मोटार इन्शुरन्स | Motor insurance | Car Insurance |Insurance policies and plans

मोटार इन्शुरन्स –

What is meant by motor insurance?

What are the 3 types of motor insurance?

What is the use of motor insurance?

Who needs motor insurance?

What are the types of motor insurance policies?

Which are benefits of motor insurance ?

#insurance policies and plans

मोटार इन्शुरन्स | Motor insurance –

   हल्ली अगदी बहुतेक लोक प्रवास करण्यासाठी खाजगी वाहन वापरताना दिसतात. या वाहनांमध्ये मोटार सायकल, कार किंवा इतर वाहने यांचा समावेश होतो. वाहन वापरत असताना अचानक अपघात होणे किंवा वाहन चोरीला जाणे तसेच वाहनाचे काही पार्ट्स डॅमेज होणे यांसारख्या घटना घडू शकतात आणि म्हणूनच जसे आपण लाईफ इन्शुरन्स किंवा इतर इन्शुरन्स काढतो त्या प्रकारेच मोटार इन्शुरन्स काढणे देखील तितकेच गरजेचे आहे. मोटार इन्शुरन्स काढलेला असल्याने अशा काही घटना घडल्यानंतर आर्थिक दृष्ट्या आपल्याला हातभार मिळतो. काही लोकांचा असा गैरसमज आहे की मोटार इन्शुरन्स हा फक्त मोटार सायकल साठीच आहे परंतु तसे नसून मोटार इन्शुरन्स हा मोटार सायकल,कार,जीप तसेच इतर व्यावसायिक वाहने यांच्याशी देखील संबंधित आहे.

➡️मोटार इन्शुरन्सचे कोणते प्रकार पडतात ?

What are the types of motor insurance?

१) टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी Two-Wheeler Insurance Policy

२) खाजगी कार इन्शुरन्स पॉलिसी Private car insurance policy

३) कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स Commercial Vehicle Insurance

१) टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी Two-Wheeler Insurance Policy –

टू व्हीलर इन्शुरन्स काढणे बंधनकारक असून यामध्ये मोटर सायकल, स्कुटी यांसारख्या दुचाकी वाहनांचा समावेश होतो. अपघात किंवा इतर काही आपत्ती, आग लागणे किंवा वाहन चोरीला जाणे यामुळे होणारे नुकसान तसेच थर्ड पार्टीला होणारे नुकसान यांसारख्या गोष्टी यामध्ये कव्हर असतात. म्हणजेच यामध्ये अपघाताव्यतिरिक्त इतर मानवनिर्मित असेच निसर्गनिर्मित आपत्ती देखील कवर केल्या जातात.

२) खाजगी कार इन्शुरन्स पॉलिसी Private car insurance policy –

अपघातामुळे होणारे नुकसान तसेच मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित आपत्तीमुळे होणारे नुकसान हे यामध्ये कव्हर असतात. बऱ्याच कंपन्या आता कार विम्या सोबतच वैद्यकीय विमा देखील देतात. जेवढे वेगवेगळे कव्हरेज या इन्शुरन्स मध्ये वाढेल तसतसे प्रीमियम देखील वाढते.

३) कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स Commercial Vehicle Insurance –

कमर्शियल व्हेईकल म्हणजेच जे वाहने वैयक्तिक वापरासाठी न वापरता व्यावसायिक हेतूने वापरली जातात अशी वाहने जसे की बस, ट्रक, ॲम्बुलन्स, कृषी वाहने तसेच हेवी कमर्शियल व्हेईकल्स यांसारख्या इतर काही वाहनांचा समावेश होतो. अपघातामुळे किंवा इतर आपत्तीमुळे आलेल्या नुकसानाची भरपाई या प्रकारामध्ये कव्हर केली जाते.

जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर KuKu FM Discount Code- GVKEO1966कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत-

https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8

➡️मोटार इन्शुरन्स पॉलिसीचे कोणते प्रकार पडतात ?

What are the types of motor insurance policies?

१) थर्ड पार्टी third party 

२) कॉम्प्रेसिव्ह मोटार विमा पॉलिसी comprehensive motor insurance policy

१) थर्ड पार्टी Third party –

थर्ड पार्टी इन्शुरन्स या विम्याच्या प्रकारामध्ये थर्ड पार्टी वाहन किंवा व्यक्ती किंवा इतर मालमत्तेचे नुकसान कव्हर केले जाते.

२) कॉम्प्रेसिव्ह मोटार विमा पॉलिसी comprehensive motor insurance policy –

कॉम्प्रेसिव्ह मोटार विमा पॉलिसी या विमा प्रकारांतर्गत थर्ड पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे नुकसान कव्हर केले जाते त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या वाहनाचे नुकसान हे देखील कव्हर करते. म्हणूनच हा विमा प्रकार महत्त्वाचा आहे.

➡️मोटार विम्याचे फायदे कोणते आहेत ?

Which are benefits of motor insurance ?

– विमा उतरवलेल्या वाहनाचे डॅमेज किंवा इतर नुकसान

– वैयक्तिक अपघात कव्हर

– तृतीय पक्ष दायित्वे

– नो क्लेम बोनस

– कॅशलेस गॅरेजचे मोठे नेटवर्क 

जसे आपण जीवन विमा किंवा इतर इन्शुरन्स काढतो त्याप्रमाणे मोटार इन्शुरन्स काढणे देखील तितकेच गरजेचे आहे.

हे ही वाचा जीवन विमा,आरोग्य विमा,डाक जीवन विमा

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन | एस इ ओ म्हणजे काय ? Search engine optimization information in Marathi

🔍सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन

What is meant by SEO?

What are the types of SEO?

How do I do SEO?

Search engine optimization –

आपण जर आर्टिकल लिहीत असू आणि ते एखाद्या वेबसाईटवर पब्लिश केल्यानंतर सर्च इंजिन मध्ये पहिल्या पेजवर किंवा जास्त वरती ( top searches) कशाप्रकारे रँक करता येईल यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन या प्रक्रियेचा उपयोग केला जातो.

सर्च इंजिन म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहीतच आहे , उदाहरणार्थ, गुगल हे जगामधील सर्वात प्रसिद्ध असे सर्च इंजिन आहे. गुगल प्रमाणेच इतर सर्च इंजिन देखील आहेत जसे की yahoo.

➡️सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय ?

What is search engine optimisation ( SEO ) ?

सर्च इंजिनच्या टॉपला किंवा टॉप पेजेस मध्ये आपली वेबसाईट रँक करण्यासाठी वापरली जाणारी टेक्निक म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन होय.

  आपण जेव्हा एखादा टॉपिक सर्च इंजिन वर उदाहरणार्थ गुगल वर सर्च करतो त्यावेळी सर्वात पहिली जी वेबसाईट येते तिचे एसइओ खूप चांगले केलेले असते असे समजून जायचे ,कारण त्यामुळेच ती वेबसाईट सर्वात वरती दिसत असते.

➡️सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करणे का गरजेचे आहे ?

Why is search engine optimization important ?

   जर तुम्हाला तुमची वेबसाईट सर्च इंजिन वर सर्वात टॉप वर रँक करायची असेल तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करणे गरजेचे आहे.

  जर तुम्ही तुमच्या वेबसाईटवर कंटेंट अगदी छान लिहीत असाल परंतु की वर्ड्स तसेच एसइओ व्यवस्थित नसेल तर तुम्ही लिहिलेला ब्लॉग वाचकांपर्यंत सहजासहजी पोहोचू शकणार नाही म्हणजेच तुमच्या वेबसाईटवर कमी प्रमाणामध्ये ट्राफिक येईल, त्यासाठीच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन योग्यरीत्या करणे गरजेचे असते.

📻 जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर 

KuKu FM Discount Code- GVKEO1966

कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत-

https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8

➡️एस इ ओ चे प्रकार 🪩-

Types of search engine optimization –

एस इ ओ चे दोन प्रकार पडतात –

१ . ऑन पेज एसइओ ( on page SEO ) 

२ . ऑफ पेज एसइओ ( off page SEO ) 

१ . ऑन पेज एसइओ ( on page SEO ) –

   ऑन पेज एसइओ हे वेबसाईटच्या डिझाईन किंवा थीमवर अवलंबून असते. इमेज ऑप्टिमायझेशन, एस इ ओ फ्रेंडली ब्लॉग, वेबसाईटचा लोडिंग टाईम कमीत कमी ठेवणे, की वर्डसचा योग्य रित्या वापर करणे हे काही घटक ऑन पेज सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये येतात.

ऑन पेज सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन कसे करावे ?

How to do on page search engine optimization?

१) टायटल Title –

तुम्ही उत्कृष्टरीत्या लिहिलेल्या ब्लॉग पोस्टला योग्य ते टायटल देणे तितकेच महत्त्वाचे आहे.

टायटल देत असताना की वर्ड चा उपयोग केल्यामुळे तुमचा ब्लॉग सर्च इंजिन वर रँक होण्यासाठी मदत होते.

