PART 1: Vijay Shekhar Sharma success story/ Paytm Success Story :
भाग १ : विजय शेखर शर्मा सक्सेस स्टोरी/Paytm सक्सेस स्टोरी : –
पेटीएम हे एक असे भारतीय ॲप्लिकेशन आहे ज्याच्या मदतीने युजर्सना ऑनलाइन पेमेंट करता येते.पेटीएम मध्ये खूप सारे ऑप्शन्स उपलब्ध आहेत जसे की ऑनलाइन पेमेंट करता येते,मोबाईल रिचार्ज करता येतो,डिश टीव्ही रिचार्ज करता येतो, इलेक्ट्रिसिटी बिल भरता येते,ऑनलाइन टिकीट बुकिंग करता येते अशा प्रकारचे विविध ऑप्शन्स उपलब्ध आहेत.” Paytm ” हा ” Pay Thorough Mobile” चा शॉर्ट फॉर्म आहे. पेटीएम ची सुरुवात 2010 मध्ये विजय शेखर शर्मा यांनी केली. विजय शेखर शर्मा यांचा जन्म 8 जुलै 1978 अलीगढ, उत्तर प्रदेश येथे झाला.विजय शेखर शर्मा यांचे वडील एक शिक्षक होते तर आई गृहिणी.विजय शेखर शर्मा यांना तीन भावंड..
वयाच्या १४ व्या वर्षी विजय शेखर शर्मा यांनी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. विजय शेखर शर्मा यांना अभियंता व्हायचे होते .पण इंग्लिश भाषा त्यांना येत नव्हती ,त्यामुळे त्यांना असे वाटत होते की इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याच्या आधी इंग्रजी भाषेचे कोचिंग घ्यावे.पण कोचिंग घेण्यासाठी त्यांच्याकडे ना पैसा होता ना काही रिसोर्सेस.पण विजय शेखर शर्मा यांनी कधीच हार मानली नाही. विजय शेखर यांनी त्याच्या आईला विचारले की, त्यांना इंजिनियर व्हायचे आहे त्यामुळे इंग्रजी भाषेचे कोचिंग घेणे आवश्यक आहे. परंतु विजय शर्मा यांच्या आईला नकार द्यावा लागला आणि त्यांच्या आईने त्यांना सांगितले की त्यांच्याकडे पुरेसे संसाधने नाहीत आणि त्यांच्या बहिणीचे देखील लवकरच लग्न करावे लागेल.
विजय शेखर शर्मा हे त्यांच्या गावातील दोन लोकांपैकी एक होते ज्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू ठेवले.विजय शेखर शर्मा यांनी दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली .विजय शेखर शर्मा यांच्या मते, तेव्हा ज्यांचे शिक्षण हिंदी माध्यमातून होत असत त्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागत असे.त्यावेळी हिंदी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांसाठी पुस्तके आणि कोचिंग क्वचितच उपलब्ध असे.
पूर्वी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणून ओळखले जाणारे,आणि आत्ताचे डीटीयू (दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी) मध्ये असताना त्यांना त्यांचे जीवन लोकप्रिय बॉलिवूड चित्रपट ” तारे जमीन पर ” या चित्रपटामधील मुलासारखे वाटे.म्हणजे त्यांना त्यांच्या शिक्षकांचे ओठ हलताने तर दिसत असत पण ते काय शिकवत आहेत हे विजय यांना समजत नसे कारण ते सर्व इंग्लिश भाषेमधून असे. परीक्षेची तयारी करत असताना देखील विजय आणि त्यांचे मित्र उत्तरे वाचत असत परंतु प्रश्न इंग्रजी भाषेतून असल्यामुळे त्यांना प्रश्न समजत नसत. या अशा अडचणी आल्यामुळे विजय शेखर शर्मा यांनी इंग्रजी वाचायला, लिहायला आणि बोलायला शिकले.
विजय शेखर शर्मा हे एकदा बाजारात गेले असताना त्यांनी फोर्ब्स मॅगझिन घेतले. त्यामध्ये त्यांनी ॲपल, इंटेल आणि एचपी यांसारख्या मोठ्या ब्रँडच्या यशोगाथा वाचल्या. त्यामधून त्यांना असे समजले की हे ब्रँड इकोसिस्टीम मधील सर्वात मोठे नाव कसे बनले आहे. त्याचबरोबर विजय यांना या मोठ्या ब्रँडच्या यशोगाथेमधून एक गोष्ट सामाईक वाटली आणि ती म्हणजे या सर्व कंपन्यांची सुरुवात बेसमेंट गॅरेजमधून झाली होती.
1997 मध्ये विजय शेखर शर्मा यांनी त्यांचा मित्र हरी यासोबत कॉलेजमध्ये असताना इंटरनेट कंपनी सुरू केली. या दोघांना सर्च इंजिन विकसित करायचे होते. त्या दोघांच्या देखील पालकांनी त्यांना नोकरी करण्यास प्रवृत्त केले परंतु त्यांचा त्यांची कंपनी विकसित करण्याचा दृढ निश्चय असल्यामुळे त्यांनी जास्त काळ नोकरी करणे कधीही पसंत केले नाही. विजय यांनी त्यांच्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी 2001 मध्ये नोकरी सोडली.आणि एक कंपनी सुरू केली जी Yahoo च्या तत्त्वज्ञानाच्या विचारसरणीवर आधारित होती.
सुरुवातीला विजय शेखर शर्मा यांचे ग्राहक त्यांना वेळेवर पैसे देत नसत. पुढे जाऊन त्यांच्या बहिणीचे लग्न जवळ येत असल्यामुळे त्यांना त्यांच्या कंपनीचा 40% हिस्सा एका गुंतवणूकदाराला फक्त आठ लाख रुपयांना विकावा लागला. त्यांच्या वडिलांचे दोन लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले नाही त्यावेळी कुटुंबापुढे मोठी अडचण होती.
विजय शेखर शर्मा यांना कन्झ्युमर ब्रँड तयार करण्याची इच्छा होती. संचालक मंडळांनी सुचवले की One97 कम्युनिकेशन्सचा नफा योग्य अशा ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. विजय शेखर शर्मा हे बीजिंग येथे गेले असताना त्यांना तेथील तंत्रज्ञान अधिक पटीने विकसित होत असल्याचे समोर आले. त्यावेळी त्यांना एक पेमेंट प्लॅटफॉर्म तयार करावा अशी कल्पना सुचली. तसा प्रस्ताव त्यांनी संचालक मंडळापुढे मांडला परंतु संचालक मंडळाने त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. कारण त्यांचा असा विश्वास होता की भारतामध्ये रोख रक्कम वापरली जाते त्यामुळे लोक डिजिटल व्यवहाराला मान्यता देतील की नाही. परंतु नंतर विजय यांना पाच कोटी रुपये देण्यात आले आणि नंतर त्यांनी पेटीएमची कल्पना यशस्वीरित्या अमलात आणली.पुढे जाऊन विजय यांनी पेटीएम विकसित केले.
( पे टी एम ची उर्वरित यशोगाथा बघणार आहोत पुढील भागामध्ये…. )