Gopaani…

GoPaani :

गोपाणी ॲप :

  What is Gopaani?

  Who founded Gopaani?

  What is the use of Gopaani?

    जे लोक काही व्यवसाय निमित्त किंवा नोकरीनिमित्त बाहेर राहतात ते लोक पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पाण्याचे जार विकत घेतात. तसेच ज्या लोकांचे घरापासून दूर दुकान आहेत जसे की किराणा स्टोअर, मेडिकल स्टोअर, पार्लर, स्टेशनरी स्टोअर किंवा ऑफिसेस असे लोक पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पाण्याचे जार खरेदी करतात. परंतु जे लोक पाण्याचे जार प्रोव्हाइड करतात म्हणजेच वॉटर सप्लायर्स त्या लोकांना रोज कोणकोणत्या ठिकाणी पाण्याचे जार द्यायचे आहे तसेच किती ठिकाणी किती पाण्याचे जार दिले यांसारखे डिटेल्स ठेवावे लागतात. हे डिटेल्स रोजच्या रोज ठेवण्यामध्ये काही समस्या येतात किंवा डिटेल्स व्यवस्थित रित्या ठेवले जात नाही. या समस्यांचे निराकरण अंकित रांका आणि अर्पित शारदा यांनी 2019 मध्ये केले.हे दोघेही बालपणीचे मित्र आहेत. 

      अंकित रांका आणि अर्पित शारदा या दोघांनी मिळून जून 2019 मध्ये Boond Tech Pvt Ltd नावाने GoPaani लॉन्च केले. ऑगस्ट 2019 मध्ये GoPaani हे ॲप प्ले स्टोअर वर लॉन्च करण्यात आले.या दोघांनी हे स्टार्ट अप इंदोर मधून सुरू केले आहे.अंकित रांका आणि अर्पित शारदा यांचे उद्दिष्ट पाणी पुरवठादारांना तसेच ग्राहकांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे हा आहे. भारतामध्ये खूप वॉटर डिलिव्हरी बिझनेस आहेत. त्यांना ज्या समस्या येतात त्या समस्या अंकित रांका आणि अर्पित शारदा यांनी GoPaani ॲपच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

      GoPaani ॲप हे प्रॉडक्ट इन्व्हेंटरी जसे की डिस्पॅच, डिलिव्हरी, कलेक्शन आणि अनलोडिंग इत्यादींचा ट्रॅक ठेवण्यास किंवा मागोवा घेण्यास मदत करते.GoPaani ॲप अँड्रॉइड आणि iOS या दोन्हींवर उपलब्ध आहे.GoPaani Customer App द्वारे या व्यवसायांचे जे ग्राहक असतात ते डिलिव्हरी कधी होईल ह्याची माहिती घेवू शकतात तसेच बिल पेमेंट करू शकतात तसेच रेटिंग देऊ शकतात आणि व्यवसाय मालकांशी देखील संपर्क करू शकतात,थंड पाण्याचे जार ऑर्डर करू शकतात तसेच पाणी बॉटल्स देखील ऑर्डर करू शकतात. त्यामुळे GoPaani ॲप फक्त व्यवसाय मालकांसाठीच नव्हे तर ग्राहकांसाठी देखील फायदेशीर आहे.या मध्ये एक इव्हेंट ॲप देखील आहे जे की लग्न समारंभ,पार्टी यांसारख्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना लागणाऱ्या मोठ्या ऑर्डर्स व्यवस्थापित करण्यासाठी परवानगी देते.GoPaani हे B2B आहे तसेच हे ॲप व्यवसायांचे ग्राहक देखील वापरतात त्यामुळे B2B2C म्हणून देखील चालते.

       GoPaani ची 45 सदस्यांची टीम असून अंकिता रांका हे कंपनीचे सीईओ आहेत.अंकित यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी, एन वाय सी मधून कम्प्युटर सायन्स मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे आणि Gopaani सुरू करण्याच्या आधी त्यांनी यु एस मध्ये टॅपफेमची स्थापना केली.आणि अर्पित शारदा हे सी ओ ओ आहेत,अर्पित यांनी  ICFAI विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे आणि ते हर्ष पेट येथे प्रोप्रायटर होते जे प्लास्टिक उत्पादने जसे की  पाण्याचे जार, दुधाचे कंटेनर इ.मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग करत असे.अंकित रांका हे डिझाईनची काळजी घेतात तर अर्पित शारदा हे विक्री आणि मार्केटिंगची जबाबदारी घेतात.

    स्टार्टअप व्यवसायांना त्यांच्या एकूण ग्राहकांच्या संख्येनुसार 4,000 ते 36,000 रुपये प्रति वर्ष शुल्क आकारले जाते. सध्याला जवळपास 20 हजार व्यवसायांनी ह्या ॲपवर साइन अप केले असून त्यापैकी 4.5% इतके व्यवसाय सशुल्क व्यवसाय आहेत म्हणजेच सशुल्क व्यवसायामध्ये या ॲपचे प्रीमियम वर्जन वापरण्यासाठी कंपनीला पैसे द्यावे लागतात.

     या ॲपचे विनामूल्य व्हर्जन देखील उपलब्ध असून ज्या व्यवसायांनी 50 पेक्षा कमी ग्राहक जोडले आहे किंवा पन्नास ग्राहकांपर्यंत डिटेल्स ठेवण्याची मर्यादा या विनामूल्य ॲप मध्ये आहे म्हणजेच हे ॲप 50 ग्राहकांचे डिटेल्स ठेवण्याची परवानगी देते. डिटेल्स जशी की डेली डिलिव्हरी रेकॉर्ड ठेवणे तसेच पर्सनल कस्टमर बिल डाउनलोड करणे, ऑनलाइन पेमेंट करणे, पेमेंट रिमाइंडर आणि खूप काही.

     अशा रीतीने GoPaani पाणी सेवा पुरवठादारांना त्यांचा व्यवसाय डिजीटल करण्यात मदत करत आहे.

Parner buffalo farm पारनेर मधील म्हशींचा गोठा : श्रद्धा ढवन हीची यशोगाथा…..

Parner buffalo farm :

पारनेर मधील म्हशींचा गोठा : श्रद्धा ढवन हीची यशोगाथा…..

      पूर्वी मुलींसाठी फक्त ” चूल आणि मुल ” एवढेच म्हटले जायचे, परंतु आता मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटावत आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींनी कर्तुत्व गाजवले आहे. फक्त शैक्षणिक दृष्ट्या मुली आघाडीवर नसून इतर क्षेत्रात देखील मुली पुढे आहेत. वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये मुली उतरत असून यश संपादन करत आहेत. आज आपण अशाच एका मुलीची यशोगाथा बघणार आहोत जिने दुग्ध व्यवसाय सुरू करून सर्वांपुढेच एक आदर्श निर्माण केला आहे, ती मुलगी म्हणजेच श्रद्धा ढवन …

        श्रद्धा हीचे पूर्ण नाव श्रद्धा सत्यवान ढवन.श्रद्धा ही अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे राहते. श्रद्धाच्या कुटुंबामध्ये तिचे आई-वडील आणि तिचा एक भाऊ आहे. श्रद्धाचे वडील सत्यवान ढवन हे पूर्वीपासूनच म्हशींचा व्यापार करत असत. 1998 मध्ये ढवन कुटुंबियांकडे एकच म्हैस होती. त्यांनी पूर्वी कधी दुधाचा व्यवसाय करण्यासाठी म्हशींचा गोठा तयार केला नाही. परंतु 2011 नंतर श्रद्धा आणि कुटुंबीयांनी म्हशींची संख्या वाढवण्यास सुरुवात केली. श्रद्धा आणि कुटुंबीयांनी एकाच वेळी सर्व म्हशी घेतल्या नसून हळूहळू म्हशींची संख्या वाढवत गेले आणि आता त्यांच्याकडे 80 म्हशी आहेत. श्रद्धा हिच्या वडिलांना गाडी चालवणे शक्य नाही आणि श्रद्धाचा भाऊ देखील वयाने तिच्या पेक्षा लहान आहे. त्यामुळे जेव्हापासून श्रद्धा आणि कुटुंबीयांनी दुग्ध व्यवसायासाठी म्हशी वाढवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून श्रद्धाच डेअरीमध्ये दूध पोहच करत असेल. 

