पी पी सी मार्केटिंग | पे पर क्लिक मार्केटींग | PPC ( Pay per click) marketing –
What does PPC mean in marketing?
What is an example of PPC marketing?
What are the types of PPC advertising?
What is advantages of PPC marketing ?
आपला जो व्यवसाय असेल तो व्यवसाय वाढवण्यासाठी तसेच ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंग करणे खूप गरजेचे असते. पूर्वी मार्केटिंग करण्यासाठी पारंपारिक मार्केटिंग पद्धतीचा उपयोग केला जायचा परंतु हल्ली डिजिटल मार्केटिंग पद्धतीचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये करताना दिसत आहे. कारण डिजिटल मार्केटिंग पद्धतीने वेळेची बचत होते त्याचबरोबर कमी कालावधीमध्ये व्यवसायाबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते. आतापर्यंत डिजिटल मार्केटिंग मधील विविध पद्धती बद्दल माहिती आपण # Marathify वर जाणून घेतल्या आहेत. आज आपण पीपीसी मार्केटिंग बद्दल माहिती जाणून घेणार आहोत …
✔️पी पी सी मार्केटिंग म्हणजे काय ?
What is PPC marketing ?
– पी पी सी हे एक ऑनलाईन सशुल्क जाहिरात मॉडेल असून याच्या साह्याने जाहिरातदार त्यांच्या उत्पादनांची तसेच सर्विसेसची जाहिरात करतात.
– पीपीसी मार्केटिंग मुळे उत्पादनांची तसेच सर्विसेसची जाहिरात लवकर होते आणि व्यवसाय वाढण्यास मदत देखील होते.
– समजा जर एखाद्या व्यावसायिकांनी त्यांच्या उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात गुगल वर केली आणि एखाद्या युजरने त्यावर क्लिक केले तर अशावेळी त्या व्यवसायिकाला जाहिरात नेटवर्कला काही पैसे द्यावे लागतात म्हणजेच पे पर क्लिक ही पद्धती या ठिकाणी लागू होते.
जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर
सशुल्क जाहिरात विविध मार्गाने केली जाते, त्यापैकीच काही प्रकार आपण पुढे बघणार आहोत.
१ . व्हिडिओ ॲड्स video ads –
बऱ्याचदा तुमच्या लक्षात आले असेल की युट्युब वर व्हिडिओ पाहत असताना त्या व्हिडिओच्या मध्येच एखादी ऍड सुरू होते त्याद्वारे देखील मार्केटिंग केली जाते.व्हिडिओ ॲड्स द्वारे विविध उत्पादनांची तसेच सर्विसेसची मार्केटिंग केली जाते.
२ . डिस्प्ले ॲड्स display ads –
डिस्प्ले ॲड्स या प्रकारच्या जाहिराती एखाद्या वेबसाईटवर किंवा ब्लॉगवर बघायला मिळतात. या प्रकारच्या जाहिरातींद्वारे सुद्धा विविध उत्पादनांची तसेच सर्विसेसची मार्केटिंग केली जाते. ज्यावेळी Google AdSense द्वारे मान्यता मिळते अशावेळी एखाद्या वेबसाईटवर किंवा ब्लॉगवर या प्रकारच्या जाहिराती बघण्यास मिळतात. जाहिरातदारांनी या प्रकारच्या जाहिरातींसाठी शुल्क ठरवलेले असते.
३ . सर्च ॲड्स search ads –
जेव्हा आपण गुगलवर एखादा कीवर्ड सर्च करतो अशावेळी या प्रकारच्या जाहिराती आपणास बघण्यास मिळतात. Google AdSense चा उपयोग करून एखाद्या उत्पादनाची तसेच सर्विसेसची जाहिरात करू शकतो आणि युजरला किती रक्कम द्यायची हे देखील ठरवू शकतो.
४ . शॉपिंग ॲड्स shopping ads –
शॉपिंग ॲड्स या प्रकारच्या जाहिराती ज्यावेळी आपण कुठलेही ऑनलाइन शॉपिंग पोर्टल ओपन करतो अशावेळी बघण्यास मिळतात.
५ . मोबाईल ॲप्स ॲड्स mobile apps ads –
बऱ्याचदा प्ले स्टोर वरून एखादे ॲप डाऊनलोड केल्यानंतर ते ॲप ओपन केल्यावर वेगवेगळ्या जाहिराती दिसण्यास सुरू होते आणि ह्याच मोबाईल ॲप्स ॲड्स आहेत.
६ . सोशल मीडिया ॲड्स social media ads –
आज-काल बरेच लोक सोशल मीडिया वापरतात, अगदी कमी लोक आहेत जे सोशल मीडियाचा वापर करत नाही. सोशल मीडियाचा वापर करून सुद्धा विविध उत्पादनांची तसेच सर्विसेस जाहिरात केली जाते.
✔️पीपीसी मार्केटिंगचे कोणते फायदे आहेत ?
What is advantages of PPC marketing ?
– पीपीसी मार्केटिंग अगदी कमी कालावधीमध्ये योग्य रीतीने उत्पादनांची तसेच सर्विसेसची मार्केटिंग करते.
– पीपीसी मार्केटिंग योग्य त्या ग्राहकाला टार्गेट करते.
– पीपीसी मार्केटिंग पद्धती इतर लोकल जाहिरात पद्धतीपेक्षा स्वस्त आहे म्हणजेच बजेट फ्रेंडली आहे.
– पीपीसी मार्केटिंग पद्धती इतर मार्केटिंग चॅनेल सोबत देखील योग्य पद्धतीने कार्य करते.
आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टींची आवश्यकता आपल्याला रोजच असते आणि या गोष्टी किंवा वस्तू अजूनही काही लोक दुकानामधून जाऊन खरेदी करतात परंतु पूर्वीच्या काळी कुठलेही ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स उपलब्ध नसल्याकारणाने अगदी कुठलीही वस्तू घ्यायची असो मग ती छोटी वस्तू असो किंवा मोठी वस्तू तरी देखील मार्केटमध्ये जाऊनच खरेदी करावी लागत असे. परंतु हल्ली विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मस उपलब्ध झाल्या कारणाने आपण ऑनलाइन शॉपिंग करू शकतो. ऑनलाइन शॉपिंग केल्यामुळे वेळेची तर बचत होते त्याचबरोबर आपल्याला जी वस्तू हवी आहे ती वस्तू मिळण्यामध्ये देखील मदत होते. आपण आतापर्यंत दुसऱ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स वरून वस्तूंची खरेदी करत आलो आहोत परंतु जर असा विचार केला की आपल्या स्वतःचे देखील ई-कॉमर्स स्टोअर असेल तर…….? हो …हे शक्य आहे आपण देखील ऑनलाइन पद्धतीने इन्कम कमावू शकतो आणि म्हणूनच आज आपण ई-कॉमर्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत ….
✔️ई-कॉमर्स म्हणजे काय ?
What is e-commerce ?
E-commerce – Electronic commerce
वस्तू किंवा उत्पादन आणि सेवांची ऑनलाईन पद्धतीने खरेदी आणि विक्री करण्याची पद्धत म्हणजे ई-कॉमर्स होय.
✔️ई-कॉमर्स व्यवसाय कशा पद्धतीने कार्य करतो ?
How does an e-commerce business work?
– ई-कॉमर्स व्यवसाय मध्ये सर्वप्रथम ऑनलाइन स्टोअर तयार केले जाते.
– त्यानंतर प्रॉडक्टची तसेच सर्विसेसची मार्केटिंग आणि प्रमोशन केले जाते.
