शरीरामधील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय / home remedies to increase calcium in our body –
कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असा घटक आहे. जर शरीरामधील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाले तर विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते जसे की सांधेदुखी , हाडांचे आजार , कंबर दुखी , मणक्यांचे आजार , दातांचे आजार. यांसारखे विविध आजार होऊ शकतात. परंतु जर आपण आपल्या शरीरामधील कॅल्शियमचे प्रमाण योग्य ते राखले तर या आजारांपासून आपण दूरच राहू.
१ . अर्जुन साल की शरीरामधील कॅल्शियम वाढवण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. अर्जुन सालीचे चूर्ण एक कप पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये उकळवून घ्या आणि तयार झालेला काढा सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी असे दोन वेळा तुम्ही घेऊ शकता. या उपायामुळे शरीरामधील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यामध्ये मदत होईल, त्याचबरोबर कंबर दुखी आणि मणक्याचे आजार बरे होण्यामध्ये देखील हा अर्जुन काढा खूपच उपयुक्त आहे.
२ . दररोज एक मूठभर ड्रायफ्रूट्स जसे की काजू , बदाम , मनुके, अंजीर , अक्रोड आणि पिस्ता यांचे सेवन करावे. दररोज ड्रायफ्रूट्स खाल्ल्यामुळे शरीरामधील कॅल्शियमचे प्रमाण तर योग्य राहतेच , त्याचबरोबर ड्रायफ्रूट्सचे इतर फायदे देखील आपल्या शरीराला मिळतात.
३ . दररोज एक ग्लास भर देशी गाईचे दूध पिले पाहिजे. यामुळे देखील शरीरामधील कॅल्शियमचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते. तसेच गायीच्या दुधापासून तयार झालेले पदार्थ जसे की पनीर , तूप , दही यांचे देखील सेवन केले पाहिजे.
४ . आपल्या आहारामध्ये फळे आणि पालेभाज्यांचा जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे. संत्री , लिंबू , सीताफळ , अननस आंबा यांसारखी फळे आपण खाऊ शकतो. त्याचबरोबर मेथी , पालक , पुदिना , कोथिंबीर आणि विविध प्रकारच्या शेंगा यांचा समावेश देखील आपल्या आहारामध्ये केला पाहिजे. या उपायामुळे आपल्या शरीरामधील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यास मदत तर होईलच त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी आवश्यक ते इतर जीवनसत्वे देखील मिळतील.
५ . आपल्या आहारामध्ये आपण बाजरीची किंवा नाचणीची भाकरी खाऊ शकतो. बाजरी आणि नाचणी मधून आपल्या शरीराला आवश्यक ते कॅल्शियम मिळते.
६ . आपल्या आहारामध्ये कडधान्यांचा तसेच डाळींचा देखील समावेश केला पाहिजे. त्याचबरोबर राजमा , मूग , ओवा , तुळस ,काळीमिरी , जवस यांचा समावेश देखील केला पाहिजे.
७ . तिळाचा समावेश आपल्या दैनंदिन आहारामध्ये केला पाहिजे. तीळ आणि गूळ हे दोन्ही देखील शरीरामधील कॅल्शियम वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तीळ आणि गुळापासून बनवलेली चिक्की आणि लाडू तुम्ही खाऊ शकता. या उपायाने देखील शरीरामध्ये कॅल्शियम वाढवण्यासाठी खूपच मदत होईल.
८ . आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे कॅल्शियमचे एबसॉर्पशन विटामिन डी करत असते. जर आपल्या शरीरामध्ये ” विटामिन – डी ” कमी झाले तर परिणामी कॅल्शियमचे प्रमाण देखील कमी होईल. म्हणूनच आपल्या शरीरामध्ये विटामिन डी योग्य प्रमाणात असणे देखील गरजेचे आहे .त्यासाठी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये काही वेळ बसणे गरजेचे आहे. आणि विटामिन डी युक्त आहार घेणे देखील गरजेचे आहे.
९ . आवळा हा अत्यंत औषधी आहे. जर दररोज आवळ्याचे सेवन केले तर कॅल्शियम वाढवण्यामध्ये तर मदत होईलच त्याचबरोबर रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यामध्ये देखील मदत होईल. आवळ्याचा रस तुम्ही पिऊ शकता किंवा आवळ्याची कँडी तयार करून ती देखील तुम्ही खाऊ शकता.
१० . एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जिरे टाकून उकळवून घ्या. नंतर कोमट झाल्यानंतर हे पाणी पिऊन घ्या. हा उपाय दिवसातून दोनदा करावा यामुळे शरीरामधील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यामध्ये मदत होईल.
११ . एक ग्लास पाण्यामध्ये आलं किसून टाकून व्यवस्थित रित्या उकळवून घ्या. कोमट झाल्यानंतर हे पाणी पिऊन घ्या या उपायामुळे देखील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यामध्ये मदत होईल.
Author – Poonam Ghorpade Gore