          श्रद्धा ही सुरुवातीला जोपर्यंत कमी म्हशी होत्या तोपर्यंत गाडीवरच दुधाचे कॅन किंवा कीटली अडकवून डेअरीमध्ये पोहोच करत असे. परंतु जसजसं म्हशींची संख्या वाढायला लागली आणि दुधाचे उत्पादन देखील वाढू लागले, तेव्हा श्रद्धाही मोठी गाडी चालवायला देखील शिकली. ” प्रत्येक गोष्ट करण्यासाठी कॉन्फिडन्स असणे खूप महत्त्वाचे आहे. “

          जसजशी म्हशींची संख्या वाढत गेली तसतसं श्रद्धा आणि कुटुंबीयांनी जसे पाहिजे तसे शेड बांधत गेले किंवा वाढवले. परंतु जेव्हा त्यांच्याकडे 80 म्हशी होणार होत्या तेव्हा त्यांनी डबल मजली गोठा बांधला. श्रद्धा आणि कुटुंब यांचे उत्पन्न जवळपास सहा लाख रुपये महिना उत्पन्न मिळवत आहे.श्रद्धाही लहान असताना तिचे वडील जेव्हा म्हशीचे दूध काढत असत तेव्हा म्हैस हालू नये म्हणून म्हशीच्या पुढे छोटीशी काठी घेऊन उभी राहत असे. तेव्हा ती तिच्या वडिलांना म्हशी बद्दल खूप प्रश्न विचारत असे. तेव्हापासून तिचा इंटरेस्ट वाढत गेला. श्रद्धाने देखील नंतर म्हशीचे दूध काढण्यास शिकून घेतले. श्रद्धाच्या मते, गोठ्यातील इतर कामे जमून जातात, परंतु दूध काढणे हे शिकूनच घ्यावे लागते. सुरुवातीला ज्या म्हशी थोड्याशा शांत होत्या त्यांचे दूध सुरुवातीला श्रद्धा काढत असे. नंतर हळूहळू तिला दूध काढणे येऊ लागले.

        तिने दूध काढणे शिकण्याचा फायदा तिला आज देखील होतो. कारण 80 म्हशींच्या गोठ्या करता त्यांच्याकडे सहा मजूर आहेत परंतु जेव्हा त्यांच्यापैकी काही लोक सुट्टीवर असतात तेव्हा श्रद्धा आणि कुटुंबीयांना गोठ्यातील सर्व कामे सांभाळावी लागतात.

     श्रद्धा आणि कुटुंबीय म्हशींसाठी लागणारा चारा विकत घेतात. सुरुवातीला श्रद्धा आणि सर्व कुटुंबीय मिळून चारा विकत न घेता म्हशींसाठी शेतातून चारा आणत असत परंतु जसजशी म्हशींची संख्या वाढत गेली, तसतसं त्यांनी चारा विकत घेण्यास सुरुवात केली. श्रद्धा हिने एका मुलाखतीत म्हंटले की, सुक्या चाऱ्यापासून दुधाची फॅट चांगली लागते परंतु दूध जरा कमी निघते आणि हिरव्या चाऱ्यापासून दुधाची फॅट जरी कमी येत असली तरी देखील दूध चांगले निघते.

       श्रद्धा हिला एका मुलाखतीमध्ये असा प्रश्न विचारला असता की म्हशींचा गोठा तयार करण्यासाठी शेतीची आवश्यकता आहे का ? तर या प्रश्नाचे उत्तर देताना श्रद्धाने सांगितले की शेती असेल तर उत्तमच. परंतु जर शेती नसेल तरी देखील म्हशींचा गोठा तयार करता येऊ शकतो. म्हशींसाठी लागणारा चारा विकत घेता येतो. श्रद्धा हिच्या मते ” मॅनेजमेंट ” खूप महत्त्वाचे आहे.

       अशा रीतीने श्रद्धा ढवण हिने आजच्या युवा पिढी पुढे एक आदर्श उभा केला आहे. तिच्या यशोगाथे मधून खरोखरच प्रेरणा घेण्यासारखी आहे.

Meesho success story: मिशो सक्सेस स्टोरी

Meesho success story :

What is Meesho startup?

What is the history of Meesho?

Why is Meesho famous?

Who developed Meesho app?

Who founded Meesho?

मिशो सक्सेस स्टोरी :

     जे लोक काही व्यवसाय सुरू करतात जसे की कपड्यांचे दुकान, इमिटेशन ज्वेलरीचे दुकान, कुठल्या वस्तूंचे दुकान, स्टेशनरी शॉप्स, भांड्याचे दुकान असे विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी लोक ते ज्या वस्तूचा व्यवसाय सुरू करणार आहे , अशा वस्तू होलसेल दरात घेऊन येतात आणि त्यानंतर त्या वस्तू विकतात. त्यामध्ये जो प्रॉफिट मार्जिन निघतो, तो त्यांचा नफा असतो. परंतु त्यांना नफा मिळवण्यासाठी वस्तू होलसेल दरात आणाव्या लागतात, त्यानंतर जे लोक घरून व्यवसाय सुरू करू शकत नाही त्या लोकांना भाड्याने दुकान घ्यावे लागते तो देखील खर्च वाढतो अशाप्रकारे यामध्ये इतर काही खर्च जास्तीचा लागतो. या अशा पद्धतीने जो व्यवसाय केला जातो त्या व्यवसायाला आपण ऑफलाइन पद्धतीचा व्यवसाय म्हणू शकतो. परंतु जर आपल्याला ऑनलाइन पद्धतीने व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो कसा करावा हे ” मीशो – Meesho ” आपल्याला शिकवते.

         मिशोने भारतामध्ये रिसेलिंग ॲप म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. या ऑनलाइन शॉपिंग अँपच्या मदतीने आपण स्वतःला हव्या असणाऱ्या वस्तू तर घेऊ शकतो, त्याचबरोबर वस्तू विकू देखील शकतो. ते कसं ? तर तुम्ही तुम्हाला जे प्रॉडक्ट विकायचे आहेत ते व्हाट्सअप च्या किंवा इतर सोशल मीडियाच्या सहाय्याने शेअर करू शकता. जेव्हा तुम्हाला त्या प्रॉडक्टची ऑर्डर येईल, त्यानंतर तुम्ही तो प्रॉडक्ट मीशो वरून ऑर्डर करून कस्टमरचा ॲड्रेस तिथे टाका. त्यानंतर तिथे प्रॉफिट मार्जिन म्हणून ऑप्शन असतो तिथे तुमचे मार्जिन ऍड करा. कस्टमरला प्रॉडक्ट त्यांच्या पत्त्यावर पोहोच होईल आणि तुम्हाला तुमचे प्रॉफिट मार्जिन तुमच्या अकाउंट वर मिळेल. अशाप्रकारे  मिशोने बऱ्याच लोकांना मुख्यतः महिलांना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आपण घरी बसून देखील व्यवसाय सुरू करू शकतो.चला तर मग जाणून घेऊयात मीशो बद्दल अजून काही…..

