How to start profitable Tea business in Marathi 2022

How do I start my own tea business? Is tea powder business profit margin? How much money do you need to start a tea business? What are the requirements for tea business? tea powder business profit margin, how to start a tea business from home, how to start tea packaging business in india, tea leaf business profit margin in india, tea powder business plan, tea shop business plan pdf, tea leaf business plan, wholesale tea business

Tea Shop Business Plan: Know How to Start in 2022

भारतातील जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आपल्या दिवसाची सुरुवात गरम पेयाने करतो आणि बहुतेकदा  चहाने दिवसाची सुरुवात केली जाते. बहुतेक लोक संध्याकाळी देखील आणि त्यांच्या मूडनुसार चहा पिणे  पसंत करतात. म्हणून, सरासरी भारतात दररोज सुमारे 2 कप चहा बरेचसे व्यक्ती घेतात. यामुळे चहाचा व्यवसाय सर्वात चांगल्या व्यवसायांपैकी एक आहे. Tea Business idea in marathi

चहाच्या दुकानाचा व्यवसाय हा सर्वात सोपा व्यवसाय आहे, जर एखाद्या व्यक्तीला विशेषतः भारतात स्वतःहून व्यवसाय सुरू करण्यात रस असेल तर नक्की हा व्यवसाय सुरू केला पाहिजे. चहाच्या दुकानाचा आकार उद्योजकाच्या गुंतवणूक बजेटनुसार असू शकतो. 

 एकदा एखाद्या व्यक्तीने चहाचे दुकान उघडले आणि चहाचा दर्जा, किंमत इत्यादींबाबत परिसरात चांगली प्रतिष्ठा निर्माण केली की, लोक त्या चहाच्या दुकानातून नियमितपणे चहा घेण्यास सुरवात करतात.

मार्केटचा अभ्यास Tea Business Market study in Marathi

कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजार संशोधन हे सर्वात आवश्यक पाऊलांपैकी एक आहे आणि ते चहाच्या व्यवसायासाठी करणेदेखील गरजेचे आहे. यामध्ये बाजाराची गरज समजून घेणे समाविष्ट आहे, म्हणजे, ज्या ठिकाणी चहाची मागणी नियमितपणे केली जाते जसे की कंपन्या, रुग्णालये, न्यायालये, रेल्वे स्थानके,बस स्थानक इ.ठिकाणी चहा जास्त प्रमाणात विकला जातो.

credit- youtube.com

चहाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यवस्थितरीत्या योजना तयार करणे

Good planning before starting tea business in Marathi

चहाचा व्यवसाय सुरू करण्याआधी पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे चांगली योजना तयार करणे. यामध्ये चहाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला किती गुंतवणूक करायची आहे , सेट अप साठी किती गुंतवणूक लागेल हे ठरवणे त्याच बरोबर चहाच्या दुकानात कोणते पदार्थ विकायचे हे ठरवणे देखील महत्त्वाचे आहे. यामध्ये चहाच्या सोबत, बिस्किटे, टोस्ट तसेच क्रीम रोल इत्यादींसारखे इतर कोणते उत्पादने विकता येतील हे ठरवणे या गोष्टींचा समावेश होतो.

तसेच एक कप चहाची किंमत ठरवणे हे देखील गरजेचे आहे. चहाच्या कपाची किंमत चहाच्या कपाच्या आकारानुसार वेगवेगळी असू शकते.

चहाच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी

Required things for tea business in Marathi

चहाचा  व्यवसाय सुरू करण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत-

 -चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य जसे की  पाणी,चहा पावडर, साखर, दूध इ.

 -किटली

 -स्टोव्ह /गॅस

-चहाचे कप 

-चहा बनवण्याचे भांडे 

-खुर्च्या आणि टेबल किंवा बेंच

नोंदणी आणि परवाना: 

Tea Business registration and licence in Marathi

प्रत्येक व्यवसायासाठी, त्याची नोंदणी आणि परवाना असणे महत्त्वाचे आहे. लायसन्ससाठीच्या अटी  एकट्याची मालकी, भागीदारी, कंपनी इत्यादी विविध प्रकारच्या व्यवसायासाठी वेगवेगळ्या असतील. 

व्यापार परवाना –

 राज्य सरकारकडून व्यापार परवाना प्राप्त करणे महत्त्वाचे आहे.

एफएसएसएआय परवाना –

 एफएसएसएआय किंवा फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया लायसन्स देखील असणे महत्त्वाचे आहे. 

 कोणत्याही व्यवसायाची नोंदणी करणे उद्योजकासाठी तसेच सुरक्षा, फायदे इत्यादी अनेक कारणांसाठी अधिक चांगले असते. 

जीएसटी नोंदणी – 

GST registration

व्यवसायाची नोंदणी करण्याव्यतिरिक्त, व्यवसायासाठी GST नोंदणी करणे देखील अनिवार्य आहे कारण देशातील GST कायद्यानुसार, प्रत्येक नवीन चहा व्यवसायाने GST कायद्यांतर्गत स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.

MSME/SSI – 

MSME हा सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग आहे आणि SSI हा लघु उद्योग आहे. कोणतीही संस्था यापैकी कोणत्याही एका श्रेणीत येत असल्यास नोंदणी करणे सक्तीचे नसले तरी, MSME आणि/किंवा SSI घटकांना अनेक योजना, मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर फायदे दिलेले असल्यामुळे नोंदणीकृत असल्यास ते व्यवसायासाठी फायदेशीर ठरते. 

मार्केटिंग – Tea business Marketing tips 2022

एकदा का कोणताही व्यवसाय सुरू झाला की, मार्केटिंग करणे खूपच महत्त्वाची असते कारण मार्केटिंग व्यवसाय विकसित करण्यात मदत करते. खरं तर, व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मार्केटिंग देखील सुरू केले जाऊ शकते कारण व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मार्केटिंग केल्याने लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची सर्व माहिती पोहोचते आणि त्याचा फायदा व्यवसाय सुरू झाल्यानंतर नक्कीच होतो उदाहरणार्थ, 

चहाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी एक दिवस लोकांसाठी मोफत सॅम्पल चहा चे आयोजन करू शकतो जेणेकरून लोकांना तुम्ही बनवलेल्या चहाची चव माहिती होईल आणि लोक भविष्यात तुमच्याकडे चहा पिण्यासाठी येण्यास सुरुवात करतील.

त्याचबरोबर चहाचा व्यवसाय चांगला चालावा यासाठी तुम्ही पॅम्प्लेट देखील वाटू शकता किंवा बॅनर देखील लावू शकता.

चहाच्या व्यवसायामध्ये चहाच्या चविकडे विशेष ध्यान देणे गरजेचे आहे.

 चहा हे एक नियमित उत्पादन आहे परंतु कोणत्याही व्यवसायात, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि चहाचे दुकान त्यांच्या उत्पादनासाठी ओळखले जाण्यासाठी अशा नियमित बनवल्या जाणार्‍या चहामध्ये सुधारणा करणे महत्वाचे आहे. यामध्ये चहाला अधिक चविष्ट बनवण्यासाठी चहामध्ये तुलसीसारखे कोणतेही अतिरिक्त घटक जोडता येऊ जसे की गवती चहा, वेलदोडा, आले इत्यादी घटक चहा बनवण्यासाठी वापरू शकतो.

Tags: No tags

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *