How to Start Poha Making Business..? || पोहे बनविण्याचा व्यवसाय

पोहे बनविण्याचा व्यवसाय (Poha Making Business):-

             भारतामध्ये सध्या लोक नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्यासाठी पुढे सरसावत आहे. यामध्ये अनेक लहान मोठे व्यवसाय,जे की कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी जागेत, जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे अनेक व्यवसाय आहेत. त्यापैकीच एक व्यवसाय म्हणजे पोहे बनविण्याचा व्यवसाय (Poha Making Business) 

How to Start Poha Making Business..?

            हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, मेस, हातगाडी, टपरी यांसारख्या ठिकाणी पोहे हमखास मिळतातच. “पोहे” हा नाश्त्यासाठी वापरला जाणारा तसेच सर्व वयोगटातील लोकांना प्रिय असणारा खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे पोह्याला आजही प्रचंड मागणी आहे. पोह्याची ही वाढती मागणी बघता, पोहे बनविण्याचा व्यवसाय हा सध्याच्या काळात एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. तर जाणून घेऊया या व्यवसायाबद्दल ची संपूर्ण माहिती…

Poha Making Business

              पोहे हे तांदळापासून बनविले जातात. त्यामुळे पोहे बनविण्याच्या व्यवसायासाठी तुम्ही कोणत्या गुणवत्तेचे पोहे बनविणार आहात, त्यानुसार होलसेल मार्केट मधून तुम्ही तांदळाची खरेदी करू शकता.  मार्केटमध्ये विविध प्रकारचे तांदूळ उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यांच्या किमतीमध्ये सुद्धा विविधता आहे. तांदळाची खरेदी केल्यानंतर, पोहे बनविण्यासाठी आवश्यकता असते ते, पोहे मेकिंग मशीनची. ही मशीन तुम्हाला साधारणता १० हजारापासून ते २५ हजारापर्यंत ऑनलाइन किंवा होलसेल मशीनच्या दुकानांमध्ये मिळू शकते.

           हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला कमीत कमी पाचशे चौरस फूट इतकी जागा आवश्यक आहे. ही जागा तुम्ही स्वतःची किंवा रेंट ने देखील घेऊ शकता आणि त्यानंतर त्या ठिकाणी यंत्रे फिक्स करून हा व्यवसाय सुरू करू शकता. 

           पोहे बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला तांदूळ स्वच्छ करून त्यातील दगड, माती, खडे हे बाजूला करून तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले जातात. त्यानंतर ते कमीत कमी ४० ते ४५ मिनिटे, गरम पाण्यात ठेवले जातात. त्यानंतर ते पाण्यातून काढून कोरडे केले जातात. नंतर ते तांदूळ रोस्टर मशीन किंवा ओव्हन द्वारे भाजून घेतले जातात. भाजल्यामुळे भुशी आणि तांदूळ वेगळा होतो.

           भुशी बाजूला केल्यानंतर, तांदूळ हे फिल्टर केले जातात.   फिल्टरिंगनंतर तांदूळ हे पोहे बनविण्याच्या मशीन मध्ये टाकले जातात आणि  त्यानंतर मशीनमध्ये तांदळाला पोह्यासारखा आकार देऊन, हे तयार पोहे पॅक केले जातात. योग्य पॅकिंग नंतर हे पोहे ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले जातात.

Poha Making Business

          पोहे हे अन्नाची निगडित असल्याने, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी FSSAI परवाना या व्यवसायात आवश्यक असतो. त्याचबरोबर व्यवसायाची जीएसटी नोंदणी, MSME नोंदणी, एक्सचेंज परवाना, IEC  कोड आवश्यक असतो.

           हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाखापासून ते पाच लाखापर्यंतची गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. तसेच  हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून देखील कर्जाऊ स्वरूपात आर्थिक मदत घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्याचा विचार केला असता महिन्याला तुम्ही ते २० ते ३० हजारापर्यंत नफा तुम्ही मिळवू शकता.

           पोहे बनविण्याच्या व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी, योग्य रीतीने मार्केटिंग करणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्केटिंग करू शकता. तसेच रेडिओ, टीव्ही, वेगवेगळ्या सोशल साईट, मोबाईल यांच्या मदतीने तुम्ही या व्यवसायाचे मार्केटिंग करून या व्यवसायाचा अधिकाधिक  विस्तार करू शकता. मार्केटमध्ये तुम्ही बनवलेल्या पोह्याचा  ब्रँड देखील तुम्ही बनवू शकता.

Poha Making Business

Job Update 2023 :-

  1. AIC Recruitment 2023 : 40 Posts
  2. IGNOU Recruitment 2023 : 200 Posts
  3. NWDA Recruitment 2023 : 40 Posts

Other Links :-

  1. Rajmata Jijabai : Inspiration of Chhatrapati Shivaji Maharaj ||राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले
  2. Importance of Painting : चित्रकलेमध्ये करिअर कशाप्रकारे घडवू शकतो ?
  3. How to do a Best Makeup..? : अगदी साधा सोपा मेकअप कसा करावा ?