        ” Meesho ” या शब्दाचा अर्थ ” Meri eshop ” किंवा ” अपनी दुकान ” असा होतो. मीशो ह्या ऑनलाइन शॉपिंग अँपची स्थापना 2015 मध्ये झाली असून संजीव बर्नवाल आणि विदित आत्रे यांनी केली. मीशोचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. जेव्हा मीशो 2015 मध्ये सुरू झाले, तेव्हा ते FASHNEAR म्हणून ओळखले जात होते.FASHNEAR ची कल्पना स्विगी किंवा झोमॅटो सारखीच होती.FASHNEAR हे फॅशनशी रिलेटेड वस्तूंचा व्यवहार करत असे. याच्या सहाय्याने ग्राहकांना आपल्या परिसरातील हव्या त्या दुकानातून आपल्या आवडीचे कपडे किंवा फॅशन ॲक्सेसरीज खरेदी करण्याची परवानगी होती म्हणजेच ग्राहकांनी जी वस्तू ऑर्डर केली ती वस्तू ग्राहकाला घरापर्यंत पोहोच व्हायची.FASHNEAR ॲपवर दुकानांना रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी होती. परंतु काही कालावधीनंतर FASHNEAR च्या संस्थापकांना काही त्रुटी जाणवल्या जसे की ग्राहक लोकल दुकानांमधून ऑनलाईन पद्धतीने खरेदी करण्यास फारसे उत्सुक नव्हते त्यामुळे सेल देखील कमीच व्हायचा. संस्थापकांना लोकल ऐवजी त्यांची योजना अशी काही राबवायची होती की पूर्ण भारतातूनच लोकांना जे हवे ते खरेदी करता येऊ शकेल. म्हणून संस्थापकांनी नंतर 2015 च्या शेवटी ” FASHNEAR ” चे रूपांतर ” मीशो” मध्ये केले.

     उत्पादकांना किंवा निर्मात्यांना ग्राहकांशी किंवा रिसेलर्सशी जोडण्याचे काम मीशोने केले आहे. उत्पादक त्या जे वस्तू बनवतात किंवा त्यांच्याकडे ज्या वस्तू असतात त्या वस्तू Meesho ॲपवर अपलोड करतात तेथून रिसेलर्स किंवा कस्टमर त्या वस्तू घेऊ शकतात. रिसेलर ह्या वस्तू व्हाट्सअप, फेसबुक किंवा इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया ॲप्स वर शेअर करून ऑर्डर्स मिळवून त्यातून प्रॉफिट मार्जिन मिळवता. मीशो वर अगदी सगळ्याच प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये व्हरायटी सुद्धा उपलब्ध आहे.

    एप्रिल २०२१ मध्ये प्रसिद्ध युनिकॉर्न क्लबमध्ये सामील होणारा मीशो हा लेटेस्ट स्टार्टअप बनला आहे.

प्रियंका गुप्ता : ग्रॅज्युएट चाय वाली Priyanka Gupta : Graduate chai wali

Priyanka Gupta : Graduate chai wali

प्रियंका गुप्ता : ग्रॅज्युएट चाय वाली

 Who is graduate Chai wali?

Who is Priyanka Gupta?

What is the education of Priyanka Gupta ?   

    आपण जर एखादे काम करण्याचे ठरवले आणि त्या कामामध्ये मेहनत जर घेतली तर त्या कामांमध्ये आपल्याला नक्कीच यश मिळते. आपल्याला कुठल्या कामामध्ये आवड आहे हे ओळखणे गरजेचे आहे, थोडक्यात आपण कोणत्या कामासाठी पॅशनेट आहोत किंवा आपल्याला कोणते काम करण्यात रस आहे हे ओळखणे गरजेचे आहे. एकदा की आपल्याला आपण कोणती गोष्ट अगदी व्यवस्थित करू शकतो हे कळाले की आपण त्यामध्ये यश नक्कीच मिळवू शकतो. कुठलेही काम छोटे किंवा मोठे नसते याचे एक उदाहरण म्हणजे ” प्रियंका गुप्ता – ग्रॅज्युएट चाय वाली ” 

      प्रियंका गुप्ता हिने महात्मा गांधी काशी विद्यापीठ, वाराणसी येथे इकॉनॉमिक्स मधून ग्रॅज्युएशन केले आहे. 2019 मध्ये प्रियंका गुप्ता ही ग्रॅज्युएट झाली. त्यानंतर 2020 – 2021 अशी दोन वर्ष प्रियंका गुप्ता  हिने नोकरी शोधली, परंतु नोकरी मिळाली नाही. त्याचबरोबर प्रियंका हिने बँकिंगची एक्झाम देखील दिली अगदीच काही मार्कांवरून तिला एक्झाम क्रॅक करता आली नाही. नंतर तिने असा विचार केला की काहीच नाही करण्यापेक्षा काहीतरी करून आत्मनिर्भय झालेले नक्कीच चांगले. प्रियंका गुप्ता हिने ” एम बी ए चाय वाला – प्रफुल्ल बिल्लोरे ” यांची यशोगाथा ऐकलेली होती तसेच त्यांचे बरेचसे इंटरव्यू बघितलेले होते, त्यामुळे ती इन्स्पायर झालेली होती. प्रियंका गुप्ता हिच्या मते ” चाय वाला ”  खूप आहेत तर मग ” चाय वाली ” का नाही?

       प्रियंका ने देखील आत्मनिर्भर बनून “आत्मनिर्भय भारत” ला सपोर्ट करण्याचे ठरवले. प्रफुल्ल यांच्याप्रमाणेच प्रियांकाने देखील विचार केला की चहा हा एक असा व्यवसाय आहे की ज्याला भांडवल कमी लागते. सुरुवातीला प्रियंका गुप्ता हिने भांडवल उपलब्ध करण्याकरता लोन घेण्यासाठी धडपड करण्यास सुरू केली. परंतु काही कारणास्तव प्रियंकाला लोन मिळू शकले नाही. नंतर प्रियांकाने तीस हजार रुपये उसने घेतले. आणि चहाचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला प्रियांकाचे काही कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणी यांनी देखील प्रियांकाला सपोर्ट केला नाही, परंतु प्रियांका गुप्ता हिने इतर काही नकारात्मक विचार न करता फक्त सकारात्मक विचार करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले.

        प्रियंका गुप्ता हिने पटना येथील महिलांचे जे कॉलेज आहे त्यासमोर आपले चहाचे दुकान सुरू केले.” कोणताच व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो “हे प्रियांकाने खरे करून दाखवले. प्रियंका गुप्ता हिने आपल्या चहाच्या दुकानाच्या पुढे जे बॅनर लावले होते त्यावर काही पंचलाईन्स लिहिल्या जसे की , ” पीना ही पडेगा” आणि ” लोग क्या सोचेंगे ? अगर ये भी हम सोचेंगे तो फिर लोग क्या सोचेंगे ? ” ,”सोच मत,चालू कर दे बस” . या पंच लाइन्समुळे देखील ग्राहक आकर्षक होत असत.

