Makar Sankranti 2022 I मकरसंक्रांती पूर्ण माहिती- पूजा मुहूर्त – वाहन- वस्त्र- makarsankranti wish messages

 

मकरसंक्रांती बद्दल पूर्ण माहिती: Makar Sankranti 2022 detail information

मकरसंक्रांत ह्या सणाला धार्मिक असे महत्त्व आहे. हा सणसुवासिनींचा सणम्हणून देखील ओळखला जातो.

 
मकरसंक्रांत का साजरी करतात? Makar Sankranti 2022

मकरसंक्रांत ह्या सणाला धार्मिक असे महत्त्व आहे.हा सणसुवासिनींचा सणम्हणून देखील ओळखला जातो.

महाराष्ट्रात मकरसंक्रांत हा सण तीन दिवसांचा असतो.मकरसंक्रांतिच्या आधीच्या दिवसालाभोगीअसे म्हणतात.ह्या दिवशी वेगवेगळ्या भाज्या मिळून एकत्र भाजी केली जाते ह्या मध्ये वांगी,गाजर,वाटाणा,हरभरा तसेच इतरही भाज्यांचा समावेश होतो तिळाची भाकरी केली जाते.

 

मकरसंक्रांतिला तिळाचे विशेष असे महत्त्व आहे,थंडीचे दिवस असल्याने तिळाचा आहारात समावेश केल्यामुळे शरीरातील उष्णता योग्य प्रमाणात राहण्यास मदत होते.तसेच तिळाचास्निग्धताहागुणधर्म आपआपसातील स्नेह टिकवतो असे दर्शवतो. भोगीच्यादिवशी सुवासिनी माहेरी आनंद उपभोगायला येतात.दुसऱ्या दिवशी मकरसंक्रांत असतेत्या दिवशी सुवासिनी सुगडांची पूजा करतात त्यात बोर,ऊस,हरभरा, गहूअशी हिवाळ्यात येणारी पिके अर्पण केली जातात.

 

ह्या दिवसापासूनहळदी कुंकूकार्यक्रमालादेखील प्रारंभ होतो.म्हणूनच मकरसंक्रांतिलासुहासिनिंचा सण असेही म्हंटले जाते. हळदीकुंकू कार्यक्रम म्हणजे बायका एकमेकींना बोलावून हळदी कुंकू लावतात, वाणदेतात ,उखाणे घेतात. नवविवाहितबायका आणि छोटी मुले ह्या दिवशी तिळाचे दागिने घालतात.छोट्या मुलामुलींचेबोरन्हानकरण्याचीदेखील प्रथा आहे.

 

तिसरा दिवस म्हणजेकर ह्यालाचकिंक्रांतअसेहीम्हणतात.ह्या दिवशी देवीने किंकरासुर ह्या राक्षसाचा वध केला होता आणि प्रजेचे त्याच्या पासून संरक्षण केले.

 पद्धतीनेमहाराष्ट्रात मकरसंक्रांत साजरी केली जाते.

 

भारतात काही राज्यात मकरसंक्रांत वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.जसे की,

उत्तर भारतात पंजाब आणि हिमाचल प्रदेश मध्येलोहरीह्या नावाने ओळखली जाते.तसेच पूर्व भारतात बिहार मध्येखिचडी“,आसाम मध्येभोगालि बिहू“, पश्चिम भारतात  गुजरात आणि राजस्थान मध्येउत्तरायणआणि तामिळनाडू मध्येपोंगलह्या नावाने ओळखली जाते.

 

मकरसंक्रांत का साजरी करतात?

ज्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवसालामकरसंक्रांतअसे म्हणतात.

मकरसंक्रांत दर वर्षी १४ जानेवारी किंवा १५ जानेवारीला येते.ह्या वर्षी मकरसंक्रांत शुक्रवार दिनांक १४ जानेवारी ला आहे. सूर्यदेवाचे उत्तरायण सुरू होते.असे मानले जाते की,सूर्यदेव त्यांचे पूत्र शनी देवांना भेटण्यासाठी जातात आणि शनी मकर राशीचे स्वामी आहेत त्यामुळे सुद्धा ह्या दिवसाला मकरसंक्रांत नावाने ओळखले जाते.गंगा या पवित्र नदीचे सुद्धा ह्याच दिवशी जमिनीवर अवतरण झाले होते.म्हणून पण हा दिवस शुभ मानला जातो.