पोटॅटो ट्विस्टर्स बिजनेस –
How much does a potato twister cost in India? What is a potato twister called?
What is the price of potato twister frying machine? How much does a potato machine cost?
Is potato business profitable?
पोटॅटो ट्विस्टर्स बिजनेस | Potato Twister business –
बटाट्यापासून वेफर्स, बटाट्याच्या पापड्या, फिंगर चिप्स, बटाटा चिवडा यांसारखे अनेक खाद्यपदार्थ बनवता येतात, परंतु हल्ली प्रसिद्ध असलेला आणि बटाट्यापासून बनवता येणारा खाद्यपदार्थ म्हणजे पोटॅटो ट्विस्टर्स.पोटॅटो ट्विस्टर्स हा खाद्यपदार्थ अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. अशातच जर तुम्हाला नवीन काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर पोटॅटो ट्विस्टर्स बनवण्याचा व्यवसाय उत्तम व्यवसाय ठरू शकतो. चला तर जाणून घेऊयात या व्यवसायाबद्दल अधिक माहिती …..
✔️पोटॅटो ट्विस्टर्स हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणते मटेरियल आवश्यक आहे ?
What materials are required to start a Potato Twisters business?
– पोटॅटो ट्विस्टर्स हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्य कच्चामाल आहे बटाटा.
– मैदा
– लाल मिरची पावडर
– व्हिनेगर
– कॉर्नफ्लॉवर
– चाट मसाला
– मीठ
– पाणी
– तेल
– पोटॅटो ट्विस्टर्स बनवण्यासाठी आवश्यक मशीन
– बांबू स्टीक्स
– फ्रायर्स
– कढई, झाऱ्या किंवा इतर छोटी मोठी आवश्यक भांडी
– सर्विंग साठी प्लेट्स किंवा इतर आवश्यक सामग्री
( विविध फ्लेवर्सनुसार पोटॅटो ट्विस्टर बनवण्यासाठी लागणाऱ्या इन्ग्रेडियंट्स मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो )
✔️पोटॅटो ट्विस्टर्स व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या मशिन्स लागतात ?
What machines are needed to start a Potato Twisters business?
▶️पोटॅटो ट्विस्टर्स मशीन दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे –
१) मॅन्युअल पोटॅटो ट्विस्टर मशीन manual potato Twister machine – घर बसल्या मशीन चेक करा- क्लिक करा इथे-
२) ऑटोमॅटिक ऑर इलेक्ट्रॉनिक पोटॅटो ट्विस्टर मशीन automatic or electronic potato Twister machine
घर बसल्या मशीन चेक करा- क्लिक करा इथे-
१) मॅन्युअल पोटॅटो ट्विस्टर मशीन –
– मॅन्युअल पोटॅटो ट्विस्टर मशीन हे इलेक्ट्रॉनिक पोटॅटो ट्विस्टर मशीन पेक्षा स्वस्त असते. ज्यांना कमी गुंतवणुकीमध्ये पोटॅटो ट्विस्टर बनवण्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा लोकांसाठी मॅन्युअल पोटॅटो ट्विस्टर मशीन घेणे योग्य राहील.
– तसेच जर हा व्यवसाय छोट्याशा स्टॉलवर सुरू करणार असाल ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीची सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी मॅन्युअल पोटॅटो ट्विस्टर मशीन वापरणे योग्य राहील.
– मॅन्युअल पोटॅटो ट्विस्टर मशीन हे साधारणतः १००० रुपयांपासून उपलब्ध आहे परंतु कॉलिटी नुसार या मशीनची किंमत बदलत जाते.
– मॅन्युअल पोटॅटो ट्विस्टर मशीन हे ऑफलाइन पद्धतीने तुम्ही तुमच्या लोकल मार्केट मधून खरेदी करू शकता किंवा हे मशीन विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे जसे की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ,इंडिया मार्ट .
२) ऑटोमॅटिक ऑर इलेक्ट्रॉनिक पोटॅटो ट्विस्टर मशीन –
– ऑटोमॅटिक पोटॅटो ट्विस्टर मशीन हे मॅन्युअल पोटॅटो ट्विस्टर मशीन पेक्षा महाग असते. ज्यांना या व्यवसायामध्ये जास्त गुंतवणूक करायची आहे त्यांनी ऑटोमॅटिक पोटॅटो ट्विस्टर मशीन घेतलेले योग्य राहील, कारण या मशीन मुळे पोटॅटो ट्विस्टर जास्त प्रमाणामध्ये बनत जातील आणि वेळ देखील कमी लागेल.
– ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीची सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी तुम्ही ऑटोमॅटिक पोटॅटो ट्विस्टर मशीन वापरू शकता. उदाहरणार्थ कॅफे, हॉटेल्स ,फूड कार्ट
– स्टेनलेस स्टील ऑटोमॅटिक पोटॅटो ट्विस्टर मशीन हे इंडिया मार्ट वर 35 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
– तसेच ऑटोमॅटिक पोटॅटो ट्विस्टर मशीन हे तुम्ही तुमच्या लोकल मार्केट मधून सुद्धा विकत घेऊ शकता.
▶️ पोटॅटो ट्विस्टर फ्रायर Potato Twister fryer –
– जर पोटॅटो ट्विस्टर बनवण्याचा व्यवसाय हा कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करायचा असेल तर पोटॅटो ट्विस्टर फ्रायर ऐवजी पोटॅटो ट्विस्टर तळण्यासाठी कढई आणि झाऱ्याचा उपयोग करू शकता.
– जर पोटॅटो ट्विस्टर बनवण्याच्या व्यवसायामध्ये जास्त गुंतवणूक करण्याची तयारी असेल तर पोटॅटो ट्विस्टर फ्रायर विकत घेऊ शकता.
– पोटॅटो ट्विस्टर फ्रायरच्या किमती त्याच्या लिटरच्या कॅपॅसिटीनुसार बदलतात.
उदाहरणार्थ,
– Kobbey इलेक्ट्रिक डीप फ्रायर मशीन जे कॉपर हीटर सोबत आणि टेंपरेचर कंट्रोल सोबत येते त्याची कॅपॅसिटी सहा लिटर असून हे मशीन ॲमेझॉन वर सध्या ३,९४९ रुपयांना उपलब्ध आहे.
– तसेच किरण एंटरप्राइजेस चे डीप फ्रायर मशीन ज्याची कॅपॅसिटी २३ लिटर आहे हे मशीन १२,९९९ रुपयांना ॲमेझॉन वर उपलब्ध आहे.
– MAZORIA डीप फ्रायर मशीन ज्याची कॅपॅसिटी बारा लिटर आहे हे मशीन ११,९९० रुपयांना ॲमेझॉन वर उपलब्ध आहे.
– Potato Twister Fryer, 3 Kv हे मशीन इंडिया मार्ट वर दहा हजार रुपयांना उपलब्ध आहे.
– अशाप्रकारे ट्विस्टर फ्रायर मशीन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तर विकत घेऊ शकतात त्याचबरोबर लोकल मार्केट मधून सुद्धा हे मशीन तुम्ही विकत घेऊ शकता.
जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका –
50% डिस्काउंट वर KuKu FM Discount Code- GVKEO1966 कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत
क्लिक करा इथे- https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8
✔️पोटॅटो ट्विस्टर कसे बनवायचे ?
How to make potato twisters ?
पोटॅटो ट्विस्टर हल्ली विविध फ्लेवर्स मध्ये उपलब्ध आहे जसे की प्लेन / सॉल्टेड पोटॅटो ट्विस्टर, पेरी पेरी पोटॅटो ट्विस्टर, चॉकलेट पोटॅटो ट्विस्टर, चाट पोटॅटो ट्विस्टर, मेयोनीज पोटॅटो ट्विस्टर.
पुढील विविध पदार्थ वापरून वेगवेगळ्या फ्लेवरचे पोटॅटो ट्विस्टर बनवतात येतात.
– स्प्रिंकल : मीठ,चाट मसाला, मॅगी मसाला,पेरी पेरी मसाला असे विविध स्प्रिंकल्स वापरून वेगवेगळ्या चवीचे पोटॅटो ट्विस्टर बनवता येतात.
– मेयोनीज: व्हेज मेयोनीज तसेच तंदुरी मेयोनीज या प्रकारचे विविध मेयोनीजच्या सहाय्याने चविष्ट असे पोटॅटो ट्विस्टर बनवू शकतात.
– विविध सॉसेस : टोमॅटो सॉस, चिली सॉस तसेच शेजवान सॉस यांसारख्या विविध सॉसेसचा उपयोग करून वेगवेगळी चव असणारे पोटॅटो ट्विस्टर सर्व्ह करू शकता.
▶️ पोटॅटो ट्विस्टर बनवण्याची रेसिपी –
– सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुऊन कोरडे करून घ्या .