     प्रियंका ही तिच्या चहाच्या मेनूमध्ये विविध फ्लेवरचे चहा बनवते जसे की कुल्लड चहा, मसाला चहा, पान चहा, चॉकलेट चहा इत्यादी. प्रियंका गुप्ता हीने तीने बनवलेल्या चहाची किंमत पंधरा ते वीस रुपये इतकी ठेवली आहे. प्रियंका गुप्ता हिला चहाच्या व्यवसायामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रियंका गुप्ता महिन्याला जवळपास दीड लाख रुपयांच्या आसपास इन्कम मिळवत आहे. फक्त जॉब्स मधूनच पैसा मिळवू शकतो , ही कल्पना प्रियंका गुप्ता हिने पूर्णपणे खोडून काढली आहे. आपण स्वतःच्या हिमतीवर एखादा व्यवसाय सुरू करून चांगला इन्कम सोर्स तयार करू शकतो. प्रियंका गुप्ता हिच्या स्टॉलवर बरेचसे सेलिब्रिटी चहा पिऊन गेलेले आहेत जसे की विजय देवराकोंडा आणि इतर काही सेलिब्रिटी.

     प्रियांका गुप्ता ही युथ साठी खरोखरच एक मोटिवेशन आहे. 

BigBasket : Online grocery store  success story  बिग बास्केट : ऑनलाइन ग्रोसरी स्टोअर सक्सेस स्टोरी

BigBasket : The online grocery store  success story 

Why is BigBasket successful?

What is the history of BigBasket?

Who founded BigBasket?

बिग बास्केट : ऑनलाइन ग्रोसरी स्टोअर सक्सेस स्टोरी

       पूर्वी कोणी कल्पना सुद्धा केली नसेल की, भाजीपाला किंवा किराणा ऑनलाइन पद्धतीने ऑर्डर करून तो आपल्या घरापर्यंत पोहोच होईल. परंतु आता तशी सुविधा नक्कीच उपलब्ध झाली आहे. आपण घरबसल्या आपल्याला हवा तो किराणा ऑर्डर करू शकतो आणि तो थेट आपल्या घरापर्यंत पोहोचतो. ही सुविधा ऑनलाईन ग्रोसरी स्टोअर्स मुळे शक्य झाली आहे. तसे तर कित्येक ऑनलाईन ग्रोसरी स्टोअर्स उपलब्ध आहेत परंतु काही थोडक्याच ऑनलाईन ग्रोसरी स्टोअर्स आपली जागा ग्राहकांच्या मनात बनवली आहे. त्यापैकीच एक ऑनलाईन ग्रोसरी स्टोअर म्हणजे बिग बास्केट. बिग बास्केट हे लोकप्रिय ऑनलाईन ग्रोसरी स्टोअरपैकी एक आहे.

        बिग बास्केटचे संस्थापक हे खूप अनुभवी आहेत. जेवढा अनुभव चांगला तेवढे काम अधिक चांगले आणि यशस्वी होते. बिग बास्केटला तब्बल पाच संस्थापक आहेत.बिग बास्केटचे पाच संस्थापक आणि सदस्य आहेत – श्री हरी मेनन,व्ही एस सुधाकर, श्री विपुल पारेख, श्री अभिनय चौधरी आणि श्री व्ही एस आर रमेश हे सर्वच या क्षेत्रात खूप अनुभवी आहेत.

       बिग बास्केटचे सध्याचे सीईओ श्रीहरी मेननजी यांनी हॅबमोल चे सहसंस्थापक म्हणून काम केले आहे तसेच इंडिया स्किल्सचे सीईओ तसेच विप्रो येथे व्यवसाय प्रमुख आणि प्लॅनेटेशियाचे प्रमुख आहेत. आणि श्रीहरी मेनन यांनी भारतातील सर्वोत्कृष्ट कॉलेज आणि टॉप इन्स्टिट्यूट BITS पिल्लानी  मधून आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. या पाच संस्थापकांनी मिळून 2011 मध्ये बिग बास्केटची स्थापना केली. बिग बास्केटचे हेडक्वार्टर बंगलोर येथे आहे. बिग बास्केटचे पेरेंट ऑर्गनायझेशन टाटा ग्रुप आहे.

        या पाच संस्थापकांनी मिळून त्यांचा पहिला ऑनलाईन व्यवसाय Fabmart.com 1999 मध्ये सुरू केला होता. आणि त्यांनी 2001 मध्ये या व्यवसायाचा ऑनलाइन किराणा विभाग सुरू केला. नंतर या पाच संस्थापकांनी मिळून दक्षिण भारतामध्ये फॅबमॉल नावाची सुपर मार्केट सुरू केली. या संस्थापकांना एवढ्यावरच थांबायचे नव्हते त्यांना अजून काहीतरी वेगळे करायचे होते. आणि नंतर बिग बास्केटची स्थापना झाली.

       बिग बास्केट ची यशस्वी अशी वाटचाल सुरू होती. बिग बास्केट ने काही प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम सुरू केले आणि दररोज जवळपास 5000 ग्राहकांकडून ऑर्डर मिळू लागल्या. कंपनीने हळूहळू जास्तीत जास्त शहरांमध्ये तिचा विस्तार सुरू केला आणि दररोज मिळणाऱ्या ऑर्डर्सची संख्या देखील हळूहळू वाढू लागली. बिग बास्केटने वेअर हाऊस आणि कोल्ड स्टोरेज उभारले आहेत, जेणेकरून उत्पादने तेथे व्यवस्थितरीत्या राहू शकतील आणि वितरण करण्यास देखील सोपे जाईल. बिग बास्केटने शाहरुख खान यांना ब्रँड अँबेसिडर म्हणून जोडले आहे तसेच ग्राहकांनी मागवलेले उत्पादने साठ मिनिटांत एक्सप्रेस डिलिव्हरीच्या मदतीने त्यांच्या घरापर्यंत पोहोच होतील अशी सुविधा उपलब्ध केली आहे. बिग बास्केटची इतर काही कंपन्यांसोबत देखील स्पर्धा आहे.

      बिग बास्केटच्या मदतीने तुम्हाला हवे ते फळे, भाज्या आणि किराणा तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला जे काही हवे आहे ते तुमच्या अगदी दारापर्यंत पोहोच होईल. सुरुवातीला बिग बास्केटला ग्राहकांचा विश्वास संपादन करणे जरा कठीण गेले परंतु नंतर बिग बास्केटने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. बिग बास्केट ग्राहकांना योग्य दरात चांगल्या दर्जाची उत्पादने उपलब्ध करून देते. बिग बास्केट चा विस्तार आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला आहे की बिग बास्केटला दररोज किमान एक लाखांपर्यंत रिसिव्हर्स मिळतात. बिग बास्केटने लोकप्रिय ऑनलाइन ग्रोसरी स्टोअर्स मध्ये एक चांगले स्थान निर्माण केले आहे.

आणि बिग बास्केटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. अशाप्रकारे बिग बास्केट ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये यशस्वी ठरली आहे.

Patanjali success story : पतंजली सक्सेस स्टोरी –

Patanjali success story :

What is the reason behind success of Patanjali?

What makes Patanjali unique?

How did Patanjali grow so fast?

What are the challenges faced by Patanjali?

