३९९ रुपयांत पोस्ट ऑफिस विमा योजना | 399 Post Office Insurance Scheme 2023
जवळपास सर्व लोक कधी ना कधी कुठे ना कुठे प्रवास करतच असतात. काही लोकांना तर नोकरीमुळे ,शिक्षणामुळे किंवा इतर काही कारणास्तव दररोजच प्रवास करावा लागतो. काही लोक त्यांच्या खाजगी वाहनाने प्रवास करतात तर काही लोक रिक्षा, बस यांसारख्या वाहनांचा उपयोग प्रवासासाठी करतात. प्रवास करत असताना हल्ली अपघाताचे प्रमाण सुद्धा रस्ते चांगले नसल्याकारणाने किंवा इतर काही कारणास्तव वाढले आहे. अशातच जर ज्या माणसाचा अपघात झाला त्या माणसावरच जर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असेल आणि त्या माणसाचे काही बरे वाईट झाले तर मात्र सर्वकाही कठीण होऊन बसते. परंतु अशावेळी जर अपघात विमा काढलेला असेल तर नक्कीच त्या व्यक्तीच्या कुटुंबाला हातभार लागू शकतो. तसेच ज्या व्यक्तीचा अपघात झालेला आहे ती व्यक्ती जखमी झाली तर दवाखान्याच्या खर्चामध्ये सुद्धा अपघात होण्यामुळे बऱ्यापैकी हातभार लागतो.
पोस्ट ऑफिस विमा हा अगदी कुठल्याही वाहनाचा अपघात झालेला असेल उदाहरणार्थ दुचाकी, चार चाकी किंवा ट्रक किंवा टेम्पो असे कुठलेही वाहन असेल तरीसुद्धा हा विमा उपलब्ध आहे.
पोस्ट ऑफिस विमा योजनेचे लाभ :
Benefits of Post office Insurance :
✓ अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये
✓ दवाखान्याचा खर्च ६० हजार रुपये
✓अपघातामुळे कायमस्वरूपीचे अपंगत्व १० लाख
✓ मुलाच्या शिक्षणासाठी- १ लाख रुपये प्रति मुल (जास्तीत जास्त दोन मुले)
✓ ऍडमीट असेपर्यंत रोज १ हजार रुपये (१० दिवसापर्यंत)
✓ ओ पी डी खर्च -३० हजार रुपये
✓ अपघाताने पॅरॅलिसिस झाल्यास- १० लाख रुपये
✓ कुटुंबाला दवाखाना प्रवासखर्च २५,०००/- रुपये
पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी पात्रता :
Eligibility for Post office Insurance :
-पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी पोस्ट ऑफिस मध्ये बँक खाते असणे आवश्यक आहे.
-पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी वयोमर्यादा १८ वर्ष ते ६५ वर्ष असणे आवश्यक आहे.
-पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी प्रति वर्ष ३९९ रुपये भरावे लागणार आहेत.
३९९ रुपयांमध्ये मिळणारा विमा लाभ कुठे आणि कसा मिळणार ?
– पोस्ट ऑफीस विम्याचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावे आणि पोस्ट ऑफिस मध्ये बँक खाते उघडावे.
– पोस्ट ऑफीस मधूनच ह्या विम्या संदर्भात माहिती तुम्हाला दिली जाईल.
– पोस्ट ऑफीस मधूनच तुम्हाला एक कार्ड सुद्धा मिळेल.
– जर भविष्यामध्ये अपघात झाला तर ह्या कार्डद्वारे तुम्हाला ह्या विम्याचा लाभ मिळू शकतो.
पोस्ट ऑफिस विमा योजनेचा कालावधी किती असणार आहे?
– पोस्ट ऑफिस विमा योजनेचा एकुण कालावधी हा एक वर्ष इतका असून दर एक वर्षानंतर विमा धारकास आपल्या विम्याचे नुतनीकरण पोस्ट ऑफीस मध्ये जाऊन करणे गरजेचे असेल.
हे ही वाचा … प्रधानमंत्री उज्ज्वला योजना