येक भागामधील स्त्रिया बांगड्या परिधान करतात आणि त्यामुळेच जर बांगड्यांचे दुकान हा कमी खर्चामध्ये सुरू होणारा व्यवसाय सुरू केला तर नक्कीच हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.

स्टेप १ – व्यवसाय योजना तयार करा –

Create a business plan –

व्यवसाय छोटा असो किंवा मोठा असो व्यवसाय योजना तयार करणे तितकेच महत्त्वाचे आहे. व्यवसाय योजना तयार केल्यामुळे व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात. बांगड्यांचा व्यवसाय किंवा बांगड्यांचे दुकान सुरू करत असताना हे दुकान तुम्ही कुठे सुरू करणार आहात, बांगड्या होलसेल दरात कुठून खरेदी करणार आहात, दुकानाचे फर्निचर किंवा सेटअप कशाप्रकारे असेल, कोणत्या बांगड्यांचा काय रेट असेल , या व्यवसायासाठी अंदाजे किती गुंतवणूक लागेल यांसारख्या विविध प्रश्नांचा समावेश या व्यवसाय योजनेमध्ये होऊ शकतो.

स्टेप २  – बांगड्यांचे दुकान सुरू करण्यासाठी ठिकाण ठरवा –

Decide the place to start bangle shop –

बांगड्यांचे दुकान कुठे सुरू करणार आहात हे ठरवणे खूप गरजेचे आहे. सुरुवातीला तुम्ही जर कमी गुंतवणूक करणार असाल तर अगदी तुमच्या घरामधील एखाद्या रूममधून सुद्धा बांगड्यांचे दुकान सुरू करता येऊ शकते. किंवा ज्या ठिकाणी गर्दी जास्त असेल अशा ठिकाणी एखादा गाळा भाड्याने घेऊन किंवा तुमची स्वतःची जागा असेल तर त्या ठिकाणी बांगड्यांचे दुकान सुरू करू शकतात.

स्टेप ३ – दुकानाची रचना, फर्निचर आणि दुकानाची सजावट –

Shop design, furniture and shop decoration –

बांगड्यांचे दुकान आकर्षक दिसणे खूप आवश्यक आहे. त्यामुळेच दुकानांमध्ये फर्निचर व्यवस्थित करा. तसेच बांगड्यांसाठी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार शेल्वस/ कप्पे बनवून घेवू शकता आणि त्यावर काचेचे कव्हर बसवून घेऊ शकता.

बांगड्यांच्या दुकानांमधील लाइटिंग सुद्धा व्यवस्थित असणे गरजेचे आहे ,ज्यामुळे बांगड्यांचा कलर तसेच बांगड्यांची डिझाईन ग्राहकांना व्यवस्थितरित्या समजण्यास मदत होते. बऱ्याचदा एखाद्या ग्राहकांना बांगड्या खरेदी करण्याचा विचार नसेल परंतु दुकानाजवळून जात असताना ग्राहकाचे लक्ष एखाद्या बांगड्यांकडे गेले आणि त्यांना त्या बांगड्या आवडल्या तर नक्कीच ते ग्राहक बांगड्या खरेदी करण्यासाठी दुकानात येतात.

तुम्ही बांगड्यांच्या दुकानाची रचना तसेच फर्निचर आणि दुकानाची सजावट तसेच लाइटिंग तुमच्या आवडीनुसार व्यवस्थित रित्या करू शकता.

स्टेप ४ – बांगड्यांच्या दुकानासाठी गुंतवणूक –

Investment for bangles shop –

बांगड्यांचे दुकान सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक करायची हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे, कारण तुम्ही दुकानांमध्ये किती माल भरणार आहात, दुकानाचे फर्निचर तसेच लाइटिंग कशी करणार आहात यांसारख्या काही गोष्टींवर गुंतवणूक अवलंबून राहू शकते. त्यामुळेच तुम्ही हा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणावर सुरू करतात यानुसार किती गुंतवणूक लागेल हे ठरू शकते. परंतु बांगड्यांचे दुकान हा एक असा व्यवसाय आहे की जो कमी गुंतवणुकीमध्ये सुद्धा सुरू केला जाऊ शकतो.

स्टेप ५ – मार्केटिंग –

Marketing –

– बांगड्यांच्या दुकानासाठी माऊथ पब्लिसिटी महत्त्वाची आहे म्हणजेच समजा एखाद्या ग्राहकाने तुमच्याकडे बांगड्या खरेदी केल्या आणि त्यांना त्या आवडल्या तर ते ग्राहक नक्कीच दुसऱ्या ग्राहकाला तुमच्या दुकानाबद्दल सांगू शकेल. तसेच तुम्ही तुमचे नातेवाईक ,मित्र – मैत्रिणी यांद्वारे सुद्धा तुमच्या दुकानाबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकता.

– मार्केटिंग करण्यासाठी महत्त्वाचे माध्यम म्हणजे सोशल मीडिया. इंस्टाग्राम, फेसबुक ,व्हाट्सअप ,युट्युब यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमच्या बांगड्यांच्या व्यवसायाबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकता आणि याद्वारे ऑफलाइन ऑर्डर मिळण्यास मदत होईलच त्याचबरोबर ऑनलाईन ऑर्डर देखील मिळू शकतात.

Writer – Poonam Ghorpade Gore