झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय –
How to get rid of cockroaches ?
Home remedies to get rid of cockroaches –
आपल्या घरामध्ये मुख्यतः स्वयंपाक घरामध्ये झुरळे येऊ शकतात किंवा बऱ्याचदा असतात देखील आणि हळूहळू त्यांचे प्रमाण देखील वाढू लागते. मार्केटमध्ये झुरळांना मारण्यासाठी जे स्प्रे भेटतात ते विषारी असतात त्यामुळे ते स्प्रे स्वयंपाक घरामध्ये फवारताने देखील विचार करावा लागतो. म्हणूनच आज आपण काही घरगुती असे उपाय बघणार आहोत, या उपायांनी झुरळे पळून जातील आणि झुरळापासून सुटका मिळेल.
१ . तीन-चार अगरबत्ती घ्या त्या अगरबत्ती पासून काडी वेगळी करा. आणि सहा ते सात कापूर घ्या. अगरबत्ती आणि कापूर खलबत्त्याच्या सहाय्याने किंवा इतर कोणत्याही वस्तूच्या सहाय्याने व्यवस्थित रित्या कुठून बारीक करून घ्या. आणि हे मिश्रण पाण्यामध्ये टाका. यामध्ये तुम्ही लिंबू देखील टाकू शकता. हे तयार झालेले पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि आपल्या किचनमध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वाटते कॉकरोचेस येत असतात त्या ठिकाणी स्प्रे करा यामुळे कॉकरोचेसची संख्या हळूहळू कमी होईल आणि नंतर कॉकरोचेस येणार नाही.
२ . बोरिक पावडर चार चमचे घेऊन त्यामध्ये एक ते दोन चमचे मैदा टाका आणि पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित रित्या मळून घ्या आणि त्याचे छोटे छोटे लाडू किंवा गोळे तयार करा आणि त्याला बाहेरच्या बाजूने साखरेचे थोडेसे दाणे लावा, जेणेकरून साखरेमुळे कॉकरोचेस अट्ट्रॅक्ट होतील आणि हे लाडू खातील. या उपायाने देखील झुरळापासून सुटका मिळेल.
३ . तमालपत्र ( Bay leaves ) –
तमाल पत्राची काही पाणी स्वयंपाक घर स्वच्छ केल्यानंतर ज्या ठिकाणी झुरळे येत असतात अशा ठिकाणी ठेवा. तमालपत्राच्या वासामुळे झुरळे लांब पळून जातील आणि झुरळांपासून सुटका मिळेल.
४ . लसूण पावडर किंवा कांदा पावडर ठिकठिकाणी टाका, यामुळे देखील झुरळे येणार नाही.
५ . लिंबाचा रस एका वाटीमध्ये काढून तो स्प्रे बॉटलमध्ये टाकून ठिकठिकाणी फवारा यामुळे देखील झुरळांपासून सुटका मिळण्यास मदत होईल.
६ . सात ते आठ लसणाच्या पाकळ्या क्रश करून घ्या आणि त्यामध्ये पाणी टाका .हे मिश्रण व्यवस्थित रित्या ढवळून घ्या. त्यानंतर हे मिश्रण गाळणीने गाळून घ्या आणि त्यामध्ये दीड ते दोन मोठे चमचे बेकिंग सोडा टाका आणि एका लिंबाचा रस टाका. यासोबतच थोडीशी टूथपेस्ट देखील टाका. हे सर्व मिश्रण व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्या. नंतर या मिश्रणामध्ये अजून काही पाणी टाका आणि हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ज्या ठिकाणी कॉकरोचेस येतात असे वाटते त्या ठिकाणी स्प्रे करा. या उपायाने देखील झुरळांपासून सुटका मिळण्यास मदत होईल.
७ . एक मोठा कांदा घ्या त्याचे छोटे छोटे काप करा . कांद्याचे काप आणि पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्या. नंतर हे मिश्रण गाळणीने गाळून घ्या. या पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करा आणि हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून ठिकठिकाणी फवारा. असे केल्यामुळे कॉक्रोचेस येणार नाहीत किंवा असतील तर त्यापासून सुटका मिळेल.
८ . पिठीसाखर आणि बेकिंग सोडा मिक्स करून ही पावडर ठिकठिकाणी पसरवा यामुळे देखील झुरळांची संख्या कमी होईल.
९ . पिठीसाखर, पीठ आणि बोरिक ऍसिड हे तीनही इन्ग्रेडियंट्स समप्रमाणात घेऊन पाणी टाकून व्यवस्थित रित्या पीठ मळताना जसा आपण उंडा तयार करतो तसा तयार करून घ्या. त्यानंतर यापासून छोट्या छोट्या गोळ्या तयार करा आणि त्या ज्या ठिकाणी झुरळे जास्त प्रमाणात येतात जसे की सिंक जवळ, गॅस जवळ, मिक्सर जवळ फ्रीजच्या मागे अशा ठिकाणी ठेवून द्या. या उपायामुळे झुरळांची संख्या हळूहळू कमी होईल आणि नंतर तर झुरळे घरामध्ये येणार देखील नाहीत.
Author – Poonam Ghorpade Gore