CARS 24 Success Story :
Why is CARS24 successful ?
How does CARS24 make money ?
Who is behind CARS24 ?
Is CARS24 a listed company ?
Is CARS24 a Indian company ?
Who is owner of CARS24 ?
CARS 24 ची सक्सेस स्टोरी:
बऱ्याच लोकांना वाहन ( Vehicle) खरेदी करण्याची हौस किंवा आवड असते , परंतु सर्वच लोक शो रूम मधून नवीन गाडी खरेदी करतीलच असे नाही.त्या ऐवजी काही लोक सेकंड हॅण्ड वाहन खरेदी करणे पसंत करतात.पूर्वी सेकंड हॅण्ड वाहन खरेदी करायचे म्हंटले तर एजंट मार्फत किंवा जाहिरातींच्या माध्यमातून ,किंवा कुठे हवे असलेले वाहन विकण्यास आहे असे कानावर आले तर त्या ठिकाणी वाहन बघण्यासाठी जाऊन वाहन योग्य वाटले तर खरेदी केले जायचे.परंतु दरवेळी वाहन पसंत पडेलच असे नाही,वाहन बघायला जाण्यासाठी आलेला खर्च, वाहन खरेदी करताना झालेली इतर काही फसवणूक अशा काही समस्यांचा सामना करावा लागत असे.परंतु आता CARS 24 या कंपनीने सेकंड हॅण्ड वाहन खरेदी करणे ही कल्पना अगदी सोपी करून ठेवली आहे.चला तर जाणून घेवूयात CARS 24 बद्दल……
वापरलेल्या वाहनांचा उद्योग हा पूर्णपणे सुरळीतपणे चालत नाही असे CARS24 च्या सस्थापकांच्या लक्षात आले.तसेच वापरलेल्या वाहनांच्या उद्योगामध्ये एक व्यवस्थित आणि सुरळीत अशी प्रक्रिया नाही तसेच या उद्योगामध्ये काही त्रुटी आहेत आणि लोकांना ( विक्री आणि खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ) काही समस्यांचा सामना करावा लागतो.ज्या काही समस्यांचा सामना ग्राहकांना करावा लागत असे त्या समस्या CARS24 च्या सस्थापकांच्या लक्षात येताच त्यांनी अशी काही टेकनोलॉजी शोधण्याचे ठरवले की जेणेकरून वाहन खरेदी किंवा विक्री ही प्रक्रिया सोपी होईल आणि ग्राहकांना देखील समस्यांचा सामना करावा लागणार नाही आणि त्यांना ह्या तंत्रज्ञानाचा फायदा होईल.तेव्हा 2015 मध्ये CARS24 चा जन्म झाला…
CARS24 या कंपनीने ऑटोमोटिव्ह क्षेत्रात खूप नाव कमावले आहे.CARS 24 हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म असून ह्याच्या माध्यमातून लोकांना सेकंड हॅण्ड वाहन खरेदी किंवा विक्री करण्यास सोपे झाले आहे.CARS 24 ची स्थापना 2015 मध्ये विक्रम चोप्रा, मेहुल अग्रवाल, गजेंद्र जांगीड आणि रुचित अग्रवाल यांनी केली आहे.ही कंपनी अशी देखील दक्षता घेते की व्यवहार प्रक्रियेत काही चूक होता कामा नये.
CARS 24 ही ISO 9001:2015 प्रमाणपत्र प्राप्त केलेली कंपनी आहे. CARS 24 या कंपनीने एका कार्यालयातून सुरुवात केली होती आणि आता तर तिचा विस्तार खूप मोठा झाला आहे. भारतातील जवळपास 50 हून अधिक शाखांमध्ये ह्या कंपनीचा विस्तार झाला आहे.बेंगळुरू,फरीदाबाद, गुडगाव,भोपाळ,कोलकाता,हैदराबाद, जयपूर,कोल्हापूर,मुंबई, पुणे,विजयवाडा या आणि अशा बऱ्याच ठिकाणी कंपनीचा विस्तार झाला आहे. 700 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.
CARS24 ही कंपनी भारतातील 15 पेक्षा अधिक शहरांमधून कार खरेदी करते आणि नंतर त्यांना एक्झिस्टिंग C2C किंवा B2C मॉडेलपेक्षा वेगळे करून, त्यांच्या युनिक C2B मॉडेलसह विकते.लोकांकडून जास्त मागणी असल्याने परंतु पुरवठा कमी असल्यामुळे, हा व्यवसाय प्रत्येक वर्षी 1,00,000 पेक्षा जास्त ट्रानझॅक्शन करतो.
कार मालकांसमोर जी काही आव्हाने येतात त्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता किंवा उद्दिष्ट CARS24 ठेवते.तसेच CARS24 कुठल्याही ग्राहकांना कोणत्याच समस्येचा सामना करावा लागू नये याची देखील काळजी घेते. CARS24 या कंपनीचा विस्तार भारतामध्ये तर झाला आहेच, आणि आता ही कंपनी तिचा विस्तार भारताबाहेर जागतिक स्तरावर करण्याची योजना आखत आहे. तसेच बाईक्समध्ये देखील विविधता आणण्याची योजना आखत आहे.CARS24 कंपनी नोव्हेंबर 2020 मध्ये DST ग्लोबल द्वारे $200 दशलक्ष निधीसह $1 अब्ज युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाली आहे.
आता CARS24 च्या सहाय्याने लोकांना वाहन खरेदी किंवा विक्री करण्यास सोपे झाले आहे.
Add a Comment