लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana –
लेक लाडकी योजना काय आहे ?
लेक लाडकी योजनेचे फायदे कोणते आहेत ?
लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे ?
लेक लाडकी योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागतात ?
लेक लाडकी योजनेचा फॉर्म कुठे भरायचा ?
सगळ्यांनाच आपली लेक लाडकी असते आणि आता तर या नावाची योजना देखील सुरू करण्याची घोषणा केलेली आहे ती योजना म्हणजे ” लेक लाडकी योजना …”काही लोक स्त्री भ्रूण हत्या करतात परंतु त्यांना हे माहिती पाहिजे की मुलाला जरी वंशाचा दिवा म्हणत असले तरी देखील मुलगी सुद्धा वंशाची पणतीच आहे … असो. काही लोक मुलगा आणि मुलगी मध्ये फरक करतात परंतु बरेचसे असे लोक आहेत की ज्यांना फक्त एकच मुलगी आहे म्हणजे समाजामध्ये असे देखील लोक आहेत की जे मुला मुलींमध्ये फरक करत नाही. केंद्र सरकार तर्फे आणि राज्य सरकार तर्फे मुलींसाठी काही योजना राबवल्या जात असतात आणि सध्या ” लेक लाडकी योजना ” या योजनेची घोषणा झालेली आहे. या योजनेबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत ….
✔️लेक लाडकी योजना २०२३ –
Lek Ladaki Yojna 2023 :
– २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने मुलींसाठी ” लेक लाडकी योजना ” या योजनेची घोषणा केली आहे.
– लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींचा जन्म झाल्यापासून तर त्या अठरा वर्षाच्या होईपर्यंत मुलींना आर्थिक मदत दिली जाणार आहे. वेगवेगळ्या वयोगटा नुसार वेगवेगळी आर्थिक मदत दिली जाणार आहे. ( हे आपण पुढे बघणार आहोत )
– महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना सुरू करण्याचे उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील आर्थिक दृष्ट्या गरीब मुलींना शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देणे असून ज्या मुली आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या आहे त्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
– महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांचा विकास होण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.
✔️लेक लाडकी योजनेचे फायदे कोणते आहेत ?
Which are benefits of Lek Ladaki Yojna ?
– लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलगी जन्मल्यापासून ते अठरा वर्षाची होईपर्यंत एकूण ९८,००० रुपये आर्थिक सहाय्य मुलीला मिळणार आहे.
– यामध्ये मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत २३,००० रुपये तर मुलीला अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर ७५,००० मिळणार आहे.
🔸मुलीचा जन्म झाल्यानंतर ५००० रुपये
🔸 मुलगी पहिली मध्ये असताना ४००० रुपये
🔸सहावी मध्ये ६००० रुपये
🔸अकरावी मध्ये ८००० रुपये
🔸मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर ७५००० रुपये
मिळणार आहेत.
✔️लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे ?
What is the required eligibility criteria for Lek Ladki Yojana?
– ही योजना फक्त मुलींसाठीच आहे.
– मुलीचा जन्म महाराष्ट्रात झालेला असणे आवश्यक असून मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे.
– महाराष्ट्रामधील ज्या कुटुंबांकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्या कुटुंबांमधील मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
– लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीला ती अठरा वर्षाची होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळतो.
( जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर
KuKu FM Discount Code- GVKEO1966
कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत- https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8 )
✔️लेक लाडकी योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
What documents are required for Lake Ladki Yojana?
– मुलीचे जन्म प्रमाणपत्र
– पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
– पासपोर्ट साईज फोटो
– रहिवासी प्रमाणपत्र
– पालकांचे आधार कार्ड
– उत्पन्नाचा दाखला
– जात प्रमाणपत्र
– बँक अकाउंट डिटेल्स
लेक लाडकी योजनेसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊयात ….
लेक लाडकी योजना २०२३ ही योजना सध्या तरी नवीन असल्याकारणाने या योजनेसाठी अद्याप अधिकृत वेबसाईट नसल्याकारणाने ऑनलाइन फॉर्म कुठे भरता येईल याची माहिती मिळालेली नाही.