२) हेडिंग heading –

 ब्लॉग पोस्टच्या हेडिंग मध्ये सुद्धा की वर्डचा उपयोग केल्यामुळे तुमचा ब्लॉग जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.

३) कन्टेन्ट content –

तुम्ही ज्या विषयावर ब्लॉग बनवत आहात त्याबद्दलचा कन्टेन्ट उत्तम रित्या लिहिणे गरजेचे आहे. कंटेंट लिहीत असताना ओरिजनल कन्टेन्ट असणे आवश्यक आहे. जर हा कंटेंट कोणाचा कॉपी केलेला असेल तर कॉपीराईट इशू येऊ शकतो.

४) इमेजेस images –

ब्लॉग पोस्ट लिहीत असताना ठीक ठिकाणी वेगवेगळे इमेजेस वापरणे फायदेशीर ठरू शकते ,कारण असे केल्यामुळे ब्लॉग पोस्ट अधिक आकर्षक दिसते आणि कंटेंट व्यवस्थितरीत्या समजण्यास देखील मदत होते त्यामुळे जास्तीत जास्त वाचक तुमचा ब्लॉग वाचू शकतात.

५) वेबसाईटचा स्पीड website speed –

वेबसाईटचा लोडिंग स्पीड कमीत कमी असणे गरजेचे आहे म्हणजेच एखाद्या युजरने वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर कमीत कमी कालावधीमध्ये वेबसाईट ओपन होणे गरजेचे आहे. जर वेबसाईटवर ओपन होण्यासाठी जास्त कालावधी लागत असेल तर नक्कीच वाचक दुसऱ्या वेबसाईटवर जाण्याची शक्यता असते.

६) इंटरनल लिंक internal link –

इंटरनल लिंक तयार केल्यामुळे सध्या वाचत असलेल्या ब्लॉगमधूनच वाचकांना दुसऱ्या ब्लॉग वर जाता येते. असे झाल्यामुळे तुमचे इतर जे ब्लॉग रँकिंग मध्ये नसतील ते सुद्धा वरती येण्यास सुरुवात होऊ शकते.

२ . ऑफ पेज एसइओ ( off page SEO )  –

  आपण वेबसाईटवर लिहिलेल्या ब्लॉग बद्दल आपल्याला माहिती असते परंतु ही माहिती वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या काही वेबसाईट प्रमोशन टेक्निक वापरतो त्याला ऑफ पेज एस इ ओ म्हटले जाऊ शकते.

   ऑफ पेज एसइओ मुळे वेबसाईट वरील ट्रॅफिक वाढण्यास मदत होते.

ऑफ पेज एस इ ओ कसे करावे ?

How to do off page SEO ?

१) सोशल मीडिया साइट्स social media sites –

सोशल मीडिया साईट हे मार्केटिंग करण्याचे एक उत्तम साधन तयार झाले आहे. विविध सोशल मीडिया साइट्स तसेच सोशल मीडिया ॲप्सचा उपयोग करून तुमची वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली जाऊ शकते.

विविध सोशल मीडिया साईटवर तुमच्या वेबसाईटच्या नावे पेज किंवा अकाउंट तयार करून त्यावर या पोस्ट तुम्ही शेअर करू शकता. उदाहरणार्थ, फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर ,इंस्टाग्राम ,शेअर चाट आणि इतर.

२) फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग साईटस् photo and video sharing sites –

तुमच्या वेबसाईटवर तुम्ही पब्लिश केलेल्या ब्लॉग संदर्भात आकर्षक अशी इमेज किंवा आकर्षक असा व्हिडिओ बनवून अशा साईटवर पब्लिश करू शकता आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या ब्लॉग पोस्टची लिंक देऊ शकता.

उदाहरणार्थ, पिंटरेस्ट, इंस्टाग्राम ,शेअर चॅट, युट्युब आणि इतर.

३) क्वेश्चन अँड अन्सर question and answer –

क्वेश्चन अँड अन्सर या प्रकारच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या ब्लॉगला अनुसरून असतील तर त्या प्रश्नांची उत्तरे देऊन अधिक माहितीसाठी असे लिहून पुढे तुमच्या ब्लॉगची लिंक तुम्ही देऊ शकता.

हे ही वाचा.... प्रिंट ऑन डिमांड बिझनेस कसा करावा ?

Print on demand Business | प्रिंट ऑन डिमांड व्यवसाय

प्रिंट ऑन डिमांड बिजनेस –

What is print on demand business ?

Is a print on demand business profitable ?

How do I start print on demand?

Is it good to start a print on demand business?

Print on demand business –

    सध्या प्रिंट ऑन डिमांड या बिझनेसला बराच वाव आहे. कारण बऱ्याच जणांना कस्टमाईज असे वेगवेगळे डिझाईनचे, वेगवेगळे शब्द ( catchy words ) असलेले तसेच लोगो असलेले शर्ट्स परिधान करायला आवडतात. सध्या प्रिंट ऑन डिमांड हा बिजनेस फक्त शर्ट्स पुरताच मर्यादित राहिलेला नसून सॉक्स ,बॅक पॅक्स, मग,फोन केसेस , बॅग्स यांसारख्या विविध उत्पादनांमध्ये सुद्धा या व्यवसायाला जागा निर्माण झाली आहे. प्रिंट ऑन डिमांड हा व्यवसाय ऑनलाइन इन्कम कमावण्यासाठी उत्तम व्यवसाय आहे.

 चला तर जाणून घेऊयात प्रिंट ऑन डिमांड या व्यवसायाबद्दल अधिक माहिती …

👉 प्रिंट ऑन डिमांड म्हणजे काय ?

What is print on demand ?

प्रिंट ऑन डिमांड म्हणजे ग्राहकांच्या मागणीनुसार तुम्ही कस्टमाईज केलेल्या डिझाइन्स विविध प्रोडक्ट्स वर प्रिंट करून देणे होय.

प्रिंट ऑन डिमांड या व्यवसायामध्ये तुम्ही थेट सप्लायर्स सोबत काम करता. प्रिंट ऑन डिमांड या व्यवसायामध्ये तुमचे सप्लायर अगदी प्रिंटिंग पासून ते ग्राहकापर्यंत प्रॉडक्ट पोचवण्यापर्यंत सर्व बघतात.

▶️स्टेप १ – आपले लक्ष्य ग्राहक ओळखा.

Identify your target customers –

प्रिंट ऑन डिमांड हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मार्केट स्टडी करून कोणते कस्टमर टारगेट करायचे आहेत हे ठरवा आणि त्यानुसार कोणत्या उत्पादनांवर प्रिंट्स करणार आहात याचा देखील निर्णय घेण्यास सोपे जाईल.

▶️स्टेप २ – कोणत्या उत्पादनांवर प्रिंट करणार आहात हे ठरवा.

Decide which products you will print on –

कस्टमाईज डिझाईन प्रिंट करण्यासाठी शर्ट्स ,बॅक पॅक्स, मग,फोन केसेस ,बॅग्स इतक्याच उत्पादनांपुरते मर्यादित राहिलेले नसून ब्लूटूथ स्पीकर्स, योगा मॅट्स, सॉक्स यांसारख्या उत्पादनांची देखील यादी तयार झाली आहे. तुम्ही टारगेटेड कस्टमर्स कोणते निवडले आहेत त्यानुसार उत्पादने देखील ठरवू शकता.

▶️स्टेप ३ – डिझाईन तयार करा

Create design –

प्रिंट ऑन डिमांड हा व्यवसाय पूर्णतः डिझाईन्स वर अवलंबून असल्याकारणाने तुम्हाला ग्राहकांना आवडतील अशा युनिक आणि आकर्षक डिझाईन तयार करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला स्वतःला डिझाईन करणे शक्य नसेल तर तुम्ही प्रोफेशनल डिझाईनर देखील अपॉइंट करू शकता. तुमच्या डिझाईन्स जेवढ्या युनिक आणि आकर्षक असतील त्यानुसार ग्राहकांची संख्या देखील वाढेल.

📻 जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर

KuKu FM Discount Code- GVKEO1966

कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत- https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8

▶️स्टेप ४ – कुठे विक्री करायची ते ठरवा –

Decide where to sell –

जेव्हा तुम्ही प्रिंट ऑन डिमांड हा व्यवसाय करत असता त्यावेळी तुम्ही एक तर स्वतःची वेबसाईट सुरू करून त्यावर सेल करू शकता किंवा इतर ई-कॉमर्स मार्केट प्लेस वर सेल करू शकता.

– जर तुम्ही स्वतःची वेबसाईट तयार करणार असाल तर ती सेटअप करण्यासाठी काही वेळ लागू शकतो तसेच वेबसाईटवर ट्रॅफिक येण्यासाठी देखील काही वेळ लागू शकतो. परंतु जर तुमची स्वतःची वेबसाईट असेल तर तुम्हाला ब्रँडिंग करण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात तसेच मार्केटिंग आणि प्रमोशन्स सुद्धा तुम्ही हव्या त्या पद्धतीने करू शकता.

