पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा ….

पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा ….

PM Modi Pune visit 

    काल मंगळवार दिनांक १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये येत असल्याकारणाने काल सकाळी ६ ते दुपारी ३ वाजे दरम्यान काही बदल करण्यात आलेले होते .त्यामध्ये वाहतुकीमध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले होते, काही मार्ग या वेळेमध्ये बंद करण्यात आलेले होते. यामध्ये टिळक रोड, शिवाजी चौक, कुमठेकर रोड, अलका चौक, स्वारगेट, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, पुणे विद्यापीठ चौक, लक्ष्मी रोड, सिमला ऑफीस चौक, संचेती चौक, संगमवाडी रोड, गोल्फ कल्ब चौक, विमानतळ रोड, स गो बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक आणि सेवासदन चौक हे प्रमुख मार्ग ठरलेल्या वेळेमध्ये बंद राहणार होते.

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे दौऱ्या दरम्यान विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले, तसेच भूमिपूजन सुद्धा करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे लोकार्पण केले.

     पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येत असल्याकारणाने पुण्याच्या रस्त्यांवर गर्दी होण्याची तसेच ट्रॅफिक जाम होण्याची दाट शक्यता होती, त्यामुळेच मनसे विद्यार्थी सेनेने शिक्षक आयुक्तांना निवेदन करून तेथील शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी विनंती सुद्धा केली होती जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांना या गोष्टीचा त्रास होऊ नये.

      पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येत असल्याकारणाने सुरक्षा यंत्रणा सुद्धा अलर्ट मोडवर कार्यरत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या ज्या मार्गाने जाणार होते त्या मार्गांवर रंगीत तालीम सुद्धा घेण्यात आली होती. पुणे पोलिसांनी तसेच केंद्रीय पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेतला होता.

     पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एअर फोर्सच्या विशेष विमानाने पुण्यामध्ये आले, त्या ठिकाणी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वप्रथम दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये गेले. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा व अभिषेक केला आणि त्यांच्या हस्ते महाआरती सुद्धा करण्यात आली.

    यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एसटी कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्काराची सर्व रक्कम नमामी गंगा प्रोजेक्टला दिली.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास काम लोकार्पणासाठी निघाले. पुणे मेट्रोचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटन दाबून पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकेचे लोकार्पण केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्घाटन सुद्धा केले.