Winter skin care –
हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडू नये म्हणून कशी काळजी घ्यावी ?
Home remedies for winter skin care –
Winter skin care routine home remedies –
हिवाळ्यामध्ये वातावरणातील ओलावा / आद्रता कमी झाल्यामुळे आपली त्वचा कोरडी पडत असते. इतर ऋतूंच्या तुलनेमध्ये हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडते, त्यामुळे त्वचेला क्रॅक्स जातात तसेच रफ पॅचेस तयार होतात. ड्राय त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येक जण सहसा बॉडी लोशन्स, मॉइश्चरायझर्स , मॉइश्चरायझिंग क्रीम अशा निरनिराळ्या ऑप्शनसच्या शोधात असतात , परंतु आपल्या घरामध्ये असे बहुतेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत ज्यांचा उपयोग करून आपण कोरड्या त्वचेच्या प्रॉब्लेम पासून सुटका मिळवू शकतो . चला तर मग बघुयात असे कोण कोणते ऑप्शन्स आहेत ….
१ . दूध #Milk –
दूध हा एक असा पदार्थ आहे की जो प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतो. कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी चेहऱ्यावर थोडा वेळ दूध लावून ठेवा. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन काढा. असे दररोज केले तर चेहऱ्याची त्वचा अगदी मऊ राहील आणि ड्राय देखील पडणार नाही. आणि कुठल्याही प्रकारच्या मॉइश्चरायझर्सची देखील गरज पडणार नाही. दुधाची साय आपण आपल्या ओठांवर देखील लावू शकतो जेणेकरून ओठ उलत नाहीत. कच्च्या दुधाचा उपयोग आपण टोनर म्हणून देखील करू शकतो. दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट असल्यामुळे आपल्या त्वचेवरील काळे डाग काढून टाकण्यात देखील दूध मदत करते त्याचबरोबर त्वचा देखील उजळवते.
२ . खोबरेल तेल #coconut oil –
खोबरेल तेल जर त्वचेला लावले तर त्वचा कोरडी पडणार नाही. खोबरेल तेल रात्री झोपताना आपण आपल्या चेहऱ्याला तसेच हात आणि पायांना देखील लावू शकतो. रात्रीतून हे तेल त्वचेमध्ये व्यवस्थित रित्या मुरेल आणि त्यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही.
३ . गावरान तूप #ghee –
गावरान तूप देखील आपण आपल्या त्वचेवर अप्लाय करू शकतो, असे केल्याने त्वचा कोरडी पडणार नाही. थंडीमध्ये आपले ओठ उलतात , आपल्या ओठांवर आपण गावरान तूप लावू शकतो ज्यामुळे ओठ उलणार नाहीत किंवा कोरडे पडणार नाहीत.
४ . बदाम तेल #almond oil –
बदाम तेल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे कारण बदाम तेल आपल्या त्वचेला योग्य आद्रता प्रदान करते. त्याचबरोबर बदाम तेलामुळे आपली त्वचा अधिक तेजस्वी आणि चमकदार बनते. यासाठी आपल्या चेहऱ्याला बदामाच्या तेलाने आपण मसाज करू शकतो तसेच चांगल्या परिणामांसाठी बदाम तेल रात्रभर चेहऱ्यावर तसेच राहू देऊ शकतो. बदाम तेल आपल्या त्वचेची नैसर्गिक चमक टिकून राहण्यासाठी किंबहुना वाढवण्यासाठी देखील मदत करते.
५ . मध #honey –
मध हा एक असा घटक आहे ज्याचा उपयोग पूर्वीपासूनच लोक करत आहेत. मधाचा उपयोग करून आपण कोरड्या त्वचेच्या समस्या पासून सुटका मिळवू शकतो. मधाचा उपयोग आपण थेट आपल्या त्वचेवर करू शकतो किंवा फेसपॅक बनवताना त्यामध्ये मध टाकून त्यानंतर त्याचा उपयोग आपण आपल्या त्वचेवर करू शकतो. मधामुळे आपली त्वचा मऊ राहते तसेच चमकदार देखील बनते. मध त्वचेसाठी लागणारे योग्य ते मॉइश्चर त्वचेला पुरवतो.
६ . कोरफड #aloevera –
जर आपल्या घरामध्ये कुंडीत कोरफड उपलब्ध असेल तर आपण कोरफडीचा उपयोग डायरेक्ट त्वचेवर करू शकतो किंवा एलोवेरा जेल वापरून देखील आपण आपली त्वचा चांगली ठेवू शकतो . एलोवेरा जेल हे एक उत्तम असे मॉइश्चरायझरच आहे, ज्यामुळे आपली त्वचा कोरडी पडत नाही. कोरफडीचा उपयोग करून आपण आपली त्वचा मुरूम आणि सुरकुत्यांपासून देखील दूर ठेवू शकतो. कोरफडीचा उपयोग करून आपण आपली त्वचा अधिक तेजस्वी आणि डागविरहित बनवू शकतो. एलोवेरा चा उपयोग थेट आपण त्वचेवर करू शकतो किंवा एखाद्या फेस पॅक मध्ये एलोवेरा मिसळवून देखील करू शकतो.
Author – Poonam Ghorpade Gore