सर्वांच्या नजरा चंद्रयान ३ मिशन कडे ….

चंद्रयान ३ मिशन :
Chandrayaan 3 mission :


        १४ जुलै २०२३ ला २ वाजून ३५ मिनिटांनी चंद्रयान ३ लॉन्च केले जाणार आहे. यापूर्वी २२ जुलै २०१९ ला चंद्रयान २ हे लॉन्च केले गेले होते परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला होता आणि हे चंद्रयान २ तब्बल अकरा वर्षानंतर चंद्रयान १ नंतर लॉन्च करण्यात आले होते.चंद्रयान २ हे मिशन अयशस्वी ठरले होता परंतु त्यानंतर इस्रोची टीम पुन्हा नव्या उमेदीने आणि जोमाने चंद्रयान ३ च्या तयारीसाठी लागली आणि आता चंद्रयान ३ हे मिशन अगदी जवळ आले असून १४ जुलै २०२३ ला २ वाजून ३५ मिनिटांनी लॉन्च केले जाणार आहे, त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा तिकडे लागलेल्या आहेत.
         चंद्रयान ३ चे मुख्य लक्ष्य चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे लँडिंग करणे आहे. त्याचबरोबर चंद्रावर रोव्हरच्या फिरण्याच्या क्षमतेचे निरीक्षण आणि प्रात्यक्षिक हे देखील चंद्रयान ३ चे उद्दिष्ट आहे.तसेच चंद्राची रचना अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी व सराव करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर जे नैसर्गिक तसेच रासायनिक घटक उपलब्ध आहेत त्यावर आणि माती, पाणी इत्यादींवर वैज्ञानिक प्रयोग करणारे इनसाईट वैज्ञानिक निरीक्षण करणे हे सुद्धा उद्दिष्ट चंद्रयान ३ चे आहे. तसेच दोन ग्रहांमधील म्हणजेच इंटर प्लॅनेटरी मोहिमांसाठी गरज असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रात्यक्षिक.चंद्रयान-३ या यानामध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉडय़ुल आहे.

पेलोड वजन –
प्रोपल्शन मॉड्यूल: २१४८ किलोग्रॅम
लैंडर मॉड्यूल ( विक्रम ): २६ किलोग्रॅमच्या (प्रज्ञान) रोवर सहित १७५२ किलोग्रॅम
निव्वळ : ३९०० किलोग्रॅम

ऊर्जा –
प्रोपल्शन मॉड्यूल : ७५८ W
लैंडर मॉड्यूल: ७३८ W
रोवर: ५० W


        इस्रोचे प्रमुख एस . सोमनाथ यांच्या मते भारताचे अंतराळ क्षेत्रामधील हे अजून एक मोठे यश असणार आहे.चंद्रयान ३ चे लॉन्च सतीश धवन अंतरिक्ष केंद्र , श्रीहरिकोटा येथून होणार आहे.
चंद्रयान ३ ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडावी यासाठी इस्रोचे अधिकारी हे तिरुपती वेंकटाचलापथी या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले आणि चंद्रयान ३ ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी प्रार्थना देखील केली. यावेळी इस्रोचे वैज्ञानिक चंद्रयानाचे छोटे मॉडेल घेऊन तिरुपती मंदिरामध्ये आले होते.
       जर चंद्रयान ३ ची चंद्रावर यशस्वीरीत्या लँडिंग झाली तर भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन नंतर असा पराक्रम करणारा चौथा देश ठरणार आहे.


पावसाळ्यामध्ये घरामध्ये येणारे डास, माश्या तसेच कीटकांना पळवून लावण्यासाठी उपाय

घरामधील डास तसेच माश्यांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय

Top 10 Natural ways to Keep Insects away – 

      पावसाळा सुरू झाला की वेगवेगळ्या समस्या आपल्याला जाणवू लागतात त्यापैकीच एक समस्या म्हणजे पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे तसेच अस्वच्छतेमुळे आपल्या घराच्या आसपासच्या परिसरामध्ये डास, माश्या तसेच इतर किटके भटकू लागतात आणि त्याचा त्रास आपल्याला होऊ लागतो. या किटकामुळे आपल्या आरोग्याला सुद्धा धोका असतो आणि आपण आजारी पडण्याची शक्यता जाणवते. म्हणून यावर आपण काही घरगुती उपाय बघणार आहोत ते पुढील प्रमाणे :

१ . आपल्या घरापासून डास, माश्या तसेच इतर किटके दूर ठेवण्यासाठी सर्वात पहिला उपाय म्हणजे संध्याकाळच्या वेळी आपल्या घराच्या खिडक्या वगैरे पॅक करून घेणे.

२ . ज्या खोलीमध्ये किंवा ज्या ठिकाणी लाईटची आवश्यकता नसेल अशा ठिकाणी लाईट बंद करून ठेवा असे केल्यामुळे लाईट भोवती फिरणारे किटके फिरत नाहीत.

३ . काळी मिरी कुठून ती पाण्यामध्ये मिक्स करा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून हा स्प्रे घरामध्ये फवारा असे केल्यामुळे घरामधील डास, माश्या तसेच इतर किटके पळून जातील.

४ . त्याचप्रमाणे लिंबू आणि सोड्याचे मिश्रण करून ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरून हा स्प्रे घरामध्ये फवारा असे केल्यामुळे घरामधील डास, माश्या तसेच इतर किटके पळून जातील.

५ . घरामध्ये जास्तीत जास्त स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करा. ज्या ठिकाणी स्वच्छता असते अशा ठिकाणी शक्यतो डास, माश्या तसेच इतर किटके भटकत नाहीत.

६ . लवंग तसेच लिंबूवर्गीय फळे सुद्धा कीटकांसाठी घातक असल्याकारणाने लवंगाची पावडर करून पाण्यामध्ये मिसळा आणि त्यामध्ये लिंबाचा रस घाला. तयार झालेले मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घरामध्ये सगळीकडे फवारा, असे केल्यामुळे डास, माश्या तसेच इतर किटके घरामधून दूर पळून जातील.

७ . पुदिना हा सुद्धा डासांसाठी घातक असल्याकारणाने तुम्ही तुमच्या घराच्या गॅलरीमध्ये पुदिना लावू शकता तसेच ठिकठिकाणी पुदिन्याची पाने ठेवू शकता. तसेच पुदिन्याचे तेल सुद्धा तुम्ही घरामध्ये ठीक ठिकाणी फवारू शकता,असे केल्यामुळे डास, माश्या तसेच इतर किटके घरामधून दूर पळून जातील.

८ . गावाकडे पूर्वी आणि अजून सुद्धा डास आणि इतर किटके पळवून लावण्यासाठी एक पारंपारिक असा उपाय केला जातो तो म्हणजे कडुलिंबाच्या पानांचा धूर करणे. कडुलिंबाच्या पानांच्या धुरामुळे डास, माश्या तसेच इतर कीटकांना त्रास होऊ लागतो आणि ते दूर पळून जातात.

९ . कडुलिंबाच्या पानांचा अजून एक उपाय म्हणजे घरामध्ये बल्ब जवळ कडुलिंबाच्या पानांची फांदी बल्ब चालू करण्यापूर्वी अडकवणे, असे केल्यामुळे सुद्धा लाईट चालू केल्यानंतर येणारी किटके येत नाहीत.