– जेव्हा एखादा ग्राहक ऑनलाईन स्टोअर वरून एखाद्या उत्पादनाची खरेदी करतो म्हणजे ऑर्डर करतो अशावेळी आपल्याला त्या उत्पादनाचा जो निर्माता आहे त्यांच्याकडे ऑर्डर द्यावी लागते आणि त्यानंतर तो निर्माता एखाद्या सप्लायर द्वारे ते उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवतो.
– या पद्धतीमध्ये निर्माता आणि सप्लायर हे वेगवेगळे देखील असू शकतात अशा परिस्थितीमध्ये सप्लायरला शिपिंग चार्जेस द्यावे लागतात.
जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर
ई-कॉमर्सच्या या प्रकारामध्ये कंपनी आणि ग्राहक यांच्यामध्ये थेट व्यवहार होत असतो. ई-कॉमर्स त्यांच्याकडे असलेले उत्पादने आणि सर्विसेसची मार्केटिंग तसेच प्रमोशन करून ग्राहकाला उत्पादनांची तसेच विक्री करते.
उदाहरणार्थ, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट.
२ . व्यवसाय ते व्यवसाय Business to Business B2B –
ई-कॉमर्सच्या या प्रकारांमध्ये व्यापार किंवा व्यवहार हा एका व्यवसायाचा दुसऱ्या व्यवसायाशी किंवा एका कंपनीचा दुसऱ्या कंपनीशी होत असतो. म्हणजेच एखादी कंपनी प्रोडक्ट तसेच सर्विसेसची खरेदी दुसऱ्या कंपनीकडून करत असते.
३ . ग्राहक ते ग्राहक Customer to Customer C2C –
ग्राहक ते ग्राहक या प्रकारामध्ये एक ग्राहक स्वतः वस्तू तयार करतो आणि त्या वस्तूला किंवा सर्विसला दुसऱ्या ग्राहकाला ऑनलाईन पद्धतीने विकतो. म्हणजेच या प्रकारामध्ये एक ग्राहक दुसऱ्या ग्राहकाला वस्तू विकतो. उदाहरणार्थ, ओएलएक्स वर एखादी वस्तू एका ग्राहकाने दुसऱ्या ग्राहकाला विकणे.
✔️ई कॉमर्सचे फायदे कोणते आहे ?
What are advantages of e-commerce ?
– ई-कॉमर्स मुळे ग्राहक अगदी घरबसल्या एखाद्या उत्पादनाची किंवा सेवेची खरेदी करू शकतो.
– ई-कॉमर्स मुळे वेळेची बचत होते आणि हवी असलेली वस्तू अगदी घरपोच मिळते.
– जर आपण एखाद्या मार्केटमध्ये काही वस्तू खरेदी करायला गेलो तर त्या ठिकाणी वेळेचे बंधन असते परंतु ऑनलाईन पद्धतीने अगदी 24×7 आपण खरेदी करू शकतो.
– आपण ज्या ई-कॉमर्स साइटवरून उत्पादनांची तसेच सर्विसेसची खरेदी करणार आहोत जर ती विश्वासार्ह असेल आणि चुकून जर तुम्हाला फॉल्टी किंवा खराब प्रॉडक्ट मिळालं तर अशावेळी तुम्हाला नक्कीच तो प्रॉडक्ट बदलून मिळेल.
– आपल्याला जी वस्तू खरेदी करायची आहे त्या वस्तूसाठी इ कॉमर्स वर विविध पर्याय उपलब्ध असतात त्यामधून आपल्या आवडीची वस्तू आपण खरेदी करू शकतो.
– बऱ्याचदा सणांच्या वेळी किंवा इतर काही खास प्रसंगी ई-कॉमर्सद्वारे विविध उत्पादनांवर डिस्काउंट दिले जातात आणि त्यामुळे वस्तू नेहमीच्या दरापेक्षा कमी दरामध्ये मिळते हा देखील फायदा ई-कॉमर्स मुळे होतो.
✔️ई कॉमर्सचे कोणते तोटे आहेत ?
What are disadvantages of E-commerce ?
– एखादे प्रॉडक्ट खरेदी केल्यानंतर कधीकधी चुकीचे प्रॉडक्ट मिळू शकते आणि जर अशा वेळी ई-कॉमर्स विश्वासार्ह नसेल तर प्रॉडक्ट बदलून मिळण्याची खात्री कमी होते.
– कधी कधी काही कारणास्तव प्रॉडक्टची डिलिव्हरी लेट होऊ शकते.
– ऑनलाइन प्लॅटफॉर्म्समुळे लोकल मार्केट मधील काही उत्पादनांची खरेदी कमी होत असल्याकारणाने विक्रेत्यांचे थोड्याफार प्रमाणात नुकसान होऊ शकते.
दैनंदिन जीवनामध्ये मनुष्याची सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे अन्न. सर्वजण अन्न मिळवण्यासाठी तसेच इतर सुख सुविधा मिळवण्यासाठी काही ना काहीतरी व्यवसाय किंवा नोकरी करत असतात. आणि बरेच लोक तर नोकरी किंवा व्यवसाय करण्याच्या उद्देशाने तसेच शिक्षणासाठी त्यांच्या मूळ घरापासून लांब अंतरावर राहत असतात, आणि अशावेळी जर त्यांची फॅमिली सोबत नसेल किंवा त्यांना स्वतःला जेवण बनवायला येत नसेल तर मात्र जेवण करण्यासाठी कोणत्या ठिकाणी जावे हा प्रश्न उभा राहतो. कुणीही दररोज हॉटेलचे जेवण खाऊ शकत नाही आणि बऱ्याच लोकांना हॉटेलच्या जेवणापेक्षा घरगुती पद्धतीचे जेवण जेवायला आवडते. म्हणूनच असे लोक ज्या ठिकाणी घरगुती पद्धतीचे जेवण मिळते अशा ठिकाणाचा शोध घेतात. आज आपण टिफिन सर्विस व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत ….
✔️स्टेप १ : व्यवसाय योजना तयार करा
Create a business plan –
व्यवसाय योजना तयार केल्यामुळे व्यवसायाचा मार्ग जरा सोपा होतो. टिफिन सर्विस या व्यवसायाची योजना आखत असताना त्यामध्ये पुढील काही गोष्टींचा समावेश होऊ शकतो : –
टिफिन सर्विस व्यवसायासाठी कोणत्या परवान्यांची आवश्यकता आहे ?
टिफिन सर्विस व्यवसायासाठी मेनू कशाप्रकारे असेल ?
टिफिनचा दर काय असेल ?
टिफिनची घरपोज डिलिव्हरी करणार की ज्या ठिकाणी टिफिन बनवता त्या ठिकाणी ग्राहकांना टिफिन न्यायला बोलावणार ?
टिफिन सर्विस व्यवसायामध्ये किती गुंतवणूक करणार ?
अशा बऱ्याच प्रश्नांचा समावेश व्यवसाय योजनेमध्ये होऊ शकतो.
✔️स्टेप २ : टिफिन सर्विस व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य ते ठिकाण निवडा.
Choose right location to start tiffin service business –
– टिफिन सर्विस हा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य ठिकाण निवडणे गरजेचे आहे.
– जर तुम्हाला टिफिन सर्विस हा व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करायचा असेल तर अगदी घरून देखील हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो.
– जर तुम्हाला टिफिन सर्विस हा व्यवसाय जास्त गुंतवणुकीमध्ये सुरू करायचा असेल तर तुम्ही कॉलेज हॉस्टेल्स, हॉस्पिटल्स तसेच गर्दीच्या ठिकाणी चांगले लोकेशन बघून हा व्यवसाय सुरू करू शकता जेणेकरून या व्यवसायासाठी जास्तीत जास्त ग्राहक मिळतील.
