सांधेदुखीवर घरगुती उपाय –
Home remedies for joint pain –
बऱ्याचशा लोकांना सांधेदुखीचा त्रास होत असतो. हिवाळ्यामध्ये संधीवाताचा त्रास जास्त प्रमाणामध्ये जाणवतो.आज आपण सांधेदुखीवर कोणकोणते घरगुती उपाय करता येतील हे बघणार आहोत.
१ . सांधेदुखीवर काळे तीळ खूपच उपयुक्त आहेत. रात्री पाऊण कप पाण्यामध्ये थोडेसे तीळ भिजत घालावे आणि सकाळी हे तीळ खावे. काळे तीळ खाल्ल्यामुळे सांधेदुखी कमी होण्यामध्ये खूपच मदत होते.
२ . सांधेदुखीवर आवळा देखील उपयुक्त आहे. आपल्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करावा. तसेच आवळ्याचा रस आणि आल्याचा रस गुळासोबत मिक्स करून खावा. हा उपाय रोज सकाळी आणि संध्याकाळी करावा. यामुळे देखील सांधेदुखी कमी होण्यामध्ये मदत होते.
३ . रोज एक मेथीचा लाडू खाल्ल्यामुळे देखील सांधेदुखीचा त्रास कमी होण्यामध्ये खूप मदत होते.
४ . सांधेदुखीवर लसूण देखील खूपच गुणकारी आहे. तीन ते चार लसणाच्या पाकळ्या गावरान तुपामध्ये तळून घ्या आणि जेवण करण्या अगोदर या तळलेल्या लसणाच्या पाकळ्या खाऊन घ्या. त्याचबरोबर लसूण ठेचून घेऊन त्याचा रस काढून किंवा ठेचलेला लसूण तसाच ज्या ठिकाणी सांधेदुखी होत आहे अशा ठिकाणी लावा , असे केल्यामुळे लसणाचा रस आतपर्यंत शिरेल. या दोन्ही उपायामुळे सांधेदुखी कमी होण्यामध्ये खूप मदत होते.
५ . बटाट्याच्या साली पाण्यामध्ये व्यवस्थित रित्या उकळवून घ्या आणि नंतर गाळून घ्या. हे पाणी घेतल्याने देखील सांधेदुखी पासून आराम मिळतो.
६ . बटाटा सालीसकट किसून घ्या किंवा मिक्सर मधून बारीक करून घ्या आणि नंतर त्याचा रस काढून ह्या रसामध्ये जेवढा रस आहे तेवढेच पाणी घाला आणि थोडीशी हळद टाका. हा रस घेतल्याने देखील सांधेदुखी कमी होते. सलग सात दिवस हा उपाय केल्याने अधिक फायदा मिळतो. हा उपाय सकाळी करायचा आहे.
७ . तसेच जेवणापूर्वी एक चमचा बटाट्याचा रस घेतल्यामुळे देखील सांधेदुखी कमी होण्यामध्ये खूपच मदत होते.
८ . रोजचे पोळीचे पीठ मळताना त्यामध्ये तुपाचे मोहन घालावे.
९ . आल्याचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनातील आहारामध्ये करावा. आलं किसून पाण्यामध्ये उकळवून घ्यावं आणि त्यानंतर पाणी थोडसं कोमट झाल्यानंतर हे पाणी प्यावं. आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. या उपायामुळे देखील सांधेदुखीचा त्रास कमी होण्यामध्ये खूपच मदत होते.
१० . शरीराची तिळाच्या तेलाच्या सहाय्याने व्यवस्थित रित्या मालिश करावी आणि त्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करावी यामुळे शरीराला व्यवस्थित रित्या शेक मिळेल.
११ . आपण आपल्या आहारामध्ये आलं, लसूण, पेरू ,पपई, गाजर ,दुधी भोपळा ,मटकी ,तूप यांचा समावेश केला पाहिजे.
१२ . रोजच्या आहारामध्ये फळे , भाज्या यांचा समावेश केला पाहिजे.
१३ . रोज सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी पिले पाहिजे , या उपायाने देखील संधिवातापासून आराम मिळतो.
१४ . तिळाचे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी हिंग सुंठ पावडर आणि ओवा हे घालावे आणि या तेलाने सांध्यांना मसाज करावा. मसाज केल्यानंतर त्यावर शेक द्यावा. या उपायामुळे देखील सांधेदुखी पासून आराम मिळतो.
१५ . तिळाच्या लाडूचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा.
१६ . रोज मेडिटेशन , योगा किंवा व्यायाम करावा. तसेच लिफ्टचा वापर न करता जिन्यांचा वापर करावा यामुळे आपले गुडघे आखडणार नाहीत. व्यायाम केल्यामुळे स्नायू लवचिक बनतील. तसेच वेळ मिळेल तेव्हा आपल्या शरीराची हालचाल करणे गरजेचे आहे.
१७ . अननसाचा आणि द्राक्षाचा रस देखील संधिवातावर खूपच उपयुक्त आहे.
१८ . आपल्या आहारामध्ये कोबी , संत्री आणि अक्रोड या गोष्टींचा समावेश करावा.
१९ . रात्री एक ग्लासभर दूध उकळवून घ्या.नंतर गॅस बंद करून त्यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या बारीक करून घाला आणि रात्रभर हे दूध तसेच राहू द्या. सकाळी हे दूध घ्यायचे आहे. हा उपाय सलग केल्यामुळे संधिवातापासून सुटका होण्यासाठी नक्कीच मदत मिळेल. ( हा उपाय करताना दुधामध्ये लसून टाकत असताना गॅस बंद करून मगच लसूण टाकायचा आहे असे न केल्यास दूध फुटू शकते)
Author – Poonam Ghorpade Gore