पी पी सी मार्केटिंग | पे पर क्लिक मार्केटींग | PPC ( Pay per click) marketing –
What does PPC mean in marketing?
What is an example of PPC marketing?
What are the types of PPC advertising?
What is advantages of PPC marketing ?
आपला जो व्यवसाय असेल तो व्यवसाय वाढवण्यासाठी तसेच ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंग करणे खूप गरजेचे असते. पूर्वी मार्केटिंग करण्यासाठी पारंपारिक मार्केटिंग पद्धतीचा उपयोग केला जायचा परंतु हल्ली डिजिटल मार्केटिंग पद्धतीचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये करताना दिसत आहे. कारण डिजिटल मार्केटिंग पद्धतीने वेळेची बचत होते त्याचबरोबर कमी कालावधीमध्ये व्यवसायाबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते. आतापर्यंत डिजिटल मार्केटिंग मधील विविध पद्धती बद्दल माहिती आपण # Marathify वर जाणून घेतल्या आहेत. आज आपण पीपीसी मार्केटिंग बद्दल माहिती जाणून घेणार आहोत …
✔️पी पी सी मार्केटिंग म्हणजे काय ?
What is PPC marketing ?
– पी पी सी हे एक ऑनलाईन सशुल्क जाहिरात मॉडेल असून याच्या साह्याने जाहिरातदार त्यांच्या उत्पादनांची तसेच सर्विसेसची जाहिरात करतात.
– पीपीसी मार्केटिंग मुळे उत्पादनांची तसेच सर्विसेसची जाहिरात लवकर होते आणि व्यवसाय वाढण्यास मदत देखील होते.
– समजा जर एखाद्या व्यावसायिकांनी त्यांच्या उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात गुगल वर केली आणि एखाद्या युजरने त्यावर क्लिक केले तर अशावेळी त्या व्यवसायिकाला जाहिरात नेटवर्कला काही पैसे द्यावे लागतात म्हणजेच पे पर क्लिक ही पद्धती या ठिकाणी लागू होते.
जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर
KuKu FM Discount Code- GVKEO1966
कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत- https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8
✔️पी पी सी जाहिरातींचे कोणते प्रकार आहेत ?
What are the types of PPC advertising?
सशुल्क जाहिरात विविध मार्गाने केली जाते, त्यापैकीच काही प्रकार आपण पुढे बघणार आहोत.
१ . व्हिडिओ ॲड्स video ads –
बऱ्याचदा तुमच्या लक्षात आले असेल की युट्युब वर व्हिडिओ पाहत असताना त्या व्हिडिओच्या मध्येच एखादी ऍड सुरू होते त्याद्वारे देखील मार्केटिंग केली जाते.व्हिडिओ ॲड्स द्वारे विविध उत्पादनांची तसेच सर्विसेसची मार्केटिंग केली जाते.
२ . डिस्प्ले ॲड्स display ads –
डिस्प्ले ॲड्स या प्रकारच्या जाहिराती एखाद्या वेबसाईटवर किंवा ब्लॉगवर बघायला मिळतात. या प्रकारच्या जाहिरातींद्वारे सुद्धा विविध उत्पादनांची तसेच सर्विसेसची मार्केटिंग केली जाते. ज्यावेळी Google AdSense द्वारे मान्यता मिळते अशावेळी एखाद्या वेबसाईटवर किंवा ब्लॉगवर या प्रकारच्या जाहिराती बघण्यास मिळतात. जाहिरातदारांनी या प्रकारच्या जाहिरातींसाठी शुल्क ठरवलेले असते.
३ . सर्च ॲड्स search ads –
जेव्हा आपण गुगलवर एखादा कीवर्ड सर्च करतो अशावेळी या प्रकारच्या जाहिराती आपणास बघण्यास मिळतात. Google AdSense चा उपयोग करून एखाद्या उत्पादनाची तसेच सर्विसेसची जाहिरात करू शकतो आणि युजरला किती रक्कम द्यायची हे देखील ठरवू शकतो.
४ . शॉपिंग ॲड्स shopping ads –
शॉपिंग ॲड्स या प्रकारच्या जाहिराती ज्यावेळी आपण कुठलेही ऑनलाइन शॉपिंग पोर्टल ओपन करतो अशावेळी बघण्यास मिळतात.
५ . मोबाईल ॲप्स ॲड्स mobile apps ads –
बऱ्याचदा प्ले स्टोर वरून एखादे ॲप डाऊनलोड केल्यानंतर ते ॲप ओपन केल्यावर वेगवेगळ्या जाहिराती दिसण्यास सुरू होते आणि ह्याच मोबाईल ॲप्स ॲड्स आहेत.
६ . सोशल मीडिया ॲड्स social media ads –
आज-काल बरेच लोक सोशल मीडिया वापरतात, अगदी कमी लोक आहेत जे सोशल मीडियाचा वापर करत नाही. सोशल मीडियाचा वापर करून सुद्धा विविध उत्पादनांची तसेच सर्विसेस जाहिरात केली जाते.
✔️पीपीसी मार्केटिंगचे कोणते फायदे आहेत ?
What is advantages of PPC marketing ?
– पीपीसी मार्केटिंग अगदी कमी कालावधीमध्ये योग्य रीतीने उत्पादनांची तसेच सर्विसेसची मार्केटिंग करते.
– पीपीसी मार्केटिंग योग्य त्या ग्राहकाला टार्गेट करते.
– पीपीसी मार्केटिंग पद्धती इतर लोकल जाहिरात पद्धतीपेक्षा स्वस्त आहे म्हणजेच बजेट फ्रेंडली आहे.
– पीपीसी मार्केटिंग पद्धती इतर मार्केटिंग चॅनेल सोबत देखील योग्य पद्धतीने कार्य करते.