पतंजली सक्सेस स्टोरी :

        ” पतंजली ”  हा भारतातील सर्वात मोठा असा आयुर्वेदिक ब्रँड आहे. हा ब्रांड जवळपास भारतातील प्रत्येक घरोघरी पोहोचला आहे. पतंजली ग्राहकांना आयुर्वेदिक उत्पादने उपलब्ध करून देते. पतंजली सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक औषध आणि खाद्यपदार्थ बनवते.तसेच आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये साबण, फेस वॉश, हँडवॉश ,डिश वॉश यांसारखी कित्येक उत्पादने पतंजली ग्राहकांना पुरवते आणि पतंजलीचे हेच उद्दिष्ट आहे की उत्तम दर्जाची उत्पादने ग्राहकांना मिळवून देणे. तसेच कमी किमतीमध्ये उत्तम दर्जाची उत्पादने तयार करून ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. पतंजली हा भारतामधील अत्यंत लोकप्रिय असा आयुर्वेदिक ब्रँड आहे. पतंजलीचा असा देखील विश्वास आहे की , निसर्गामध्ये सर्व संकटांशी सामना करण्याची शक्ती आहे.

      “पतंजली” हा शब्द “पट्टा” (म्हणजे पडणे, उडणे) आणि “अंजा” (सन्मान, उत्सव, सुंदर) किंवा “अंजली” (पूज्य, हाताचे तळवे जोडणे) मधील एक मिश्रित असे नाव आहे. पतंजली या नावाचा अर्थ ” प्रसिद्ध योग तत्वज्ञ ” किंवा “योग सूत्रांचे लेखक” असा होतो. पतंजलीची टॅग लाईन ” प्रकृती का आशीर्वाद ” अशी आहे.

       पतंजलीची स्थापना 2016 मध्ये बाबा रामदेवजी आणि आचार्य बाळकृष्ण यांनी केली. पतंजली ही भारतीय फास्ट-मूविंग कंज्यूमर गुड्स (एफएमसीजी) कंपनी हरिद्वार येथे स्थित आहे. पतंजलीचे नोंदणीकृत कार्यालय दिल्ली येथे असून उत्पादन युनिट आणि मुख्यालय हरिद्वारच्या औद्योगिक परिसरात आहे. 

     बाबा रामदेव (राम किसन यादव)  हरिद्वार मध्ये एक योग शिक्षक होते. आचार्य बाळकृष्ण हे त्यांचे सहकारी असून या दोघांनी मिळून आयुर्वेदिक आणि हर्बल औषधे तयार करण्यासाठी स्वामी शंकर देव ( बाबा रामदेव यांचे गुरु ) यांच्या आश्रमात 1995 मध्ये दिव्या फार्मसीची स्थापना केली. आणि त्यांची औषधे इतकी लोकप्रिय झाली की बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी त्यामध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न केला. परंतु दिव्या फार्मसी ही कंपनी ट्रस्ट अंतर्गत रजिस्टर असल्यामुळे तसे करणे कठीण जात होते. दिव्या फार्मसीच्या दरम्यान सुरुवातीचे काही दिवस त्यांच्यासाठी खूप खडतर होते, दिव्या फार्मसी चा रजिस्ट्रेशन साठी देखील त्यांच्याकडे जेमतेमच पैसे होते. 1995 नंतर जवळपास पहिली तीन वर्ष म्हणजे 1998 पर्यंत त्यांनी मोफत औषधांचे वाटप केले. सुरुवातीला पैशाच्या कमतरतेमुळे ते कर्मचारी देखील ठेवू शकत नसत त्यामुळे ते स्वतः सर्व कामे करत असत जसे की कच्चामाल खरेदी करणे आणि दळणे,मिक्सिंग पर्यंतची सर्वच कामे.

          नंतर बाबा रामदेव हे योगा करण्यामुळे खूप प्रसिद्धीस आले. त्यांना सुनीता पोद्दार आणि गोविंद अग्रवाल यांच्याकडून आर्थिक मदत झाली. नंतर त्यांनी 2006 मध्ये पतंजली आयुर्वेद ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या स्थापनेचा उद्देश विविध उत्पादने जसे की केसांची निगा राखणारी उत्पादने, दातांची काळजी घेणारी उत्पादने, सौंदर्य प्रसाधने सामग्री, आरोग्य सेवा आणि अन्न आणि बरेच काही उत्पादने निर्माण करून पतंजली या ब्रँड अंतर्गत ग्राहकांपर्यंत पोहोचवली. पतंजली या कंपनीने अगदी कमी कालावधीमध्ये लोकप्रियता मिळवली . पतंजली हा ” स्वदेशी ” ब्रांड असल्याकारणाने लोकांमध्ये या ब्रँड बद्दल एक वेगळ्याच प्रकारचे आकर्षण सुरुवातीपासूनच राहिले आहे.

     पतंजली मध्ये वस्तूंचा दर्जा आणि प्रमाण तपासण्यासाठी संस्थेच्या सर्व प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन केले जाते. बाबा रामदेव हे पतंजली फर्मचा चेहरा आहेत. बाबा रामदेव हे त्यांच्या योग शिबिरांमध्ये तसेच टेलिव्हिजन शोज मध्ये पतंजली उत्पादनांचे समर्थन करत असतात. आचार्य बाळकृष्णजी यांच्याकडे कंपनीची 94% टक्के मालकी आहे तसेच ते व्यवस्थापकीय संचालक म्हणून देखील काम करतात. बाळकृष्णजी बाबा रामदेव यांच्या अत्यंत जवळचे आहेत.

     पतंजलीची मार्च 2018 पर्यंत ₹43,932 कोटी ($6.1 अब्ज) ची निव्वळ संपत्ती आहे. फोर्ब्सच्या भारतातील 100 सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीनुसार मे 2021 मधील आचार्य बाळकृष्ण हे भारतातील तिसरे सर्वात तरुण अब्जाधीश आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती US$2.3 अब्ज इतकी आहे.

Prafulla billore :  MBA chai wala प्रफुल्ल बिल्लोरे : एम बी एच चाय वाला कमी वयातच मोठे यश संपादन केले…..

Prafulla billore :  MBA chai wala

How did Prafull Billore started business?

How did MBA Chaiwala started?

Is Prafull Billore entrepreneur?

Who owns MBA Chaiiwala ?

What is the story of Prafull Billore?

प्रफुल्ल बिल्लोरे : एम बी एच चाय वाला

प्रफुल्ल बिल्लोरे यांचा जन्म 14 जानेवारी 1996 रोजी मध्यप्रदेश धार,इंदोर येथे झाला. प्रफुल्ल बिल्लोरे यांनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटले होते की ते मध्यमवर्गीय कुटुंबातूनच येतात. त्यांच्या आई-वडिलांची अशी इच्छा होती की त्यांनी एमबीए करून त्यांचे भविष्य उज्वल करावे.

     प्रफुल्ल बिल्लोरे यांनी आय आय एम अहमदाबाद येथे प्रवेश मिळवण्यासाठी तीन वेळा सी ए टी CAT ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न केला पण तेव्हा त्यांना यश आले नाही.प्रफुल्ल बिल्लोरे यांना पहिल्यापासूनच व्यवसाय करण्याची आवड होती.प्रफुल्ल बिल्लोरे हे भारतातील विविध शहरांमध्ये किंवा विविध ठिकाणी फिरले वेगवेगळ्या लोकांशी त्यांनी संभाषण केले. जेव्हा ते लोकांशी संभाषण करत त्यातून ते काहीतरी ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करत असत. तसेच प्रफुल्ल यांना यशोगाथा वाचण्याची देखील आवड होती. प्रफुल्ल यांनी अमेरिकन व्यावसायिक जेफ बेझोस आणि रिचर्ड ब्रॅन्सन सारख्या लोकांच्या यशोगाथा वाचल्या . यशोगाथा वाचल्यानंतर प्रफुल यांना त्यांच्या जीवनातील एक समान असा धागा सापडला तो म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीतरी मॅकडोनाल्डसाठी काम केलेले होते.