– जर तुम्ही इतर ई-कॉमर्स मार्केट प्लेस वर सेल करणार असाल तर त्या वेबसाईट आधीच सेटअप झाल्या असल्याकारणाने त्या ठिकाणी ट्रॅफिक सुद्धा जास्त असेल आणि तुम्हाला जास्त सेल मिळण्याचे चान्सेस वाढू शकतात परंतु त्या ठिकाणी ब्रॅण्डिंग करण्यासाठी जास्त संधी उपलब्ध होऊ शकणार नाही.

▶️स्टेप ५ – योग्य सप्लायर निवडा.

Choose right supplier –

प्रिंट ऑन डिमांड हा व्यवसाय सुरू करत असताना योग्य सप्लायरची निवड करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही जो सप्लायर निवडाल तो विश्वासार्ह आणि येणाऱ्या ऑर्डर्स पूर्ण करणारा असावा. सप्लायर हा उच्च दर्जाचे उत्पादने देणारा तसेच कमी शिपिंग चार्जेस घेणारा असावा.

▶️स्टेप ६ – मार्केटिंग 💻

Marketing –

कोणत्याही व्यवसायामध्ये उत्तमरीत्या मार्केटिंग करणे गरजेचे असते. प्रिंट ऑन डिमांड या व्यवसायामध्ये ऑडियन्सला वेबसाईटपर्यंत आणणे आणि त्यानंतर ऑडियन्सचे रूपांतर ग्राहकांमध्ये करणे हे महत्त्वाचे आहे. प्रिंट ऑन डिमांड या व्यवसायामध्ये पुढील काही पद्धती मार्केटिंग साठी उपयोगामध्ये येतात –

– सोशल मीडिया : कोणत्याही व्यवसायासाठी सोशल मीडिया हे मार्केटिंग करण्यासाठी उत्तम माध्यम झाले आहे. प्रिंट ऑन डिमांड या व्यवसायासाठी सुद्धा सोशल मीडिया खूप महत्वपूर्ण आहे. विविध सोशल मीडियावर उत्तमरीत्या मार्केटिंग करून जास्तीत जास्त ग्राहक मिळवले जाऊ शकतात.

हे ही वाचा ….सोशल मीडिया मार्केटिंग

– कन्टेन्ट मार्केटिंग : डिजिटल मार्केटिंग मधील कंटेंट मार्केटिंग हा एक भाग असून सध्या कंटेंट मार्केटिंगला खूप महत्त्व आहे. विविध आर्टिकल्स तसेच प्रॉडक्ट रिव्ह्यूजच्या मदतीने तुम्ही ग्राहकांचा विश्वास संपादन करू शकता.

हे ही वाचा… कन्टेन्ट मार्केटिंग

– इन्फ्ल्यूएन्सर मार्केटिंग : एखाद्या चांगल्या इन्फ्ल्यूएन्सर सोबत कोलाब्रेट करून तुमच्या प्रिंट ऑन डिमांड या व्यवसायाची मार्केटिंग केली जाऊ शकते.

अशाप्रकारे तुम्हाला जर युनिक आणि आकर्षक डिझाईन्स तयार करता येत असतील तर सध्याच्या काळात प्रिंट ऑन डिमांड हा व्यवसाय करणे फायदेशीर ठरू शकते.

कमी गुंतवणुकीमध्ये करता येणारा व्यवसाय – भेटवस्तूंचे दुकान Gift shop | Low cost business idea – Gift shop

Low cost business idea – Gift shop

How to start gift shop ?

What is usually in a gift shop?

How do I start a small gift business?

Is a gift shop a profitable business?

How do I succeed in gift business?

कमी गुंतवणूक व्यवसाय कल्पना – भेटवस्तूंचे दुकान

      अगदी कुठलाही कार्यक्रम असो जसे की लग्न समारंभ, वाढदिवस ,एनिवर्सरी, सक्सेस पार्टी, डोहाळे जेवण, साखरपुडा अशा खास प्रसंगासाठी किंवा कधीकधी काही खास प्रसंग नसेल तरीदेखील एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. आज काल तर भेटवस्तू देण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळेच जर भेटवस्तूंचे दुकान सुरू केले तर फायदेशीर ठरू शकते.

स्टेप १ – व्यवसाय योजना तयार करा –

Create a business plan –

कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना व्यवसाय योजना आखणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणी नक्कीच कमी होतात.

गिफ्ट शॉप सुरू करत असताना व्यवसाय योजनेमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होऊ शकतो जसे की गिफ्ट शॉप कुठे सुरू करायचे, गिफ्ट शॉप साठी कोणते परवाने आवश्यक आहे, गिफ्ट शॉप साठी किती गुंतवणूक करायची, उपलब्ध असलेल्या गिफ्टचे रेट काय ठेवायचे, गिफ्ट होलसेल दरात कुठून खरेदी करायचे यांसारख्या विविध प्रश्नांचा समावेश होऊ शकतो.

स्टेप २ – गिफ्ट शॉप उघडण्यासाठी योग्य ते ठिकाण निवडा 

Choose the right place to open a gift shop –

कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना त्यासाठी योग्य ठिकाणे निवडणे महत्त्वाचे आहे.

गिफ्ट शॉप साठी अशी जागा शोधा की ज्या ठिकाणी गर्दी जास्त असेल तसेच घरे दाट असतील, शाळा कॉलेजेस जवळ असतील थोडक्यात काय तर ज्या ठिकाणी ग्राहक वर्ग जास्त असेल अशा ठिकाणी तुम्ही गिफ्ट शॉप सुरू करणे फायद्याचे ठरू शकेल.

ज्या ठिकाणी अगोदरपासूनच जास्त गिफ्ट शॉप आहे अशा ठिकाणी गिफ्ट शॉप सुरू न करता ज्या परिसरामध्ये गिफ्ट शॉप नाही अशा परिसरामध्ये गिफ्ट शॉप सुरू करणे फायद्याचे ठरू शकते.

जर ज्या भागांमध्ये अगोदरपासूनच गिफ्ट शॉप जास्त आहे अशा भागात गिफ्ट शॉप सुरू करायचे असेल तर सुरुवातीचा काळ जरा कठीण जाऊ शकतो परंतू कालांतराने तुमच्या गिफ्ट शॉप मध्ये उपलब्ध असणाऱ्या गिफ्टची कॉलिटी आणि दर लक्षात घेता ग्राहक वर्ग तुमच्याकडे येऊ शकतो.

जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर
KuKu FM Discount Code- GVKEO1966

कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत- https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8

स्टेप ३ – गिफ्ट शॉप सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने

Licenses required to start a gift shop –

कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना काही परवाने आवश्यक असतात. गिफ्ट शॉप सुरू करण्यासाठी पुढील परवान्यांची आवश्यकता आहे –

– व्यवसायाचे नाव नोंदणी

– व्यवसाय परवाना

– टीआयएन

– ऑक्यूपंसी प्रमाणपत्र 

स्टेप ४ – योग्य होलसेलरची निवड करा

Choose the right wholesaler –

गिफ्ट शॉप सुरू करत असताना सुरुवातीला मार्केटमध्ये कोणत्या होलसेलरकडे कोणत्या भेटवस्तू मिळतात तसेच त्या भेट वस्तूंचा दर काय याबद्दलचा सर्व अभ्यास करा.

आणि नंतर ज्या होलसेलर कडून योग्य त्या दरामध्ये चांगल्या गुणवत्तेच्या आणि विविध व्हरायटी असणाऱ्या भेटवस्तू मिळतील अशा होलसेलर कडून तुम्ही भेटवस्तू खरेदी करू शकता.

हे ही वाचा…..

व्यवसाय वाढ करण्यासाठी काही योजना

स्टेप ५ – भेट वस्तूंचा दर ठरवा –

Determine the price of gift items –

भेट वस्तूंचा दर योग्य ते ठरवणे देखील महत्त्वाचे आहे.

तुम्ही ज्या ठिकाणी गिफ्ट शॉप सुरू करणार आहात त्या एरियानुसार तसेच भेटवस्तूंच्या क्वालिटीनुसार भेटवस्तूंचे दर ठरवू शकता.

स्टेप ६ – गिफ्ट शॉपचे इंटिरियर

Interior of gift shop –

कुठल्याही दुकानाकडे ग्राहक सुरुवातीला त्या दुकानाचे इंटेरियर किंवा भौतिक रचना बघून आकर्षित होतो.

आणि हे तर गिफ्ट शॉप असल्यामुळे याचे इंटेरियर ,फर्निचर आणि लाइटिंग आकर्षक असणे गरजेचे आहे.

स्टेप ७ – गिफ्ट शॉप मध्ये कोणत्या भेटवस्तू ठेवू शकतात –

What gifts can be kept in the gift shop –

तुम्ही तुमच्या गिफ्ट शॉप मध्ये तुमच्या आवडीनुसार तसेच तुम्ही ज्या परिसरामध्ये गिफ्ट शॉप सुरू केले आहे त्या परिसरातील ग्राहकांच्या मागणीनुसार विविध प्रकारच्या भेट वस्तू ठेवू शकता.

