Business growth strategies : –
Why is business growth important ?
What are the stages of growth strategies ?
Which are business growth strategies ?
व्यवसाय वाढ करण्यासाठी काही योजना –
कुठलाही व्यवसाय करत असताना त्या व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी योग्य त्या योजना आखणे गरजेचे आहे. यापूर्वी देखील बिजनेस ग्रोथ स्ट्रॅटेजी यावर एक लेख आपल्या #Marathify वेबसाईटवर प्रसिद्ध केलेला आहे त्याची लिंक देखील पुढे दिली जाईल. तो लेख देखील आवर्जून वाचावा.
https://marathify.com/archives/1891
१ . बाजारपेठेंबद्दल तसेच उद्योगाबद्दल संशोधन करा –
आता आज आपण व्यवसाय वाढ करण्यासाठी कोणकोणत्या योजना अवलंबता येतील हे बघणार आहोत.
Research the markets as well as the industry –
तुमच्या आसपासच्या बाजारपेठा तसेच इतर शहरांमधील देखील बाजारपेठांचा तसेच उद्योगधंद्यांचा अभ्यास करा आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे उत्पादने अधिक चालतात हे लक्षात घ्या. तसेच तुमच्या उद्योगाचे सध्याचे असलेले उत्पादन कोण कोणत्या बाजारपेठापर्यंत पोहोचले आहे आणि कोण कोणत्या ठिकाणी पोहोचायचे बाकी आहे हे देखील लक्षात घ्या. तसेच जर तुम्हाला काही नवीन उत्पादन मार्केटमध्ये आणायचे असेल तर कोणते उत्पादन मार्केटमध्ये आणले पाहिजे हे देखील अशा प्रकारचे संशोधन केल्यानंतर तुमच्या लक्षात येण्यास मदत होईल. या संशोधनामध्ये मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग नक्कीच तुम्हाला सध्याच्या आणि पुढील व्यवसायाच्या प्रवासामध्ये होईल.
२ . कर्मचाऱ्यांची वाढ ( Growth of employees ) –
बाजारपेठेबद्दल तसेच व्यवसायाबद्दल संशोधन केल्यानंतर तुमच्याकडे असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वाढ केली पाहिजे का याचा विचार करून गरजेप्रमाणे कर्मचाऱ्यांमध्ये वाढ देखील केली पाहिजे, जेणेकरून व्यवसाय वाढीमध्ये मदत होईल.
३ . सध्याच्या असणाऱ्या कंपनीच्या जागेमध्ये विस्तार –
Expansion in existing company premises –
सध्या तुमचा व्यवसाय ज्या ठिकाणी सुरू आहे तेथील जागेमध्ये वाढ केली पाहिजे का याचा विचार करून गरजेनुसार कंपनीच्या जागेत तसेच गोडाऊनमध्ये किंवा ऑफिसमध्ये वाढ केली पाहिजे.
४ . नवनवीन ठिकाणी व्यवसाय पोहोचवला पाहिजे –
Business or products should be expanded to new locations –
सध्या तुमच्या कंपनीची उत्पादने किंवा तुमचा व्यवसाय कोण कोणत्या ठिकाणी पोहोचला आहे आणि कोणत्या ठिकाणी पोहोचायचा बाकी आहे याबद्दलची माहिती जमा करून ज्या ठिकाणी तुमची उत्पादने पोहोचलेली नसेल त्या ठिकाणी कोण कोणते मार्ग किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वापरून पोहोचता येईल हे जाणून घेऊन नवीन ठिकाणी व्यवसाय पोहोचवला पाहिजे.
तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या अधिक ब्रांचेस सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी सुरू करू शकता. हळूहळू तुम्ही दुसऱ्या शहरांमध्ये, दुसऱ्या राज्यांमध्ये आणि दुसऱ्या देशांमध्ये देखील विस्तार करण्याबाबत विचार केला पाहिजे.
५ . उत्पादनांमध्ये किंवा सेवेमध्ये वाढ –
Addition of new products and services –
तुम्ही सध्या तयार करत असलेले उत्पादने किंवा देत असलेल्या सेवा यामध्ये वाढ केली पाहिजे का हे लक्षात घेऊन गरजेनुसार तुम्ही तुमच्या कंपनीच्या उत्पादनांची संख्या वाढवू शकता तसेच तुमची कंपनी ज्या काही सर्विसेस ग्राहकांना उपलब्ध करून देत असते त्यामध्ये देखील काही वाढ करता येत असेल तर ते देखील तुम्ही करू शकता.
६ . गुंतवणुकीमध्ये वाढ –
Growth in investment –
तुमच्या कंपनीमध्ये उपलब्ध असलेल्या मशिनरी किंवा इतर काही गोष्टींमध्ये वाढ करणे गरजेचे असेल तर तसे केले पाहिजे. गुंतवणुकीमध्ये जर थोड्याफार प्रमाणात वाढ करून अधिक नफा होणार असेल तर तसे करण्यात काहीच हरकत नाही.
७ . ग्राहकांमध्ये वाढ –
Growth of customers –
तुमच्याकडे सध्या जे ग्राहक आहेत त्या व्यतिरिक्त इतर ग्राहकांना कशाप्रकारे तुमच्या व्यवसायाशी जोडता येईल अशा योजना अमलात आणून अधिकाधिक ग्राहक तुमच्या व्यवसायाशी जोडले पाहिजे. जेवढी ग्राहकांची संख्या जास्त असेल नक्कीच व्यवसायामध्ये देखील तितक्या प्रमाणामध्ये वाढ होण्यामध्ये मदत होईल.
अशाप्रकारे वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास करून तुमच्या व्यवसायामध्ये नक्की कोणत्या गोष्टींमध्ये बदल करणे गरजेचे आहे, त्याप्रमाणे बदल केला तर व्यवसायामध्ये वाढ होऊ शकते.
Writer – Poonam Ghorpade Gore