१० .हा उपाय शक्यतो संध्याकाळच्या वेळेस करावा कारण संध्याकाळच्या वेळी घरामध्ये डास,माश्या तसेच इतर कीटकांची प्रमाण जास्त आढळते. चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेऊन थोड्याशा ठेचून घ्या त्यानंतर त्यामध्ये चार ते पाच कापराची पावडर टाका. यामध्ये थोडेसे गावरान तूप घाला आणि नंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार झालेले हे मिश्रण एखाद्या पणती मध्ये किंवा दिव्यामध्ये होता आणि त्यात कापूर प्रज्वलित करा. असे केल्यामुळे या मिश्रणाचा वास तसेच धूर घरामध्ये पसरेल आणि या उपायामुळे डास,माश्या तसेच इतर कीटक दूर पळून जातील.

रिलायन्स जिओचा मोठा धमाका… सर्वात स्वस्त 4G मोबाईल फोन लॉन्च.. फक्त ९९९ रुपयांमध्ये …

रिलायन्स जिओचा मोठा धमाका… सर्वात स्वस्त 4G मोबाईल फोन लॉन्च.. फक्त ९९९ रुपयांमध्ये …

Reliance jio Bharat mobile –

What is Jio Bharat?

What is the price of Jio mobile?

What is the price of Jio mobile 2023?

What are features of Jio Bharat 4G mobile phone?

जियो भारत 4G मोबाईल फोन :

आपल्या सर्वांच्याच दैनंदिन जीवनाचा महत्त्वपूर्ण असा घटक मोबाईल फोन. हल्ली अगदी प्रत्येकाकडेच मोबाईल फोन असतो आणि तो गरजेचा देखील आहे असे देखील आपण म्हणू शकतो. भारतामध्ये बरेचसे लोक अजून सुद्धा 2G वापरताना दिसतात, परंतु जास्तीत जास्त भारतीयांना 4G मोबाईल वापरता यावा यासाठी रिलायन्स जिओने जिओ भारत 4G हा मोबाईल लॉंच केला आहे.” 2G मुक्त भारत करणे ” असे त्यांचे उद्दिष्ट आहे असे म्हटले जात आहे.

चला तर जाणून घेऊयात या जिओ भारत 4G  मोबाईल बद्दल अधिक माहिती ….

जियो भारत 4G मोबाईल फोनची वैशिष्ट्ये | Jio Bharat 4G mobile phone features –

– जियो भारत 4G मोबाईल फोनचे वजन ७१ ग्रॅम असून या मोबाईलला ४.५ सेंटीमीटर ( 1.77165 inches ) इतकी स्क्रीन आहे.

– जियो भारत 4G मोबाईल फोनला ०.३ मेगापिक्सल इतका कॅमेरा आहे.

– जियो भारत 4G मोबाईल फोनला १००० मिली एम्पियर इतकी बॅटरी आहे.

– जियो भारत 4G मोबाईल फोन हा हेडफोन सपोर्टिव्ह आहे.

– जियो भारत 4G मोबाईल फोनला टॉर्चची सुविधा सुद्धा आहे. कीपॅड वरील झिरो प्रेस करून मोबाईलची टॉर्च ऑन ऑफ केली जाऊ शकते.

– तसेच जियो भारत 4G मोबाईलला एचडी व्हॉइस कॉलिंगची सुविधा आहे.

– जियो भारत 4G मोबाईलला १२८ जीबी मेमरी कार्ड टाकू शकतो.

– जियो भारत 4G मोबाईल हा 22 भारतीय भाषांना सपोर्ट करतो.

– जियो भारत 4G मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम रिलायन्स जिओचीच असणार आहे.

– जियो भारत 4G मोबाईल हा इतर ॲप्स सोबतच पुढील ॲप्स उपलब्ध करून देतो.

✓ जिओ सिनेमा – जिओ सिनेमा या ॲपद्वारे ग्राहकांना भरपूर सिनेमे बघता येणार आहेत.

✓ जिओ सावन – विविध गाणे सुद्धा ग्राहकांना ऐकता येणार आहेत 

जिओ पे – जिओ भारत 4G मोबाईल मधील ग्राहकांचे लक्ष वेधून घेणार आणि महत्त्वाचं ॲप जिओ पे असणार आहे कारण याद्वारे ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करता येणे सोपे होणार आहे.

– जियो भारत दोन प्रकारांमध्ये सीरिज उपलब्ध केली जात आहे – Jio Bharat K1 कार्बन आणि Jio Bharat V2

– कार्बनचे व्हेरिएंट ग्रे-रेड कलर उपलब्ध आहे, तर जियो भारत फोन V2 दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे – काळा आणि निळा. 

– प्रत्येक फोन हा चार्जरसह उपलब्ध आहे.

जिओ भारत 4G  मोबाईलचा रिचार्ज प्लॅन कसा असणार आहे ?

 Recharge plan of Jio Bharat 4G mobile –

– १२३ रुपयांमध्ये अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग २८ दिवसांसाठी आणि १४ GB डेटा २८ दिवसांसाठी असणार आहे म्हणजेच रोजचा ५०० Mb डेटा असणार आहे.

– तसेच वार्षिक प्लॅन ३६५ दिवसांऐवजी ३५६ दिवसांचा उपलब्ध असून हा प्लॅन १२३४ रुपयांना उपलब्ध आहे ,यामध्ये ३५६ दिवस अनलिमिटेड कॉलिंग आणि १२८ जीबी इतका डेटा असणार आहे.

पूजा भांडार | पूजा सामग्रीचा व्यवसाय

पूजा भांडार | पूजा सामग्रीचा व्यवसाय

Is Pooja store business profitable?

What is Pooja Samagri?

What is the list of puja material?

         आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विविध सणसमारंभ मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात. प्रत्येक सणा- समारंभासाठी काहीतरी पूजा आपण आपल्या घरी करत असतो. तसेच आपल्या घरामध्ये आपण नित्य पूजा सुद्धा करत असतो. धार्मिक ठिकाणी सुद्धा नित्यनियमाने पूजा पाठ केले जातात. पूजा करण्यासाठी नक्कीच विविध सामग्रीची आवश्यकता लागते. आता तर श्रावण सुरू होत आहे त्यामुळे विविध सण आणि उत्सवाला सुरुवात होईल, अशावेळी तर या सामग्रीची आवश्यकता अधिकच वाढते. आणि म्हणूनच कमी गुंतवणुकीमध्ये जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर पूजा सामग्रीचा व्यवसाय म्हणजेच पूजा भांडार सुरू करू शकतो. याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत …

स्टेप १ : व्यवसाय योजना तयार करा 

Create a business plan –

– व्यवसाय छोटा असो किंवा मोठा व्यवसाय योजना तयार केली पाहिजे जेणेकरून व्यवसायामध्ये भविष्यात येणारे अडथळे बऱ्यापैकी कमी होतात.

– पूजा भांडार सुरू करत असताना व्यवसाय योजनेमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होऊ शकतो :

पूजा भांडार हा व्यवसाय तुम्ही कुठे सुरू करणार आहात ?

पूजा भांडार व्यवसायासाठी लागणारी सामग्री तुम्ही कुठून खरेदी करणार आहात?

पूजा भांडार मध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होऊ शकतो ?

पूजा भांडार व्यवसायाची मार्केटिंग कशी कराल ?

स्टेप २ : पूजा भांडार व्यवसायासाठी योग्य ते ठिकाण निवडा

Choose right location for Pooja Bhanadar Business – 

– कुठल्याही व्यवसायासाठी योग्य ठिकाण निवडणे महत्त्वाचे असते.

– पूजा भांडार हा व्यवसाय तुम्ही ज्या ठिकाणी दाट घरे आहेत अशा ठिकाणी सुरू करू शकता जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त ग्राहक मिळतील.