विविध प्रकारचे आणि विविध किमतीचे घड्याळे, चॉकलेट्स , मेकअप सामान, पर्सेस, परफ्यूम ,दागिने, सुगंधित मेणबत्त्या, फोटो फ्रेम्स,लहान मुलांच्या खेळण्या, फ्लावर पॉट, विविध प्रकारच्या फ्रेम्स यांसारख्या अनेक भेटवस्तू तुम्ही तुमच्या गिफ्ट शॉप मध्ये ठेवू शकता.

Content marketing | कंटेंट मार्केटींग

Content Marketing –

What is content marketing ?

What are benefits of content marketing ?

What is an example of content marketing?

What are types of content marketing ?

कंटेंट मार्केटिंग –

      आजकाल कुणालाही अगदी कसलीही अडचण आल्यास किंवा काही प्रश्न पडल्यास त्या बद्द्लची अधिक माहिती आपण इंटरनेट वर शोधत असतो.इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या महितीलाच आपण कंटेंट म्हणू शकतो.कंटेंट मार्केटिंग हा एक डिजिटल मार्केटिंगचाच प्रकार असून कंटेंट मार्केटींग द्वारे चांगल्या प्रकारे इन्कम देखील कमावता येतो.तर आज आपण कंटेंट मार्केटिंग बद्द्ल अधिक माहिती जाणून घेणार आहोत …

कंटेंट मार्केटिंग म्हणजे काय ?

What is content marketing ?

कंटेंट मार्केटिंग म्हणजे विविध विषयांवर महत्त्वपूर्ण माहिती लिहून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करणे होय.ही माहिती अगदी ऑफलाईन पद्धतीने प्रकाशित करायची असल्यास वृत्तपत्रे तसेच मासिके यांमध्ये प्रकाशित करू शकतो आणि ऑनलाईन  पद्धतीने विविध वेबसाइट्स वर ब्लॉगच्या स्वरूपात तसेच सोशल मीडिया वर प्रकाशित करू शकतो.कंटेंट हे विविध स्वरूपात जसे की टेक्स्ट,इमेज तसेच व्हिडिओच्या स्वरूपात असू शकते.

     तयार केलेला कंटेंट जास्तीत जास्त वाचकांपर्यंत किंवा ऑडीअन्स पर्यंत पोहचावा यासाठी कंटेंट चांगला असणे आणि ऑडीअन्सला कोणत्या विषयांवर माहिती पाहिजे हे माहीत असणे खूप गरजेचे आहे.

कंटेंट मार्केटिंगचे फायदे –

Benefits of content marketing –

१ . उच्च दर्चाचा कंटेंट असणे खूप महत्त्वाचे आहे.जर तुम्ही तयार करत असलेला कंटेंट चांगला असेल तर नक्कीच तुमच्या वेबसाईट वर किंवा ब्लॉग वर जास्तीत जास्त ऑडीअन्स येतील.जास्तीत जास्त ऑडीअन्स आल्यामुळे वेबसाईटचा रीच वाढेल आणि परिणामी तुमचा इन्कम देखील वाढेल.

२ . सोशल मीडिया जसे की इंस्टाग्राम,फेसबुक ,यूट्यूब यांवर फॉलोवर्स तसेच सबस्क्राएबर्स वाढवण्यासाठी कंटेंट मार्केटींग योग्य रीतीने केली तर नक्कीच फायदेशीर ठरू शकेल.परिणामी इंस्टाग्राम,फेसबुक ,यूट्यूब यांमधून मिळणारा इन्कम देखील वाढेल.

३ . समजा तुमचा एखादा व्यवसाय असेल किंवा एखादी कंपनी असेल तर तुमच्या उत्पादनांची माहिती तसेच सर्विसेसची माहिती तुम्ही तुमच्या वेब साईट वर तसेच सोशल मीडिया वर प्रकाशित करू शकता जेणेकरून तुमचा ग्राहक वर्ग तुमच्या  उत्पादनांबद्दल तसेच सर्विसेस बद्दल अधिक माहिती मिळवू शकेल आणि त्यामुळे ग्राहकाचा तुमच्या ब्रँड बद्दल असणारा विश्वास वाढेल आणि तुमचा ब्रॅण्ड लोकप्रिय होण्यास मदत होईल.

४ . तुम्ही कंटेंट मार्केटिंग करत असल्याने तुम्हाला मिळणाऱ्या ऑर्डर्स तसेच लीड्स जास्त प्रमाणात मिळू शकतील.तसेच ग्राहकांचा थेट तुमच्याशी संपर्क होत असल्याने त्यांना पडत असलेल्या प्रश्नांचे निरसन तुम्ही करू शकाल.

५ . कंटेंट मार्केटिंगमुळे तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचण्यास अधिक मदत होईल आणि त्या व्यवसायामध्ये तुम्ही अधिक लोकप्रिय व्हाल.

कंटेंट मार्केटिंगचे प्रकार –

Types of content marketing –

१ . ब्लॉग ( Blog ) –

समजा एखाद्या विषयाबद्दल किंवा वस्तू बद्दल गूगल वर सर्च केल्या नंतर त्या विषयाबद्दल माहिती गूगल दर्शवते.जी माहिती / content गूगल दर्शवते त्यालाच ब्लॉग असे म्हणू शकतो.म्हणजेच जर तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायाबद्दल किंवा सर्विसेस बद्दल ब्लॉग लिहून वेबसाईट वर प्रकाशित केला तर ग्राहक वर्ग नक्कीच वाढेल.

२ .  व्हिडिओ कंटेंट ( Video content) –

बऱ्याच लोकांना एखाद्या विषया बद्दल माहिती जाणून घ्यायची असल्यास वाचण्या ऐवजी ती माहिती व्हिडीओ स्वरूपात बघण्यास आवडते आणि व्हिडियो मुळे माहिती समजण्यास देखील मदत होते.त्या मुळे तुम्ही व्हिडीओ कंटेंट देखील तयार करू शकतात.

३ . सोशल मीडिया ( Social media ) –

आजकाल बराच वेळ लोक सोशल मीडिया वर घालवताना दिसतात.त्यामुळे सोशल मीडिया जसे की फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्स ॲप यांवर कंटेंट प्रकाशित करून जास्तीत जास्त फॉलोवर्स मिळू शकतात.कंटेंट मार्केटिंगला सोशल मीडिया मध्ये खूप महत्त्व आहे.

४ . इन्फोग्राफिक्स ( Infographics ) –

इन्फोग्राफिक्समुळे डोळ्यांना आकर्षित करणारे आणि  पटकन समजणारे कंटेंट ऑडीअन्सला मिळते.काही प्रक्रिया किंवा आकडेवारी सादर करण्याचे इन्फोग्राफिक्स हे एक चांगले माध्यम आहे.

कंटेंट मार्केटींगचे वरील काही प्रकार असून ह्या व्यतिरिक्त अन्य प्रकार देखील आहेत ते पुढील प्रमाणे –

– ई बुक्स (eBooks)

– युजर जनरेटेड कंटेंट (User-generateed content)

– चेक लिस्ट (Checklists)

– मेम्स ( Memes )

– टेस्टी मोनिअल्स/ रीव्ह्यूज (Testimonials/Reviews)

– इन्फ्लूएन्सरर्स/ पेड ॲड कंटेंट  Influencers/Paid Ad Content

सध्या कंटेंट मार्केटिंगला खूप महत्त्व आहे.

बारावीनंतर करिअर करण्यासाठी काही युनिक ऑप्शन्स | unique career options after 12th

Unique career options after 12th arts, commerce and science  –

Which career is best after 12th arts?

What are the future options in arts?

Which job has highest scope in arts?

Which career is best after 12th commerce?

What are the future options in commerce?

Which job has highest scope in commerce?

Which career is best after 12th science?

What are the future options in science?

Which job has highest scope in science?

बारावी नंतर युनिक करिअर ऑप्शन्स –

    बारावीचे वर्ष अगदी सर्वांच्या जीवनाला कलाटणी देणारे वर्ष असून शैक्षणिक जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे वर्ष मानले जाते ; कारण बारावीनंतरच आपण कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर बनवणार आहोत हे ठरते आणि आपले भविष्य देखील त्यावरच अवलंबून असते. दहावी झाल्यानंतर काही विद्यार्थी आर्ट्स घेतात ,काही कॉमर्स घेतात तर काही सायन्स घेतात तर काही डिप्लोमा किंवा इतर काही कोर्सेस कडे वळतात. बारावी झाल्यानंतर काही निवडकच पदव्यांची नावे आपल्याला माहीत असतात आणि त्यामध्येच करिअर करायचे आपण ठरवतो परंतु काही अशी क्षेत्रे आहेत ज्यामध्ये सुद्धा आपण यशस्वीरित्या करिअर करू शकतो.

