आरोग्य विमा –
What do you mean by health insurance ?
Which is the best health insurance in India ?
Which company is best in health insurance ?
What are benefits of health insurance ?
How to choose good health insurance ?
Health Insurance –
” आरोग्यम् धनसंपदा ” असे आपण अगदी पूर्वीपासूनच ऐकत आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने आपले चांगले आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे. त्यामुळे दररोज आपल्या आरोग्याची काळजी प्रत्येकाने घेतलीच पाहिजे. परंतु बऱ्याचदा आपल्या शरीराला काही व्याधी किंवा आजार होतात, काही आजार अगदी कमी खर्चामध्ये बरे होऊ शकतात. परंतु काही आजारांवर औषधोपचार करण्यासाठी किंवा ते आजार पूर्णपणे नाहीसे करण्यासाठी जास्त खर्च येऊ शकतो आणि अशावेळी जर आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर मात्र पैसे कुठून उभे करावे हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो ? बऱ्याचदा मित्र – मैत्रिणी किंवा नातेवाईकांकडून सुद्धा मदत मिळत नाही आणि आपल्यापुढे पैशांचा गंभीर प्रश्न तयार होतो. पण जर आपण आरोग्य विमा काढलेला असेल तर मात्र आजार बरा होण्यासाठी कमी खर्च येऊ शकतो.
आरोग्य विमा हा फक्त स्वतःसाठीच नव्हे तर पूर्ण कुटुंबाचे देखील संरक्षण करतो. असे कधी होऊ नये परंतु यदाकदाचित कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला किंवा एखाद्या व्यक्तीला काही आजार उद्भवला तर नक्कीच या आरोग्य विम्याची खूप मदत होते.
आरोग्य विम्याचे फायदे ( Benefits of Health Insurance ) –
– ज्या व्यक्तीचा आरोग्य विमा काढलेला असतो जर समजा त्या व्यक्तीचा अपघात झाला तर जो काही वैद्यकीय खर्च येतो तो खर्च विमा कंपनी उचलते.
– दवाखान्यामध्ये ऍडमिट झाल्यापासून जवळपास 60 दिवसांपर्यंत खर्च देखील विमा कंपनी देते.
– आयसीयू मधील खर्च देखील विमा कंपनी देते.
– काही विमा पॉलिसी अंतर्गत वार्षिक आरोग्य तपासणी देखील करता येते.
– जे पेशंट आहे त्यांना जर समजा घरी उपचार करायचा असेल आणि त्याचा खर्च देखील विमा कंपनीने उचलावा असे वाटत असेल तर मात्र काही अटींची पूर्तता करावी लागते.
– काही विमा कंपन्या अशा आहेत की ज्या मधील आरोग्य पॉलिसी अंतर्गत दरवर्षी क्लेम बोनस प्राप्त केला जाऊ शकतो, ज्यामुळे विमा रकमेमध्ये देखील वाढ होऊ शकते.
चांगला आरोग्य विमा कसा निवडावा ?
How to choose good health insurance ?
– आरोग्य विमा पॉलिसी देणारी कंपनी निवडताना त्या कंपनीकडे तुम्हाला किती प्रीमियम भरावा लागेल याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. ऑनलाइन उपलब्ध असलेल्या प्रीमियम कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुमच्या कुटुंबामधील व्यक्तींची संख्या,तसेच तुमचे वय आणि मेडिकल इतिहास यावरून प्रीमियम कॅल्क्युलेटर प्रीमियम रकमेचा अंदाज देऊ शकते. तसेच आरोग्य विमा पॉलिसी देणाऱ्या कंपनीकडून प्रीमियम रक्कम कधीकधी भरावी लागते याची देखील माहिती मिळवा.
– काही आरोग्य विमा पॉलिसी मध्ये मोठ-मोठे आजार जसे की कॅन्सर यांसारखे काही आजार कव्हर केलेले नसतात किंवा काही बंधने असतात तर या गोष्टींची सुद्धा माहिती घेतली पाहिजे आणि किती प्रीमियम रकमेमध्ये कोणकोणते आजार कव्हर होतात हे देखील जाणून घेतले पाहिजे. त्यामुळे आरोग्य विमा निवडताना असा निवडला पाहिजे की ज्या द्वारे जास्तीत जास्त आजार कव्हर होईल किंवा जास्त कव्हरेज मिळेल, जेणेकरून काही गंभीर आजार झाल्यास जास्त आर्थिक भार तुमच्यावर येणार नाही.
– काही आरोग्य विमा पॉलिसी मध्ये काही आजार किंवा विकार कव्हर केलेले नसतात, त्यामुळे कुठलीही आरोग्य विमा पॉलिसी कोणकोणते आजार कव्हर करते याची माहिती देखील घेतली पाहिजे.
– प्रत्येक आरोग्य विमा पॉलिसीमध्ये प्रतीक्षा कालावधी असतो. जर तुम्हाला एखादी व्याधी आधीपासूनच असेल आणि जर तुम्ही आत्ता आरोग्य विमा घेत असाल तर अशा व्याधींकरता अंदाजे ४८ महिन्यांपर्यंतचा प्रतीक्षा कालावधी असू शकतो.
– अशा प्रकारचा विमा तुम्ही निवडला पाहिजे की ज्यामध्ये दवाखान्यामध्ये जर समजा ऍडमिट होण्याची वेळ आली तर कॅशलेस भरती करून घेतली पाहिजे.
– आरोग्य विमा निवडत असताना त्या कंपनीची प्रीमियम रक्कम किंवा रिन्यूअल करत असताना पेमेंट करताना जलद आणि सोप्या पद्धतीने करता आले पाहिजे.
– आरोग्य विमा निवडत असताना पत्नी, आई वडील, संतती यांच्यासाठी विमा हप्ता भरत असताना काही कर सूट मिळू शकते त्याबद्दल देखील माहिती मिळवली पाहिजे.
– आरोग्य विमा योजना निवडत असताना कोणती विमा कंपनी अतिरिक्त लाभ म्हणजे जसे की जर काही आजार उद्भवले नाही तर वार्षिक नो क्लेम बोनस तसेच कॅशलेस भरती आणि वार्षिक हेल्थ चेकअप देते आणि जास्त कव्हर देखील देते याबद्दल माहिती घेऊन नंतरच त्या कंपनीचा आरोग्य विमा काढावा.
काही टर्म इन्शुरन्स कंपन्या पुढील प्रमाणे आहेत –
– लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन इंडिया (LIC)
– स्टार हेल्थ
– HDFC जीवन विमा
– टाटा एआयए लाइफ
– एसबीआय लाइफ इन्शुरन्स
– कोटक लाइफ इन्शुरन्स
– बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स
– मॅक्स लाइफ इन्शुरन्स
– ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स
– आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स
– भारती एक्सा लाइफ इन्शुरन्स
Writer – Poonam Ghorpade Gore