     प्रफुल्ल बिल्लोरे यांनी देखील अहमदाबाद येथील मॅकडोनाल्डमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना तीनशे रुपये प्रति दिवस असे पैसे मिळत होते. ते म्हणतात की, ” काम करताना कसे वाटते हे पाहण्यासाठी मी मॅकडोनाल्डमध्ये अर्धवेळ नोकरी देखील केली. पगार फारसा नव्हता आणि त्यामुळे मला वाटले “ऐसे बडा आदमी कैसे बनूंगा, एमबीए के बाद भी ऐसे तो काम करता रहूंगा (एमबीए नंतरही मी असे काम केले तर मी मोठा माणूस कसा बनू)?” .

       प्रफुल्ल बिल्लोरे यांना सुरुवातीपासून व्यवसाय करण्याची आवड तर होतीच. त्यांनी नोकरी करता करताच काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु नेमका कोणता व्यवसाय सुरू करावा हे सुचत नव्हते. प्रफुल्ल यांनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटले की, पाववडा किंवा पराठे यांसारखे खाद्यपदार्थ भारतातील सगळ्याच ठिकाणी चालतातच असे नाही परंतु चहा हे एक असे पेय आहे की जे कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत म्हणजेच जवळपास पूर्ण भारतात जवळपास सर्वच लोक आवडीने पितात आणि पाण्यानंतर जास्त पिले जाणारे पेय म्हणजे चहा आहे.

        त्यानंतर त्यांनी चहाचे दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूक नव्हती. चहाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पालकांकडून आठ हजार रुपये घेतले. आणि आठ हजार रुपयांमध्ये चहाचे दुकान सुरू केले.

       प्रफुल्ल हे स्वतः फारसे चहा पिणारे नाही. प्रफुल्ल यांच्या चहाच्या दुकानावर पहिल्या दिवशी चहाचा एक कप देखील विकला गेला नाही परंतु प्रफुल्ल यांनी हार न मानता त्यांचे प्रयत्न सतत सुरू ठेवले. नंतर प्रफुल्ल यांनी आसपासच्या परिसरात लोकांशी संभाषण सुरू केले. एक चहा वाला एवढे अख्खलित इंग्लिश बोलतो हे बघून लोकांना देखील आश्चर्य वाटत असे. प्रफुल्ल हे चहा सर्व्ह करताना, चहा सोबत एक टोस्ट आणि टिशू पेपर देत असत. प्रफुल्ल यांच्या चहाची चव तर उत्तम होतीच त्याचबरोबर प्रफुल्ल यांची चहा सर्व्ह करण्याची पद्धत यामुळे देखील लोकांना प्रफुल्ल यांच्या चहाचे आकर्षण वाटत असत. कमी कालावधीमध्ये प्रफुल्ल यांनी आसपासच्या परिसरामध्ये लोकप्रियता मिळवली.

      इतक्या कमी कालावधीमध्ये या नवीन मुलाने एवढी प्रसिद्धी मिळवली हे तिथल्या आसपासच्या काही चहा वाल्यांना खटकले आणि त्यांनी प्रफुल्ल यांना धमकावले देखील. प्रफुल्ल यांनी चहाचे दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला होता परंतु नंतर त्यांनी हार न मानता एका हॉस्पिटलच्या अथोरिटीजच्या मदतीने हॉस्पिटल जवळच चहाचे दुकान सुरू केले आणि त्या दुकानाला ” एमबीए चायवाला ” असे नाव दिले. ते गमतीने एमबीए म्हणजे ” मिस्टर बिल्लोर अहमदाबाद ” असे म्हणत.

      प्रफुल्ल बिल्लोरे यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की त्यांनी सुरुवातीला व्हिजिटिंग कार्ड्स देखील वाटले तसेच एकदा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांनी सिंगल लोकांसाठी फ्री मध्ये चहा वाटण्याचे घोषित केले. तेव्हा त्यांच्या दुकानावर जवळपास दोन ते तीन हजार लोकांनी चहा घेतला. त्यावेळी प्रफुल्ल हे जास्त प्रसिद्धीस आले.

      प्रफुल्ल यांनी अहमदाबाद मधील दोन वर्षाच्या कामकाजाच्या अनुभवामुळे भोपाळमध्ये त्यांची पहिली फ्रेंचाईसी सुरू केली. त्यानंतर पाच वर्षानंतर आता तर एम बी ए चाय वाला या  ब्रँडच्या जवळपास 50 पेक्षा जास्त फ्रेंचाईजी आउटलेटस् आहेत. तसेच ते लग्न समारंभ किंवा पार्ट्या यांसारख्या कार्यक्रमांच्या देखील ऑर्डर्स घेतात.

     प्रफुल्ल यांनी अगदी कमी वयामध्ये मोठे असे यश संपादन केले आहे. त्यांच्या यशोगाथेतून खरोखरच प्रेरणा घेण्यासारखी आहे.

Mama Earth : Asia’s first MadeSafe certified brand ममाअर्थ : आशियातील पहिला मेडसेफ सर्टिफाईड ब्रँड

Mama Earth : Asia’s first MadeSafe certified brand

Is Mamaearth Indian company ?

What is the meaning of Mamaearth ?

Is Mamaearth a herbal ?

Who is owner of Mamaearth ?

Why is Mamaearth so successful ?

Does Mamaearth products have side effects ?

How old is Mamaearth ?

Is Mamaearth Ayurvedic ?

ममाअर्थ : आशियातील पहिला मेडसेफ सर्टिफाईड ब्रँड

Mamaearth ची स्थापना 2016 मध्ये वरुण अलाघ यांनी त्यांच्या पत्नी गझल अलाघ यांच्यासोबत आपल्या पहिल्याच बेबी नरिशिंग ब्रँडची स्थापना केली. वरुण अलाघ हे Honasa Consumer Private Limited चे देखील संस्थापक आहेत. ही कंपनी भारतामध्ये गुरुग्राम येथे आहे. ममाअर्थ टॉक्सिन फ्री बेबी, फेस, ब्युटी, हेअर अँड बॉडी केअर प्रॉडक्टस् प्रोव्हाइड करते. ममाअर्थ या कंपनीला आशियातील पहिला मेडसेफ सर्टिफाइड ब्रँड म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

     वरुण यांनी इलेक्ट्रिकल ही ब्रांच घेऊन बॅचलर ऑफ इंजीनियरिंग ही पदवी दिल्ली येथील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून मिळवली. त्यांनी नंतर फायनान्स आणि मार्केटिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट (PGDBM) एक्सएलआरआय जमशेदपूर येथे केला.वरुण त्यांचे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच त्यांना कोलगेट पामोलिव्ह, हॅवेल्स इलेक्ट्रिक, मदुरा गारमेंट्स, मारुती आणि नोकिया यांसारख्या विविध कंपन्यांमध्ये इंटर्नशिप आणि लाइव्ह प्रोजेक्ट्सच्या स्वरूपात काम करण्याची संधी मिळत गेली.

      वरुण यांचा विवाह गझल यांच्याशी झाला. गझल यांनी आयटी कॉर्पोरेट जगतात काम केलेले आहे. सध्या त्या ममाअर्थ कंपनीच्या सह संस्थापक असून कंपनीचे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, कन्टेन्ट आणि कम्युनिटी मॅनेजमेंट बघतात. वरून यांना अगस्त्य या नावाचा एक मुलगा आहे त्याला जन्मापासूनच त्वचाजन्य आजार – एक्जिमा झाला होता.