    तर आज आपण अशा काही युनिक करिअर ऑप्शन्स बद्दल जाणून घेणार आहोत की जे बारावी झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी उपयुक्त ठरतील. चला तर मग सुरुवात करूयात….

Unique career options after 12th arts –

बारावी आर्ट्स नंतर युनिक करिअर ऑप्शन्स –

१ . इव्हेंट मॅनेजमेंट ( Event management ) –

– सध्या इव्हेंट मॅनेजमेंटला खूप महत्त्व आहे. आज-काल अगदी कुठलाही कार्यक्रम असो जसे की लग्न, एंगेजमेंट, डोहाळे जेवण, ॲनिवरसरी ,सेलिब्रेशन पार्टी ,सक्सेस पार्टी असे विविध कार्यक्रम एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून ऑर्गनाईज करून घेतले जातात जेणेकरून वेळेची बचत व्हावी आणि कार्यक्रमाचा आनंद घेता यावा.

– बारावीनंतर तीन वर्षासाठी फुल टाईम मॅनेजमेंट कोर्स करू शकतात.

– इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स केल्यानंतर पुढील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत :

– इव्हेंट प्लॅनर Event Planner

– एक्झिबिशन ऑर्गनायझर Exhibition Organiser

– वेडिंग प्लॅनर Wedding Planner

– स्टेज डेकोरेटर Stage decorator

– इव्हेंट मॅनेजर Event Manager

२ . बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ( Bachelor of hotel management ) –

    सध्या हॉटेल मॅनेजमेंटला देखील बराच स्कोप आहे. बॅचलर्स ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हा बारावी नंतरचा तीन ते चार वर्षाचा पदवी कोर्स आहे. बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या कोर्सच्या दरम्यान विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन स्किल्स, कस्टमर सर्विस स्किल्स तसेच आदरातिथ्य आणि इतर आवश्यक कौशल्य शिकवली जातात.

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केल्यानंतर पुढील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत :

– हॉटेल मॅनेजर Hotel Manager

– ऍकोमोडेशन मॅनेजर Accommodation Manager

– फूड अँड बेवरेज मॅनेजर Food and Beverage Manager

– एरिया रिटेल मॅनेजर Area Retail Manager

-जनरल मॅनेजर  General Manager

– मीटिंग अँड इव्हेंट प्लॅनर Meeting & Event Planner

– फूड अँड सर्विस मॅनेजर Food and Service Manager

– केटरिंग ऑफिसर Catering officer

– सेल्स मॅनेजर Sales Manager

– ह्यूमन रिसोर्स असिस्टंट Human Resource Assistant

३ . बॅचलर्स इन फॅशन डिझायनिंग ( Bachelors in fashion designing ) –

  सध्या फॅशन जगतात नवनवीन क्रिएटिव गोष्टी बघण्यास मिळतात. बारावीनंतर बॅचलर्स इन फॅशन डिझाइनिंग हा तीन ते चार वर्षाचा पदवी कोर्स आहे. ज्यांना फॅशन इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स खूप उपयुक्त आहे. कपडे, ज्वेलरी तसेच फुटवेअर यांसारख्या गोष्टी डिझाईन कशा करायच्या हे यामध्ये शिकवले जाते.

बॅचलर्स इन फॅशन डिझायनिंग हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी उपलब्ध आहेत :

 – फॅशन डिझायनर Fashion Designer

– डिझाईन मॅनेजर Design Manager

– फॅशन स्टायलिस्ट Fashion Stylist

– फॅशन कन्सल्टंट Fashion consultant

– टेक्स्टाईल डिझायनर Textile designer

– गारमेंटस् सॅम्पल कॉर्डिनेटर Garments sample coordinator

४ . ॲनिमेटर ( Animator ) –

बारावीनंतर करण्यासाठी युनिक कोर्स पैकी एक कोर्स म्हणजे ॲनिमेशन. बारावीनंतर BCA / BFA (Animation)/ B. Sc Animation या डिग्री मिळवून ॲनिमेशन क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर बनवू शकता. तुम्ही ॲनिमेटर म्हणून व्हिज्युअल आणि ग्राफिकल सामग्री डिझाइन आणि विकसित करू शकता.टेलिव्हिजन वर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती तसेच इतर शोज, मुव्हीज यांसाठी तसेच विविध वेबसाइट्स, सोशल मीडिया ,गेम्स या एरियामध्ये तुम्ही काम करू शकता.

५ . फोटोग्राफी ( Photography ) –

फोटोग्राफी मध्ये सुद्धा उत्तम करिअर करता येऊ शकते.बारावीनंतर फोटोग्राफीसाठी सुद्धा विविध कोर्सेस उपलब्ध आहेत ते पुढील प्रमाणे –

– BA/BA (Hons) in Photography

– BA/BA (Hons) in Fashion Photography

– BA/BA (Hons) in Photojournalism

– Bachelor’s in Image Arts – Photography Studies

– Diploma in Digital Photography & Imaging

– Associate Degree in Photography

– BFA in Photography

– Bachelor’s in Photography

– Masters in Fashion Photography & Film

– MFA in Studio Arts – Photography

– MA Photography

वरील काही कोर्सेस बारावी आर्ट च्या विद्यार्थ्यांसोबतच बारावी कॉमर्स आणि बारावी सायन्सचे विद्यार्थी सुद्धा करू शकतात.

जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर

KuKu FM Discount Code- GVKEO1966

कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत- https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8

Unique career options after 12th commerce –

बारावी कॉमर्स नंतर काही युनिक करिअर ऑप्शन्स –

१ . फॉरेन लँग्वेजेस कोर्सेस Foreign Language Courses –

बारावी झाल्यानंतर तुम्ही फुल टाइम फॉरेन लँग्वेजेस कोर्सेस जसे की जपानीज, स्पॅनिश, जर्मन यांसारख्या कित्येक फॉरेन लँग्वेजेसचे कोर्सेस करू शकता. या क्षेत्रामध्ये नोकरीच्या पुढील संधी उपलब्ध आहेत –

– फॉरेन लँग्वेज इन्स्ट्रक्टर Foreign Language 

– इन्स्ट्रक्टर Instructor

– ट्रान्सलेटरTranslator

– कंटेंट एडिटर Content Editor

– स्क्रीन रायटर Screenwriter

२ . डिप्लोमा इन फिल्म मेकिंग  Diploma in Film Making –

बारावीनंतर फिल्म मेकिंग मध्ये डिप्लोमा करून पुढील संधी उपलब्ध आहेत –

– कॅमेरा प्रोडक्शन असिस्टंट Camera Production Assistant

– मोशन कंट्रोल ऑपरेटर Motion Control Operator

– कॅमेरा ऑपरेटर Camera Operator

– कॅमेरा असिस्टंट Camera Assistant

३ . थ्रीडी ॲनिमेशन अँड व्ही एफ एक्स 3D Animation & VFX –

सध्या डिजिटल मार्केटिंगचे युग असल्याकारणाने थ्रीडी ॲनिमेशन आणि व्ही एफ एक्सला खूप स्कोप आहे. अगदी अकरावी आणि बारावी कुठल्याही स्ट्रीम मध्ये म्हणजे आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स मध्ये केलेली असली तरी सुद्धा हा कोर्स करता येऊ शकतो.

४ . केबिन क्रू ट्रेनिंग कोर्स  Cabin Crew Training Course –

बारावीनंतर बरेच असे कोर्सेस असतात की त्याबद्दल आपल्याला माहिती नसते त्यापैकीच एक म्हणजे केबिन क्रू ट्रेनिंग कोर्स.

– डिप्लोमा इन एव्हिएशन मॅनेजमेंट Diploma in Aviation Management

– डिप्लोमा इन हॉस्पिटॅलीटी अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट Diploma in Hospitality and Travel Management

– डिप्लोमा इन फ्लाईट अटेंडंट ट्रेनिंग Diploma in Flight Attendant Training

– डिप्लोमा इन एअर होस्टेस ट्रेनिंग Diploma in Air Hostess Training

५ . बॅचलर्स इन ट्रॅव्हल अँड टुरिझम Bachelors in Travel and Tourism –

बारावीनंतर करण्यासाठी बॅचलर्स इन ट्रॅव्हल अँड टुरिझम हा देखील एक युनिक कोर्स आहे. यामध्ये पुढील काही करिअर करण्यासाठी संधी उपलब्ध आहे –

– टुरिझम ऑफिसर Tourism officer

– टूर मॅनेजर Tour manager

– ट्रॅव्हल गाईड Travel host/guide

– ट्रॅव्हल एजंट Travel agent

– केबिन क्रु Cabin crew

– ट्रॅव्हल कन्सल्टंट Travel consultant

– ट्रॅव्हल एजन्सी मॅनेजर Travel agency manager

बारावी सायन्स नंतर युनिक करिअर ऑप्शन्स –

Unique career options after 12th science –

१ . न्यूट्रिशनीस्ट किंवा डायटीशन Nutritionist / Dietitian –

सध्या लोकांमध्ये फिटनेस बद्दल अधिकाधिक जागरूकता निर्माण होत असल्याने न्यूट्रिशनीस्ट किंवा डायटीशन बनणे फायदेशीर ठरू शकते.

