Dabur success story –
Who is the founder of Dabur ?
What are the products of Dabur ?
डाबर सक्सेस स्टोरी –
डॉ. एस.के. बर्मन हे एक असे डॉक्टर होते की जे आपल्या रुग्णांवर आयुर्वेदिक औषधांनी उपचार करत असत आणि त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांसाठी त्यांच्यावर दृढ असा विश्वास होता. आणि यामुळेच एक ब्रँड उदयास आला आणि तो म्हणजे ” डाबर “.डॉ. एस.के. बर्मन यांनी 1884 मध्ये भारताची स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश राजधानी कलकत्ता शहरातील एका गल्लीमध्ये एक लहान क्लीनिक डाबर म्हणून सुरू केले.
” Dabur ” हे नाव अशा रीतीने तयार झाले की Da हे Daktaar ( डॉक्टरचे बंगाली प्रोणून्सिएशन ) या शब्दामधून घेण्यात आले तर Bur हा शब्द डॉक्टर एस. के. बर्मन यांच्या आडनावामधून ( Burman ) घेण्यात आले.
आयुर्वेदिक फॉर्मुलेशनचा उपयोग करून मलेरिया आणि कॉलरा यांसारख्या विविध आजारांवर व्यवस्थित रित्या उपचार करता येतो असे लक्षात ठेवून डॉक्टर एस. के. बर्मन यांनी औषधांची मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नंतर डॉक्टर एस. के. बर्मन यांचा मुलगा सी.एल. बर्मन यांनी भारतामध्ये आयुर्वेदिक औषधांसाठी पहिले रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले. नंतर 1996 मध्ये डाबर ही पब्लिक लिमिटेड कंपनी बनली.
डाबर ही आता जगामधील आघाडीची अशी आयुर्वेदिक कंपनी बनली आहे. डाबर ही आयुर्वेदिक औषधी आणि नॅचरल कन्झुमर प्रॉडक्टस् तयार करते. डाबर ही कंपनी भारतामधील सर्वात मोठ्या एफ एम सी जी म्हणजेच फास्ट मुविंग कन्झुमर गुड्स कंपन्यांपैकी एक आहे.
डाबर ही कंपनी प्राचीन पारंपारिक ज्ञान आणि अत्याधुनिक विज्ञान यांचा उपयोग करून ग्राहकांसाठी उत्पादने तयार करत असते. डाबर ही कंपनी लोकांच्या पसंतीस उतरली आहे. डाबर इंडिया लिमिटेड ही भारतामधील चौथी सर्वात मोठी एफ एम सी जी कंपनी आहे.
डाबर या कंपनीकडे जवळपास 138 पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव असून त्यांच्याकडे अडीचशे पेक्षा जास्त आयुर्वेदिक उत्पादने आहेत. डाबरच्या हेल्थकेअर सेक्टरमध्ये डाबर च्यवनप्राश, डाबर हनी, डाबर पुदिनहारा, डाबर लाल तेल आणि डाबर हनिटस या उत्पादनांचा समावेश होतो. तसेच पर्सनल केअर उत्पादनांमध्ये डाबर आमला आणि डाबर रेड पेस्ट या उत्पादनांचा समावेश होतो तर फूड अँड बेवरेज सेक्टरमध्ये Réal हा ब्रँड तर वाटिका हा एक ग्लोबल पावर ब्रँड आहे.
डाबर हा ब्रँड फूड्स, हेल्थ केअर ,होम केअर, स्किन केअर आणि ओरल केअर याच्याशी संबंधित
विविध उत्पादने तयार करत असतो. डाबर हा ब्रँड फक्त भारतापुरताच मर्यादित राहिलेला नसून या ब्रँडचा विस्तार भारताबाहेर जगामधील विविध देशांमध्ये झाला आहे जसे की हा ब्रँड मध्य पूर्व, सार्क राष्ट्रे, आफ्रिका, अमेरिका, युरोप आणि रशियामध्ये ओळखला जातो. डाबर या कंपनीची उत्पादने जगभरामधील 120 पेक्षा अधिक देशांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच डाबर या कंपनीचा 27% पेक्षा जास्त महसूल परदेशांमधून येतो.
डाबर हा ब्रँड जगभरामधील वीस अत्याधुनिक अशा उत्पादन साईट चालवतो.साहिबाद ( उत्तर प्रदेश ), जम्मू सिल्वासा , अल्वर , कटनी , नरेंद्रपूर , पिथमपूर आणि नाशिक येथे कारखाने आहेत तर बड्डी (हिमाचल प्रदेश) आणि पंतनगर (उत्तरांचल) हे देखील दोन मुख्य उत्पादन कारखाने आहेत. डाबर या ब्रँडची कार्यालये दुबई, इजिप्त, नायजेरिया, बांगलादेश, युनायटेड स्टेट्स, लंडन आणि नेपाळ या देशांमध्ये देखील आहेत.
डाबर या कंपनीला विविध प्रतिष्ठित अशा पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. इकॉनॉमिक्स टाइमने डाबरला भारतामधील आयकॉनिक ब्रँड्स मध्ये 2017 मध्ये स्थान दिले तर सीएनबीसी द्वारे एफएमसीजी श्रेणीमधील बेस्ट रिस्क मॅनेजमेंट प्रॅक्टिस साठीचा पुरस्कार मिळाला तर डाबरला झी मीडिया फॅमिली बिजनेस लेगसी अवॉर्डने मान्यता मिळाली तसेच सर्वोत्कृष्ट भारतीय ब्रँड्स 2016 मध्ये टॉप ब्रँड म्हणून देखील स्थान देण्यात आली त्याचबरोबर भारतामधील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या
BT500 रँकिंग मध्ये डाबर 39 व्या स्थानावर आहे.
Author – Poonam Ghorpade Gore