बारावीनंतर या क्षेत्रांमध्ये करिअरच्या नवीन संधी –
Which is the best course after 12th?
What is the best opportunity after 12th?
How many opportunities are there after 12th?
What is the scope after 12th?
How can I get a fast job after 12th?
New career opportunities in these fields after 12th –
अगदी लहानपणापासूनच शिक्षण घेत असताना आपल्या सर्वांना माहीत असते की दहावी आणि बारावी हे आपल्या आयुष्यामधील महत्त्वाचे टप्पे आहेत. बारावीनंतर आपण कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो हे ठरते. करिअरच्या दृष्टीने काही स्वप्न आपण लहानपणापासूनच बघितलेले असते आणि त्या दृष्टीने शिक्षणामधील वाटचाल आपण सुरू ठेवतो. बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बारावीनंतर कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करता येईल असा प्रश्न निर्माण होतो तर अशावेळी फक्त वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी यांसारखे करिअर ऑप्शन्स विद्यार्थ्यांना त्यांच्या डोळ्यासमोर दिसतात. हे क्षेत्र तर करिअरच्या दृष्टीने उत्तम आहेतच परंतु त्याचबरोबर बारावीनंतर करिअर घडवण्याच्या दृष्टीने खूप साऱ्या नवनवीन संधी सध्या उपलब्ध आहेत. तर बारावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो, त्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय आपण पुढे बघणार आहोत.
बारावीनंतर करियर घडवता येईल अशा काही नवीन संधी –
Some new career opportunities after 12th –
१. डिजिटल मार्केटिंग ( Digital marketing )
२. रिस्क मॅनेजर ( Risk manager )
३. रेडिओ जॉकी ( Radio jockey )
४. लँग्वेज कोर्सेस ( Language courses )
५. मास्टर ऑफ सोशल वर्क ( MSW – master of social work )
६. पॉलिटिकल ॲनालीसिस ( Political analysis )
बारावीनंतर काही क्रिएटिव्ह क्षेत्रांमध्ये करिअर घडवण्यासाठी कोर्सेस –
Courses to build a career in some creative fields after 12th –
ज्या विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच क्रिएटिव्हिटीची आवड असते त्यांच्या दृष्टीने पुढील कोर्सेस बारावीनंतर नक्कीच महत्त्वपूर्ण आणि क्रिएटिव्ह कोर्सेस ठरणार आहेत. सध्या पुढे दिलेल्या क्रिएटिव्ह कोर्सेस मध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह
क्षेत्रामध्ये नाव कमवायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पुढील कोर्सेस नक्कीच उपयुक्त आहेत. पुढे दिलेले बरेचसे कोर्सेस ऑफलाइन पद्धती सोबतच ऑनलाईन पद्धतीने देखील करता येऊ शकतात. तसेच पुढे दिलेले बरेचसे कोर्स केल्यानंतर कंपनीमध्ये तर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेतच त्याचबरोबर हे कोर्स केल्यामुळे स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करता येऊ शकतो. पुढे दिलेले कोर्सेस केल्यानंतर अगदी घरून सुद्धा काम करू शकतो आणि त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे वेळेचे बंधन येणार नाही. तर जाणून घेऊयात असे कोणकोणते कोर्स आहेत ….
१ . डिझाईनिंग कोर्सेस ( Designing Courses )
२ . आर्किटेक्चर ( Architecture )
३ . वेब डेव्हलपर ( Web Developer )
४ . इव्हेंट मॅनेजमेंट ( Event Management )
५ . जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन ( Journalism and Mass Communication )
६ . फिल्म मेकिंग ( Film Making )
७ . फोटोग्राफी कोर्सेस ( Photography Courses )
८ . ॲनिमेशन कोर्सेस ( Animation Courses )
९ . रायटिंग ( Writing )
१० . थेटर ( Theatre )
११ . ॲडव्हर्टायझिंग ( Advertising )
१२ . मेकअप आर्टिस्ट ( Makeup Artists )
१३ . आर्ट्स अँड क्राफ्ट्स ( Arts & Crafts )
१४ . म्युझिक ( Music )
Writer – Poonam Ghorpade Gore