आज आपण बघणार आहोत काही उपयुक्त अशा किचन टिप्स..
१. दूध उकळत असेल किंवा इतर काही उकळत असेल तर भांड्यावर लाकडी चमचा ठेवा जेणेकरून दूध उतू जाणार नाही.
२. गूळ व्यवस्थित ठेवण्यासाठी जेणेकरून तो पघळू नये किंवा त्याला बुरशी लागू नये म्हणून गुळ छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये कट करून पेपर मध्ये बांधून ठेवावा म्हणजे त्याला ओलावा सुटत नाही आणि तो व्यवस्थित टिकतो. गुळ जास्त काळासाठी टिकवायचा असेल, तर गुळाला फ्रीजमध्ये ठेवू शकता. Easy Kitchen tips in Marathi
Best 15 Kitchen Tips and Tricks That Will Make Your Cooking easier
३. गावरान तूप जास्त दिवस टिकवण्यासाठी त्याला नेहमी काचेच्या भांड्यात किंवा बरणीत ठेवावे व त्यात ओला चमचा घालू नये म्हणजे तूप जास्त दिवस टिकेल. best kitchen tips for your kitchen in marathi
४. दही गोड आणि घट्टसर होण्यासाठी नेहमी मातीच्या भांड्यात लावावे. कधीकधी दही बनवताना त्याला पाणी सुटतं व ते घट्ट बनत नाही परंतु जर दही मातीच्या भांड्यात लावले तर मातीचे भांडे पाणी शोषून घेतं आणि घट्टसर दही तयार होते.
५. लिंबू जास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी लिंबाला पेपर गुंडाळून ठेवावा तसेच लिंबाला खोबरेल तेल लावल्याने देखील लिंबू खुप दिवस फ्रेश रहाते.
६. काही महिला नोकरी करत असतील तर त्या सकाळीच जास्तीचे पीठ भिजवून ठेवतात किंवा इतर कारणांमुळे देखील कधी कधी सकाळी जास्तीचे पीठ मळून ठेवले जाते परंतु कधीकधी संध्याकाळपर्यंत त्या पिठाचा वेगळा असा वास येतो किंवा ते काळवंडते त्यासाठी सकाळी पीठ भिजवताना माठातील थंड पाण्याचा उपयोग केल्याने पीठ खराब होत नाही.
७. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या फ्रीजमध्ये जास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी बाजारातून आणल्यानंतर त्यांना स्वच्छ रीतीने धुऊन, स्वच्छ कापडाने पुसून, नंतर विशिष्ट प्रकारच्या पेपरमध्ये पॅक करून ठेवल्याने त्या जास्त काळ फ्रेश राहतात. तसेच टोमॅटो, शिमला मिरची, वांगी यासारख्या काही भाज्या प्लास्टिक बॅग मध्ये जास्त दिवस ताज्या राहतात.
८. फ्रिजमध्ये कधीकधी दुर्गंध येतो परंतु तो कसला आहे हे समजत नाही त्यासाठी बेकिंग सोडा एका डबी मध्ये झाकण न लावता रात्रभर ठेवावा दुसर्या दिवशी सकाळपर्यंत फ्रीजमधील दुर्गंध नाहिसा झालेला असेल.
९. जेव्हा तेलामध्ये एखादा पदार्थ तळतो त्यापूर्वी तेलात चिमूटभर मीठ टाकल्याने पदार्थ जास्त तेलकट बनत नाही व क्रिस्पी बनतो.
१०. तांब्याचे भांडे जर लिंबू व मीठ एकत्र करून त्याने घासले तर ते अगदी नव्या सारखे व चकचकीत दिसतात. Kitchen tips marathi
११.भात मोकळा होण्यासाठी भात बनवत असताना कुकर मध्ये तांदूळ व पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल किंवा गावरान तूप टाकावे.
१२. जर बेसिन ब्लॉक झाले तर त्यामध्ये गरम पाणी आणि भांडी घासण्याचे जेल त्याचे मिश्रण बेसिन मध्ये टाकावे ,थोडा वेळ थांबून नंतर नळाचे पाणी सोडावे ,थोड्या वेळातच बेसिन पूर्ववत काम करेल. kitchen utensil cleaning tips
१३. मुळ्याची पाने हे फेकून न देता ती लिंबू व मीठ टाकून निर्जंतुक करून घ्यावी व स्वच्छ पाण्याने धुऊन त्याचे ज्युस करावे किंवा भाजी करावी ते शरीरासाठी खूपच उपयुक्त आहेत. मुळ्याची पाने आयर्न ची कमतरता दूर करण्यास तसेच ब्लड प्रेशर साठी खूप उपयुक्त आहेत.
१४. शक्यतो ॲल्युमिनियम ची भांडी स्वयंपाक बनवताना कमी वापरावी, कारण ॲल्युमिनियम शरीरासाठी चांगले नसते.
१५. हिरव्या मिरच्या जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी मिरच्या बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन, सुती कपड्याने पुसून, त्यांची देठे काढून ठेवावी व मिरच्यांना पेपर किंवा टिशू पेपर मध्ये गुंडाळून हवाबंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवावे किंवा प्लास्टिक पिशवी मध्ये किंवा जीप लॉक बॅगमध्ये ठेवावे. मिरच्या अशारितीने साठवल्यास जास्त दिवस ताज्या राहतात.
related searches- kitchen tips, kitchen tips marathi, best kitchen cleaning tips, kitchen manage tricks, kitchen management tips, kitchen management tips, kitchen tricks marathi