✔️स्टेप ३ : टिफिन सर्विस व्यवसाय करण्यासाठी कोणती भांडी किंवा उपकरणे लागणार आहेत –
What are the utensils or equipment required to run tiffin service business –
– टिफिन सर्विस व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वप्रथम स्वयंपाक बनवण्यासाठी मोठ्या भांड्यांची आवश्यकता असेल. जर समजा हा व्यवसाय तुम्ही घरून सुरु करणार असाल तर तुमच्याकडे भांडी तसेच गॅस ,मिक्सर यांसारख्या बऱ्याच गोष्टी उपलब्ध असतील परंतु जास्त प्रमाणात अन्न बनवण्यासाठी मोठ्या भांड्यांची आवश्यकता असेल.
– टिफिन सर्विस व्यवसायासाठी चांगल्या क्वालिटीच्या टिफिनची आवश्यकता असेल. शक्यतो प्लास्टिक टिफिन न वापरता स्टीलचे टिफिन वापरणे आरोग्यासाठी योग्य असेल.
– तसेच जेवण बनवण्यासाठी भाजीपाला आणि किराणा माल आवश्यक असेल.
जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर
✔️स्टेप ४ : टिफिन सर्विस व्यवसायासाठी कोणत्या परवान्यांची आवश्यकता आहे ?
What are the licenses required for tiffin service business –
१. शॉप ॲक्ट लायसन्स ( Shop act licence) -जर तुम्ही टिफिन सर्विस व्यवसाय एखाद्या शॉप मध्ये सुरू करणार असाल तर या लायसन्सची आवश्यकता असेल.
२ . एफ एस एस ए आय FSSAI – खाद्यपदार्थ संबंधित कुठलाही व्यवसाय सुरू केल्यानंतर या परवान्याची आवश्यकता असते.
३ . ट्रेड लायसन्स
४ . फायर एन ओ सी
५ . सोसायटी एन ओ सी
✔️स्टेप ५ : टिफिन सर्विस व्यवसायासाठी मेनू कशाप्रकारे असेल ?
What will be the menu for tiffin service business –
– टिफिन सर्विस या व्यवसायासाठी तुम्ही कोणता मेनू ठेवणार आहात हे ठरवणे गरजेचे आहे.
– सर्वात आधी तुम्ही फक्त शाकाहारी जेवण ठेवणार आहात की शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवण ठेवणार आहात हे ठरवा.
– त्यानंतर आठवड्यामधील सात दिवसांसाठी कोणत्या भाज्या असतील , सुक्या भाज्या की रस्स्याच्या भाज्या हे देखील ठरवा म्हणजे जेणेकरून स्वयंपाक बनवताना जास्त गोंधळ उडणार नाही.
– तसेच आठवड्यातून एक दिवस किंवा रविवारी स्पेशल मेनू ठेवू शकता.
✔️स्टेप ६ : मार्केटिंग –
Marketing –
– कॉलेज तसेच विविध इन्स्टिट्यूटच्या ठिकाणी जाहिरात करू शकता.
– तसेच विविध ऑफिसच्या ठिकाणी जाहिरात करू शकतात.
– टिफिन सर्विस हा व्यवसाय मुख्यत्वे माऊथ पब्लिसिटी वर चालणारा व्यवसाय आहे त्यामुळे जर तुम्ही बनवलेल्या जेवणाची चव आणि क्वालिटी उत्तम असेल तर आपोआपच ग्राहक वाढण्यास सुरुवात होईल.
– तसेच पॅम्प्लेटस् छापून ठिकठिकाणी वाटू शकता.
– विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील टिफिन सर्विस व्यवसायाची मार्केटिंग करू शकता.
आपल्या सर्वांनाच माहीतच आहे की,आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या भारत देशामधील बहुतांश लोक शेती करतात. बऱ्याच लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे कुटुंब सुद्धा फक्त शेतीवरच चालते. परंतु बऱ्याचदा दुष्काळामुळे किंवा अतिवृष्टीमुळे तसेच गारपिटीमुळे शेतामध्ये घेतलेल्या पिकाचे नुकसान होते आणि परिणामी शेतकऱ्यांचे देखील नुकसान होऊन बऱ्याचदा हालाखीचे दिवस शेतकऱ्यांना काढावे लागतात. परंतु ज्याप्रमाणे इतर गोष्टींसाठी विमा उपलब्ध आहे त्याचप्रमाणे शेतीसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना उपलब्ध आहे आणि त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत …..
– शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान लक्षात घेता २०१६ रोजी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आली.
– अतिवृष्टी, पूर ,वादळ, दुष्काळ तसेच गारपिटीमुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते आणि यातूनच बाहेर काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आली.
– प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई देणे हा आहे.
– प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा प्रीमियम कमी असून शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत रब्बी पिकासाठी १.५ टक्के प्रीमियम तर खरीप पिकासाठी २ टक्के प्रीमियम भरावा लागतो.
✔️कोणत्या कारणांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल ?
In case of crop loss due to which reasons, compensation will be given to farmers under Pradhan Mantri Crop Bima Yojana?
कारणे –
– पिकाची पेरणी झाल्यापासून ते पिकाच्या काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्ती तसेच कीड लागल्यामुळे किंवा काही रोग पडल्यामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये झालेली घट.
– हवामानांमधील काही बदलामुळे किंवा अपुऱ्या पावसामुळे शेतीमध्ये पेरणी किंवा लागवड न झाल्यास
– प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, तसेच इतर काही नैसर्गिक आपत्तीमुळे जसे की गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर पंचनामे करावेत. व्यापारी तसेच बागायती पिकांना देखील विमा संरक्षण प्रधानमंत्री पिक विमा योजना पुरवते परंतु यासाठी पाच टक्के प्रीमियम शेतकऱ्यांना भरावा लागतो.
– दुष्काळ किंवा पूर यांसारख्या हंगामा मधील प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतीमध्ये जर अपेक्षित उत्पन्नामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या ५०% पेक्षा जास्त घट जर अपेक्षित असेल तर अशावेळी नुकसान भरपाई देण्यात येते.
– जर अवेळी आलेल्या पावसामुळे तसेच चक्रीवादळामुळे पिकाच्या कापणी किंवा काढणीनंतर पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाते परंतु जे नुकसान झालेले आहे ते कापणी किंवा काढणीनंतर जास्तीत जास्त 14 दिवसांपर्यंत पात्र राहील. ज्या शेतकऱ्यांनी वित्तीय संस्थेमार्फत या योजनेमध्ये भाग घेतला आहे आणि अशा शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास, नुकसान झाल्यापासून 48 तासांच्या आत नुकसान झालेल्या पिकाची माहिती तसेच नुकसान कशामुळे झाले याचे कारण आणि किती नुकसान झाले हे कळवणे गरजेचे आहे.
✔️प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी आवश्यक पात्रता –
Essential Eligibility for Pradhan Mantri Pik Bima Yojana –
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
What documents are required for Pradhan Mantri Crop Insurance Yojana?
Pradhanmantri Pik Vima Yojana Documents –
– ७/१२ उतारा
– पासपोर्ट साईज फोटो
– रहिवासी पुरावा
– आधार कार्ड
– राशन कार्ड
– बँक खात्याची माहिती
– बँकेचा रद्द केलेला चेक
– मोबाईल नंबर
– ई-मेल आयडी
– शपथपत्र
– घोषणापत्र
– शेतात पिकाची पेरणी झाली असल्याचा पुरावा (पीक पेरणीच्या पुराव्यासाठी शेतकरी तलाठी, सरपंच, ग्रामसेवक यांचे पत्र सादर करू शकतो)
– शेतकऱ्याने जर शेत कसायला घेतलेले असेल तर आणि पिकाची पेरणी झाली असेल तर जमिनीच्या मालकासोबत केलेल्या कराराची फोटोकॉपी त्या करारामध्ये शेताचा ७/१२ उतारा ,नंबर असावा.
जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर
प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी छंद लहानपणापासून जडलेला असतो जसे की कुणाला चित्र काढायला आवडते तर कुणाला गायला तर कुणाला डान्सिंग आवडते याच प्रकारे काही व्यक्तींना फोटोग्राफीची आवड असते. काही व्यक्तींची हीच फोटोग्राफीची आवड व्यवसायामध्ये रूपांतरित होते. फोटोग्राफी ही फक्त ऑफलाइन पद्धतीने इन्कम कमावण्याचा मार्ग राहिलेली नसून जर तुम्हाला उत्तम फोटो काढता येत असेल तर ह्याच फोटोग्राफी द्वारे ऑनलाईन पद्धतीने इनकम मिळवता येते. तर जाणून घेऊयात याबद्दल अधिक माहिती ….
✔️कशा प्रकारची फोटोग्राफी तुम्हाला आवडते ते ठरवा.
Decide what kind of photography you like –
तुम्ही फोटोग्राफी या क्षेत्रात उतरले म्हणजे त्याबद्दल तुम्हाला नक्कीच आवश्यक ते ज्ञान असेलच परंतु फोटोग्राफी करत असताना तुम्हाला कोणत्या प्रकारच्या फोटोग्राफी मध्ये इंटरेस्ट आहे हे हे शोधून ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त ऑडियन्स मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ,निसर्ग, खाद्य,प्रवास, फॅशन, वाइल्ड लाईफ …
✔️फोटोग्राफीसाठी लागणारी आवश्यक उपकरणे
Essential equipments for photography –
फोटोग्राफीसाठी उत्तम क्वालिटीचा कॅमेरा असणे आवश्यक आहे परंतु आजकाल मार्केटमध्ये उत्कृष्ट क्वालिटीचे मोबाईल फोन्स उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही मोबाईल फोन द्वारे देखील उत्तम फोटोग्राफी करू शकता. परंतु जर अगदी प्रोफेशनल फोटोग्राफर बनायचे असेल तर पुढील उपकरणांची आवश्यकता आहे :
– कॅमेरा Camera
– कॅमेरा बॅग Camera bag
– ट्राय पॉड Tripod
– फोटोग्राफिक फिल्टर Photographic filter
– मेमरी कार्ड Memory card
– प्राईम लेन्स Prime lens
– फोटोशॉप Photoshop
– फ्लॅश Flash
– कॅमेरा लेन्स Camera lens
– डिजिटल कॅमेरा Digital camera
– पॉईंट अँड शूट कॅमेरा Point and shoot camera
जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर
✔️फोटोज कोणत्या वेबसाईटवर अपलोड करून इन्कम कमावता येतो ?
On which website you can earn income by uploading photos?
– अडोब स्टॉक Adobe Stock
– कॅन्वा Canva
– क्रेस्टॉक Crestock
– डिपॉझिट फोटोज Depositphotos
– ड्रीम स्टाइम dreamstime
– फ्रीपिक Freepik
– गेट्टी इमजेस Getty Images
– इमेज वर्टेक्स Image Vortex
– आय स्टॉक iStock
– फोटोज् इंडिया PhotosIndia
– पिक्सी Picxy
– शटर स्टॉक Shutterstock
– स्नॅप वायर Snapwire
– स्टॉक्सी Stocksy
– थिंक स्टॉक Thinkstock
– अनस्पलाश Unsplash
– वेक्टिझी Vecteezy
– 123RF
– 500px
✔️ऑनलाइन फोटो सेल करून पैसे कसे कमावू शकतो ?
How can you earn money by selling photos online?
– ज्या वेबसाईटवर फोटो सेल केले जातात त्या वेबसाईटच्या काही नियम आणि अटी असतात.
– वेबसाईटवर फोटो अपलोड केल्यानंतर प्रत्येक वेबसाईट किंवा कंपनी काही रक्कम त्यांना ठेवते आणि काही रक्कम ज्यांनी फोटो अपलोड केला आहे त्यांना दिली जाते. थोडक्यात ,काही टक्के कमिशन वेबसाईटला राहते.
– फोटोच्या मोबदल्यामध्ये जी रक्कम फोटो अपलोड करणाऱ्याला मिळणार असते ती रक्कम जमा होण्यासाठी PayPal अकाउंट असणे गरजेचे आहे.
नारळ पाणी पिण्याचे खूप सारे फायदे आहेत. नारळ पाणी पिल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, नारळ पाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटिऑक्सिडन्स असतात. नारळ पाण्यामध्ये खूप सारी पोषक तत्वे असतात. नारळ पाणी हे असे पेय आहे जे अगदी तीनही ऋतूमध्ये म्हणजेच उन्हाळा ,पावसाळा आणि हिवाळा यामध्ये पिता येते. आजारी व्यक्ती तर आवर्जून नारळ पाण्याचे सेवन करतात जेणेकरून त्यांची तब्येत लवकर ठणठणीत व्हावी. अशाप्रकारे नारळ पाण्याचे कित्येक फायदे आहेत आणि यामुळे नारळ पाणी विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरू शकतो. चला तर जाणून घेऊया या व्यवसायाबद्दलची इतर काही माहिती ….
✔️स्टेप १ : व्यवसाय योजना तयार करा –
Create a business plan –
व्यवसाय छोटा असो किंवा मोठा व्यवसाय योजना तयार करणे महत्त्वाचे आहे. अगदी कमी गुंतवणुकीमध्ये जरी तुम्ही व्यवसाय सुरू करणार असाल तरी व्यवसाय योजना तयार केली पाहिजे. नारळ पाण्याचा व्यवसाय सुरू करत असताना हा व्यवसाय तुम्ही कुठे सुरू करणार आहात, या व्यवसायासाठी लागणारे नारळ कुठून खरेदी करणार आहात, नारळ पाणी कशा रीतीने विकणार आहात, नारळ पाण्याचा दर किती ठेवणार आहात तसेच या व्यवसायामध्ये किती गुंतवणूक करणार आहात अशा विविध प्रश्नांचा समावेश व्यवसाय योजनेमध्ये होऊ शकतो.
✔️स्टेप २ – नारळ पाण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य ठिकाण निवडा –
Choose right location to start coconut water business –
– नारळ पाणी विक्री करण्यासाठी योग्य ते ठिकाण निवडा.
– नारळ पाणी विक्री करण्यासाठी जे लोक स्वास्थ्य संबंधित जास्त जागृत आहेत अशा लोकांचा वावर ज्या ठिकाणी असतो असे ठिकाण निवडले पाहिजे. उदाहरणार्थ, योगा क्लासेस, जिम, स्पोर्ट्स अकॅडमी.
– तसेच नारळ पाण्याची विक्री हॉस्पिटल जवळ जास्त प्रमाणात होते; त्यामुळे हॉस्पिटल जवळ नारळ पाणी विक्री व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो.
– तसेच ज्या ठिकाणी फळांचे मार्केट असेल त्या ठिकाणी ग्राहक जास्त प्रमाणामध्ये फळे घेण्यासाठी येतात त्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू करू शकतात.
✔️स्टेप ३ – नारळ पाणी विक्री करण्यासाठी नारळ कुठून खरेदी करता येतील ?
Where can coconuts be purchased to sell coconut water?
– नारळ पाणी विक्री करण्यासाठी तुम्ही नारळ होलसेल दरामध्ये चांगल्या होलसेलर कडून खरेदी करू शकतात.
– तसेच नारळ पाणी विक्री करण्यासाठी नारळाची खरेदी थेट शेतकऱ्याकडून केली जाऊ शकते.
– तुमच्या स्वतःकडे जर शेती असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नारळ लावून स्वतःच्या शेतीमधील नारळाचे पाणी विकू शकता, परंतु शेतीमध्ये नारळ लावल्यानंतर नारळ मोठी होईपर्यंत काही वर्षांचा कालावधी लागू शकतो.
जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर KuKu FM Discount Code- GVKEO1966कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत-
✔️स्टेप ४ – नारळ पाणी विक्री करण्यासाठी किती गुंतवणूक करणार आहात ?
How much are you going to invest to sell coconut water?
– नारळ पाणी विक्री व्यवसाय करण्यासाठी तुम्ही किती गुंतवणूक करणार आहात यावर इतर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत.
– जर नारळ पाणी विक्री व्यवसाय तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये करणार असाल तर हा व्यवसाय छोटासा स्टॉल लावून तुम्ही सुरू करू शकता.
– जर नारळ पाणी विक्री व्यवसायासाठी तुम्ही जास्त गुंतवणूक करणार असाल तर तुम्ही नारळ पाणी व्यवस्थित रित्या पॅकेजिंग करून तुमचा एखादा ब्रँड तयार करू शकता आणि नंतर या पाण्याची विक्री करू शकता.
– तसेच जर तुम्ही नारळ पाणी विक्री व्यवसायासाठी जास्त गुंतवणूक केली तर ग्राहकांना घरपोच डिलिव्हरी सुविधा देखील देऊ शकता.
✔️स्टेप ५ – नारळ पाणी विक्री कशाप्रकारे करणार आहात ?
Marketing of coconut water business –
– जर तुम्ही नारळ पाणी विक्री व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करून स्टॉल लावणार असाल तर त्या ठिकाणी तुम्ही एखादा साऊंड बसवून त्यामध्ये नारळ पाण्याची किंमत असलेली ऑडिओ क्लिप लावू शकता जेणेकरून तुम्हाला ग्राहकांना बोलावण्यासाठी मोठ्याने आवाज देण्याची गरज पडणार नाही.
– नारळ पाण्याची विक्री करत असताना त्या ठिकाणी कॅश स्वीकारणे व्यतिरिक्त ऑनलाईन मनी ट्रान्सफर करण्यासाठी देखील स्कॅनर ठेवले पाहिजे जेणेकरून ज्या ग्राहकांकडे कॅश उपलब्ध नसेल किंवा सुटे पैसे नसतील त्यांच्यासाठी गैरसोय होणार नाही.
– नारळ पाण्याची जास्त विक्री होण्यासाठी समजा, एका नारळाची किंमत तीस रुपये असेल तर दोन नारळ पन्नास रुपयांना मिळतील अशा काही ऑफर्स देखील तुम्ही ठेवू शकता.
– तुम्ही ज्या ठिकाणी नारळ पाण्याची विक्री करतात त्या ठिकाणी नेहमी स्वच्छता राखली पाहिजे.
अशाप्रकारे नारळ पाणी विक्री बिजनेस अगदी कमी गुंतवणुकीमध्ये देखील सुरू केला जाऊ शकतो.
हल्ली तर अगदी शाळेतील मुला मुलींपासून सर्वांना कम्प्युटरचे शिक्षण दिले जाते. एकदा की कम्प्युटर यायला लागलं की हळूहळू इंटरनेट बद्दल देखील माहिती आपोआपच होऊ लागते. शाळेमध्ये लहानग्यांना शिकवले जायचे की, कंप्यूटर वरील आपला पत्ता म्हणजे ई-मेल. अगदी शाळेपासूनच ई-मेल ची ओळख विद्यार्थ्यांना होते आणि हाच ईमेल आयडी कॉलेज पासून तर अगदी पुढील आयुष्यात देखील वेळोवेळी उपयोगी पडतो आणि आवश्यक असतो. कुठलाही फॉर्म भरत असताना त्यावर ईमेल आयडी टाकणे गरजेचे झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रिझ्युम बनवत असताना त्यावर देखील ईमेल आयडी टाकणे आवश्यक असते. ईमेल फक्त एवढ्या पुरताच मर्यादित राहिलेला नसून डिजिटल मार्केटिंग मध्ये त्याचा समावेश झालेला आहे.डिजिटल मार्केटिंग मधील एक प्रकार म्हणजेच ई-मेल मार्केटिंग. तर आज आपण ई-मेल मार्केटिंग बद्दल जाणून घेणार आहोत ….
➡️ई-मेल मार्केटिंग म्हणजे नक्की काय ?
What is email marketing ?
एखाद्या व्यवसायाच्या उत्पादनांची तसेच सर्विसेसची मार्केटिंग ई-मेल द्वारे करणे म्हणजेच ईमेल मार्केटिंग होईल. ई-मेल मार्केटिंग करण्यासाठी ई-मेल नेटवर्क तयार केले जाते. ईमेल द्वारे लोकांना एखाद्या प्रॉडक्ट बद्दल तसेच सर्विसेस बद्दल माहिती दिली जाते तसेच वेळोवेळी काही ऑफर्स असतील तर त्याबद्दल ईमेल द्वारे कळवले जाते आणि तेथून ज्यांना प्रॉडक्टची तसेच सर्विसेसची खरेदी करायचे आहे ते करू शकतात.
ई-मेल मार्केटिंगचा मुख्य उद्देश उत्पादनांची तसेच सर्विसेसची मार्केटिंग आणि प्रमोशन करणे असा आहे.
➡️ई-मेल मार्केटिंग कशी करावी ?
How to do email marketing ?
✔️ सर्वप्रथम ई-मेल आयडी कलेक्ट करून ई-मेल आयडी लिस्ट तयार करा. तुमच्या केंद्रित ग्राहकांचे ईमेल आयडी मिळवणे गरजेचे आहे. मार्केटमधील काही कंपन्यांकडून तुम्ही ई-मेल आयडी लिस्ट मिळवू शकता.
✔️ त्यानंतर ई-मेल व्यवस्थित रित्या डिझाईन करणे गरजेचे आहे. ई-मेल मध्ये तुम्हाला ज्या उत्पादनांची किंवा सर्विसेस विक्री करायची आहे त्याबद्दल अचूक माहिती टाका तसेच संबंधित इमेजेस ॲड करा. ई-मेल अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करा किंवा काही रेडीमेड टेम्प्लेट्सचा देखील तुम्ही वापर करू शकता.
✔️ ई-मेल मधील कंटेंट तसेच ई-मेलचा सब्जेक्ट पर्सनलाईजड करण्याचा प्रयत्न करा म्हणजे ज्यांना मेल करणारा त्यांच्या नावे संपूर्ण कन्टेन्ट तयार करण्याचा प्रयत्न करा आणि त्या ग्राहकाच्या पास्ट ब्राउझिंग हिस्टरी वरून ग्राहकाला हवे असलेले उत्पादने तसेच सर्विसेस बद्दल माहिती देऊ शकता.
✔️ लोकांना ई-मेल करत असताना ई-मेल जास्त वेळा करू नये ,याची देखील काळजी घेतली पाहिजे कारण जास्त वेळा ई-मेल केल्यामुळे लोकांना इरिटेट होऊ शकते आणि यामुळे तुम्ही पाठवत असलेल्या ई-मेल कडे दुर्लक्ष होऊ शकते म्हणून ई-मेल योग्य तितक्या वेळी पाठवणे योग्य राहील.
✔️ ज्यांना ई-मेल केला आहे त्यांचा फॉलो अप घेणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ एखाद्या ग्राहकाने एखादा प्रॉडक्ट कार्ट मध्ये ठेवलेला असेल तर त्याबद्दल रिमाइंड करून देणे जेणेकरून ग्राहक त्या प्रॉडक्टची खरेदी करू शकेल.
जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर
✔️ ई-मेल मार्केटिंग मुळे तुम्ही पर्सनलाईजड कन्टेन्ट तयार करू शकता.
✔️ ई-मेल मार्केटिंग द्वारे विविध सर्व्हेज घेऊ शकतात तसेच ग्राहकांकडून फीडबॅक देखील मिळवू शकतात.