– तसेच पूजा भांडार हा व्यवसाय तुम्ही धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सुद्धा सुरू करू शकता.

– जर तुम्हाला हा व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करायचा असेल तर अगदी घरामधूनच तुम्ही सुरू करू शकता किंवा छोटासा स्टॉल लावून सुद्धा हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो.

– जर तुम्हाला या व्यवसायासाठी चांगली गुंतवणूक करायची असेल तर एखाद्या योग्य ठिकाणी गाळा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी सुद्धा हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता.

जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर

KuKu FM Discount Code- GVKEO1966

कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत- https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8 )

स्टेप ३ : पूजा भांडार व्यवसायासाठी लागणारी सामग्री तुम्ही कुठून खरेदी करणार आहात?

Where are you going to buy the materials required for the Pooja Bhandar business?

– एखाद्या चांगल्या होलसेलर कडून पूजा भांडार व्यवसायासाठी लागणारी सामग्री तुम्ही खरेदी करू शकता.

– हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या शहरांमध्ये नेमकी कोणत्या ठिकाणी हे सर्व सामान होलसेल दरामध्ये मिळते याची माहिती घ्या ,कारण तुम्हाला जर हे सामान होलसेल दरामध्ये मिळाले तरच तुम्हाला नफा मिळू शकतो आणि हा व्यवसाय परवडू शकतो.

स्टेप ४ : पूजा भांडार मध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होऊ शकतो ?

What items can be included in Pooja Bhandar?

पूजा भांडार मध्ये पुढील वस्तू तुम्ही विक्रीसाठी ठेवू शकता :

– धूप

– पितळी दिवे,समया,घंटी

– तांब्याचे भांडे, तम्हान

– कापूर

– धूप

– अगरबत्ती

– वाती

– रांगोळी

– रांगोळीचे छाप

– अत्तर

– गंगाजल

– भस्म

– धागे

– दिव्याची काच

– इतर पूजेसाठी आवश्यक पितळी ,स्टील किंवा तांब्याची भांडी

– देवपुजेला लागणारे वस्त्र

– पूजा पाठ पुस्तके/ ग्रंथ

– फुले

– इतर पूजेसाठी आवश्यक ती सामग्री तुम्ही ठेवू शकता. वेगवेगळ्या सणासाठी लागणाऱ्या वस्तू सुद्धा तुम्ही त्या त्यावेळी ठेवू शकता.

स्टेप ५ : पूजा भांडार व्यवसायाची मार्केटिंग कशी कराल ?

How to do Marketing of Pooja Bhandar business?

– तुम्ही ज्या ठिकाणी पूजेची सामग्री विकणार आहात ते ठिकाण अतिशय आकर्षक आणि प्रसन्न वाटेल असे बनवा जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहक पूजेचे सामान घेण्यासाठी तुमच्याकडे येतील.

– सुरुवातीला तुमच्या व्यवसायाबद्दलची माहिती असलेले पॅम्पलेट्स टाकून ठिकठिकाणी त्याचे वाटप करू शकता.

– तुम्ही विक्री करत असलेल्या सामग्रीची गुणवत्ता नेहमी चांगली ठेवा जेणेकरून ग्राहक पुन्हा खरेदीसाठी तुमच्याकडे येईल आणि इतर लोकांना सुद्धा तुमच्या पूजा भंडार व्यवसाय बद्दलची माहिती देईल.

– वेगवेगळ्या सणासमारंभाच्या वेळी काही डिस्काउंट किंवा ऑफर सुद्धा ठेवू शकता.

– सोशल मीडियाच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकता.

हे ही वाचू शकता….. ब्युटी पार्लर व्यवसाय

वेबसाईट मार्केटिंग | Website marketing

वेबसाईट मार्केटिंग | website marketing –

How are websites used in digital marketing?

How do I start digital marketing on my website?

Why is website good for marketing?

What is the main advantage of website?

     अगदी कुठल्याही व्यवसायासाठी मार्केटिंग करणे खूपच गरजेचे आहे. सध्या बरेचसे लोक डिजिटल मार्केटिंग वर लक्ष केंद्रित करत आहेत. डिजिटल मार्केटिंग मध्ये वेबसाईट मार्केटिंग हा सुद्धा इतर मार्केटिंग पद्धतीप्रमाणे महत्त्वाचा प्रकार आहे. वेबसाईट हे मार्केटिंग करण्यासाठी उत्तम माध्यम आहे. तुमच्या व्यवसायाची उत्तमरीत्या मार्केटिंग करून उत्पादनांची तसेच सेवेची विक्री करण्यासाठी वेबसाईट हे उत्कृष्ट माध्यम आहे. आजच्या स्पर्धात्मक मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी वेबसाईट असणे गरजेचे आहे. आजच्या आर्टिकल मध्ये आपण वेबसाईट मार्केटिंग बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत …

✔️वेबसाईट मार्केटिंग म्हणजे काय ?

What is website marketing ?

– तुमची जी वेबसाईट आहे तिचा प्रचार इंटरनेटवर करण्याची प्रक्रिया म्हणजेच वेबसाईट मार्केटिंग होय.

– वेबसाईट मार्केटिंगचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे वेबसाईटला अधिक ट्रॅफिक मिळवून देणे आणि व्यवसायामध्ये वाढ करणे आहे.

✔️वेबसाईट मार्केटिंग करण्यासाठी पुढील स्टेप्स महत्त्वाच्या आहेत.

स्टेप १ : वेबसाईट डिझाईन आणि प्रेझेंटेशन 

Website design and presentation –

सर्वात पहिली स्टेप म्हणजे वेबसाईट अशा रीतीने डिझाईन करणे की वेबसाईटचे प्रेझेंटेशन अगदी व्यवस्थित असले पाहिजे आणि त्यामधील कंटेंट सुद्धा व्यवस्थित असला पाहिजे.

वेबसाईट साठी पुढील काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत :

– वेबसाईटचे स्ट्रक्चर अतिशय सुटसुटीत आणि ग्राहकाला समजेल या पद्धतीने असणे आवश्यक आहे.

– ग्राहकाने हव्या त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर कमीत कमी कालावधीमध्ये त्यावर क्लिक होऊन पुढील पेज ओपन झाले पाहिजे.

– तुमच्या कंपनी बद्दल, उत्पादनाबद्दल तसेच सर्विसेस बद्दल योग्य ती माहिती वेबसाईटवर असायला पाहिजे.

– वेबसाईटचा स्पीड जलद असणे आवश्यक आहे तसेच वेबसाईट ही मोबाईल फ्रेंडली सुद्धा असली पाहिजे.

स्टेप २ : सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन

Search Engine Optimization –

– तुमची वेबसाईट टॉपला रँक होण्यासाठी एस इ ओ करणे अत्यंत गरजेचे आहे ; कारण असे केल्यामुळे वेबसाईटची विजीबिलिटी वाढते.

– सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये सुद्धा विविध प्रकारे येतात.

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन बद्दल अधिक माहिती वाचू शकता : सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन )

– तुम्हाला स्वतःला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन बद्दल आवश्यक ज्ञान असल्यास तुम्ही स्वतः करू शकता किंवा एस ई ओ एक्सपर्ट कडून करून घेऊ शकता.

स्टेप ३ : तुमची वेबसाईट सोशल मीडियासाठी ऑप्टिमाइज करणे –

Optimize your website for social media –

– तुमच्या वेबसाईट वरील माहिती किंवा कंटेंट इतर सोशल नेटवर्क वरती शेअर करण्यासाठी शेअरिंग बटन ॲड करणे गरजेचे आहे.

