नाशिकमधील व्यक्तीचं अजय देवगणसाठी ” भीख माँगो आंंदोलन “…
बरेचसे लोक हे बॉलीवूड मधील किंवा इतर सेलिब्रिटींचे फॅन्स असतात आणि काही फॅन तर इतके मोठे असतात की ते त्या सेलिब्रिटींच्या नावाचे किंवा चेहऱ्याचे टॅटू सुद्धा त्यांच्या शरीरावर बनवतात. परंतु नाशिक मधील एका व्यक्तीने प्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रिटी ज्यांनी विविध हिट चित्रपट दिले आहेत असे अजय देवगन यांच्यासाठी ” भीक मांगो आंदोलन ” सुरू केले आहे. एकीकडे अजय देवगन यांचे भरपूर सारे फॅन्स असतील परंतु अजय देवगन हे ते करत असलेल्या काही जाहिरातींमुळे ट्रोल होत असतात.
अजय देवगन पान मसाल्याची जाहिरात आणि ऑनलाईन गेमिंगची जाहिरात या जाहिरातींमुळे नेहमीच ट्रोल होतात आणि आता तर नाशिक मधील एका व्यक्तीने अजय देवगनसाठी भीक मांगो आंदोलन सुरू केले आहे. नाशिक मधील हा व्यक्ती स्कुटी वरून फिरताना दिसत असून या व्यक्तीच्या स्कुटीला एक बॅनर लावलेला आहे आणि त्या बॅनर वर ” अजय देवगन के लिए भीक मांगो आंदोलन ” असे लिहिलेले असून त्याखाली प्रकाश कलोजे आणि मोबाईल नंबर लिहिलेला आहे. तसेच स्कुटीला स्पीकर आणि माइकची व्यवस्था सुद्धा केलेली असून या माईक मध्ये ही व्यक्ती पुढीलप्रमाणे बोलताना दिसत आहे. ही व्यक्ती म्हणते की ,” ऑनलाइन गेम च्या विरोधात आंदोलन करत आहे. ऑनलाइन गेम हे आपल्या पिढीला खराब करू राहिले. फिल्मस्टार तसेच क्रिकेटर अशा ऑनलाइन गेमची जाहिरात करत आहे ,देवाने त्यांना भरपूर दिलेले आहे तरीसुद्धा अशा प्रकारच्या ऍड करून आपल्या पिढीला खराब करत आहेत. आपण अजय देवगन
ला हे भीक मांगो आंदोलन करून पैसे पाठवणार आहे आणि विनंती करणार आहे गांधीगिरी स्टाईलने, की कृपया करून अशा प्रकारची ऍड करू नये. जर तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल तर मी परत भीक मागेल आणि परत तुम्हाला पैसे पाठवेल, परंतु अशी ऍड करू नये अशी विनंती करू गांधीगिरी स्टाईलने… यासाठी तुम्हा लोकांची साथ पाहिजे. ही साथ अशाप्रकारे पाहिजे की तुमच्याकडे असलेला मोबाईल वापरा… एक फोटो काढा, व्हिडिओ काढा .. सोशल मीडियावर पुढे पाठवा … आज जरी तुमच्या घरातलं ऑनलाइन गेमिंग मध्ये कोणी नसेल तरीसुद्धा भविष्यात 101% कोणीतरी असेल म्हणून हे थांबवलं पाहिजे … …. ” असं ती व्यक्ती स्कुटीवर माईकच्या सहाय्याने बोलत होती.
या व्यक्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे आणि त्यावर विविध लोक कॉमेंट्स सुद्धा करत आहेत. काही कमेंट्स अशा सुद्धा येत आहेत की फक्त अजय देवगनच नाही तर इतर लोक सुद्धा अशा जाहिराती करत आहेत तर एका व्यक्तीने या व्यक्तीच्या व्हिडिओवर अशी सुद्धा कमेंट केली की तुम्ही समाजासाठी चांगले काम करत आहात.