✔️ ई-मेल मार्केटिंग मुळे तुमच्या उत्पादनांची तसेच सर्विसेसची माहिती ग्राहकांपर्यंत वेळोवेळी ई-मेल द्वारे पोहोचवून तुमच्या सेल्स मध्ये वाढ करू शकता.
✔️ ई-मेल मार्केटिंग तुमच्या वेबसाईटवरील ट्रॅफिक देखील वाढू शकते.
✔️ ई-मेल मार्केटिंग मुळे तुम्हाला मिळत असलेल्या लीड्स मध्ये देखील वाढ होऊ शकते.
✔️ ई-मेल मार्केटिंग मुळे तुम्ही तुमच्या टार्गेट ग्राहकांना मेल करून उत्पादनांची तसेच सर्विसेसची माहिती देऊन सेल्स तर वाढू शकतातच त्याच बरोबर ग्राहकांशी संभाषण देखील साधता येईल.
✔️ तुमच्याकडे तुम्ही स्वतः बनवलेली टारगेटेड ग्राहकांची लिस्ट असेल तसेच ई-मेल मार्केटिंग हे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम माध्यम आहे.
✔️ तुम्ही कधी प्रॉडक्टवर किंवा सर्विसेस वर काही ऑफर्स देणार असाल तर त्याची माहिती ग्राहकांपर्यंत ई-मेल मार्केटिंग द्वारे जाऊ शकता.
✔️ ई-मेल मार्केटिंग प्रॉडक्ट तसेच सर्विसेस मार्केटिंग करण्यासाठी आणि प्रमोशन करण्यासाठी उत्तम माध्यम आहे.
ऑनलाईन पद्धतीने इन्कम मिळवण्याचा मार्ग : इंस्टाग्राम
दिवसेंदिवस सोशल मीडिया युझर्सचे प्रमाण वाढत चालले आहे. सोशल मीडिया फक्त मनोरंजनाचे साधन राहिलेले नसून सोशल मीडियाचा मार्केटींग साठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो,तसेच सोशल मीडिया मुळे आपल्याकडे असलेले कौशल्ये जगासमोर आणण्यास मदत होते आणि ह्याच सोशल मीडियाचा उपयोग करून ऑनलाईन पद्धतीने इन्कम देखील कमावला जाऊ शकतो … होय…इन्कम कमावला जाऊ शकतो.सोशल मीडिया पैकी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे इंस्टाग्राम.
✔️इंस्टाग्राम वरून पैसे कमावण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे –
In order to earn money from Instagram, it is necessary to keep in mind the following points –
👉 कशासंबंधीत इंस्टाग्राम अकाउंट ओपन करायचे आहे Find your niche –
तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल अधिक इंटरेस्ट आहे त्याविषयीचे पोस्ट, व्हिडिओज किंवा माहिती इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करू शकता.फोटोग्राफी,प्रवास,फॅशन, संगीत, मनोरंजन, फिटनेस, बिझनेस तसेच टेक्निकल, रेसिपीज यांसारख्या विषयांवर तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट वर माहिती शेअर करू शकता.
👉 इंस्टाग्राम अकाउंट वरील फॉलोवर्स वाढवा –
Increase Followers on Instagram Account –
इंस्टाग्राम अकाउंट ओपन करून झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंस्टाग्राम अकाउंट वरील फॉलोवर्स वाढवणे. इंस्टाग्राम वरील फॉलोवर्स वाढवण्यासाठी इंस्टाग्राम अकाउंट वर दररोज नियमितपणे पोस्ट्स अपलोड करणे गरजेचे आहे जेणेकरून इंस्टाग्राम अकाउंट वरील फॉलोवर्स हळूहळू वाढू लागतील.
👉 पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे –
Boost post –
इंस्टाग्राम वर तुम्ही शेअर करीत असलेली पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर
✔️ इंस्टाग्राम वरून कोणत्या मार्गाने पैसे कमावता येऊ शकतात ?
How to earn money from Instagram?
👉 इन्फ्ल्युएन्सर बनून उत्पादनांची विक्री करण्यासाठी जाहिरात करू शकता –
Become an Influencer –
वेगवेगळ्या ब्रँड्स सोबत पार्टनरशिप किंवा कोलाबरेशन करून त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी जाहिरात करू शकता. त्यासोबतच त्या प्रोडक्टची लिंक किंवा वेबसाईट शेअर करू शकता जेणेकरून जे फॉलोवर्स किंवा ग्राहक असतील त्यांना तो प्रॉडक्ट खरेदी करता येईल.
👉 ऍफिलिएट मार्केटिंग –
Affiliate marketing –
ऑनलाइन पद्धतीने इनकम मिळवण्यासाठी अफिलिएट मार्केटिंग हा एक चांगला पर्याय आहे. ऍफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वर ज्या प्रोडक्टची विक्री करायची आहे त्या प्रॉडक्टशी संबंधित फोटो किंवा व्हिडिओ शेअर करून त्या प्रॉडक्टची जाहिरात करू शकता आणि सोबतच तो प्रॉडक्ट कुठून खरेदी करायचा याची लिंक देखील देऊ शकता.ऍफिलिएट मार्केटिंग मध्ये जेव्हा हा प्रॉडक्ट एखादा ग्राहक त्या लिंक वरून खरेदी करतो त्यावेळी कमिशन स्वरूपात काही रक्कम मिळते.
👉 इंस्टाग्राम वर शॉप सुरू करू शकता –
You can start a shop on Instagram –
तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वरील फॉलोवर्स वाढल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या उत्पादनांचे शॉप इंस्टाग्राम वर सुरू करू शकता. फॉलोवर्स जास्त असल्याकारणाने ग्राहक देखील जास्त मिळण्याची शक्यता वाढेल.
👉 इंस्टाग्राम प्रशिक्षक किंवा सल्लागार व्हा.
Become an Instagram coach or consultant –
तुम्हाला जर इंस्टाग्राम वर फॉलोवर्स कसे वाढवायचे तसेच इंस्टाग्राम वरून इन्कम कशाप्रकारे मिळवायचा याबद्दलचे ज्ञान अवगत झाले असेल आणि तुम्ही त्यामध्ये तज्ञ बनले असाल तर तुम्ही इंस्टाग्राम प्रशिक्षक किंवा सल्लागार म्हणून इतरांना त्याबद्दल प्रशिक्षण देऊन त्याद्वारे इन्कम कमावू शकता.
👉 इंस्टाग्राम अकाउंट वर फोटोंची विक्री करणे –
Selling photos on Instagram account –
तुमच्याकडे उच्च दर्जाचा कॅमेरा असेल किंवा चांगल्या क्वालिटीचे फोटो येणारा मोबाईल असेल तर आणि तुम्हाला उत्तम फोटोग्राफी येत असेल तर चांगल्या गुणवत्तेचे फोटो काढून हे फोटोज इंस्टाग्राम च्या साह्याने सेल करू शकता आणि त्याद्वारे इन्कम कमावू शकता.