वरुण आणि गझल या दोघांना जेव्हा कळले की त्यांच्या मुलाला एक्जिमा नावाचा त्वचाजन्य आजार आहे आणि त्याच्या त्वचेला बर्‍याच पदार्थांची ऍलर्जी होत होती, रसायनांच्या संपर्कात आल्यावर त्वचा लाल होत असत आणि खाज सुटत असे तेव्हा त्यांनी मार्केट मध्ये टॉक्सीन फ्री बेबी केअर उत्पादने शोधली परंतु त्यांना टॉक्सिन फ्री बेबी केअर उत्पादने मिळाली नाहीत.

      डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या बाळासाठी फक्त नैसर्गिक उत्पादने वापरण्याचा सल्ला दिला होता कारण इतर उत्पादने जर वापरली असती तर बाळाची प्रकृती बिघडण्याचा धोका होता. म्हणून या जोडप्याने त्यांचे जे काही मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईक दुसऱ्या देशांमध्ये असतात त्यांच्याकडून टॉक्सिन फ्री उत्पादने मागवली कारण भारतातील बहुतेक साऱ्या बेबी केअर प्रॉडक्ट मध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात थोडेसे प्रमाणात टॉक्सिन होते असे त्यांचे म्हणणे होते.वरुण अलाघ यांच्या मते, भारतातील बाळांसाठी योग्य टॉक्सिन फ्री ब्रँड्ससाठी कोणताही पर्याय न सापडल्याने मामाअर्थची स्थापना करण्यात आली. यु एस मधील उत्पादनांची किंमत देखील जास्त आहे.

    ममाअर्थ ही कंपनी स्टार्टअप नंतर अवघ्या दोन वर्षातच दोन कोटी रुपयांच्या रीटेल टर्नओव्हर पर्यंत पोहोचली.

2020 पर्यंत तरMamaearth ची एकूण संपत्ती 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. 1 जानेवारी 2022 रोजी $52 दशलक्ष इतकी वाढ झाली असून 2022 मध्ये भारतातील पहिली युनिकॉर्न कंपनी बनली.

       बॉडी केअर प्रॉडक्ट, हेअर, ऑरगॅनिक ब्युटी अँड बेबी केअर प्रॉडक्ट अशा विविध प्रकारातील प्रॉडक्ट्स Mamaearth यांच्या स्वतःच्या वेबसाईटवर आहेत. त्याचबरोबर Mamaearth च्या बेबी केअर प्रॉडक्ट्स फर्स्ट क्राय ,नायका ॲमेझॉन यांसारख्या वेगवेगळ्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म द्वारे देखील प्रवेश केला जाऊ शकतो.Mamaearth इतका प्रसिद्ध झाला आहे की भारतातील जवळपास 120 पेक्षा जास्त प्रमुख शहरांमध्ये त्याची उपस्थिती आहे त्याचबरोबर आपण ऑनलाइन पद्धतीने देखील Mamaearth चे प्रॉडक्ट ऑर्डर करू शकतो.

      2017 मध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही Mamaearth ची ब्रँड अँबेसिडर बनली तसेच शिल्पा शेट्टी यांनी स्वतः देखील कंपनीमध्ये काही गुंतवणूक केली. त्यांचा विश्वास होता की टॉक्सिन फ्री प्रॉडक्ट सर्वोत्तम आहेत.इतर निधी Mamaearth ने Fireside Ventures आणि Stellaris Ventures Partners यांच्या नेतृत्वाखाली उभा केला.

Firstcry.com : Baby and kid products  FIRSTCRY : लहान मुला मुलींसाठीचे प्रॉडक्ट्स

Firstcry.com : Baby and kid products 

When was Firstcry founded ?

Who are the founders of Firstcry ?

Who is the founder of FirstCry ?

Why was FirstCry started ?

When was FirstCry founded ?

Is first cry profitable ?

FIRSTCRY : लहान मुला मुलींसाठीचे प्रॉडक्ट्स

    पूर्वी आणि अजूनही लोक लहान मुला मुलींसाठी कपडे वगैरे घ्यायचे असल्यास थेट दुकानातून खरेदी करतात. नंतर जेव्हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले, तेव्हा काही लोक घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने लहान मुला मुलींसाठी हवे असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू लागले. परंतु या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर इतर सर्वच प्रॉडक्ट्स उपलब्ध असल्याने फक्त लहान मुला मुलींसाठीचे प्रॉडक्ट्स मर्यादित प्रमाणात उपलब्ध असायचे. तेव्हा FIRSTCRY या कंपनीने त्यांचा स्वतंत्र असा ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू करून त्यावर फक्त लहान मुला मुलींसाठी जे काही प्रॉडक्ट्स आवश्यक असतात, ते सर्वच प्रॉडक्ट्स FIRSTCRY ने लिस्टेड केलेले आहेत.

      FIRSTCRY ची स्थापना 2010 मध्ये सुपम माहेश्वरी आणि अमिताव साहा यांनी केली.सुपम माहेश्वरी हे FirstCry चे CEO आणि सह-संस्थापक असून ते आय आय एम अहमदाबाद येथे पदवीधर झाले आणि दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे इंजिनियर ही पदवी मिळवली.सुपम माहेश्वरी यांना ते जेव्हा त्यांच्या मुलीसाठी प्रॉडक्ट घेत होते तेव्हा त्यांना फर्स्ट फ्राय बद्दलची कल्पना सुचली आणि ती कल्पना त्यांनी पुढे जाऊन विकसित केली . अमिताव साहा हे फर्स्ट क्रायचे सी ओ ओ आणि सह संस्थापक असून त्यांनी आय आय एम लखनऊ मधून पदव्युत्तर पदवी मिळवली आणि आयआयटी वाराणसी येथून बी टेक ही पदवी मिळवली. बऱ्याच पालकांना त्यांच्या संततीसाठी योग्य ती उत्पादने मिळत नसत ही समस्या सोडवण्यासाठी फर्स्ट क्राय चा जन्म झाला.

           सुरुवातीला फर्स्ट क्राय हे दिल्ली, बेंगलोर, कोलकता आणि पुणे येथील गोदामांमधून उत्पादने देशभरात पाठवत असे. काही वर्षानंतर फर्स्ट क्राय या प्लॅटफॉर्मने रिटेल सेलर्स जोडण्यास सुरुवात केली आणि स्थानिक रिटेल विक्रेत्यांना त्यांची उत्पादने फर्स्ट क्रायच्या वेबसाईटवर विकण्याची संधी दिली. फर्स्ट क्राय कडे स्वतःची अशी दोन खाजगी लेबले आहेत ती म्हणजे बेबीहग आणि क्यूटवॉक.बेबीहग हा एक प्रॉडक्ट्सचा ब्रँड आहे तर क्यूटवॉक हा फुटवेअर ब्रँड आहे. आता तर फर्स्ट क्राय लहान मुला मुलींच्या प्रॉडक्टच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म पैकी एक सर्वात मोठा प्लॅटफॉर्म बनला आहे. भारतामध्ये 125 पेक्षा जास्त शहरांमध्ये 350 पेक्षा जास्त फ्रेंचायसीज आहेत.

firstcry.com वर बऱ्याच प्रकारचे प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत जसे की स्किन अँड हेल्थ केअर, खेळण्या, कपडे, फुटवेअर, डायपर्स, फीडिंग आणि नर्सिंग, फॅशन ॲक्सेसरीज आणि अजून बरेच काही. फर्स्ट क्राय हा एक ऑनलाईन तसेच ऑफलाइन ब्रँड आहे जो पालकांच्या पसंतीस उतरत आहे.Firstcry.com यांच्याकडे भारतीय ब्रँड मधील 90 हजाराहून अधिक वस्तूंची किंवा उत्पादनांची यादी आहे तर आंतरराष्ट्रीय उत्पादने बाराशेच्या आसपास आहेत . फर्स्ट क्राय ही कंपनी ग्राहकांना दर्जेदार उत्पादने मिळवून देण्यास मदत करते त्याच बरोबर विश्वासार्ह अशी वितरण सेवा / delivery service देते.

