डोळ्याखाली येणारे डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी घरगुती उपाय –
Home remedies to remove dark circles under eyes
बऱ्याचशा कारणांमुळे डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात , त्यापैकीच काही कारणे म्हणजे पुरेशी झोप न घेणे , मोबाईल लॅपटॉप यांचा अतिरिक्त वापर करणे , व्यवस्थित आहार न घेणे. तर आज आपण डोळ्याखाली येणारे डार्क सर्कल्स कसे दूर करायचे यासाठीचे काही घरगुती उपाय बघणार आहोत.
१ . रात्री झोपण्यापूर्वी डोळ्याखाली बदामाचे शुद्ध तेल लावावे यामुळे डार्क सर्कल नष्ट होण्यामध्ये मदत होईल.
२ . ज्यांची स्किन ऑईली आहे , त्यांनी बदाम तेलाचा वापर न करता जायफळ आणि चंदन उगाळून त्याचा लेप डार्क सर्कलवर लावावा ,यामुळे डार्क सर्कल नष्ट होण्यामध्ये मदत होईल. जायफळ आणि चंदन समप्रमाणात घेऊ शकता. ही पेस्ट लावल्यावर रात्रभर तशीच ठेवायची आहे आणि सकाळी पाण्याने स्वच्छ धुऊन काढा.
३ . तीन ते चार चमचे मसूर डाळ गुलाब पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी मसूर डाळी मधील अतिरिक्त गुलाब पाणी बाजूला काढून घ्या आणि नंतर मसूर डाळ हाताने किंवा चमच्याच्या साह्याने व्यवस्थित येत्या कुस्करून घ्या. नंतर ही डाळ डार्क सर्कल वर किंवा पूर्ण चेहऱ्यावर लावली तरी देखील चालेल. नंतर एक लिंबू घेऊन त्याचा रस काढून घ्या आणि लिंबाची साल डार्क सर्कल वर जी मसूर डाळ लावली आहे , त्यावर ठेवून व्यवस्थित रित्या मसाज करा यामुळे डार्क सर्कल कमी होण्यामध्ये नक्कीच मदत होईल.
४ . खोबरेल तेल आणि बदाम तेल समप्रमाणात घेऊन व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्या आणि नंतर तयार झालेले तेल डार्क सर्कल वर लावा आणि एक तास तसंच राहू द्या आणि नंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन काढा.
५ . एक चमचा बेसन पीठ घ्या त्यामध्ये चिमूटभर हळद घाला आणि गुलाब पाणी टाकून व्यवस्थित रित्या पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट डार्क सर्कल वर अप्लाय करायची आहे आणि ही पेस्ट सुकल्यानंतर काही वेळाने चेहरा कोमट पाण्याने धुऊन काढा.
६ . एक चमचा मध घ्या त्यामध्ये चिमूटभर हळद घाला आणि एक चमचा गुलाब पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्या नंतर हे मिश्रण डार्क सर्कलवर लावा अर्धा तास तसेच राहू द्या आणि नंतर स्वच्छ धुऊन काढा.
७ . एलोवेरा जेल किंवा कोरफडीचा गर डोळ्याखाली आलेल्या डार्क सर्कल वर दिवसातून दोन वेळा दहा मिनिटांसाठी लावा आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन काढा, यामुळे देखील डार्क सर्कल दूर होण्यासाठी मदत होईल.
८ . दुधामध्ये लिंबाचा रस घालून घ्या त्यामध्ये कापूस बुडवून हा कापूस डार्क सर्कल वर थोडा वेळ ठेवायचा आहे आणि नंतर चेहरा पाण्याने धुऊन काढायचा आहे.
९ . लिंबाचा रस डार्क सर्कल वर लावल्यामुळे डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते कारण लिंबाच्या रसामध्ये विटामिन सी आढळते. परंतु ज्यांची त्वचा जास्त सेन्सिटिव्ह आहे त्यांनी हा उपाय करणे टाळावे.
१० . एक बटाटा घ्यायचा आहे .बटाट्याची साल काढून टाकायची आहे, त्यानंतर बटाट्याच्या बारीक बारीक फोडी करायचे आहे. या बटाट्याच्या फोडी खलबत्त्यामध्ये कुटुन घ्यायचे आहे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. ही तयार झालेली पेस्ट एक चमचा घ्या , त्यामध्ये एक चमचा एलोवेरा जेल टाका, व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्या आणि नंतर हे मिश्रण डार्क सर्कल वर लावा. वीस मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुऊन काढा.
११ . तीन चमचे एलोवेरा जेल घ्या त्यामध्ये एक विटामिन ई ची कॅप्सूल घाला. व्यवस्थित रित्या मिक्स केल्यानंतर हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी डार्क सर्कल वर लावा. सकाळी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
१२ . एक चमचा एलोवेरा जेल घ्या . त्यामध्ये थोडीशी हळद आणि कच्चे दूध घाला. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर डार्क सर्कल वर लावा आणि दहा ते पंधरा मिनिटांनंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन काढा.
Author – Poonam Ghorpade Gore