पूर्वी तर लोक आरोग्याबाबत जागृत होतेच परंतु हल्ली लोक आरोग्याबद्दल जास्तीत जास्त काळजी घेताना दिसत आहेत. त्यामुळेच लोक रोजच्या रोज व्यायाम करणे, फळांचे सेवन करणे तसेच योग्य तो आहार घेणे यांसारखे गरजेचे आणि महत्त्वपूर्ण नियम पाळताना दिसतात. परंतु आजच्या धावपळीच्या जगामध्ये काही लोकांना दैनंदिन क्रियेसाठी सुद्धा व्यवस्थितरित्या वेळेचे व्यवस्थापन करावे लागते. उदाहरणार्थ, फळांचे सेवन करत असताना फळांचे ज्यूस घेतले तर थोडासा का होईना वेळ देखील वाचतो आणि कमी कालावधीमध्ये जास्त फळे पोटामध्ये देखील जातात. म्हणूनच जर एखाद्या चांगल्या ठिकाणी ज्यूस सेंटर सुरू केले तर हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. चला तर बघूयात हा व्यवसाय कसा सुरू करता येऊ शकतो …
➡️ ज्यूस सेंटर सुरू करण्यासाठी व्यवसाय योजना तयार करा –
Create business plan for juice centre business –
कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना व्यवसाय योजना तयार केल्यामुळे भविष्यात येणाऱ्या काही अडचणी नक्कीच कमी होतात आणि म्हणूनच व्यवसाय योजना तयार करणे महत्त्वाचे असते. ज्यूस सेंटर सुरू करत असताना ते कोठे सुरू करणार आहे, ज्यूस सेंटर साठी लागणारा कच्चामाल कुठून येणार आहात तसेच ज्यूस सेंटर साठी आवश्यक लायसन्स तसेच या व्यवसायासाठी तुम्ही किती गुंतवणूक करणार आहात यांसारख्या विविध गोष्टींचा समावेश व्यवसाय योजनेमध्ये होऊ शकतो.
➡️ ज्यूस सेंटर सुरू करण्यासाठी योग्य ते ठिकाण निवडा –
Choose right location to start choose centre business –
▶️ कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना योग्य ठिकाण निवडणे महत्त्वाचे असते कारण चुकीचे ठिकाण निवडले गेल्यास तुमचा व्यवसाय ठप्प होऊ शकतो परंतु जर योग्य ठिकाणी व्यवसाय सुरू केला तर हळूहळू का होईना परंतु तो वाढीस लागू शकतो.
▶️ शक्यतो ज्यूस पिणारे लोक आरोग्याबाबत जास्त जागरूक असतात आणि म्हणूनच तुम्ही जिम, योगा क्लासेस जवळ तसेच इतर जे काही वेलनेस बिजनेस असतात अशा ठिकाणी तसेच वॉकिंग ट्रॅक जवळ ज्यूस सेंटर सुरू करू शकता.
▶️ तसेच ज्यूस सेंटर सुरू करत असताना जास्त गर्दीचे ठिकाणे म्हणजेच शाळा, कॉलेजेस, नाट्यगृहे तसेच चित्रपटगृहे, हॉस्पिटल्स, बस स्टॅन्ड ,रेल्वे स्टेशन , गार्डन्स अशी ठिकाणे देखील निवडू शकता.
▶️ तसेच तुम्ही अशा ठिकाणी ज्यूस सेंटर सुरू करा ज्या ठिकाणी ग्राहकांना त्यांची वाहने पार्क करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असेल कारण बऱ्याचदा पार्किंगसाठी जागा नसल्याकारणाने ग्राहक येत नाही.
▶️ सुरुवातीला जर तुम्ही कमी गुंतवणूक करणार असाल तर छोट्याशा स्टॉल पासून सुरुवात करू शकता आणि कालांतराने व्यवसाय जास्त वाढू लागेल त्या पद्धतीने तुम्ही त्या व्यवसायाचे रूपांतर मोठ्या व्यवसाय मध्ये करू शकता.
➡️ ज्यूस सेंटर सुरू करण्यासाठी लागणारा आवश्यक कच्चामाल आणि इतर उपकरणे –
Raw materials and other equipment required to start a juice center –
▶️ ज्यूस सेंटर सुरू करण्यासाठी लागणारा मुख्य कच्चामाल म्हणजे ताजी फळे. तुम्ही ताजी फळे एखाद्या फळांच्या होलसेलर कडून किंवा थेट शेतकऱ्याकडून विकत घेऊ शकता.
▶️ इतर उपकरणे –
– ज्यूसर्स
– व्यावसायिक ब्लेंडर
– रेफ्रिजरेटर्स
– बर्फ मशीन
– मेजरींग टूल्स
– कटिंग बोर्ड
– स्टोरेज कंटेनर
– ग्लासेस आणि स्ट्रॉ
– नॅपकिन्स
– ट्रे
– चमचे
– स्टूलस्,खुर्च्या आणि टेबल
– आणि इतर आवश्यक भांडी
– कॅश अँड बिलिंग मशीन
– ज्यूस सोबत ड्रायफ्रूट्स किंवा आईस्क्रीम देखील देऊ शकता.
जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर
How much does a potato twister cost in India?What is a potato twister called?
What is the price of potato twister frying machine?How much does a potato machine cost?
Is potato business profitable?
पोटॅटो ट्विस्टर्स बिजनेस | Potato Twister business –
बटाट्यापासून वेफर्स, बटाट्याच्या पापड्या, फिंगर चिप्स, बटाटा चिवडा यांसारखे अनेक खाद्यपदार्थ बनवता येतात, परंतु हल्ली प्रसिद्ध असलेला आणि बटाट्यापासून बनवता येणारा खाद्यपदार्थ म्हणजे पोटॅटो ट्विस्टर्स.पोटॅटो ट्विस्टर्स हा खाद्यपदार्थ अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. अशातच जर तुम्हाला नवीन काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर पोटॅटो ट्विस्टर्स बनवण्याचा व्यवसाय उत्तम व्यवसाय ठरू शकतो. चला तर जाणून घेऊयात या व्यवसायाबद्दल अधिक माहिती …..
✔️पोटॅटो ट्विस्टर्स हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणते मटेरियल आवश्यक आहे ?
What materials are required to start a Potato Twisters business?
– पोटॅटो ट्विस्टर्स हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्य कच्चामाल आहे बटाटा.
– मैदा
– लाल मिरची पावडर
– व्हिनेगर
– कॉर्नफ्लॉवर
– चाट मसाला
– मीठ
– पाणी
– तेल
– पोटॅटो ट्विस्टर्स बनवण्यासाठी आवश्यक मशीन
– बांबू स्टीक्स
– फ्रायर्स
– कढई, झाऱ्या किंवा इतर छोटी मोठी आवश्यक भांडी
– सर्विंग साठी प्लेट्स किंवा इतर आवश्यक सामग्री
( विविध फ्लेवर्सनुसार पोटॅटो ट्विस्टर बनवण्यासाठी लागणाऱ्या इन्ग्रेडियंट्स मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो )
✔️पोटॅटो ट्विस्टर्स व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या मशिन्स लागतात ?
What machines are needed to start a Potato Twisters business?
▶️पोटॅटो ट्विस्टर्स मशीन दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे –
– मॅन्युअल पोटॅटो ट्विस्टर मशीन हे इलेक्ट्रॉनिक पोटॅटो ट्विस्टर मशीन पेक्षा स्वस्त असते. ज्यांना कमी गुंतवणुकीमध्ये पोटॅटो ट्विस्टर बनवण्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा लोकांसाठी मॅन्युअल पोटॅटो ट्विस्टर मशीन घेणे योग्य राहील.
– तसेच जर हा व्यवसाय छोट्याशा स्टॉलवर सुरू करणार असाल ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीची सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी मॅन्युअल पोटॅटो ट्विस्टर मशीन वापरणे योग्य राहील.
– मॅन्युअल पोटॅटो ट्विस्टर मशीन हे साधारणतः १००० रुपयांपासून उपलब्ध आहे परंतु कॉलिटी नुसार या मशीनची किंमत बदलत जाते.
– मॅन्युअल पोटॅटो ट्विस्टर मशीन हे ऑफलाइन पद्धतीने तुम्ही तुमच्या लोकल मार्केट मधून खरेदी करू शकता किंवा हे मशीन विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे जसे की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ,इंडिया मार्ट .
