डार्क पडलेल्या ओठांसाठी काही घरगुती उपाय / home remedies for dark lips 👄 :
#dark lips to pink lips tips
#lips pigmentation removal tips
बऱ्याच कारणांमुळे ओठांचा रंग डार्क दिसू लागतो. त्यातीलच काही कारणे म्हणजे उन्हामध्ये जास्त असणे , ओठ कोरडे पडणे , मेडिसिनचा साइड इफेक्ट , चुकीची जीवन पद्धती तसेच स्मोकिंगची किंवा अल्कोहोल घेण्याची सवय असणे ही आहेत. तर डार्क पडलेल्या ओठांसाठी काही घरगुती उपाय आपण बघणार आहोत : –
१ . स्मोकिंग किंवा ड्रिंकिंगची सवय असेल तर ती सर्वप्रथम थांबवली पाहिजे. ही सवय फक्त गडद ओठांसाठीच नव्हे तर पूर्ण शरीरासाठी आणि आपल्या जीवनासाठी देखील घातक आहे. त्यामुळे अशा व्यसनांपासून दूरच राहिले पाहिजे.
२ . लिंबू स्लाईसेस मध्ये कट करून घ्या. त्यानंतर साखरेमध्ये बुडवून रात्री झोपण्यापूर्वी ओठांना हळुवारपणे मसाज करा. सकाळी उठल्यानंतर ओठ धुऊन काढा. या उपायाने ओठांवर आलेला डार्कनेस निघून जाईल.
३ . दीड चमचा लिंबाचा रस घ्या. त्यामध्ये एक चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा मध मिसळा. सर्व मिश्रण व्यवस्थित रित्या मिक्स करून झाल्यानंतर तयार झालेला लेप झोपण्यापूर्वी ओठांवर लावा. या उपायामुळे ओठ व्यवस्थित रित्या मॉइश्चराईज होतील आणि लिंबामुळे ओठांवरील टॅनिंग देखील दूर होईल. रात्रभर हा लेप ओठांवर तसाच राहू द्या आणि सकाळी पाण्याने ओठ स्वच्छ धुऊन काढा. उपाय नंबर २ स्क्रबिंग सारखे काम करते , त्यामुळे दुसरा उपाय करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल.
३ . एक चमचा दूध घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करा. आणि हे दूध ओठांवर लावून दहा ते पंधरा मिनिटांसाठी तसेच ठेवा mत्यानंतर हळुवारपणे ओठांना मसाज करून ओठ पाण्याने धुऊन काढा. दूध नैसर्गिकरीत्या टॅनिंग दूर करण्यामध्ये मदत करते आणि हळद देखील खूपच औषधी आहे.
४ . ज्यांना लिंबू सूट होत नाही, त्यांच्यासाठी हा पुढील उपाय आहे. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा मध आणि एक चमचा साखर. हे दोन्ही व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर जे शुगर स्क्रब तयार होईल त्याच्या सहाय्याने ओठांना अगदी हळुवारपणे मसाज करायचा आहे. आणि नंतर ओठ पाण्याने धुऊन काढायचे आहेत. हा उपाय आठवड्यातून दोनदा करू शकता. या उपायानंतर तुम्ही उपाय क्रमांक तीन देखील करू शकता.
५ . एक ते दोन चमचे डाळिंबाचे दाणे क्रश करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये एक चमचा गुलाब पाणी आणि एक चमचा दुधाची साय घ्यायची आहे. सर्व मिश्रण व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ओठांना लावायचे आहे.दहा मिनिटानंतर ओठांना हळुवारपणे मसाज करून ओठ पाण्याने धुऊन काढायचे आहेत. हा उपाय दररोज केला तरी देखील चालेल.
६ . जर ओठांना जास्तच गडद कलर आला असेल तर हा उपाय फायदेशीर ठरणार आहे. स्ट्रॉबेरी व्यवस्थित रित्या क्रश करून घ्या आणि त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घाला. तयार झालेली पेस्ट ओठांवर लावा आणि अगदी पाच ते दहा मिनिटांसाठी ठेवून ओठ लगेच पाण्याने धुऊन काढा. हा उपाय स्ट्रॉंग असल्यामुळे आठवड्यातून फक्त दोन वेळा करायचा आहे.
७ . मध , साखर आणि खोबरेल तेल मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर याच्या साहाय्याने ओठांवर स्क्रबिंग करायची आहे. हे ओठांवर रात्रभरासाठी ठेवू शकता आणि सकाळी वॉश करा.
८ . थोडीशी साखर पोळपाटाच्या सहाय्याने क्रश करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि साय मिक्स करून हे मिश्रण एका डबी मध्ये भरून ठेवायचे आहे. त्यानंतर दररोज तयार झालेल्या मिश्रणाच्या सहाय्याने ओठांना हळुवारपणे मसाज करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे ओठांचा गडद कलर दूर होऊन ओठांना गुलाबी कलर येण्यास सुरुवात होईल.
Author – Poonam Ghorpade Gore