B.Sc in Nutrition and Dietetics किंवा B.Sc in Home science करून न्यूट्रिशनीस्ट किंवा डायटीशन बनता येऊ शकते.

२ . फूड टेक्नॉलॉजीस्ट  Food Technologist –

फूड टेक्नॉलॉजीस्ट हा देखील बारावी सायन्स नंतर करिअर करण्यासाठी युनिक ऑप्शन आहे.BSc degree in Food Science किंवा B.Tech in Food Engineering करून तुम्ही फूड टेक्नॉलॉजिस्ट बनू शकता.

३ . डेटा सायंटिस्ट Data Scientist –

डेटा सायंटिस्ट बनण्यासाठी तुम्हाला B.Sc degree in computer science किंवा data science artificial intelligence यामधून डिग्री घ्यावी लागेल. बऱ्याच कंपन्यांमध्ये डेटा सायंटिस्टची प्रचंड मागणी आहे.

४ . ब्लॉकचेन सोल्युशन्स आर्किटेक्ट/ब्लॉकचेन अभियंता Blockchain Solutions Architect/ Blockchain Engineer –

ब्लॉकचेन सोल्युशन्स आर्किटेक्ट/ब्लॉकचेन अभियंता  बनण्यासाठी बीएस्सी किंवा बी.टेक कॉम्प्युटर सायन्स मधून डिग्री मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर डेटा सायन्स, मशीन लर्निंग यांसारख्या संबंधित क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण देखील घेता येऊ शकते.

५ . सिरॅमिक अँड ग्लास डिझाईनिंग Ceramic and Glass Designing –

बारावी सायन्स केल्यानंतर सिरॅमिक अँड ग्लास डिझाईनिंग यामधील शिक्षण घेऊन करिअर करण्यासाठी पुढील संधी उपलब्ध आहेत –

– सिरॅमिक्स इंजिनिअर Ceramics Engineer

– सिरॅमिक्स अँड ग्लास डिझायनर Ceramics and Glass Designer

– ग्लास इंजिनिअर अँड टेक्निशियन Glass Engineer and Technician

– सिरॅमिस्ट Ceramist

( या लेखामध्ये दिलेले काही कोर्सेस असे आहेत की जे बारावी आर्ट्स ,कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही स्ट्रीम मधील विद्यार्थी करू शकतात.)

आर्टिफिशल ज्वेलरी व्यवसाय | Artificial Jewellery Business

आर्टिफिशल ज्वेलरी व्यवसाय –

Is artificial jewellery a profitable business?

How to start jewellery business at home?

How to start a jewellery business?

Artificial jewellery business –

    स्त्रियांना काही खास प्रसंगासोबतच अगदी दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ज्वेलरी परिधान करायला आवडत असते. आपल्या भारत देशामध्ये दागिने सोने ,चांदी ,हिरे तसेच तांबे यांसारख्या विविध धातूंपासून बनवले जातात. परंतु सोन्या चांदी पासून किंवा हिऱ्यापासून बनवलेले दागिने महाग असल्याकारणाने तसेच चोरीची संख्या वाढल्याने दागिने घालणे अवघड झाले आहे. आणि म्हणूनच आर्टिफिशल ज्वेलरी परिधान करणे महिला तसेच पुरुष पसंत करतात. आर्टिफिशल ज्वेलरी दिसायला देखील आकर्षक असते तसेच अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये आकर्षक डिझाईन्स मिळतात तसेच चोरीची भीती देखील राहत नाही. आज-काल आर्टिफिशल ज्वेलरी परिधान करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे त्यामुळे आर्टिफिशल ज्वेलरी व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरू शकते.

स्टेप १ – व्यवसाय योजना तयार करा.

Create a business plan – 

कुठलाही व्यवसाय सुरू करताना बिजनेस प्लॅन तयार करणे महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच आर्टिफिशियल ज्वेलरीचा व्यवसाय सुरू करताना देखील व्यवसाय योजना तयार करा.

व्यवसाय योजना तयार करत असताना त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होऊ शकतो –

तुम्ही स्वतः ज्वेलरी डिझाईन करणार आहात की एखाद्या होलसेलर करून ज्वेलरी विकत घेणार आहात ?

आर्टिफिशल ज्वेलरीचा व्यवसाय कुठे सुरू करणार आहात ?

आर्टिफिशल ज्वेलरी व्यवसायासाठी किती गुंतवणूक करणार आहात ?

आर्टिफिशल ज्वेलरी किती किमतीमध्ये विकणार आहात ? आर्टिफिशल ज्वेलरीची मार्केटिंग कशी करणार आहात ?

आर्टिफिशल ज्वेलरी साठी तुमचे लक्ष्य ग्राहक कोण असणार आहे ?

स्टेप २ – आर्टिफिशल ज्वेलरी व्यवसायासाठी योग्य ठिकाण निवडा.

Choose right location for artificial jewellery business –

जर तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये आर्टिफिशल ज्वेलरीचा व्यवसाय सुरू करणार असाल तर अगदी घरून सुद्धा हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. जर तुम्ही या व्यवसायासाठी जास्त गुंतवणूक करू इच्छित असाल तर एखाद्या चांगल्या ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच ज्या ठिकाणी ग्राहक जास्तीत जास्त असतील अशा ठिकाणी जागा भाड्याने घेऊन किंवा तुमची स्वतःची जागा असेल तर त्या ठिकाणी हा व्यवसाय उभारू शकता.

जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर

KuKu FM Discount Code- GVKEO1966

कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत- https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8

स्टेप ३ – दागिने स्वतः डिझाईन करणार की होलसेलर कडून विकत घेणार हे ठरवा –

Decide whether to design the jewelery yourself or buy it from a wholesaler –

– आर्टिफिशल ज्वेलरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आर्टिफिशल ज्वेलरी तुम्ही स्वतः डिझाईन करणार की एखाद्या होलसेलर कडून वेगवेगळ्या डिझाईनच्या ज्वेलरी विकत घेणार हे ठरवा.

– जर तुम्ही स्वतः आर्टिफिशल ज्वेलरी डिझाईन करणार असाल तर इतरांपेक्षा तुमच्या डिझाइन्स कशा वेगळ्या आणि आकर्षक असतील याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या.

– आणि जर आर्टिफिशल ज्वेलरी तुम्ही होलसेलर कडून खरेदी करणार असाल तर कोणत्या होलसेलर कडून कमी दरामध्ये चांगल्या क्वालिटीची आर्टिफिशल ज्वेलरी मिळेल हे शोधा आणि तिथून आर्टिफिशल ज्वेलरी खरेदी करून योग्य त्या दरामध्ये ग्राहकांना विका.

स्टेप ४ – आर्टिफिशल ज्वेलरी व्यवसायाची मार्केटिंग कशी करावी –

How to market an artificial jewellery business –

– आर्टिफिशल ज्वेलरी व्यवसायाची मार्केटिंग ऑफलाइन तसेच ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकते. सुरुवातीला ज्यावेळी व्यवसाय सुरू करणार आहात त्यावेळी पॅम्प्लेट्स छापून ते ठिकठिकाणी वाटू शकता तसेच ठीक ठिकाणी बॅनर्स देखील लावू शकता.

– जर समजा तुम्ही तुमचा आर्टिफिशल ज्वेलरीचा व्यवसाय वाढवण्यासाठी मार्केटिंग मध्ये अधिक खर्च करणार असाल  तर आर्टिफिशल ज्वेलरीची जाहिरात करण्यासाठी वर्तमानपत्रे, रेडिओ तसेच टीव्ही या माध्यमांचा उपयोग करू शकता.

– आर्टिफिशल ज्वेलरीची जाहिरात करण्यासाठी सोशल मीडिया जसे की व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच युट्युबचा वापर करू शकता.

– आर्टिफिशियल ज्वेलरी  विकण्यासाठी तुम्ही तुमची स्वतःची वेबसाईट सुरू करू शकता तसेच इतर ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत त्यावर देखील तुमची आर्टिफिशियल ज्वेलरी बद्दलची माहिती अपलोड करू शकता आणि तेथून देखील ऑनलाइन ऑर्डर्स मिळवू शकतात.

ब्लॉग रायटिंग | Blog writing

ब्लॉग राइटिंग –

Blog writing –

What is Blog writing ?

How do you write a blog?

Where do I start a blog?

What makes a good blog?

      बऱ्याच व्यक्तींना फुल टाईम नोकरी करणे काही कारणास्तव शक्य नसते अशावेळी अगदी घरून सुद्धा इनकम मिळवण्याचे काही मार्ग आहेत. त्यापैकीच एक मार्ग म्हणजे ब्लॉग राइटिंग.आज-काल ब्लॉग रायटिंगला बराच स्कोप आहे. चला तर जाणून घेऊयात ब्लॉग राइटिंग बद्दल सविस्तर माहिती …

ब्लॉग रायटिंग म्हणजे काय ?