– तुमच्या वेबसाईटवरील मीडिया म्हणजे जसे की फोटोज किंवा व्हिडिओ शेअर करण्यासाठी सुद्धा शेअरिंग बटन ऍड करू शकता.

– सोशल मीडियावर माहिती शेअर करण्यासाठी हे बटन जोडणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून तुमच्या वेबसाईटवरील कंटेंट इतर लोकांना शेअर करण्यासाठी मदत होईल तसेच यामुळे सोशल मीडियावर प्रमोशन सुद्धा करता येऊ शकते.

जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर

KuKu FM Discount Code- GVKEO1966

कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत- https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8 )

स्टेप ४ : कंटेंट रायटिंग 

Content writing –

– तुमची वेबसाईट व्यवस्थित रित्या तयार करून झाल्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कंटेंट रायटिंग.

– तुमच्या वेबसाईटवरील कंटेंट अतिशय उत्कृष्ट आणि योग्य ते असले पाहिजे.जेणेकरुन ग्राहकांपर्यंत तुमच्या व्यवसायाबद्दलची जी माहिती पोहोचवणे गरजेचे आहे ती माहिती पोहोचेल.

– कंटेंट रायटिंग बद्दल तुम्हाला स्वतःला ज्ञान असल्यास तुम्ही स्वतः ही माहिती लिहू शकता किंवा यासाठी एखादा कंटेंट रायटर सुद्धा नेमू शकता.

–  कीवर्ड रिसर्च करून योग्य त्या कीवर्ड्सचा उपयोग कंटेंट लिहीत असताना केला पाहिजे.

– तसेच सर्च इंजिन कोणत्या प्रकारचे कन्टेन्ट टॉपला रँक करते याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे.

स्टेप ५ : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचार करणे

 Promotion on social media platform –

– वेबसाईट कन्टेन्ट सहित व्यवस्थित रित्या तयार झाल्यानंतर वेबसाईटचा प्रचार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना वेबसाईट बद्दल माहिती मिळेल तसेच तुमच्या उत्पादनाबद्दल आणि सर्विसेस बद्दल सुद्धा माहिती मिळेल.

– विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बिझनेस अकाउंट तयार करा आणि वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एकमेकांना कनेक्ट करा.

    अशा रीतीने वेबसाईट मार्केटिंग ही कुठल्याही व्यवसायासाठी खूप महत्त्वाची आहे, ज्यामुळे व्यवसाय वाढीमध्ये खूप मदत होते.

ब्युटी पार्लर हा व्यवसाय कसा सुरु करावा | how to start beauty parlour business

कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय कल्पना : ब्युटी पार्लर –

Low cost business idea : Beauty parlour –

Is beauty parlour business profitable ?

How to start a beauty parlour business?

How to write business plan about beauty parlour?

How do I run a successful salon?

       प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी टॅलेंट दडलेले असते. काही व्यक्ती शैक्षणिकदृष्ट्या हुशार असतात तर काही व्यक्तींकडे इतर काही कौशल्य असतात तर काही व्यक्ती शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा हुशार असतात आणि त्यांच्याकडे इतर देखील बरेचसे कौशल्य असतात. एखाद्या व्यक्तीकडे जे कौशल्य आहे ते फक्त कौशल्या पुरतेच मर्यादित न राहता त्या स्किलचा उपयोग करून आर्थिकदृष्ट्या सुद्धा ती व्यक्ती मजबूत बनू शकते. 

आज-काल अगदी कुठलाही समारंभ असेल किंवा कुठलेही सेलिब्रेशन असेल तरी देखील स्त्रियांना मेकअप करायला आवडते.

मेकअप करणे म्हणजे फक्त चेहऱ्याचा वर्ण गोरा करणे असे नव्हे तर मेकअप केल्यामुळे आपली जी नैसर्गिक सुंदरता आहे ती वाढवू शकतो, तसे तर मनाची सुंदरता ही शारीरिक सौंदर्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे.

ज्या महिलांना सौंदर्याबद्दल अधिक माहिती असेल किंवा त्यांच्याकडे ते कौशल्य असेल किंवा ज्यांनी या क्षेत्रामधील ज्ञान संपादन केलेले असेल अशा महिलांसाठी ब्युटी पार्लर ही एक उत्तम व्यवसाय कल्पना ठरू शकते.

✔️स्टेप १ : व्यवसाय योजना तयार करा

Create a business plan –

– व्यवसाय कोणताही असो आणि कितीही छोटा असो किंवा मोठा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यवसाय योजना नक्कीच तयार केली पाहिजे.

– ब्युटी पार्लर या व्यवसाय योजनेमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होऊ शकतो :

ब्युटी पार्लर हा व्यवसाय तुम्ही कुठे सुरू करणार आहात ?

ब्युटी पार्लर या व्यवसायासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ?

ब्युटी पार्लर या व्यवसायामध्ये तुम्ही कोण कोणत्या सर्विसेस देणार आहात?

तसेच कोणत्या सर्विसेसचे दर काय ठेवणार आहात हे देखील ठरवा.

ब्युटी पार्लर या व्यवसायाची मार्केटिंग कशी करावी?

✔️स्टेप २: ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड करा –

Choose right location to start beauty parlour –

– कोणत्याही व्यवसायासाठी ठिकाणाची योग्य निवड ही व्यवसायासाठी महत्त्वाची असते.

– ब्युटी पार्लर हा व्यवसाय सुरू करत असताना ज्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी जास्त असते असा परिसर निवडा.

– ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी ज्या ठिकाणी लोकवस्ती दाट आहे म्हणजेच जास्तीत जास्त बिल्डिंग किंवा घरे ज्या परिसरामध्ये आहे ते ठिकाण तुम्ही निवडू शकता.

– तसेच ब्युटी पार्लर कॉलेजेस जवळ हॉस्टेल जवळ सुद्धा सुरू केले जाऊ शकते.

– सुरुवातीला तुम्ही जर या व्यवसायामध्ये कमी गुंतवणूक करणार असाल तर अगदी तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथून म्हणजे अगदी घरातून सुद्धा तुम्ही ब्युटी पार्लर सुरू करू शकता.

– कालांतराने जसजसा तुमचा व्यवसाय वाढू लागेल तसे तुम्ही एखाद्या ठिकाणी चांगली जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी ब्युटी पार्लर सुरू करा.

✔️स्टेप ३ : ब्युटी पार्लर या व्यवसायासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ?

What are the things required for a beauty parlor business?

– हेअर वॉश बेसिन 

– हायड्रोलिक चेअर

– ब्युटी सलोन ट्रॉली रोलिंग कार्ट

– स्टायलिस्ट अप्रोन

– हॅन्ड टॉवेल्स

– मिरर

– सिजर

– हेअर रिमूव्हल वॅक्स

– स्टायलिंग क्रीम आणि हेअर जेल

– सर्जिकल ग्लोज

– शॅम्पू आणि कंडिशनर

– हेअर डाईज 

– फेशियल किट

– ट्रीटमेंट किट्स

– फाउंडेशन

– मेकअप पॅलेट्स

– आय लायनर

– लीप ग्लॉस

– लिपस्टीक

– लीप लायनर

– हायलायटर 

– आयशाडो पॅलेट्स

– मॉइश्चरायझर आणि क्लीनझर 

– बॉडी लोशन्स 

– हेअर ड्रायर

– कोंब

– आयब्रो थ्रेड

– मेकप ब्रशेस

– सर्विसेसच्या आवश्यकते नुसार इतर आवश्यक प्रॉडक्टस

जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर

KuKu FM Discount Code- GVKEO1966

कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत- https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8 )

✔️स्टेप ४ : ब्युटी पार्लर या व्यवसायामध्ये तुम्ही कोण कोणत्या सर्विसेस देणार आहात?