– ऑटोमॅटिक पोटॅटो ट्विस्टर मशीन हे मॅन्युअल पोटॅटो ट्विस्टर मशीन पेक्षा महाग असते. ज्यांना या व्यवसायामध्ये जास्त गुंतवणूक करायची आहे त्यांनी ऑटोमॅटिक पोटॅटो ट्विस्टर मशीन घेतलेले योग्य राहील, कारण या मशीन मुळे पोटॅटो ट्विस्टर जास्त प्रमाणामध्ये बनत जातील आणि वेळ देखील कमी लागेल.
– ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीची सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी तुम्ही ऑटोमॅटिक पोटॅटो ट्विस्टर मशीन वापरू शकता. उदाहरणार्थ कॅफे, हॉटेल्स ,फूड कार्ट
– स्टेनलेस स्टील ऑटोमॅटिक पोटॅटो ट्विस्टर मशीन हे इंडिया मार्ट वर 35 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
– तसेच ऑटोमॅटिक पोटॅटो ट्विस्टर मशीन हे तुम्ही तुमच्या लोकल मार्केट मधून सुद्धा विकत घेऊ शकता.
– जर पोटॅटो ट्विस्टर बनवण्याचा व्यवसाय हा कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करायचा असेल तर पोटॅटो ट्विस्टर फ्रायर ऐवजी पोटॅटो ट्विस्टर तळण्यासाठी कढई आणि झाऱ्याचा उपयोग करू शकता.
– जर पोटॅटो ट्विस्टर बनवण्याच्या व्यवसायामध्ये जास्त गुंतवणूक करण्याची तयारी असेल तर पोटॅटो ट्विस्टर फ्रायर विकत घेऊ शकता.
– पोटॅटो ट्विस्टर फ्रायरच्या किमती त्याच्या लिटरच्या कॅपॅसिटीनुसार बदलतात.
उदाहरणार्थ,
– Kobbey इलेक्ट्रिक डीप फ्रायर मशीन जे कॉपर हीटर सोबत आणि टेंपरेचर कंट्रोल सोबत येते त्याची कॅपॅसिटी सहा लिटर असून हे मशीन ॲमेझॉन वर सध्या ३,९४९ रुपयांना उपलब्ध आहे.
पोटॅटो ट्विस्टर हल्ली विविध फ्लेवर्स मध्ये उपलब्ध आहे जसे की प्लेन / सॉल्टेड पोटॅटो ट्विस्टर, पेरी पेरी पोटॅटो ट्विस्टर, चॉकलेट पोटॅटो ट्विस्टर, चाट पोटॅटो ट्विस्टर, मेयोनीज पोटॅटो ट्विस्टर.
पुढील विविध पदार्थ वापरून वेगवेगळ्या फ्लेवरचे पोटॅटो ट्विस्टर बनवतात येतात.
– स्प्रिंकल : मीठ,चाट मसाला, मॅगी मसाला,पेरी पेरी मसाला असे विविध स्प्रिंकल्स वापरून वेगवेगळ्या चवीचे पोटॅटो ट्विस्टर बनवता येतात.
– मेयोनीज: व्हेज मेयोनीज तसेच तंदुरी मेयोनीज या प्रकारचे विविध मेयोनीजच्या सहाय्याने चविष्ट असे पोटॅटो ट्विस्टर बनवू शकतात.
– विविध सॉसेस : टोमॅटो सॉस, चिली सॉस तसेच शेजवान सॉस यांसारख्या विविध सॉसेसचा उपयोग करून वेगवेगळी चव असणारे पोटॅटो ट्विस्टर सर्व्ह करू शकता.
▶️ पोटॅटो ट्विस्टर बनवण्याची रेसिपी –
– सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुऊन कोरडे करून घ्या .
– त्यानंतर पोटॅटो ट्विस्टर बनवण्याच्या मशीनच्या सहाय्याने बटाट्याचे रूपांतर ट्विस्टर मध्ये करून घ्या म्हणजेच बटाट्याचे स्लाईसेस एका बांबू स्टिक मध्ये आपल्याला उपलब्ध होतील.
– त्यानंतर बटाट्यामध्ये उपलब्ध असलेले स्टार्च काढून टाकण्यासाठी मिठाच्या पाण्यामध्ये हे पोटॅटो ट्विस्टर थोडा वेळ तसेच राहू द्या. असे करायचे नसल्यास बटाटे धुवून झाल्यानंतर बटाट्याची साल काढून बटाटे काही वेळ पाण्यामध्ये बुडवून ठेवू शकता.
– वाटीभर दह्यामध्ये एक चमचा मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घ्या.
– त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट आणि हळद टाकून घ्या.
– त्यानंतर यामध्ये धने पावडर ,जिरे पावडर आणि कसुरी मेथी आणि एक चमचाभर आलं लसूण पेस्ट टाका.
– आता हे मिश्रण व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्या त्यामध्ये कन्सिस्टन्सी अड्जस्ट करण्यासाठी आवश्यकतेनुसार दही ऍड करू शकता.
– या मिश्रणामध्ये एक चमचाभर विनेगर टाका.
– आता यामध्ये पोटॅटो ट्विस्टर बुडवा आणि नंतर तुमच्याकडे पोटॅटो ट्विस्टर फ्रायर उपलब्ध असेल तर त्याच्या सहाय्याने तळून घ्या आणि जर हे उपलब्ध नसेल तर कढईमध्ये मंद आचेवर पोटॅटो ट्विस्टर तळून घ्या.
– यानंतर तुम्हाला ज्या फ्लेवरचे पोटॅटो ट्विस्टर बनवायचे आहे तो मसाला यावर स्प्रिंकल करा. उदाहरणार्थ, तुम्ही यावर चाट मसाला स्प्रिंकल करू शकता.
– तयार झालेले पोटॅटो ट्विस्टर तुम्ही मेयोनीज आणि विविध सॉसेस सोबत सर्व्ह करू शकता.
( पोटॅटो ट्विस्टर वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाऊ शकतात )
What is the profit margin in a potato twister business?
– साधारणतः एक किलो बटाटे वीस ते तीस रुपये किलो प्रमाणे मिळू शकतात. जर तुम्ही जास्त बटाटे खरेदी केले तर आपण असे मानू की वीस रुपये किलो प्रमाणे बटाटे मिळाले.
– या एक किलो बटाट्यामध्ये मध्यम आकाराचे दहा बटाटे बसतील.
– म्हणजेच एक बटाटा दोन रुपयाला पडला.
– त्यानंतर एक पोटॅटो ट्विस्टर बनवण्यासाठी एक बांबू स्टिक लागेल एका बांबू स्टिक ची किंमत एक रुपये.
– त्यानंतर पोटॅटो ट्विस्टर बनवण्यासाठी लागणारे बॅटर, लेबर आणि इलेक्ट्रिसिटी मिळून तीन रुपये लागतील असे पकडून.
– म्हणजेच एक पोटॅटो ट्विस्टर बनवण्यासाठी साधारणतः सहा रुपये लागू शकतात.
– एक पोटॅटो ट्विस्टर कमीत कमी २० रुपयापासून तुम्ही विकू शकता. पोटॅटो ट्विस्टरच्या फ्लेवरनुसार त्याच्या किमतीमध्ये तुम्ही बदल करू शकता.
– म्हणजेच जर तुम्ही एका दिवसाला २० रुपयांचे शंभर पोटॅटो ट्विस्टर विकले तर दिवसाला २००० रुपये आणि महिन्याला ६०,००० रुपये कमावू शकता. त्यामध्ये बेचाळीस हजार नफा कमावू शकता.
– तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्यानुसार बटाट्याच्या किमतीमध्ये तसेच पोटॅटो ट्विस्टर विकण्याच्या किमतीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो. परंतु तरीदेखील या बिझनेस मध्ये चांगला नफा मिळवला जाऊ शकतो.