What is Blog writing ?

ब्लॉग रायटिंग म्हणजे लेख किंवा बातमी किंवा एखाद्या विषया संबंधित माहिती लिहून वेबसाईटवर प्रकाशित करणे होय.

      ब्लॉग लिहीत असताना त्यामध्ये इमेजेस, व्हिडिओज, इन्फोग्राफिक्स तसेच चार्ट्स त्यामध्ये ऍड करून ब्लॉग अधिक आकर्षक बनवू शकतो.

       काही वर्षांपूर्वी एखाद्या लेखक किंवा लेखिकेला त्यांनी लिहिलेले लेख किंवा इतर विषयासंबंधात काही माहिती प्रकाशित करायचे असल्यास वर्तमानपत्रे, मासिके यांसारख्या माध्यमांचा उपयोग करावा लागत असे परंतु सध्या इंटरनेटमुळे अगदी कुणालाही स्वतःचे मत मांडण्यासाठी किंवा अनुभव इतर लोकांशी शेअर करण्यासाठी किंवा लेख किंवा इतर काही विषयासंबंधातील माहिती प्रकाशित करण्यासाठी इतर कुणावरही अवलंबून न राहता स्वतःची वेबसाईट सुरू करून त्यावर हे प्रसिद्ध केले जाऊ शकते.

ब्लॉगर म्हणजे काय ?

What is blogger ?

ब्लॉगर म्हणजे अशी व्यक्ती जी एखाद्या विषयासंदर्भात किंवा निरनिराळ्या विषयांवर लेख लिहून वेबसाईटवर प्रकाशित करते.

ब्लॉग लिहिण्यासाठी किंवा ब्लॉगर बनण्यासाठी पुढील काही पायऱ्या महत्त्वाच्या आहेत.

स्टेप १  – तुमच्या वाचकाला किंवा ऑडियन्सला समजून घ्या.

Understand your reader or audience –

– वेबसाईट सुरू करण्यापूर्वी किंवा ब्लॉग लिहिण्यापूर्वी तुम्हाला कुठल्या विषयावर ब्लॉग लिहायचा आहे हे ठरवा.

– तसेच तुमचे जे वाचक किंवा ऑडियन्स असणार आहेत त्यांना कोणत्या विषयासंदर्भात अधिक माहिती वाचायला आवडेल हे जाणून घेण्यासाठी रिसर्च करा.

– रिसर्च केल्यानंतर ज्या विषयावर ब्लॉग लिहायचे आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

– एकदा की त्या विषयाबद्दल माहिती मिळाली की त्यानंतर त्या विषयावर तुम्ही चांगल्या पद्धतीने ब्लॉग लिहू शकता.

स्टेप २ – तुमचे स्पर्धक ओळखा –

Know your competitors –

– एकदा की ब्लॉग लिहिण्यासाठी विषय निवडला की त्यानंतर तुम्ही जो विषय निवडला आहे त्यावर अजून कोणी लेख लिहिलेले आहे याबद्दल रिसर्च करा.

– तसेच त्यांच्या स्ट्रॅटेजीज ओळखा.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्ट्रॉंग स्पर्धक असतो, अशावेळी ती व्यक्ती देखील स्ट्रॉंग बनत चालते , त्याचप्रमाणे ब्लॉग लिहीत असताना देखील समोर जर स्ट्रॉंग स्पर्धक असेल तर तुम्ही लिहीत असलेला ब्लॉक देखील अधिक चांगल्या प्रकारे आणि आकर्षक लिहू शकता.

स्टेप ३ – कीवर्ड रिसर्च

Keyword Research –

– कीवर्ड रिसर्च केल्यामुळे ऑडियन्सला किंवा वाचकांना कोणत्या विषयासंदर्भात माहिती वाचायला अधिक आवडते याबद्दलची माहिती आपणास मिळते.

– ऑडियन्स किंवा वाचकांना ज्या विषयाबद्दल माहिती जाणून घेणे आवडते असे विषय तुम्ही ब्लॉग लिहिण्यासाठी निवडा.

– असे विषय निवडल्यामुळे तुम्ही लिहिलेला ब्लॉग अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचेल म्हणजेच ऑडियन्स रिच वाढेल आणि तुमच्या वेबसाईटवर जास्तीत जास्त ट्राफिक येण्यास मदत होईल.

जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर 

KuKu FM Discount Code- GVKEO1966

कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत- https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8

स्टेप ४ – ब्लॉगला योग्य ते नाव द्या.

Give the blog an appropriate name –

ब्लॉग लिहून झाल्यानंतर त्या ब्लॉगला आकर्षक नाव देणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे जेणेकरून फक्त ब्लॉगचे शीर्षक वाचूनच वाचक ब्लॉग वाचू लागेल.

स्टेप ५ – तुमचे ब्लॉग डोमेन तयार करा

Create your blog domain –

डोमेन हा वेब ऍड्रेस नामांकनाचा ( web address nomenclature )  एक भाग असून तुमची वेबसाइट किंवा तुमच्या वेबसाइटचे पृष्ठ (page ) ऑनलाइन शोधण्यासाठी होतो.

पुढे काही वेब होस्टिंग सर्विसेस दिलेल्या आहेत –

– godaddy

– dreamhost

– ipage

– hostGator

ब्लॉग सुरू करण्यासाठी इतर काही प्लॅटफॉर्म पुढील प्रमाणे –

– WordPress

– Blogger

– Wix 

स्टेप ६ – तुमचा ब्लॉग योग्य रीतीने कस्टमाईज करा.

Customise your blog –

– एकदा की वेबसाईट तयार झाली आणि ब्लॉग लिहून झाला की त्यानंतर आकर्षक अशी थीम निवडा तसेच ब्लॉग देखील योग्य रीतीने कस्टमाईज करा.

–  ब्लॉग एडिटिंग देखील योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे.

ब्लॉगमध्ये आकर्षक असे इमेजेस तसेच व्हिडिओज देखील ऍड केले जाऊ शकतात, असे केल्यामुळे ब्लॉग मधील माहिती समजणे सोपे जाईल आणि ब्लॉग देखील अधिक आकर्षक बनेल.

मसाल्यांचा व्यवसाय | Spices business

मसाल्यांचा व्यवसाय –

Is a spice business profitable?

How do I start a spices business?

How can I sell spices in India?

Spices business –

    आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंबहुना वेगवेगळ्या गावानुसार तसेच वेगवेगळ्या परिसरानुसार वेगवेगळ्या पद्धतीचे स्वादिष्ट असे जेवण बनवले जाते आणि हे जेवण बनवत असताना त्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे मसाले घातले जातात त्यामुळे जेवणाला अधिक स्वादिष्ट चव प्राप्त होते. भारतीय मसाल्यांमुळे जेवण तर स्वादिष्ट बनते त्याचबरोबर काही मसाले औषधी सुद्धा आहे. सामान्यतः भारतीय जेवण बनवत असताना हळद पावडर, मिरची पावडर धने पावडर, जिरे पावडर तसेच इतर खडे मसाले जसे की तमालपत्र, दालचिनी, मिरे यांसारख्या अनेक मसाल्यांचा समावेश होतो. भारत देश हा मसाल्यांचा उत्पादक असून निर्यातदार देखील आहे त्यामुळे जर मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला तर नक्कीच फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो.

स्टेप १ : मसाल्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय योजना तयार करा –

Create a business plan –

कुठलाही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यवसाय योजना तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे व्यवसायात भविष्यामध्ये येणाऱ्या बऱ्याचशा अडचणी कमी होतात आणि म्हणूनच मसाल्यांचा व्यवसाय सुरू करत असताना व्यवसाय योजना तयार करा.

या व्यवसाय योजनेमध्ये पुढील काही गोष्टींचा समावेश होईल जसे की हा व्यवसाय तुम्ही कुठे सुरू करणार आहात, मसाल्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणते परवाने आवश्यक आहेत, मसाल्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या मशिनरी लागतील, मसाल्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणता कच्चामाल लागेल यांसारख्या विविध प्रश्नांचा समावेश यामध्ये होऊ शकतो.

स्टेप २ – मसाल्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य ठिकाण निवडा.

Choose right location to start spices business –

तुम्हाला जर कमी गुंतवणुकीमध्ये मसाल्यांचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सुरुवातीला अगदी तुमच्या घरामधूनच मसाल्यांचा व्यवसाय सुरू करू शकता आणि कालांतराने जसजशी या व्यवसायामध्ये वाढ होईल त्यानुसार गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच ज्या ठिकाणी जास्तीत जास्त ग्राहक मिळतील अशा ठिकाणी जागा भाड्याने घेऊन किंवा तुमची स्वतःची जागा असेल तर त्या ठिकाणी हा व्यवसाय उभारू शकता.