What services are you going to provide in this beauty parlor business?

– ब्युटी पार्लर विविध प्रकारच्या सर्विसेस देतात जसे की हेअर स्पा, हेअर स्टाईल, प्रोफेशनल मसाज, मॅनिक्युअर – पेडीक्योर, मेकअप तसेच हेअर कलर आणि इतर खूप काही सर्विसेस.

– तर तुम्ही ब्युटी पार्लर हा व्यवसाय सुरू करत असताना तुम्हाला सुद्धा तुम्ही कोणत्या सर्विसेस ग्राहकांना देणार आहात याची यादी तयार करावी लागेल, त्यानुसार तुम्ही आवश्यक त्या प्रॉडक्टची आणि उपकरणांची खरेदी करू शकता.

✔️स्टेप ५ : ब्युटी पार्लर या व्यवसायाची मार्केटिंग कशी करावी?

How to do Marketing of beauty parlour ?

– सर्वप्रथम तुमचे ब्युटी पार्लर ऑनलाईन डायरेक्टरीजमध्ये रजिस्टर करा, जेणेकरून कोणीही त्या एरियामधील पार्लर बद्दल ऑनलाईन सर्च केले तर तुमचे पार्लर सुद्धा त्या यादीमध्ये दिसेल.

– तुमचे ब्युटी पार्लर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा ऍड करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या पार्लर बद्दलची माहिती पोहोचेल.

– त्यानंतर ब्युटी पार्लर या बिझनेस मध्ये माऊथ पब्लिसिटी सुद्धा तितकीच महत्त्वाची असते, माऊथ पब्लिसिटी ही तुमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांद्वारे होईल त्यामुळे तुम्ही देत असलेल्या सर्विसेसची गुणवत्ता नेहमी चांगली राखण्याचा प्रयत्न करा.

– काही खास प्रसंगी विविध ऑफर्स किंवा डिस्काउंटस् द्या.

– हळूहळू तुमच्या पार्लरची प्रसिद्धी वाढल्यानंतर आणि तुम्हाला देखील त्या क्षेत्रामधील अनुभव आल्यानंतर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेस सुद्धा घेऊ शकता आणि त्याद्वारे सुद्धा इनकम कमावू शकता.

हे ही वाचू शकता…. ब्रेकफास्ट कॉर्नर

हस्तनिर्मित उत्पादनांचा ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय कसा करावा | How to start an online business selling handmade items

Handmade products online business idea –

हस्तनिर्मित उत्पादनांचा ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय कसा करावा ?

#Make money online idea

How to start an online business selling handmade items?

What homemade products can I sell online?

How do I start a handmade product business?

Where is the best place to sell handmade items?

    प्रत्येक व्यक्तीला अगदी लहानपणापासून कुठला ना कुठला छंद जडलेला असतो किंवा काहीतरी कौशल्य त्या व्यक्तीमध्ये नक्कीच असते फक्त गरज असते ती ते कौशल्य शोधण्याची …आणि त्याला जोपासण्याची… ! कुणाला चित्रकला आवडते ,तर कुणाला संगीत आवडते, तर कुणाला नृत्य करायला आवडते ,तर कुणाला विविध क्रिएटिव वस्तू बनवायला आवडतात अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे छंद असतात. कालांतराने बऱ्याच व्यक्तींच्या छंदाचे रूपांतर प्रोफेशनमध्ये किंवा व्यवसायामध्ये होते परंतु काही व्यक्तींना विशेषतः महिलांना कुटुंबाच्या जबाबदारी मुळे किंवा इतर काही कारणास्तव घराबाहेर पडता येत नाही परंतु त्यांच्यामध्ये ते छंद अजून सुद्धा दडलेले असतात आणि म्हणूनच जर तुम्हाला उत्तमरीत्या चित्र काढायला येत असेल किंवा काही क्रिएटिव वस्तू बनवायला येत असतील किंवा उत्तमरीत्या शिवणकाम येत असेल किंवा उत्तमरीत्या विणकाम येत असेल किंवा तुमच्याकडे इतर काही कौशल्य असतील तर त्या कौशल्याच्या सहाय्याने विविध आकर्षक अशी उत्पादने बनवून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सेल करू शकता आणि त्याद्वारे घरबसल्या इनकम मिळवू शकता. आज आपण याबद्दलच अधिक माहिती जाणून घेणार आहोत ….

👉 सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या गोष्टी मध्ये आवड आहे हे शोधा –

– तुम्हाला ज्या गोष्टीचे व्यवस्थित रित्या ज्ञान आहे ते बनवून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने विकू शकता.

– उदाहरणार्थ,जर तुम्हाला उत्कृष्ट अशी चित्रकला येत असेल तर तुम्ही विविध प्रकारचे चित्र काढून ते विकू शकता.

– हस्त निर्मित उत्पादनांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो :

🔸 हस्तनिर्मित ज्वेलरी

🔸 विविध प्रकारच्या साबणी

🔸 पेंटिंग्स

🔸 बॅग्स

🔸 खेळणी

🔸 परफ्युम्स

🔸 होम डेकोर

🔸 शिल्प

🔸 कँडल

🔸 हेअर ॲक्सेसरीज

🔸 स्कार्फ

🔸 हॅट्स

🔸 फर्निचर

🔸 कपडे

🔸 ईको फ्रेंडली उत्पादने

🔸 डिजिटल प्रॉडक्ट्स

🔸 मातीची भांडी

🔸 आणि इतर खूप काही ….

👉 तुम्ही जी उत्पादने बनवून ऑनलाईन पद्धतीने विक्री करणार आहात त्या उत्पादनांचा योग्य तो दर ठरवा. उत्पादनांचा दर ठरवत असताना एखाद्या ग्राहकाने समजा ते उत्पादन खरेदी केल्यानंतर त्या ग्राहकाला घरपोच डिलिव्हरी देण्यापर्यंतचा खर्च तुम्ही त्यामध्ये ग्राह्य धरू शकता किंवा सुरुवातीला फक्त उत्पादनाचा दर त्या ठिकाणी उल्लेख करून तेथेच अधिक  शिपिंग चार्जेस लागतील असे मेन्शन करा.

जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर

KuKu FM Discount Code- GVKEO1966

कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत- https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8 )

👉 उत्पादन बनवून झाल्यानंतर ते उत्पादन वेबसाईटवर अपलोड करत असताना त्या उत्पादनाचा उत्कृष्ट क्वालिटीचा फोटो काढणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वेबसाईटवर उत्पादनाबद्दलचे व्यवस्थितरीत्या डिस्क्रिप्शन देणे सुद्धा गरजेचे आहे ,ज्यामुळे ग्राहकाला उत्पादनाबद्दलची सर्व माहिती व्यवस्थित रित्या मिळेल.

👉 तुम्ही जी हस्त निर्मित उत्पादने बनवलेली आहे ती उत्पादने ऑनलाइन विकण्यासाठी दोन मुख्य पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे : स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट आणि मार्केट प्लेस.

