घरातूनच राज्य कला प्रदर्शनसाठी तुमची कलाकृती जमा करा Rs.50,000 पर्यंत पारितोषिक

 

61 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन व्यावसायिक कलाकार विभाग मुंबई आयोजित करण् येणार आहे या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी artwork असतील तर सर्व विभागांत महाराष्ट्रातला रहिवासी असलेल्या कलावंतांच्या कलांना सादर करता येईल, त्याचप्रकारे त्यातून वेगळ्या कलाकारांना क्रमवारीनुसार सुद्धा बक्षीस देण्यात येतील

 या प्रदर्शनामध्ये पारितोषिक आस पात्र ठरलेल्या सर्व कलाकृतींना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे १५ पारितोषिके देण्यात येणार आहे तर तुम्हालाही असं वाटत असेल तुमची Art Work किंवा Your Best Art प्रदर्शनामध्ये आपण जमा करावी किंवा ति स्पर्धेमध्ये उतरण्यास पात्र असेल तर तुम्ही नक्की या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता या प्रदर्शनामध्ये तुम्ही तुमची कला दाखवू शकता सदर प्रदर्शनासाठी इच्छुक कलावंतांनी अर्ज करण्यासाठी 5-15 जानेवारी मध्ये रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे


How to participate in Kalapradarshan Online

सहभागी होण्याची प्रोसेस अशी आहे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमची माहिती सर्वप्रथम भरायची आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या ART चे डिटेल्स च्या मध्ये भरून तुमची Art च्या चांगल्या क्वालिटीचे फोटो अपलोड करु शकता सर्व कलाकृतीही ऑनलाइन सादर केल्या जाणार असून त्यामुळे तुम्हाला तुमच्या कलाकृती सोबत मुंबईपर्यंत जाण्याची गरज नाही, तुम्ही अगदी घरातून सुद्धा चांगल्या क्वालिटी चे फोटो अपलोड करून तुम्ही या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊ शकता डिटेल माहिती तुम्ही त्यांच्या वेबसाइटवर जाऊन अजून वाचून सुद्धा घेऊ शकतात

थोडक्यात काय

या प्रदर्शनात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी रु.५०,०००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) याप्रमाणे एकूण १५ पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक कलावंतांनी अर्ज करण्यासाठी दि. ५ ते १५ जानेवारी, २०२२ या कालावधीत कला संचालनालयाच्या http://doaonline.in/doakalapradarshan/public/home या लिंकवर ऑनलाईन स्वरुपात कलाकृती सादर कराव्यात, असे आवाहन  कला संचालनालयाचे,  प्र. कला संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.