मसाल्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मशिन्स ठेवण्यासाठी पुरेशी जागा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर

KuKu FM Discount Code- GVKEO1966

कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत- https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8

स्टेप ३ – मसाल्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणते परवाने आवश्यक आहेत –

Licence required to start spices business –

१ . रजिस्ट्रार ऑफ फर्म्स (ROF) सह नोंदणी

२ . व्यापार परवाना ( Trade License )

३ . एमएसएमई नोंदणी ( MSME registration )

४ . उद्योग आधार ( Udyog Aadhar )

५ . खाद्य व्यवसाय परवाना / FSSAI परवाना 

६ . आयात निर्यात कोड (Import Export Code) –

तुम्हाला जर जागतिक बाजारपेठेमध्ये मसाले निर्यात करायचे असतील तर इम्पोर्ट एक्स्पोर्ट कोड आवश्यक असेल.

स्टेप ४ – मसाल्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मशिन्स –

Machines required to start spice business –

मसाल्यांचा व्यवसाय सुरू करत असताना योग्य त्या मशीनची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मसाल्यांचे पावडर स्वरूपामध्ये रूपांतरण करण्यासाठी पुढील मशीन उपयुक्त ठरतील –

१ . ग्राइंडिंग मशीन (Grinding machine)

२ . इम्पॅक्ट पल्व्हरायझर (Impact pulverizer)

३ . डबल स्टेज पल्व्हरायझर (Double stage pulverizer)

 ४ . हॅमरमिल मसाला (Hammermill)

५ . गिरणी (Spice mill)

६ . पाउंडिंग मशीन ( Pounding machine )

मसाले पावडर व्यवसायासाठी इतर काही उपयुक्त मशीन पुढील प्रमाणे –

 १ . कंप्रेसर ( Compressor )

२ . विघटन करणारा (Disintegrator)

३ . हिट सीलिंग मशीन (Heat sealing machine)

४ . पॅकेजिंग मशीन (Packaging machine)

५ . रोस्टर (Roster)

६ . चाळणी (Sieves)

 ७ . मसाला ग्राइंडर (Spice grinder)

८ . वजनकाटा (Weighing scale)

स्टेप ५ : कच्चामाल खरेदी करणे

Buying raw materials –

योग्य त्या ठिकाणाहून योग्य त्या किमतीमध्ये कच्चामाल खरेदी करणे आवश्यक आहे.

मसाला व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढील काही कच्चामाल आवश्यक आहे, परंतु तुम्ही ज्या पद्धतीचे मसाले बनवणार आहात त्यानुसार कच्च्या मालामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये फरक आढळू शकतो त्यानुसार तुम्ही कच्च्या मालाची खरेदी करावी.

– हळद (Turmeric)

– परवानगी असलेले किंवा अन्न-दर्जाचे पॅकिंग साहित्य (Permitted or food-grade Packing materials)

– मिरची (Chillies)

– मोहरी (Mustard)

– मिरी (Pepper)

– कोथिंबीर (Coriander)

– परवानगी असलेले खाद्य रंग आणि संरक्षक (Permitted food color and preservative)

– खसखस (Poppyseed)

– जिरे (Cumin)

– मोहरी (Mustard)

स्टेप ५ : मार्केटिंग

Marketing –

१ . तुम्ही तयार करत असलेल्या मसाल्यांची मार्केटिंग करण्यासाठी पारंपारिक मार्केटिंग पद्धती म्हणजे पॅम्प्लेट छापून त्यांचे वाटप करणे तसेच वृत्तपत्रे रेडिओ टीव्ही यावर जाहिरात देणे तसेच ठिकठिकाणी बॅनर्स लावणे. या विविध पद्धतींचा उपयोग तुम्ही करू शकता.

२ . तसेच सोशल मीडियाचा म्हणजेच इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअप यावर तुम्ही तयार करत असलेल्या मसाल्यांची जाहिरात करून त्याबद्दल जास्तीत जास्त प्रचार ग्राहकांपर्यंत करू शकता.

३ . तसेच सुपर मार्केट ,किराणा ,दुकान ,मॉल ,हॉटेल्स ,खानावळी या ठिकाणी विजिट करून देखील मसाल्यांच्या मोठमोठ्या ऑर्डर्स मिळवू शकता.

४ . तसेच एखाद्या कुकिंग चॅनल सोबत पार्टनरशिप करून सुद्धा तुमच्या मसाल्यांची विक्री वाढवू शकता.

५ . तुम्ही बनवत असलेले मसाले भारताबाहेर सुद्धा तुम्ही निर्यात करू शकता.

अशाप्रकारे भारतामध्ये मसाल्यांची मागणी कधीही कमी होणारी नसून मसाल्यांचा व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरू शकते.

बारावीनंतर या क्षेत्रांमध्ये करिअरच्या नवीन संधी | New career opportunities in these fields after 12th

बारावीनंतर या क्षेत्रांमध्ये करिअरच्या नवीन संधी –

Which is the best course after 12th?

What is the best opportunity after 12th?

How many opportunities are there after 12th?

What is the scope after 12th?

How can I get a fast job after 12th?

New career opportunities in these fields after 12th –

    अगदी लहानपणापासूनच शिक्षण घेत असताना आपल्या सर्वांना माहीत असते की दहावी आणि बारावी हे आपल्या आयुष्यामधील महत्त्वाचे टप्पे आहेत. बारावीनंतर आपण कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो हे ठरते. करिअरच्या दृष्टीने काही स्वप्न आपण लहानपणापासूनच बघितलेले असते आणि त्या दृष्टीने शिक्षणामधील वाटचाल आपण सुरू ठेवतो. बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बारावीनंतर कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करता येईल असा प्रश्न निर्माण होतो तर अशावेळी फक्त वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी यांसारखे करिअर ऑप्शन्स विद्यार्थ्यांना त्यांच्या डोळ्यासमोर दिसतात. हे क्षेत्र तर करिअरच्या दृष्टीने उत्तम आहेतच परंतु त्याचबरोबर बारावीनंतर करिअर घडवण्याच्या दृष्टीने खूप साऱ्या नवनवीन संधी सध्या उपलब्ध आहेत. तर बारावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो, त्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय आपण पुढे बघणार आहोत.

बारावीनंतर करियर घडवता येईल अशा काही नवीन संधी –

Some new career opportunities after 12th –

१. डिजिटल मार्केटिंग ( Digital marketing )

२. रिस्क मॅनेजर ( Risk manager )

३. रेडिओ जॉकी ( Radio jockey )

४. लँग्वेज कोर्सेस ( Language courses )

५. मास्टर ऑफ सोशल वर्क ( MSW – master of social work )

६. पॉलिटिकल ॲनालीसिस ( Political analysis )

बारावीनंतर काही क्रिएटिव्ह क्षेत्रांमध्ये करिअर घडवण्यासाठी कोर्सेस –

Courses to build a career in some creative fields after 12th –

ज्या विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच क्रिएटिव्हिटीची आवड असते त्यांच्या दृष्टीने पुढील कोर्सेस बारावीनंतर नक्कीच महत्त्वपूर्ण आणि क्रिएटिव्ह कोर्सेस ठरणार आहेत. सध्या पुढे दिलेल्या क्रिएटिव्ह कोर्सेस मध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह

 क्षेत्रामध्ये नाव कमवायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पुढील कोर्सेस नक्कीच उपयुक्त आहेत. पुढे दिलेले बरेचसे कोर्सेस ऑफलाइन पद्धती सोबतच ऑनलाईन पद्धतीने देखील करता येऊ शकतात. तसेच पुढे दिलेले बरेचसे कोर्स केल्यानंतर कंपनीमध्ये तर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेतच त्याचबरोबर हे कोर्स केल्यामुळे स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करता येऊ शकतो. पुढे दिलेले कोर्सेस केल्यानंतर अगदी घरून सुद्धा काम करू शकतो आणि त्या क्षेत्रामध्ये  काम करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे वेळेचे बंधन येणार नाही. तर जाणून घेऊयात असे कोणकोणते कोर्स आहेत ….

१ . डिझाईनिंग कोर्सेस ( Designing Courses )

२ . आर्किटेक्चर ( Architecture )

३ . वेब डेव्हलपर ( Web Developer )

४ . इव्हेंट मॅनेजमेंट ( Event Management )

५ . जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन ( Journalism and Mass Communication )

६ . फिल्म मेकिंग ( Film Making )

७ . फोटोग्राफी कोर्सेस ( Photography Courses )

८ . ॲनिमेशन कोर्सेस ( Animation Courses )

९ . रायटिंग ( Writing )

१० . थेटर ( Theatre )

११ . ॲडव्हर्टायझिंग ( Advertising )

१२ . मेकअप आर्टिस्ट ( Makeup Artists )

१३ . आर्ट्स अँड क्राफ्ट्स ( Arts & Crafts )

१४ . म्युझिक ( Music )

Writer – Poonam Ghorpade Gore