– पुढे काही ऑनलाईन मार्केटप्लेसची यादी दिली आहे त्यावर तुम्ही हस्तनिर्मित केलेली उत्पादने ऑनलाइन पद्धतीने विकू शकता :

🔸Etsy

🔸Arty Owl

🔸iCraft’s 

🔸Craftsville

– दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही स्वतःची वेबसाईट तयार करून त्यावर तुम्ही तयार केलेली उत्पादने विकू शकता.

👉 हस्त निर्मित उत्पादने बनवून झाली …तसेच त्याचे फोटोग्राफ्स आणि इतर माहिती वेबसाईटवर अपलोड सुद्धा करून झाली …आता त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या उत्पादनांचे पॅकेजिंग व्यवस्थित करणे आणि ते उत्पादन ग्राहकांपर्यंत व्यवस्थित रित्या पोहोचवणे.

– उत्पादनांची पॅकेजिंग तुम्ही आकर्षक करा, त्यासोबतच तुम्ही पर्सनलाईज मेसेज सुद्धा देऊ शकता.

– अगदी उन्हाळा असो किंवा पावसाळा असो किंवा हिवाळा असो कुठल्याही ऋतूमध्ये तुम्ही जे उत्पादन पाठवणार आहात ते उत्पादन खराब होता कामा नये यासाठी उत्पादनांची पॅकेजिंग अगदी योग्य पद्धतीने करा जेणेकरून उत्पादन ग्राहकापर्यंत व्यवस्थित पोहोचले पाहिजे.

👉 तुम्ही बनवलेल्या हस्त निर्मित उत्पादनांना जास्तीत जास्त ग्राहक मिळावे यासाठी तुम्ही विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मार्केटिंग सुद्धा करू शकता.

हेही वाचू शकता …. पॉडकास्ट

अग्नि विमा | Fire insurance

अग्नि विमा | Fire insurance –

What is fire insurance?

Why is fire insurance important?

What are benefits of fire insurance ?

For what losses does fire insurance provide coverage?

Which losses are not covered in fire insurance?

     बऱ्याचदा काही नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे आपल्या घराचे किंवा गाडीचे किंवा व्यवसायाचे नुकसान होऊ शकते. आपण जर वाहन विमा काढलेला असेल तर आपल्या वाहनाचे काही नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळू शकते. तसेच जर अपघात झाला तर अपघात विमा काढलेला असेल तर त्यावेळी सुद्धा नुकसान भरपाई मिळू शकते. परंतु जर काही कारणास्तव आपल्या घराला किंवा आपला व्यवसायाचे ठिकाण आहे त्या ठिकाणी जर आग लागली तर अशावेळी नुकसान होऊ शकते आणि म्हणूनच सावधान बाळगले आणि अशी घटना घडण्यापूर्वीच जर आपण अग्नि विमा काढलेला असेल तर नक्कीच आपल्याला नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता असते.# Marathify याच वेबसाईटवर आपण अपघात विमा बद्दल तसेच मोटार इन्शुरन्स किंवा कार इन्शुरन्स बद्दल माहिती जाणून घेतली आहे, ती सुद्धा तुम्ही वाचू शकता. आज आपण अग्नि विमा याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत …

✔️अग्नि विमा म्हणजे काय ?

What is fire insurance ?

– अग्नी विमा म्हणजे विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यामधील करार असून यामध्ये काही ठराविक प्रीमियमच्या बदल्यात विमा कंपनी विमाधारकास विशिष्ट कालावधीसाठी मालमत्तेचे आगीमुळे होणाऱ्या  नुकसानापासून संरक्षण प्रदान करते.

– अग्नि विमा मध्ये विविध योजना उपलब्ध आहेत विमाधारक त्यांच्या गरजेनुसार आवश्यक त्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.

– काही अग्नी विमा योजनेमध्ये आगीमुळे मालमत्तेच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळतेच त्यासोबतच इतर परिणामांसाठी सुद्धा संरक्षण दिले जाते. उदाहरणार्थ,नफ्याचे नुकसान, पगार …

– इमारत, फर्निचर,प्लांट व त्यातील यंत्रसामग्री,इलेक्ट्रिक फिटिंग, कच्चामाल किंवा प्रक्रिया चालू असणारा माल तसेच तयार माल, इमारतीच्या आतील तसेच इमारतीच्या बाहेर असणारी पाईप लाईन या गोष्टींसाठी अग्नी विमा योजनेमध्ये संरक्षण दिले जाते.

✔️अग्नि विम्याचे फायदे कोणते आहेत ?

What are benefits of fire insurance ?

– फॅक्टरी तसेच व्यवसायाच्या ठिकाणी आग लागल्यामुळे फर्निचर फिक्स्चर फिटिंगच्या नुकसानासाठी सुद्धा अग्नि विमा संरक्षण प्रदान करत असते.

– तसेच फॅक्टरीच्या ठिकाणी आग लागल्यामुळे खराब झालेल्या मशीनच्या दुरुस्तीच्या खर्चासाठी सुद्धा अग्नि विमा आर्थिक मदत करते.

– अग्नि विमा पॉलिसी आगीमुळे मालमत्तेच्या होणाऱ्या नुकसानासाठी जसे की इमारतींचे नुकसान, यंत्रसामग्रीचे नुकसान तसेच ऑफिस मधील किंवा वेअर हाऊस इन्वेंटरीचे नुकसान यासाठी आर्थिक संरक्षण प्रदान करते ज्यामुळे विमाधारकास पूर्वस्थितीमध्ये येण्यास खूप मदत होते.

– समजा एखाद्या कंपनीमध्ये आग लागली आणि तेथील एखादा कर्मचारी जखमी झाला तर त्या कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठीचा खर्च सुद्धा अग्नि विमा योजनेमध्ये कव्हर केला जातो.

– तसेच आगीमुळे जर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान झाले तर त्यासाठी सुद्धा संरक्षण दिले जाते.

– एकंदरीतच, आगीमुळे जर घरामधील किंवा ऑफिस मधील आगीमुळे होणाऱ्या नुकसानासाठी अग्नि विमा योजना कव्हर देते.

✔️कोणत्या नुकसानासाठी अग्नी विमा संरक्षण प्रदान करते ?

For what losses does fire insurance provide coverage?

– आगीमुळे मालमत्तेचे झालेले नुकसान

– नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान

– आगीमुळे झालेल्या स्फोटापासून होणारे नुकसान

– वीज पडून इमारतीचे होणारे नुकसान

– विमानाला जर आग लागली तर त्यामुळे होणारे नुकसान 

– विविध प्रकारचे संप तसेच दंगली यामध्ये जर आग लागली तर अशावेळी होणारे नुकसान

– भूस्खलनामुळे मालमत्तेचे होणारे नुकसान

✔️अग्नि विमा कोणत्या नुकसानासाठी किंवा कोणत्या गोष्टींसाठी आर्थिक संरक्षण प्रदान करत नाही ?

Fire insurance does not provide financial protection for which losses or things?

– जर कोणी जाणीवपूर्वक मालमत्तेचे नुकसान केले तर अशावेळी

– युद्धामध्ये होणारे नुकसान

– भूकंपामुळे होणारे नुकसान

– वीज गळतीमुळे तसेच शॉर्टसर्किटमुळे विद्युत उपकरणांचे झालेले नुकसान

अग्नि विमा पॉलिसीमध्ये विविध योजना समाविष्ट आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला ज्या गोष्टींसाठी इन्शुरन्स हवा आहे त्यानुसार योग्य त्या अग्नी विमा कंपनीशी संपर्क साधून त्यानुसार अग्नि विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.