– त्यानंतर पोटॅटो ट्विस्टर बनवण्याच्या मशीनच्या सहाय्याने बटाट्याचे रूपांतर ट्विस्टर मध्ये करून घ्या म्हणजेच बटाट्याचे स्लाईसेस एका बांबू स्टिक मध्ये आपल्याला उपलब्ध होतील.
– त्यानंतर बटाट्यामध्ये उपलब्ध असलेले स्टार्च काढून टाकण्यासाठी मिठाच्या पाण्यामध्ये हे पोटॅटो ट्विस्टर थोडा वेळ तसेच राहू द्या. असे करायचे नसल्यास बटाटे धुवून झाल्यानंतर बटाट्याची साल काढून बटाटे काही वेळ पाण्यामध्ये बुडवून ठेवू शकता.
🔸पोटॅटो ट्विस्टर बनवण्यासाठी लागणारा मसाला :
– वाटीभर दह्यामध्ये एक चमचा मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घ्या.
– त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट आणि हळद टाकून घ्या.
– त्यानंतर यामध्ये धने पावडर ,जिरे पावडर आणि कसुरी मेथी आणि एक चमचाभर आलं लसूण पेस्ट टाका.
– आता हे मिश्रण व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्या त्यामध्ये कन्सिस्टन्सी अड्जस्ट करण्यासाठी आवश्यकतेनुसार दही ऍड करू शकता.
– या मिश्रणामध्ये एक चमचाभर विनेगर टाका.
– आता यामध्ये पोटॅटो ट्विस्टर बुडवा आणि नंतर तुमच्याकडे पोटॅटो ट्विस्टर फ्रायर उपलब्ध असेल तर त्याच्या सहाय्याने तळून घ्या आणि जर हे उपलब्ध नसेल तर कढईमध्ये मंद आचेवर पोटॅटो ट्विस्टर तळून घ्या.
– यानंतर तुम्हाला ज्या फ्लेवरचे पोटॅटो ट्विस्टर बनवायचे आहे तो मसाला यावर स्प्रिंकल करा. उदाहरणार्थ, तुम्ही यावर चाट मसाला स्प्रिंकल करू शकता.
– तयार झालेले पोटॅटो ट्विस्टर तुम्ही मेयोनीज आणि विविध सॉसेस सोबत सर्व्ह करू शकता.
( पोटॅटो ट्विस्टर वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाऊ शकतात )
✔️ पोटॅटो ट्विस्टर बनवण्याच्या व्यवसायामध्ये किती प्रॉफिट मार्जिन आहे ?
What is the profit margin in a potato twister business?
– साधारणतः एक किलो बटाटे वीस ते तीस रुपये किलो प्रमाणे मिळू शकतात. जर तुम्ही जास्त बटाटे खरेदी केले तर आपण असे मानू की वीस रुपये किलो प्रमाणे बटाटे मिळाले.
– या एक किलो बटाट्यामध्ये मध्यम आकाराचे दहा बटाटे बसतील.
– म्हणजेच एक बटाटा दोन रुपयाला पडला.
– त्यानंतर एक पोटॅटो ट्विस्टर बनवण्यासाठी एक बांबू स्टिक लागेल एका बांबू स्टिक ची किंमत एक रुपये.
– त्यानंतर पोटॅटो ट्विस्टर बनवण्यासाठी लागणारे बॅटर, लेबर आणि इलेक्ट्रिसिटी मिळून तीन रुपये लागतील असे पकडून.
– म्हणजेच एक पोटॅटो ट्विस्टर बनवण्यासाठी साधारणतः सहा रुपये लागू शकतात.
– एक पोटॅटो ट्विस्टर कमीत कमी २० रुपयापासून तुम्ही विकू शकता. पोटॅटो ट्विस्टरच्या फ्लेवरनुसार त्याच्या किमतीमध्ये तुम्ही बदल करू शकता.
– म्हणजेच जर तुम्ही एका दिवसाला २० रुपयांचे शंभर पोटॅटो ट्विस्टर विकले तर दिवसाला २००० रुपये आणि महिन्याला ६०,००० रुपये कमावू शकता. त्यामध्ये बेचाळीस हजार नफा कमावू शकता.
– तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्यानुसार बटाट्याच्या किमतीमध्ये तसेच पोटॅटो ट्विस्टर विकण्याच्या किमतीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो. परंतु तरीदेखील या बिझनेस मध्ये चांगला नफा मिळवला जाऊ शकतो.
हे ही वाचा…
⬇️