Bisleri success story –
Who is the owner of bisleri water ?
Why is bisleri famous ?
What is the strategy of bisleri ?
How did bislery become successful ?
Who brought bisleri brand in India ?
Is bisleri Indian company ?
Which company owns bisleri ?
Where was bislery founded ?
बिसलरी सक्सेस स्टोरी –
आपल्या पूर्वजांच्या काळामध्ये पाणी विहिरीमधून किंवा नदीवरून आणले जायचे, त्यानंतर बोअर तसेच हापसा यांसारख्या काही सुविधा निघत केल्या. परंतु त्यावेळी कोणी हा विचार देखील केला नसेल की पाणी सुद्धा विकत घ्यावे लागेल. आजच्या युगामध्ये तर पाणी बॉटल्स किंवा पाण्याचे जार पाण्याची गरज भागवण्यासाठी विकत मिळतात. मार्केटमध्ये विविध प्रकारच्या ब्रँडच्या पाणी बॉटल उपलब्ध आहेत ; परंतु बिसलरी हा ब्रँड एवढा प्रसिद्ध झालेला आहे की , अगदी कोणीही पाणी बॉटल विकत घेताना ” बिसलरी द्या ” असे शब्द उच्चारण करतात ,जणू काही पाणी बॉटल ला समानार्थी शब्द बिसलरी आहे. तर आज आपण बघणार आहोत ” बिसलरी ” या ब्रँड बद्दलची माहिती …..
बिसलेरी ही कंपनी इटालियन कंपनी होती जी फेलिस बिसलरी यांनी स्थापन केली होती. याच कंपनीने बॉटलमध्ये पाणी पॅक करून विकण्याची कल्पना भारतामध्ये सर्वप्रथम आणली. फेलिस बिसलरी यांनी सुरुवातीला सिन्कोना, औषधी वनस्पती आणि लोह क्षारांनी युक्त अशी बिसलरी विकसित केली. फेलिस बिसलरी यांचे निधन 17 सप्टेंबर 1921 रोजी झाले. त्यांच्या निधनानंतर डॉक्टर रॉसी हे बिसलरी या कंपनीचे मालक बनले.डॉक्टर रॉसी हे फेलिस बिसलरी यांचे फॅमिली डॉक्टर होते तसेच सुरुवातीपासूनच बिसलरी या ब्रँडचे अविभाज्य असे भाग होते.
बिसलरी हा ब्रँड भारतामध्ये कसा आला ?
खुशरू सुनटूक यांनी भारतामध्ये बिसलरी स्थापन करण्यामध्ये महत्त्वाची अशी भूमिका बजावली.खुशरू सुनटूक हे एक वकील असून कंपनीच्या कायदेशीर सल्लागाराचा मुलगा होते. त्या काळामध्ये भारतामध्ये पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असली तरी देखील शुद्ध पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेता सनटूक यांनी भारतीय बाजारपेठेकडे वळण्याचे निश्चित केले. आणि अशा रीतीने बिसलरी हा ब्रँड भारतामध्ये आला.खुशरू सुनटूक यांनी ठाणे, मुंबई येथे पहिला ‘बिसलेरी वॉटर प्लांट’ 1965 मध्ये स्थापन केला.
सुरुवातीच्या काळामध्ये बिसलरी बॉटल्स फाईव्ह स्टार हॉटेल्स मध्ये तसेच इतर हाय एंड रेस्टॉरंट मध्ये उपलब्ध होत्या. सुरुवातीला बाहेरून येणारे तसेच परदेशी लोक ज्यांना इतर ठिकाणचे पाणी सहन होत नसत असे लोक बिसलरी चा वापर करत असत. नंतर खुशरू सुनटूक आणि डॉक्टर रॉसी यांनी त्यांच्या उत्पादनाची ओळख सामान्य लोकांना देखील करून देण्याचा निर्णय घेतला आणि अशा रीतीने त्यांच्या बाजारपेठेचा देखील विस्तार करण्यात आला.
काही कालावधीनंतर रमेश चौहान यांनी 1969 मध्ये बिसलरी चार लाख रुपयांना विकत घेतली. रमेश चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रँडचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. रमेश यांनी फक्त पॅकेज केलेले पाणीच नाही तर त्याचबरोबर इतर शीतपेये आणि सोडा देखील बाजारपेठेमध्ये आणला. आणि अशा रीतीने बिसलरी हा देशातील सर्वात लोकप्रिय असा ब्रँड बनला.
बिसलरी या ब्रांडने वेगवेगळ्या मार्केटिंग पद्धती अवलंबून भारतीय बाजारपेठेमध्ये आपले एक वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. बिसलरी नेहमीच आकर्षक जाहिराती तयार करत असते, तसेच वेगवेगळ्या मार्केटिंग योजना देखील आखत असते आणि त्यामुळेच आज हा ब्रँड यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. बिसलरी लोकेशन बेस्ड प्रायसिंग स्ट्रॅटेजीचा वापर करते म्हणजेच रेस्टॉरंट तसेच थिएटर यामध्ये विकली जाणारी बिसलरीची उत्पादने रिटेल दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या बिसलरीच्या उत्पादनांच्या तुलनेमध्ये थोड्या प्रमाणात महाग विकली जातात.
बिसलरी या कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे. तसेच बिसलरीचे देशभरामध्ये 15 पेक्षाही जास्त उत्पादन युनिट्स आहेत आणि त्यामुळेच बिसलरी चे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते. बिसलरीकडे स्वतःचे वितरण नेटवर्क आहे . बिसलरी कडे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रक आहेत ज्यामुळे सहज आणि जलद अशी वाहतूक शक्य होते.