ऑनलाइन इन्कम मिळवण्याचा मार्ग : पॉडकास्ट | Way to earn money online: Podcast

ऑनलाइन इन्कम मिळवण्याचा मार्ग : पॉडकास्ट –

Way to earn money online : Podcast –

What is podcast and how does it work?

What are the 3 types of podcasts?

What are the advantages of podcast?

How to start podcast?

How to earn money with the help of podcast?

Which are podcast platforms?

    सध्या टेक्निकल जगतात विविध नवनवीन हालचाली घडताना दिसत असतात. पूर्वी ऑनलाइन पद्धतीने काही माहिती मिळवायची झाल्यास एखाद्या सर्च इंजिनच्या सहाय्याने लेखी स्वरूपामध्ये किंवा ब्लॉगच्या स्वरूपात माहिती आपल्याला बघायला मिळत असत, अजून सुद्धा मिळते. कालांतराने यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला हवी ती माहिती व्हिडिओच्या स्वरूपात मिळू लागली. आणि आता तर ऑडिओ स्वरूपात पॉडकास्टच्या सहाय्याने  माहिती आपण ऐकू शकतो. पॉडकास्ट हे माध्यम आपल्याला माहिती ऐकण्यासाठी तर उत्तम आहेच त्याचबरोबर पॉडकास्ट च्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने आपण इन्कम सुद्धा कमावू शकतो. चला तर जाणून घेऊयात पॉडकास्ट बद्दल अधिक माहिती….

✔️पॉडकास्ट म्हणजे काय ?

What is mean by podcast ?

– आपल्याला विविध वेबसाईटवर लेखी स्वरूपात किंवा ब्लॉगच्या स्वरूपामध्ये माहिती वाचण्यास मिळते तसेच व्हिडिओ रुपात माहिती बघण्यास आणि ऐकण्यास मिळते त्याप्रमाणेच पॉडकास्टच्या साह्याने आपण माहिती ऐकू शकतो.

– बऱ्याचदा आपल्याला माहिती वाचण्यास किंवा व्हिडिओ बघण्यास वेळ नसतो अशावेळी आपण फक्त आपल्याला आवश्यक ती माहिती पॉडकास्टच्या सहाय्याने ऐकू शकतो.

– एफ एम आणि रेडिओ सारखे पॉडकास्ट हे माहिती ऑडिओ स्वरूपात ऐकण्याचे एक माध्यम आहे.

✔️पॉडकास्टचे फायदे कोणते आहेत ?

 What are benefits of podcast ?

– ज्यावेळी आपल्याला व्हिडिओ बघायला किंवा माहिती वाचायला वेळ नसेल अशावेळी आपल्याला आवश्यक माहिती आपण पॉडकास्टच्या सहाय्याने ऐकू शकतो.

– पॉडकास्ट मुळे वेळेची सुद्धा बचत होते, कारण आपण काही काम करत असताना सुद्धा माहिती ऐकू शकतो.

– पॉडकास्ट तुम्हाला चांगला श्रोता होण्यामध्ये सुद्धा मदत करते.

– पॉडकास्टला कुठलीही भौगोलिक सीमा नसल्याने अगदी जागतिक स्तरावरील श्रोते देखील माहिती ऐकू शकतात.

– पॉडकास्ट ऐकण्यासाठी वेळेचे बंधन नाही, अगदी कधीही आणि कुठेही आपण पॉडकास्ट ऐकू शकतो.

– पॉडकास्टच्या सहाय्याने ऑनलाइन रित्या इन्कम कमावला जाऊ शकतो.

✔️पॉडकास्ट कसे सुरु करावे ?

How to start podcast ?

– पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी तुम्हाला ज्या विषयाबद्दल योग्य ते ज्ञान आहे तो विषय पॉडकास्ट साठी निवडा. उदाहरणार्थ ,पाककला, संगीत, शिक्षण, टेक्निकल माहिती किंवा इतर कोणताही विषय ज्या बद्दल तुम्हाला सखोल ज्ञान आहे.

– पॉडकास्ट सुरू करण्यासाठी आपल्याकडे मोबाईल आणि इंटरनेटची सुविधा असणे आवश्यक आहे.

– श्रोत्यांपर्यंत जी माहिती तुम्हाला पोहोचवायची आहे ती माहिती सर्वप्रथम तुम्ही रेकॉर्ड करा.

– आवाज रेकॉर्ड करत असताना आवाज स्पष्टपणे रेकॉर्ड होण्यासाठी तुम्ही माईकचा उपयोग करू शकता, जेणेकरून आवाजाची गुणवत्ता उत्तम राहील आणि श्रोत्यांपर्यंत आवाज स्पष्टपणे पोहोचू शकेल.

– तुम्ही जी ऑडिओ क्लिप तयार केली आहे त्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक देखील देऊ शकता.

– ऑडिओ क्लिप एडिटिंग साठी तुम्ही विविध सॉफ्टवेअरचा उपयोग करू शकता.

– तयार केलेली ऑडिओ क्लिप योग्य ती एडिटिंग करून तुम्ही नंतर अपलोड करू शकता.

✔️पॉडकास्टचे प्रकार कोणते आहेत ?

What are types of podcast ?

ऑडिओ क्लिप मध्ये किती व्यक्ती समाविष्ट आहेत, यानुसार पॉडकास्टचे पुढील प्रकार पडतात :

१. व्यक्तिगत पॉडकास्ट (Personal Podcast) –

व्यक्तिगत पॉडकास्ट म्हणजे फक्त एकच व्यक्ती स्वतःचे विचार मांडत असते, याचा अर्थ या प्रकारच्या पॉडकास्ट मध्ये एकाच व्यक्तीचा आवाज श्रोत्यांना ऐकण्यास मिळतो.

२. संभाषणपर पॉडकास्ट (Conversation Podcast) –

संभाषणपर पॉडकास्ट या प्रकारामध्ये दोन व्यक्तींमधील संभाषण म्हणजेच दोन व्यक्तींचा आवाज श्रोत्यांना ऐकण्यास मिळतो.

उदाहरणार्थ, क्रिकेट कॉमेंट्री.

३. मुलाखतपर पॉडकास्ट (Interview Podcast) –

इंटरव्यू पॉडकास्ट आणि कॉन्व्हर्सेशन पॉडकास्ट हे पॉडकास्टचे दोन्ही प्रकार जवळजवळ सारखेच आहे परंतु इंटरव्यू पॉडकास्ट मध्ये एखाद्या व्यक्तीची मुलाखत दुसरा व्यक्ती घेत असतो. 

जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर

KuKu FM Discount Code- GVKEO1966

कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत- https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8 )

✔️पॉडकास्ट या माध्यमातून पैसे कसे कमावले जाऊ शकतात ?

How to earn money with the help of podcast?

–  लोकांना ब्लॉग वाचायला किंवा व्हिडिओ बघण्यास वेळेचे बंधन असल्यामुळे पॉडकास्टला हळूहळू अधिक मागणी वाढू शकते.

– जर रोजच्या रोज ऑडिओ अपलोड केले तर चॅनल ग्रो होऊ शकते.

– पॉडकास्ट वर यूट्यूबच्या तुलनेने कॉम्पिटिशन सुद्धा कमी आहे.

– पॉडकास्ट वर जर तुमचे चॅनल ग्रो झाले तर तुम्हाला विविध स्पॉन्सर्स मिळतील आणि त्याद्वारे तुम्ही पैसे कमावू शकता.

– तसेच तुमचे चॅनल मोनेटाइज झाले तर गुगल ॲडसेन्सद्वारे सुद्धा तुम्ही इनकम कमावू शकता.