       फर्स्ट क्राय योग्य त्या मार्केटिंग स्ट्रॅटजीजचा उपयोग करत असते. फर्स्ट क्राय हे नाव सुद्धा त्यांनी अत्यंत विचार करून आणि योग्य असे नाव निवडले आहे. या नावावरूनच ओळखले जाऊ शकते की ही कंपनी लहान मुला मुलींसाठीचे उत्पादने उपलब्ध करून देते.FirstCry ची टॅगलाइन अशी आहे की, “आशियातील आवडते बाळांचे आणि मुलांचे शॉपिंग प्लॅटफॉर्म”.” Asia’s favourite baby and kid’s shopping platform .”

     FirstCry एक अनोखा असा उपक्रम चालवत आहे त्या अंतर्गत फर्स्ट क्राय दर महिन्याला 70 हजारापेक्षा जास्त पालकांपर्यंत पोहोचते आणि त्यांना फर्स्ट क्राय बॉक्स देऊ करते. हा उपक्रम देशातील सहा हजार रुग्णालयांमध्ये चालवला जातो आणि या उपक्रमांतर्गत नवीन पालकांना त्यांच्या मुलाच्या किंवा मुलीच्या जन्माबद्दल अभिनंदन  स्वरूप भेटवस्तू म्हणून हा बॉक्स दिला जातो. या बॉक्समध्ये डायपर , बेबी लोशन , बेबी ऑइल यांसारखे मूलभूत प्रोडक्ट्स यांचा समावेश असतो. या उपक्रमांतर्गत फर्स्ट क्राय कित्येक पालकांपर्यंत पोहोचले आहे.

CARS 24


CARS 24 Success Story :
Why is CARS24 successful ?
How does CARS24 make money ?
Who is behind CARS24 ?
Is CARS24 a listed company ?
Is CARS24 a Indian company ?
Who is owner of CARS24 ?
CARS 24 ची सक्सेस स्टोरी:
बऱ्याच लोकांना वाहन ( Vehicle) खरेदी करण्याची हौस किंवा आवड असते , परंतु सर्वच लोक शो रूम मधून नवीन गाडी खरेदी करतीलच असे नाही.त्या ऐवजी काही लोक सेकंड हॅण्ड वाहन खरेदी करणे पसंत करतात.पूर्वी सेकंड हॅण्ड वाहन खरेदी करायचे म्हंटले तर एजंट मार्फत किंवा जाहिरातींच्या माध्यमातून ,किंवा कुठे हवे असलेले वाहन विकण्यास आहे असे कानावर आले तर त्या ठिकाणी वाहन बघण्यासाठी जाऊन वाहन योग्य वाटले तर खरेदी केले जायचे.परंतु दरवेळी वाहन पसंत पडेलच असे नाही,वाहन बघायला जाण्यासाठी आलेला खर्च, वाहन खरेदी करताना झालेली इतर काही फसवणूक अशा काही समस्यांचा सामना करावा लागत असे.परंतु आता CARS 24 या कंपनीने सेकंड हॅण्ड वाहन खरेदी करणे ही कल्पना अगदी सोपी करून ठेवली आहे.चला तर जाणून घेवूयात CARS 24 बद्दल……
वापरलेल्या वाहनांचा उद्योग हा पूर्णपणे सुरळीतपणे चालत नाही असे CARS24 च्या सस्थापकांच्या लक्षात आले.तसेच वापरलेल्या वाहनांच्या उद्योगामध्ये एक व्यवस्थित आणि सुरळीत अशी प्रक्रिया नाही तसेच या उद्योगामध्ये काही त्रुटी आहेत आणि लोकांना ( विक्री आणि खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ) काही समस्यांचा सामना करावा लागतो.ज्या काही समस्यांचा सामना ग्राहकांना करावा लागत असे त्या समस्या CARS24 च्या सस्थापकांच्या लक्षात येताच त्यांनी अशी काही टेकनोलॉजी शोधण्याचे ठरवले की जेणेकरून वाहन खरेदी किंवा विक्री ही प्रक्रिया सोपी होईल आणि ग्राहकांना देखील समस्यांचा सामना करावा लागणार नाही आणि त्यांना ह्या तंत्रज्ञानाचा फायदा होईल.तेव्हा 2015 मध्ये CARS24 चा जन्म झाला…
CARS24 या कंपनीने ऑटोमोटिव्ह क्षेत्रात खूप नाव कमावले आहे.CARS 24 हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म असून ह्याच्या माध्यमातून लोकांना सेकंड हॅण्ड वाहन खरेदी किंवा विक्री करण्यास सोपे झाले आहे.CARS 24 ची स्थापना 2015 मध्ये विक्रम चोप्रा, मेहुल अग्रवाल, गजेंद्र जांगीड आणि रुचित अग्रवाल यांनी केली आहे.ही कंपनी अशी देखील दक्षता घेते की व्यवहार प्रक्रियेत काही चूक होता कामा नये.
CARS 24 ही ISO 9001:2015 प्रमाणपत्र प्राप्त केलेली कंपनी आहे. CARS 24 या कंपनीने एका कार्यालयातून सुरुवात केली होती आणि आता तर तिचा विस्तार खूप मोठा झाला आहे. भारतातील जवळपास 50 हून अधिक शाखांमध्ये ह्या कंपनीचा विस्तार झाला आहे.बेंगळुरू,फरीदाबाद, गुडगाव,भोपाळ,कोलकाता,हैदराबाद, जयपूर,कोल्हापूर,मुंबई, पुणे,विजयवाडा या आणि अशा बऱ्याच ठिकाणी कंपनीचा विस्तार झाला आहे. 700 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.
CARS24 ही कंपनी भारतातील 15 पेक्षा अधिक शहरांमधून कार खरेदी करते आणि नंतर त्यांना एक्झिस्टिंग C2C किंवा B2C मॉडेलपेक्षा वेगळे करून, त्यांच्या युनिक C2B मॉडेलसह विकते.लोकांकडून जास्त मागणी असल्याने परंतु पुरवठा कमी असल्यामुळे, हा व्यवसाय प्रत्येक वर्षी 1,00,000 पेक्षा जास्त ट्रानझॅक्शन करतो.
कार मालकांसमोर जी काही आव्हाने येतात त्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता किंवा उद्दिष्ट CARS24 ठेवते.तसेच CARS24 कुठल्याही ग्राहकांना कोणत्याच समस्येचा सामना करावा लागू नये याची देखील काळजी घेते. CARS24 या कंपनीचा विस्तार भारतामध्ये तर झाला आहेच, आणि आता ही कंपनी तिचा विस्तार भारताबाहेर जागतिक स्तरावर करण्याची योजना आखत आहे. तसेच बाईक्समध्ये देखील विविधता आणण्याची योजना आखत आहे.CARS24 कंपनी नोव्हेंबर 2020 मध्ये DST ग्लोबल द्वारे $200 दशलक्ष निधीसह $1 अब्ज युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाली आहे.
आता CARS24 च्या सहाय्याने लोकांना वाहन खरेदी किंवा विक्री करण्यास सोपे झाले आहे.