– तसेच ॲफिलिएट मार्केटिंग करून सुद्धा तुम्ही इनकम कमावू शकता.

✔️पॉडकास्टचे कोणते प्लॅटफॉर्म आहेत ?

Which are podcast platforms ?

– Anchor podcast

– Castbox   

– Google Podcasts

– Amazon Music

– Podcast App

– Spotify

– JioSaavan

हे ही वाचू शकता …ऑनलाइन क्लासेस 

ब्रेकफास्ट कॉर्नर | Breakfast corner

ब्रेकफास्ट कॉर्नर | Breakfast corner –

#Low cost business idea :

Is breakfast corner business profitable ?

How to start breakfast corner business?

What materials are required for the breakfast corner?

How to do Marketing of breakfast corner ?

     बऱ्याचदा नाश्ता बनवत असताना विचार येतो की कोणता नाश्ता बनवावा….? सामान्यतः आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये पोहे किंवा उपमा हा नाष्टा ठरलेला असतो. त्यात एखाद्या दिवशी काही नवीन बनवावेसे वाटले तर इडली किंवा ढोकळा हे पर्याय आपण निवडतो. आपण आपल्या स्वतःच्या घरी राहत असल्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे नाश्ता करू शकतो परंतु जे लोक काही कारणास्तव म्हणजे शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी किंवा इतर काही कारणांमुळे बाहेर राहत असतात ज्यांच्या सोबत त्यांचे कुटुंब राहत नाही आणि त्यांना स्वतःला सुद्धा नाश्ता बनवता येत नाही अशा लोकांसाठी व्यवस्थित नाष्टा मिळणे सुद्धा कधी कधी कठीण होऊन जाते. म्हणूनच आज आपण अशी व्यवसाय कल्पना बघणार आहोत की जी कमी गुंतवणुकीमध्ये करता येऊ शकते आणि ती बिझनेस आयडिया म्हणजे ब्रेकफास्ट कॉर्नर …. चला तर जाणून घेऊयात ब्रेकफास्ट कॉर्नर बद्दल अधिक माहिती.

       आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर नाष्ट्याचे योग्य ते ठिकाण म्हणजे ब्रेकफास्ट कॉर्नर …

✔️स्टेप १ : व्यवसाय योजना तयार करा –

Create a business plan –

– व्यवसाय छोटा असो किंवा मोठा व्यवसाय योजना तयार करणे महत्त्वाचे असते जेणेकरून व्यवसायाचा मार्ग सुलभ होईल.

– ब्रेकफास्ट कॉर्नर या व्यवसायासाठी सुद्धा तुम्ही बिझनेस प्लान तयार करा त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होऊ शकतो :

ब्रेकफास्ट कॉर्नर कुठे सुरू करणार आहात ?

ब्रेकफास्ट कॉर्नर कशा रीतीने सुरू करणार आहात ?

ब्रेकफास्ट कॉर्नर साठी कोणती सामग्री लागणार आहे ?

ब्रेकफास्ट कॉर्नर मध्ये नाश्त्याचे कोणते प्रकार ठेवणार आहात ?

ब्रेकफास्ट कॉर्नरची मार्केटिंग कशी करणार आहात ?

✔️स्टेप २ : ब्रेकफास्ट कॉर्नर साठी योग्य ते ठिकाण निवडा –

Choose right location for breakfast corner –

– कुठल्याही व्यवसायासाठी योग्य ठिकाणाची निवड करणे गरजेचे असते.

– ब्रेकफास्ट कॉर्नर या व्यवसायासाठी तुम्ही गर्दीचे ठिकाण निवडा जेणेकरून ग्राहकांची संख्या त्या ठिकाणी जास्त असेल.

– ब्रेकफास्ट कॉर्नर साठी बस स्थानके, रेल्वे स्टेशन्स, हॉस्पिटल्स, कॉलेजेस, गार्डन्स, खाऊ गल्ली यांसारखे ठिकाणे निवडू शकता.

✔️स्टेप ३ : ब्रेकफास्ट कॉर्नर कशा रीतीने सुरू करणार आहात ?

How are you going to start the breakfast corner?

– ब्रेकफास्ट कॉर्नर हा व्यवसाय जर तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करणार असाल तर छोट्याशा स्टॉलवर सुद्धा सुरू करू शकता.

– जर ब्रेकफास्ट कॉर्नर या व्यवसायासाठी तुम्ही जास्त गुंतवणूक करणार असाल तर एखाद्या ठिकाणी गाळा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी सुद्धा हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता.

जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर

KuKu FM Discount Code- GVKEO1966

कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत- https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8 )

✔️स्टेप ४ : ब्रेकफास्ट कॉर्नर साठी कोणती सामग्री लागणार आहे ?

What materials are required for the breakfast corner?

– ब्रेकफास्ट कॉर्नर साठी पुढील सामानाची आवश्यकता आहे :

• गॅस सिलेंडर

• किराणा

• नाश्ता देण्यासाठी प्लेट्स आणि चमचे

• कढई तसेच इतर आवश्यक भांडी

• वॉटर फिल्टर / वॉटर जार / पाण्याची व्यवस्था 

• ग्राहकांना बसण्यासाठी खुर्च्या आणि टेबल

✔️स्टेप ५ : ब्रेकफास्ट कॉर्नर मध्ये नाश्त्याचे कोणते प्रकार ठेवणार आहात ?

What types of breakfast are you going to keep in the breakfast corner?

– ब्रेकफास्ट कॉर्नर मध्ये नाश्त्याचे कोणते प्रकार ठेवणार आहात हे ठरवा.

– नाश्त्याचे प्रकार ठरवत असताना इतर ठिकाणी कॉमन जे नाश्त्याचे प्रकार मिळतात त्या व्यतिरिक्त काही हेल्दी नाश्त्याचे प्रकार ठेवता येऊ शकतात.

– नाश्त्याच्या प्रकारामध्ये फक्त शाकाहारी नाष्टा ठेवणार की शाकाहार आणि मांसाहारी दोन्ही प्रकार ठेवणार हे देखील ठरवा.

✔️स्टेप ६ : ब्रेकफास्ट कॉर्नरची मार्केटिंग कशी करणार आहात ?

How to do Marketing of breakfast corner –

– सध्या मार्केटिंग सर्वात महत्त्वाचं माध्यम म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियाच्या सहाय्याने ब्रेकफास्ट करण्याची मार्केटिंग तुम्ही करू शकता.

– तसेच ज्या दिवशी ब्रेकफास्ट कॉर्नर सुरू करणार आहात त्या दिवशी काही स्पेशल ऑफर ठेवा जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहक तुमच्या ब्रेकफास्ट कॉर्नर मध्ये येतील आणि त्यांना तुमच्या नाष्ट्याची गुणवत्ता आणि चवी बद्दलची माहिती होईल आणि ते पुन्हा पुन्हा तुमच्या ब्रेकफास्ट कॉर्नर मध्ये येतील. तसेच हे ग्राहक इतर ग्राहकांना देखील तुमच्या ब्रेकफास्ट कॉर्नर बद्दल माहिती देतील.

– मंगल कार्यालय किंवा ज्या ठिकाणी काही समारंभ होतात असे हॉल्स अशा ठिकाणी संपर्क साधून त्यांच्याकडून सुद्धा ऑर्डर मिळवू शकता.

– तसेच तुम्ही स्थानिक फुड ब्लॉगरशी कोलॅब्रेट करून तुमच्या ब्रेकफास्ट कॉर्नरची मार्केटिंग करू शकता.

हे ही वाचू शकता …. पाणी पुरी व्यवसाय